नि. 23 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 213/2010 नोंदणी तारीख – 6/9/2010 निकाल तारीख – 31/12/2010 निकाल कालावधी – 115 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री प्रकाश विठ्ठलसा पवार 2. सौ मधुमती प्रकाश पवार रा.559, गुरुवार पेठ, सातारा 3. श्री मयुर प्रकाश पवार नं.1 व 3 रा.465 व 3 प्लॉट नं.23, 24 कुपर कॉलनी, क्षेत्रीय कॉम्प्लेक्स, सदर बझार, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री राजीव शिंदे) विरुध्द एच.डी.एफ.सी.बँक तर्फे मॅनेजर श्री कमल बेदी शाखा रजताद्री कंपाऊंड पोवई नाका, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री राजीव अत्रे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे प्रत्येकी रु.75,000/- च्या 3 ठेवपावत्या ठेवल्या आहेत. सदरची रक्कम अर्जदार यांनी 6 महिने 16 दिवस या काळासाठी जाबदारकडे ठेवली होती. त्यावेळी ऍटो रिनीवल ठेवण्यास अर्जदार यांनी जाबदार यांना संमती दिली होती. त्यामुळे जाबदारने डिपॉझिट कन्फरमेशन/रिनिवल एडव्हॉईस अशा पावत्या अर्जदारांना दिल्या होत्या. सदर पावत्यांची मुदत दि. 19/3/2010 पर्यंत होती. अर्जदार यांना जाबदार यांनी ज्या दिवशी पावत्यांची मुदत संपते त्या दिवशी अर्जदारने पावत्यांची रक्कम जाबदारकडून नेली नाही तर तर पावत्या पुढील 6 महिने 16 दिवसांसाठी ऍटो रिनीवल मध्ये बॅंकेचे नियमाप्रमाणे वळत्या करणार आहोत अशी हमी दिली अर्जदारांना दिली होती व त्यानुसार ऍटो रिनीवलच्या अटीवर जाबदार यांनी अर्जदारकडून डिपॉझिटच्या रकमा स्वीकारल्या आहेत. ऍटो रिनीवलसाठी वेगळे लिखाण अगर सहया लागत नाहीत असे जाबदार यांनी अर्जदारांना सांगितले होते. सदर पावत्यांची मुदत संपलेनंतर अर्जदार यांनी जाबदारकडून रक्कम घेतली नाही. जाबदारने ऍटो रिनीवलची हमी दिल्यामुळे ते बिनधास्त होते. तदनंतर दि.6/5/2010 रोजी अर्जदार जाबदारकडे रक्कम परत मागण्यास गेले असता सदर पावत्यांचे ऍटो रिनीवल जाबदार यांनी न केल्याचे अर्जदार यांना समजले तसेच पावत्यांची रक्कम व त्यावरील व्याजापोटी होणा-या एकूण रकमेचे चेक जाबदार यांनी पोस्टाने अर्जदारना पाठविल्याचे जाबदार यांनी सांगितले. परंतु तशा प्रकारचे कोणतेही चेक अर्जदार यांना मिळालेले नाहीत. चेक पाठविल्याच्या पुराव्याची कागदपत्रे मागितली असता जाबदार यांनी तसा पुरावा उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर जाबदार यांनी रक्कम रु.100/- चे स्टँपपेपरवर त्यांचे फॉरमॅटमध्ये मजकूर लिहून देण्यास भाग पाडले. अशा प्रकारे जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे. सबब सेवेतील त्रुटीबाबत रु.18,505/- व्याजासह मिळावेत व अर्जाचा खर्च मिळावा यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 12 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांनी ठेवलेल्या रकमा या केवळ 6 महिने 16 दिवस या कालावधीसाठी ठेवलेल्या होत्या. त्यामुळे ऍटो रिनीवल करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ऍटो रिनीवल बँकेच्या नियमाप्रमाणे होत नाही. अर्जदार यांना डिपॉझीटचे चेक मिळाले आहेत तशी सही अर्जदारचे वतीने करणेत आलेली आहे. चेक गहाळ झाले होते म्हणून जाबदार यांनी अर्जदारकडून इंडेम्निटी बॉंड लिहून घेतला होता. डिपॉझिट ठेवतेवेळी अर्जदार यांनी जो फॉर्म भरुन दिला होता त्यामध्ये डू नॉट रिन्युअल या सूचनेच्या मागे अर्जदार यांनी खूण केली आहे. अर्जदार यांचे जाबदारकडे बचत खाते नसल्यामुळे ठेवींची मुदत संपलेनंतर जाबदार यांनी देय रकमेचे चेक अर्जदार यांना कुरिअर मार्फत पाठविलेले आहेत. ते अर्जदार यांना मिळालेले आहेत. परंतु अर्जदार यांनी चेक न मिळाल्याबाबत जाबदारकडे तक्रार केल्यामुळे जाबदार यांनी त्यांचेकडून इंडेम्निटी बॉण्ड लिहून घेतला. अशा प्रकारे जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे श्री प्रकाश पवार यांनी व जाबदारतर्फे अभियोक्ता श्री अत्रे यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. अर्जदारतर्फे व जाबदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र तसेच दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, त्यांनी ठेवलेल्या ठेवींची मुदत संपलेनंतर अर्जदार यांनी ठेवीच्या रकमा नेल्या नाहीत तर त्या बँकेच्या नियमाप्रमाणे आपोआप ऍटो रिनीवल होतात अशी जाबदार यांनी अर्जदार यांना हमी दिली होती. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदार यांनी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही, अगर बँकेचे कोणतेही नियम दाखल केलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारचे सदरचे कथन ग्राहय मानता येणार नाही. 6. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे नमूद केले आहे की, ऍटो रिनीवल बँकेच्या नियमाप्रमाणे होत नाही. डिपॉझिट ठेवतेवेळी अर्जदार यांनी जो फॉर्म भरुन दिला होता त्यामध्ये डू नॉट रिन्युअल या सूचनेच्या मागे अर्जदार यांनी खूण केली आहे. सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी नि.13/1 ला अर्जदार यांनी डिपॉझिट ठेवताना जो अर्ज भरुन दिला होता त्याची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये डू नॉट रिन्यूव या कलमाचे ठिकाणी अर्जदार यांनी बरोबरची खूण केली आहे. यावरुन अर्जदार यांनी जाबदार यांना त्यांच्या ठेवींचे नूतनीकरण करण्यात येवू नये अशी सूचना सुरुवातीस ठेव ठेवतानाच दिलेली होती ही बाब स्पष्टपणे शाबीत होत आहे. सबब बँकेच्या नियमाप्रमाणे जाबदार यांनी ठेवींचे ऍटो रिनीवल केले नाही या अर्जदारचे कथनात तथ्य नाही हे स्पष्टपणे दिसून येते. सबब अर्जदारचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 31/12/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |