Maharashtra

Chandrapur

CC/20/15

Shri.Dharmendra Udaramji Hawelikar - Complainant(s)

Versus

HDFCBank Limited Through Branch Manager Bhadravati - Opp.Party(s)

P.P. Tathe

06 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/15
( Date of Filing : 25 Feb 2020 )
 
1. Shri.Dharmendra Udaramji Hawelikar
Guru Nagar,Bhadravati Tah.Bhandravati Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. H.D.F.C.Bank Limited Through Branch Manager Bhadravati
Bhadravati Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. H.D.F.C.Bank Limited Through Divisional Manager
Divisional Office,Ground Floor,Fidvi Tower Opposite Sarafa Chember,Mount Road,Sadar Nagpur Tah.Dist.Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
3. H.D.F.C.Bank Limited Through Mukhya Karyakari Adhikari
Mukhya Karyalay 6/242, Senapati Bapat Marg Loar Parel,Mumbai 400013
Mumbai
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 06 Feb 2023
Final Order / Judgement

    ::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                  (पारीत दिनांक ०६/०२/२०२३)

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, कलम १४, सह कलम १२  अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हा भद्रावती येथील रहिवासी असून ठोक व चिल्‍लर विक्रीचा व्‍यवसाय करतो. सन २०१२ चे दरम्‍यान विरुध्‍द पक्ष शाखा भद्रावती येथे सुरु झाली. विरुध्‍द पक्ष यांच्‍या अधिका-यांच्‍या सांगण्‍यावरुन तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे बचत खाते क्रमांक २७४६१०००००१२३० उघडले. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍यानंतर क्रेडिट कार्ड घेण्‍याबाबत कळवून सांगितले की, क्रेडिट कार्ड मोफत दिल्‍या जाईल व जेव्‍हा कार्डचा वापर होईल तेव्‍हा त्‍यावर शुल्‍क आकारण्‍यात येईल. यावर विश्‍वास ठेवून तक्रारकर्त्‍याने क्रेडिट कार्डची आवश्‍यकता नव्‍हती तरी विरुध्‍द पक्षाकडून घेतले परंतु त्‍या कार्डचा कोणताही वापर केला नसून त्‍यावर असलेल्‍या पीनचाही वापर केला नाही. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची जबरदस्‍ती पॉलिसी काढली व त्‍याच्‍या बचत खात्‍यातून पॉलिसीच्‍या Installment ची रक्‍कम कपात करणे सुरु केले व त्‍यासोबत तक्रारकर्त्‍याची आर.डी. सुध्‍दा काढून त्‍याची सुध्‍दा Installment ची रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून कपात करणे चालू केले. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची इच्‍छा नसतांना विरुध्‍द पक्ष क्रमांक १ मार्फत जबरदस्‍तीने कामे करण्‍याचा तगादा लावल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे असलेले बचत खाते पॉलिसी व आर.डी. बंद केली व आर.डी. व पॉलिसी जमा असलेली रकमेची मागणी केली परंतु ती रक्‍कम विरुध्‍द पक्ष यांनी दिली नाही. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांचे क्रेडिट कार्डच्‍या थकीत रकमेची मागणी करु लागले परंतु तक्रारकर्त्‍याने क्रेडिट कार्ड चा कोणताही वापर नसल्‍यामुळे क्रेडिट कार्डची रक्‍कम देण्‍यास नकार दर्शविला व त्‍याबाबत विरुध्‍द पक्षाच्‍या नागपूर कार्यालयात कळविले परंतु त्‍यानंतरही विरुध्‍द पक्ष यांन त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यामार्फत एकूण रक्‍कम रुपये १७,५८९.६८/- तक्रारकर्त्‍याकडे थकीत असल्‍याचे कळविले. त्‍यावर तक्रारकर्त्‍याने उत्‍तर पाठविले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला खाते उताराची मागणी करुनही दिला नाही. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असून विरुध्‍द पक्षाकडून दोषमुक्‍त सेवा अपेक्षीत आहे परंतु विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकत्‍याप्रती अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍यामुळे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे मागणी केली आहे की, क्रेडिट कार्ड संबंधात विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ ने तक्रारकर्त्‍याकडे केलेली मागणी पूर्णता चुकीची व बेकायदेशीर जाहीर करावे तसेच विरुध्‍द पक्षाकडे जमा असलेली इंन्‍शुरस व आर.डी.ची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष यांनी परत करावी तसेच क्रेडिट कार्ड थकीत रकमेसंदर्भात तक्रारकर्त्‍याचे नावे सिबील रिपोर्ट मध्‍ये घेतलेली नोंद कमी करण्‍यासंदर्भात आदेश व्‍हावेत तसेच तक्रारकर्त्‍याला झालेला शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये २,००,०००/- देण्‍याचे आदेश व्‍हावेत.
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍यात आले.
  5. विरुध्‍द पक्षांनी तक्रारीतील कथनांचे खंडन करुन विशेष कथनात नमूद केले की, सदर तक्रार मुदतबाह्य असून सदर प्रकरणात कारण सन २०१४ ला घडले व जानेवारी २०१५ ला विरुध्‍द पक्ष यांनी पॉलिसीची रक्‍कम परत केली तरीसुध्‍दा  तक्रारकर्त्‍याने पञ दिनांक २२/११/२०१७ रोजी दिले. सदरहू घटनेला कारण दिनांक २२/११/२०१७ पासून घडले असे गृहीत धरले व प्रकरण मुदतबाह्य असल्‍याचे सिध्‍द होते. त्‍यामुळे सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याने एच.डी.एफ.सी. इरगो इंन्‍शुरन्‍स  पॉलिसीसाठी फोन बॅंकीगव्‍दारे जुन २०१४ मध्‍ये अर्ज केला होता आणि तो स्‍पीड पोस्‍टव्‍दारा त्‍यांना पाठविण्‍यात आले. सदरहू विमा रक्‍कम रुपये १४,४८५/- होती जी तक्रारकर्त्‍याच्‍या  क्रेडिट कार्डवर ई.एम.आय. मध्‍ये रुपांतरीत झाली. नंतर सहा महिण्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीनुसार डिसेंबर २०१४ मध्‍ये विमा पॉलिसी रद्द करण्‍यात आली आणि त्‍याच्‍याने क्रेडिट कार्डव्‍दारे डेबीट केलेली पॉलिसीची रक्‍कम रद्द केल्‍याने त्‍याच्‍या कार्डवर परत केले गेले. त्‍यामुळे पॉलिसीची रक्‍कम परत करण्‍याचा प्रश्‍नच येत नाही हे सर्व विमा व्‍यवहार तक्रारकर्त्‍याच्‍या क्रेडिट कार्डच्‍या विवरणमध्‍ये आहेत. विरुध्‍द पक्ष पुढे नमूद करतात की, क्रेडिट कार्ड ऑटो पे अॅक्‍टीव्‍हेशन तक्रारकर्त्‍याने स्‍वतः प्राप्‍त केले होते आणि १००% केलेल्‍या  रकमेसाठी त्‍याच्‍या बचत खात्‍यातून थेट डेबीट करण्‍यासाठी कार्ड अर्जामध्‍ये  त्‍याचा उल्‍लेख आहे व त्‍यावर तक्रारकर्त्‍याची सही आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या  क्रेडिट कार्डची थकीत थकबाकी नियोजीत तारखेपूर्वी कधीच भरली नाही त्‍यामुळे विरुध्‍द पक्षांनी क्रेडिट कार्डच्‍या शर्ती नुसार थकबाकीवर शुल्‍क व व्‍याज आकारले व तक्रारकर्त्‍याच्‍या कार्ड वापराची मासीक विवरणपञे जारी करण्‍यात येऊन ती तक्रारकर्त्‍याला पाठविण्‍यात आले. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार बीनबुडाची व विरुध्‍दपक्ष यांना ञास देण्‍याच्‍या हेतुने केलेली असल्‍यामुळे दंडासह खारीज करण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तऐवज, शपथपञ व लेखी युक्तिवाद तसेच विरुध्‍द पक्ष यांचे उत्‍तर, शपथपञ व लेखी युक्तिवाद व उभयपक्षांचे तोंडी युक्तिवाद वरुन  तक्रारीच्‍या निकालीकामी खालील मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्षे आणि कारणमीमांसा खालीलप्रमाणेआहे.

कारणमीमांसा

  1. प्रकरणातील तक्रारकर्ता व विरुध्‍दपक्ष ह्या दोन्‍हीपक्षाचे म्‍हणणे व दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता आयोगाच्‍या निर्देशनास येत आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्षाकडून क्रेडिट कार्ड घेतले व त्‍यावेळी ही बाब स्‍पष्‍ट होती की क्रेडिट कार्डचा वापर केल्‍यास विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याकडून शुल्‍क नियमानुसार आकारणार. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत त्‍यांनी क्रेडिट कार्डचा कोणताही प्रकारचा वापर केला नाही असे कथन केले परंतु विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याच्‍या उत्‍तरासोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केल्‍यास असे दिसून येत आहे की, तक्रारकर्त्‍याने एच.डी.एफ.सी. इरगो इंन्‍शुरन्‍स पॉलिसी विरुध्‍द पक्षाकडून जुन २०१४ मध्‍ये काढली होती. या पॉलिसीच्‍या विमा प्रिमीयमची रक्‍कम रुपये १४,४८५/- होती जी तक्रारकर्त्‍याच्‍या क्रेडिट कार्डवर महिन्‍यानुसार कपात होत होती परंतु विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत दाखल केलेल्‍या त्‍याच्‍या दस्‍तऐवज क्रमांक २ तक्रारकर्त्‍याने दिनांक २८/०६/२०१४ रोजी सदर पॉलिसी काही कारणास्‍तव रद्द केली व पॉलिसीची परतावा रक्‍कम विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला २०१५ मध्‍ये क्रेडिट कार्ड मध्‍ये परत केली. विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन ही बाब स्‍पष्‍ट होत आहे की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून घेतलेल्‍या पॉलिसीच्‍या प्रिमीयमचे भुगतान त्‍यांनी त्‍याचेजवळ असलेल्‍या क्रेडिट कार्ड मधून केलेले आहे व त्‍याप्रमाणे त्‍याचे केलेले व्‍यवहार विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजानुसार स्‍पष्‍ट होत आहे. तक्रारकर्ता  यांची स्‍वाक्षरी विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या क्रेडिट कार्डच्‍या अर्जावर असल्‍यामुळे क्रेडिट कार्ड सोबत असलेल्‍या अटी व शर्तीच्‍या अधीन राहूनच तक्रारकर्ता यांनी क्रेडिट कार्डची सुविधा घेतली होती असे आयोगाचे मत आहे. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना पोस्‍टाव्‍दारे त्‍याच्‍या खात्‍याचा खाते उतारा पाठविल्‍याचे दस्‍तऐवज त्‍यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवज यादी सोबत दाखल केलेले आहे. याशिवाय विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍यादस्‍त क्रमांक १ वर ऑटो पे अॅक्‍टीव्‍हेशन व्‍दारे तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातून थेट डेबिट करण्‍याची सुविधा घेतली असून त्‍यावर तक्रारकर्त्‍याची स्‍वाक्षरी आहे. वरी सर्व दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होत आहे की, तक्रारकर्त्‍याने क्रेडिट कार्डचा उपभोग केलेला आहे. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाकडून घेतलेल्‍या  क्रेडिट कार्डच्‍या शर्ती व नियमानुसार क्रेडिट कार्डचा उपयोग केल्‍यामुळे असलेली थकबाकी देणे लागतो, ही बाब स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे आयोगाच्‍या मते तक्रारकर्ता यांना विरुध्‍द पक्ष यांनी कोणतीही सेवेत न्‍युनता दिली नाही. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. १५/२०२० खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.