Complaint Case No. CC/22/147 | ( Date of Filing : 24 May 2022 ) |
| | 1. Smt.Sneha Sunil Tajane | C/o Newachand Sadashiv Salote Sirsi, T.Armori, Dist.Gadchiroli | Gadchiroli | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. H.D.F.C. Ergo General Insurance Company Ltd. Through Adhikrut Adhikari | 8 wa mala,Lila Business park, Andheri,Mumbai, T.Dist.Mumbai | Mumbai | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ०३/०५/२०२३) - तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ चे कलम ३५ सह ३८ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्तीचे मयत पती श्री सुनिल जगन्नाथ ताजणे यांनी दिनांक २४/०२/२०१७ रोजी एच.डी.एफ.सी. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीकडून रुपये ८,००,०००/- चे गृह कर्ज घेतले होते. विरुध्द पक्षाचे कार्यालयामार्फत या गृह कर्जाच्या अनुषंगाने दिनांक ९/३/२०१७ रोजी गृह कर्जाकरिता कर्ज घेणारी व्यक्ती तसेच त्यांचे वारस यांच्या मोठ्या आजाराकरिता अपघात आणि नोकरी संदर्भात विमा काढण्यात आला होता आणि त्याकरिता तक्रारकर्तीचे पतीने विमा प्रिमियम सुध्दा भरले होते. सदर विमा पॉलिसी दिनांक ०९/०३/२०१७ ते दिनांक ०८/०३/२०२२ पर्यंत वैध होती. तक्रारकर्तीचे पती यांचा दिनांक २६/०४/२०२१ रोजी कोविड-१९ मुळे मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष यांच्याकडे उपरोक्त विमासंदर्भात रक्कम मिळण्याकरिता आवश्यक दस्तावेजासह अर्ज केला परंतु विरुध्द पक्ष यांनी दिनांक १८/०७/२०२१ च्या पञान्वये तक्रारकर्तीच्या पतीचा कोविड-१९ मुळे मृत्यु झाला आणि तो संसर्ग असून करारनाम्यामधील आजारामध्ये मोडत नसल्यामुळे तक्रारकर्तीचा विमादावा नामंजूर केला. मयत सुनिल यांचा विमा फक्त कॅन्सर, शरीराच्या मोठ्या अवयवाच्या बदलीकरिता तसेच ह्दयाच्या बदलीकरिता असल्याचे पञान्वये कळविले होते. तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक ९/०३/२०१७ रोजी विमा काढलेला असून त्यांचा मृत्यु हा विमा पॉलिसी वैध असलेल्या कालावधीमध्ये झाला होता. तरी सुध्दा विरुध्द पक्ष यांनी पॉलिसीच्या अटीमध्ये हा आजार येत नाही या कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्तीप्रति न्युनतापूर्ण सेवादिली. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक ०७/०२/२०२२ रोजी विरुध्द पक्ष यांना अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठवून विम्याची रक्कम रुपये ८,३४,१४५/-ची मागणी केली. नोटीस प्राप्त होऊनसुध्दा विरुध्द पक्ष यांनी उत्तरही दिले नाही आणि त्याची पुर्तता सुध्दा केली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस विम्याची रक्कम रुपये ८,३४,१४५/- व्याजासह तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १५,०००/- द्यावे अशी प्रार्थना केली आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांचे विरुध्द नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष हजर होऊन त्यांनी लेखी उत्तर दाखल केले. त्यामध्ये मयत श्री सुनिल ताजणे यांची गृह सुरक्षा प्लस पॉलिसी विरुध्द पक्ष यांचेकडून काढली असून त्याचा पॉलिसी क्रमांक २९१८२०१७०२८५७०००००० हा आहे आणि कालावधी दिनांक ९/३/२०१७ ते ८/३/२०२२ पर्यंत असून पॉलिसी करिता मयत सुनिल ताजणे यांनी रुपये ३४,१४६/- चा प्रिमीयम दिला होता, हे मान्य केले असून पुढे आपल्या विशेष कथनात नमूद केले की, विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या पॉलिसीचे फायदे हे पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार मिळणार असून सदर पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या आजाराकरिताच त्याचा फायदा मिळणार होता. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्यानंतर तिने विमा दावा सोबत दाखल केलेल्या दस्तावेजानुसार त्यांचामृत्यु हा कोविड-१९ मुळे झाला होता व सदर पॉलिसीमध्ये या आजारामुळे मृत्यु झाल्यास विमा रक्कम/फायदे मिळणार नव्हते. कारण पॉलिसीच्या अटी व शर्ती मध्ये नमूद केलेल्या मोठ्या आजारामध्ये कोविड-१९ चा उल्लेख नाही. आणि तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा कोविड-१९ मुळे झाला आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा हा पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या सेक्शन ३ च्या अटी व शर्तीनुसार नामंजूर केला आणि तसे तक्रारकर्तीला दिनांक १८/७/२०२२ च्या पञान्वये कळविले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा हा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसारच नामंजूर केला आहे. सबब तक्रारकर्तीची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यत यावी.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ तसेच तक्रार, दस्तावेज व शपथपञ यांनाच तक्रारकर्तीचा लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसीस, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व लेखी उत्तरालाच त्यांचे शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस, उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद व परस्पर विरोधी कथनावरुन तक्रार निकालीकामी खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्यावरील कारणमीमांसा व निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष १. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ होय २. काय आदेश ॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्तीचे पती मयत सुनिल जगन्नाथ ताजणे यांनी दिनांक २४/०२/२०१७ रोजी एच.डी.एफ.सी. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन यांचेकडून रुपये ८,००,०००/- चे गृहकर्ज घेतले होते व त्या कर्जासंदर्भात विरुध्द पक्षाकडे प्रिमीयम रक्कम रुपये ३४,१४६/- चा भरणा करुन क्रमांक २९१८२०१७०२८५७०००००० ची होम सुरक्षा प्लस पॉलिसी घेतली होती व त्या पॉलिसीचा वैध कालावधी हा दिनांक ०९/०३/२०१७ ते दिनांक ०८/०३/२०२२ पर्यंत होता, याबाबत उभयपक्षात वाद नाही. तक्रारकर्ती ही मयत सुनिलची पत्नी असून कायदेशीर वारस आहे व त्याचे मृत्युनंतर विमा पॉलिसीची लाभार्थी असल्याने विरुध्द पक्षाची ग्राहक आहे, ही बाब निर्विवाद आहे. उपरोक्त पॉलिसी अंतर्गत Fire and allied perils, Burglary, Housebreaking and Theft, Major medical illness, Personal accident, Loss of job याबाबींची सुध्दा रिस्क समाविष्ट केलेली आहे. पॉलिसी अंतर्गत गृहकर्जा व्यतिरिक्त विमाकृत व्यक्तीला सुध्दा वैद्यकीय व इतर फायदे/लाभ मिळणार होते. तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक २६/०४/२०२१ रोजी कोरोनामुळे मृत्यु झाला व त्यानंतर तिने विरुध्द पक्षाकडे आवश्यक दस्तावेजासह उपरोक्त पॉलिसी अंतर्गत देय असलेली विमा दावा रक्कम मिळण्याकरिता अर्ज केला परंतु विरुध्द पक्ष यांनी पॉलिसी मध्ये दिलेल्या अटी व शर्तीनुसार कोरोना संसर्ग हा मोठ्या आजारामध्ये येत नाही या कारणास्तव नामंजूर केला. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा कोरोनामुळे झाला व तो पॉलिसीमध्ये दिलेल्या अटी व शर्तीमधील क्लॉज ३ मध्ये दिलेल्या Major Illness या मोठ्या आजारामध्ये मोडत नाही, या कारणास्तव नाकारला. परंतु तक्रारकर्तीचे पतीने उपरोक्त पॉलिसी ही दिनांक ०९/०३/२०१७ रोजी घेतली व तेव्हा कोरोना हा संसर्ग/आजारच नव्हता त्यामुळे तो पॉलिसीमधील मोठ्या आजारामध्ये समाविष्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पॉलिसीमधील दिलेल्या मोठ्या आजारामध्ये नमूद नव्हता म्हणजे कोरोना संसर्ग/आजार हा गंभीर व मोठा नव्हता असे म्हणता येणार नाही व ते योग्यही नाही. मार्च २०१९ मध्ये कोरोनाची साथ भारतासह जगभरात आली व ती महामारी असून जगभरात तेव्हा भयंकर साथीची परिस्थिती निर्माण होऊन त्याचा उद्रेक झाला होता व तेव्हा जगात त्या साथीवर/संसर्गावर औषधोपचार/लस देखील उपलब्ध नव्हती, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्या साथीच्या कालावधीत साथीने गंभीर स्वरुप धारण केले होते व त्यामध्ये मृत्यु होणा-यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. उपरोक्त पॉलिसी वैध असतांना त्या कालावधीतच तक्रारकर्तीचे मयत पती श्री सुनिल यांचा सुध्दा या कोरोना साथीनेच मृत्यु झाला व तो आजार/संसर्ग हा मोठा होता व आहे आणि केंद्र शासनाने कोरोना हा आजार विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्याचे नोटीफीकेशन काढले आहे त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा अर्ज विमा पॉलिसीमधील अटी व शर्तीमध्ये दिलेल्या मोठ्या आजारात नमूद केलेल्या आजारामध्ये कोरोना संसर्ग येत नाही, या कारणास्तव नाकारुन तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे, हे स्पष्ट होते, या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष यांचेकडून तिचे पतीचे मृत्युनंतर उपरोक्त पॉलिसी अंतर्गत मिळणारी विमा दावा रक्कम व इतर फायदे मिळण्यास तसेच तिला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम व इतर खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ च्या विवेचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार क्रमांक १४७/२०२२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस उपरोक्त विवादीत पॉलिसी क्रमांक २९१८२०१७०२८५७०००००० अंतर्गत मिळणारी विमा दावा रक्कम रुपये ८,३४,१४५/- अदा करावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |