निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली असून अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जबरदस्तीने जप्त केलेले वाहन परत मिळावे, तसेच जप्त केलेले वाहन कोणासही विक्री करु नये व मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 1,35,000/- गैरअर्जदार यांनी दयावे अशी मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे. तक्रारीसोबत अर्जदाराने अंतरिम मनाई हुकूमाचा अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जावर मंचाने दिनांक 17.10.2013 रोजी आदेश पारीत केलेला असून पुढील प्रमाणे आदेश दिलेला आहे.
“ अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे रक्कम रु. 5,525/- जमा करावे व रक्कम जमा केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन अर्जदारास परत करावे.”
सदरील आदेशानंतर गैरअर्जदार क्र. 1 ते 3 हजर झाले व त्यांनी मंचाच्या आदेशानुसार अर्जदाराने रक्कम जमा केलेली असून ते सदरील वाहन अर्जदाराचे ताब्यात देण्यास तयार असल्याचे लेखी म्हणणे दिले. अर्जदाराने रक्कम जमा केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन अर्जदारास परत दिलेले आहे.
3. अर्जदारास वाहन परत मिळाल्यानंतर अर्जदार हा मंचामध्ये दिनांक 13/12/2014, 27/1/2014, 18/2/22014, 27/2/2015, 15/3/2015, 6/4/2015, 7/5/2015 रोजी हजर राहिलेले नाहीत. यावरुन गैरअर्जदार यांचे म्हणण्यानुसार अर्जदारास वाहन ताब्यात मिळालेले असल्याने अर्जदाराची तक्रार राहिलेली नाही त्यामुळे मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराचा तक्रार नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.