Maharashtra

Bhandara

CC/11/7

Smt Shakun Gajanan Shende - Complainant(s)

Versus

H D F C Ergo General Insurancee co. Ltd. - Opp.Party(s)

A D Varma

20 Apr 2011

ORDER


ACKNOWLEDGEMENTDISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BHANDARA
CONSUMER CASE NO. 11 of 7
1. Smt Shakun Gajanan ShendeR/O Shivaji Ward near Telephone,ExchangeTumsar Tah TumsarBhandaraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. H D F C Ergo General Insurancee co. Ltd. 5 th Floor shriram Shyam Tower kingsway Sadar NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :A D Varma, Advocate for
For the Respondent :MR. H. N. VERMA, Advocate

Dated : 20 Apr 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

मा. अध्‍यक्षा श्रीमती आर. डी. कुंडलेआदेश पारित द्वारा

  
1.     तक्रार – तक्रारकर्तीच्‍या वाहनाला अपघात झाल्‍यामुळे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याबद्दल दाखल आहे. तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-
 
2.    तक्रारकर्तीच्‍या नावे मारूती ओम्‍नी, रजिस्‍ट्रेशन नंबर एमएच-36/5833 आहे. या वाहनाचा विमा रू. 2,07,000/- इतक्‍या रकमेचा आहे. याचा हप्‍ता रू. 6,200/- भरलेला आहे. या वाहनाला दिनांक 28/05/2009 रोजी अपघात झाला. तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍यानुसार तिने विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे ऑनलाईन क्‍लेम दाखल केला. त्‍याचा क्रमांक 294996 असा आहे. तक्रारकर्ती पुढे म्‍हणते की, विरूध्‍द पक्ष यांनी तिला फोनवरूनच सदर वाहन नागपूरला अधिकृत कार्यशाळेत म्‍हणजेच आटोमोटिव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरर प्रायव्‍हेट लिमिटेड मध्‍ये नेण्‍यास सांगितले म्‍हणून तक्रारकर्तीने हे वाहन नागपूर येथे नेले. तेथे सर्व्‍हेअरद्वारे वाहनाचे निरीक्षण करण्‍यात आले. त्‍याचा खर्च रू. 1,85,516.91 इतका नमूद आहे.  
 
3.    दिनांक 15/09/2009 रोजी आटोमोटिव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरर प्रायव्‍हेट लिमिटेड चे पत्र तक्रारकर्तीला प्राप्‍त झाले. या पत्रानुसार तक्रारकर्तीचे वाहन त्‍यांच्‍या कार्यशाळेत जागा अडवून उभे असल्‍याने रू. 200/- प्रति दिवस दंड म्‍हणून रू. 20,000/- भरण्‍यास व वाहन नेण्‍यास सांगितले. त्‍यानुसार दिनांक 11/05/2010 रोजी तक्रारकर्तीने रू. 20,000/- भरून अपघातग्रस्‍त वाहन नागपूर येथील तिचे नातेवाईक प्रशांत बळीराम शेन्‍डे, राह. प्‍लॉट नं. 64, दत्‍तात्रयनगर, नागपूर यांच्‍याकडे हलविले. 
 
4.    तक्रारकर्ती म्‍हणते की, विरूध्‍द पक्ष यांनी रू. 1,85,516.91 या रकमेचा दावा मंजूर करण्‍याचे आश्‍वासन देऊनही दावा दिला नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने दिनांक 04/12/2010 रोजी विरूध्‍द पक्ष यांना नोटीस देऊन एकूण रू. 3,79,575/- ची मागणी केली. मात्र या नोटीसला विरूध्‍द पक्ष यांनी उत्‍तर दिले नाही असे परिच्‍छेद-5, पान नंबर 2 व 3 वर तक्रारकर्ती म्‍हणते
 
5.    तक्रारकर्तीच्‍या रू. 3,82,675/- च्‍या मागणीचा तपशील खालीलप्रमाणे आहेः-

क्र.
मागणीचे कारण
रक्‍कम
1.
वाहनाची किंमत
रू. 2,07,000/-
2.
दि. 28/05/2010 ते दि. 04/12/2010 पर्यंत व्‍याजाची 18 टक्‍के रक्‍कम
रू.   47,575/-
3.
शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई
रू. 1,00,000/-
4.
स्‍टेबलिंग चार्जेस
रू. 20,000/-
5.
नोटीस खर्च
रू.   5,000/-
6.
व्‍याज दि. 04/12/2010 ते 03/01/2011
रू.   3,100/-
 
एकूण
रू. 3,82,675/-

 
      तसेच उपरोक्‍त संपूर्ण रकमेवर 18 टक्‍के दराने भविष्‍यातील व्‍याज तक्रार दाखल केल्‍यापासून रक्‍कम मिळेपर्यंत देण्‍यात यावे अशीही मागणी केली आहे.
 
6.    तक्रारकर्तीनुसार तक्रारीस कारण वाहनाला दिनांक 28/05/2009 रोजी झालेला अपघात आणि दिनांक 04/12/2010 रोजी पाठविलेली नोटीस यामुळे घडलेले आहे. विम्‍याची रक्‍कम न देणे ही विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे म्‍हणून विमा दावा मिळावा अशी विनंती तक्रारकर्ती करते.   तक्रारकर्तीने एकूण 7 कागदपत्रे आपल्‍या तक्रारीसोबत जोडली आहेत.
 
7.    विरूध्‍द पक्ष यांचे उत्‍तर रेकॉर्डवर आहे. विरूध्‍द पक्ष यांच्‍यानुसार त्‍यांना पॉलीसी मान्‍य आहे. परंतु ही पॉलीसी नागपूर येथून घेतली, विमा हप्‍ता नागपूर येथे भरला, वाहनाची दुरूस्‍ती नागपूर येथे प्रस्‍तावित होती आणि वाहनाचा सर्व्‍हे नागपूर येथे झाला म्‍हणून या मंचाला प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र नाही असा प्राथमिक आखेप विरूध्‍द पक्ष यांनी घेतला आहे. तसेच योग्‍य पार्टी जोडली नाही असाही प्राथमिक आक्षेप त्‍यांनी घेतला आहे. 
 
8.    पॉलीसी दिनांक 22/05/2009 ते 21/05/2010 या कालावधीकरिता होती. वाहनाला अपघात दिनांक 28/05/2009 रोजी झाला. हा अपघात तुमसर-खापा रोड (जिल्‍हा भंडारा) येथे झाला. सदर वाहनाला अपघात झाला ही बाब मानण्‍यास विरूध्‍द पक्ष तयार नाहीत कारण अपघातासंबंधी एफ.आय.आर. दर्ज केलेला नाही. पुढे तक्रारकर्तीने ऑनलाईन क्‍लेम दाखल केला ही बाब सुध्‍दा विरूध्‍द पक्ष अमान्‍य करतात. विम्‍याची रक्‍कम रू. 1,85,516.91 देण्‍याचे आश्‍वासन दिले ही बाब देखील विरूध्‍द पक्ष अमान्‍य करतात. आपल्‍या उत्‍तरा‍त विरूध्‍द पक्ष पुढे म्‍हणतात की, तक्रारकर्ती आणि आटोमोटिव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरर प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर येथील वर्कशॉप यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या व्‍यवहाराबद्दल ते अनभिज्ञ आहेत. आटोमोटिव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरर प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांना तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये पार्टी म्‍हणून जोडलेले नाही. विरूध्‍द पक्ष यांना तक्रारकर्तीने पाठविलेली दिनांक 04/12/2010 ची विमा दावा देण्‍याबद्दलची नोटीस प्राप्‍त झाली व त्‍याला त्‍यांनी दिनांक 24/12/2010 रोजी उत्‍तर दिले. या उत्‍तराची प्रत व पोस्‍टल रसीद विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केली आहे. नोटीसला उत्‍तर दिले नाही हे तक्रारकर्तीचे म्‍हणणे त्‍यामुळे खोटे ठरते.    
 
9.    विमा दावा देण्‍यासंबंधाने विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला वारंवार एफ.आय.आर., दुरूस्‍तीचे बिल इत्‍यादी दस्‍तऐवजांची मागणी केली. परंतु तक्रारकर्तीने हे दस्‍त पुरविले नाहीत. विमा दावा देण्‍याकरिता या दस्‍तांची आवश्‍यकता असते. दस्‍तांच्‍या मागणीच्‍या संदर्भात विरूध्‍द पक्ष यांनी दिनांक 09/11/2009 व दिनांक 31/12/2009 रोजीचे पत्र व पोस्‍टल रसिदा दाखल केल्‍या आहेत. तक्रारकर्तीच्‍या नोटीसला दिनांक 24/12/2009 रोजी उत्‍तर देतांना सुध्‍दा कागदपत्रांची मागणी त्‍यांनी केली आहे. परंतु कागदपत्रे न मिळाल्‍याने “No Claim” म्‍हणून त्‍यांनी फाईल बंद केली व तसे तक्रारकर्तीला कळविले असे ते म्‍हणतात. विरूध्‍द पक्ष यांना हा अपघात प्रत्‍यक्ष घडला किंवा नाही आणि घडला असल्‍यास त्‍याची तीव्रता याबद्दल शंका आहे. विशेष सादरीकरणामध्‍ये विरूध्‍द पक्ष म्‍हणतात की, तक्रारकर्तीचा दावा अर्ज त्‍यांना प्राप्‍त झाला म्‍हणून अपघातग्रस्‍त वाहनाची पाहणी करण्‍यासाठी सर्व्‍हेअर प्रमोद एन. वडस्‍कर यांची नेमणूक त्‍यांनी केली. दिनांक 10/06/2009 रोजी सर्व्‍हेअरने आटोमोटिव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरर प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर येथील वर्कशॉप मध्‍ये जाऊन पाहणी केली व आपला गोपनीय अहवाल विरूध्‍द पक्ष यांना सादर केला. सर्व्‍हेअरने सुध्‍दा तक्रारकर्तीला वारंवार कागदपत्रांची मागणी केली. ती मिळाली नाहीत म्‍हणून सर्व्‍हेअर स्‍वतः तक्रारकर्तीच्‍या घरी गेला असता त्‍याला सदर वाहन तक्रारकर्ती भाड्याने देण्‍यासाठी वापरत असल्‍याचे सर्व्‍हेअरला दिसले. पॉलीसी खाजगी वाहन म्‍हणून घेतली आहे. वाहन भाड्याने देत असल्‍याने पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग होतो म्‍हणून तक्रारकर्ती विमा रक्‍कम मिळण्‍यास अपात्र ठरते असे विरूध्‍द पक्ष म्‍हणतात.  अजूनही तक्रारकर्तीने एफ.आय.आर. इत्‍यादी कागदपत्रे दिल्‍यास तिच्‍या दाव्‍याचा विचार करता येईल असे ते म्‍हणतात. विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेत त्रुटी नाही आणि ही तक्रार अपरिपक्‍व आहे म्‍हणून ती मंचासमोर चालू शकत नाही असे विरूध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे आहे.   
 
10.   मंचाने दोन्‍ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील कागदपत्रे तपासली. मंचाचे निरीक्षण व निष्‍कर्ष खालीलप्रमाणेः-
 
-ः निरीक्षण व निष्‍कर्ष ः-
11.    विरूध्‍द पक्ष यांच्‍या प्राथमिक आक्षेपात जसे मंचाचे अधिकारक्षेत्र आणि योग्‍य पार्टी न जोडणे यामध्‍ये मंचाला तथ्‍थ्‍य वाटत नाही. अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या पॉलीसीचा व्‍यवहार जरी नागपूर येथे झाला असला तरी तक्रारीचे कारण म्‍हणजे प्रत्‍यक्ष अपघात हा भंडारा मंचाच्‍या क्षेत्रात घडलेला आहे म्‍हणून मंचाला ही तक्रार चालविण्‍याचा अधिकार आहे असा निष्‍कर्ष मंच नोंदविते. योग्‍य पार्टी जोडली नाही म्‍हणजेच मारूती आटोमोटिव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरर प्रायव्‍हेट लिमिटेड वर्क शॉप यांना पार्टी केले नाही या विरूध्‍द पक्ष यांच्‍या म्‍हणण्‍यातही मंचाला तथ्‍थ्‍य वाटत नाही कारण तक्रारीतील वादाशी त्‍यांचा संबंध नाही.  
 
12.   विमा दावा न दिल्‍याचे कारण विरूध्‍द पक्ष यांच्‍यानुसार त्‍यांना दस्‍तऐवज प्राप्‍त झाले नाहीत हे आहे. या दस्‍तांची मागणी त्‍यांनी दिनांक 09/11/2009 व 31/12/2009 रोजीच्‍या पत्रान्‍वये कुरिअरद्वारे केलेली आढळते. ही पत्रे आणि कुरिअरकडील पावती त्‍यांनी दाखल केलेली आहे. आवश्‍यक कागदपत्रे मिळाली नाहीत म्‍हणून “No Claim” म्‍हणून ती फाईल त्‍यांनी बंद केली. तक्रारकर्तीची नोटीस (दि. 04/12/2010) त्‍यांना प्राप्‍त झाली. त्‍यालाही कुरिअरद्वारे त्‍यांनी दिनांक 24/12/2010 ला उत्‍तर दिलेले आहे. हे उत्‍तर, नोटीसची प्रत डॉक्‍युमेंट 2 व 3, रेकॉर्ड पेज 37 व 38 वर आहे. मंचाचा निष्‍कर्ष आहे की, विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला एफ.आय.आर. इत्‍यादी कागदपत्रांची मागणी केली असे निष्‍पन्‍न होते. परंतु एफ.आय.आर. ची प्रत देण्‍यास तक्रारकर्ती असमर्थ होती कारण तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍येच मान्‍य केले आहे की, या अपघाताचा रिपोर्ट पोलीस स्‍टेशनमध्‍ये दर्ज केला नाही आणि रिपोर्ट न देण्‍याबद्दल विरूध्‍द पक्ष यांनीच तिला सांगितले होते कारण अपघातामध्‍ये कोणत्‍याही व्‍यक्‍ती जखमी अथवा मृत झाल्‍या नाहीत. 
            दिनांक 06/08/2009 चा सर्व्‍हे रिपोर्ट रेकॉर्डवर आहे. यामध्‍ये वाहनाची माहिती, ड्रायव्‍हरची माहिती, अपघाताचा तपशील जसे वेळ दुपारी 4.30 वाजता दिनांक 28/05/2009 (तुमसर खापा रोड) इत्‍यादी तपशील आहे. स्‍पॉट सर्व्‍हे केलेला नाही. वाहनाचा प्रत्‍यक्ष सर्व्‍हे दिनांक 10/06/2009 रोजी दुपारी 4.30 वाजता सर्व्‍हेअरने केला. या रिपोर्टमध्‍ये पुढे असेही नमूद आहे की, पोलीसांना अपघाताची सूचना दिली नाही, पंचनामा नाही, थर्ड पार्टी नुकसान नाही. अपघात कसा झाला यासंबंधाने सर्व्‍हेअर नमूद करतात की, सायकलस्‍वार अचानक समोर आला, त्‍याला वाचवितांना चालकाचा ताबा सुटला, वाहन बोल्‍डरच्‍या ढिगा-यावर चढले आणि गोल फिरले व क्षतिग्रस्‍त झाले. ही माहिती तक्रारकर्तीने दावा अर्जामध्‍ये दिली तशीच ती सर्व्‍हेअरने लिहिली आहे. 
 
13.    सर्व्‍हेअरने वाहनाचे एकूण 53 भाग क्षतिग्रस्‍त झाल्‍याचे नमूद केले आहे. या भागांचा दुरूस्‍ती खर्च रू. 1,85,517/- अंदाजित असून त्‍यापैकी Net Insurer liability रू. 1,12,000/- एवढी असल्‍याचे नमूद केले आहे. सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये पुढे Note मध्‍ये वारंवार आवश्‍यक कागदपत्रांची मागणी करूनही दिली नाहीत असे लिहिले आहे. यात पुढे सर्व्‍हेअर स्‍वतः तक्रारकर्तीच्‍या घरी गेला असता ती वाहन Hire & Reward करिता वापरत असल्‍याचे दिसले असे नमूद केले आहे. मंचाने सर्व्‍हेअरचा हा रिपोर्ट अत्‍यंत बारकाईने तपासला.  एफ.आय.आर.ची नोंदणी केलेली नसतांना एफ.आय.आर. मागणे ही विरूध्‍द पक्ष यांची कृती मंचाला अनाकलनीय वाटते. सर्व्‍हेअरचा अहवाल मंचाच्‍या मते अत्‍यंत संदिग्‍ध आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या इस्टिमेट नुसार वाहनाचे एकूण 182 लहान मोठे भाग क्षतिग्रस्‍त झाल्‍याबद्दल त्‍यांच्‍या किमतीचे अंदाजपत्रक (रेकॉर्ड पान नंबर 13,14,15,16) आणि दुरूस्‍तीचा खर्च अंदाजे रू. 1,85,516/- (रेकॉर्ड पान नंबर 16 वर) नमूद केला आहे. ही दुरूस्‍ती परवडण्‍यासारखी नसल्‍याने तक्रारकर्तीने नवीन वाहनाची मागणी केली आहे. मंचाला सर्व्‍हेअरचा दिनांक 10/06/2009 चा अहवाल अजिबात ग्राह्य वाटत नाही. सर्व्‍हेअरने वाहनाचे एकूण फक्‍त 53 भाग क्षतिग्रस्‍त झाल्‍याने विचारात घेतले आहेत. दिनांक 11/05/2010 च्‍या कॅश मेमो नुसार तक्रारकर्तीने फक्‍त 3 भागांचे बिल रू. 6,588/- देऊन वाहन तेथून घेऊन गेल्‍याचे निष्‍पन्‍न होते.  
 
14.    या प्रकरणामध्‍ये तक्रारकर्तीने अपघातासंबंधी कोणतीही कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल केलेली नाहीत. वाहनचालकाचे शपथपत्र नाही, आर.टी.ओ.कडील कागदपत्रे नाहीत. तक्रारकर्तीच्‍या मागणीमध्‍ये आणि सर्व्‍हेअरने दिलेल्‍या इस्टिमेटमध्‍ये बरीच तफावत आहे. जर या वाहनाचे एकूण 182 भाग (किंवा सर्व्‍हेअरनुसार 53 भाग) क्षतिग्रस्‍त झाले तर ते वाहन चक्‍काचूर झाले असले पाहिजे. अशा स्थितीत दिनांक 11/05/2010 रोजी हे वाहन मारूती आटोमोटिव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरर प्रायव्‍हेट लिमिटेड मधून कसे हलविले याबद्दल कुठेही स्‍पष्‍टीकरण आढळत नाही. तक्रारकर्ती म्‍हणते की, विरूध्‍द पक्ष यांनी पाठविलेले दस्‍तांची मागणी करणारे कोणतेही पत्र तिला प्राप्‍त झाले नाही.   मंचाला तक्रारकर्तीच्‍या या म्‍हणण्‍यात तथ्‍थ्‍य वाटत नाही कारण विरूध्‍द पक्ष यांनी तसा पुरावा दाखल केलेला असून तो मंचाला ग्राह्य वाटतो. तक्रारकर्तीच्‍या नोटीसला विरूध्‍द पक्ष यांनी उत्‍तर दिले नाही हा तक्रारकर्तीचा दावा मंचाला ग्राह्य वाटत नाही कारण त्‍याबद्दलचा पुरावा आणि उत्‍तर नोटीस विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केली आहे. तक्रारकर्तीने वाहनचालकाचे शपथपत्र दाखल केले नाही. जे एक शपथपत्र एकनाथ चौधरी नावाच्‍या इसमाचे दाखल केले आहे त्‍याचा या वादाशी संबंध नाही. विरूध्‍द पक्ष आपल्‍या उत्‍तरात म्‍हणतात की, अपघातानंतर 7 महिन्‍यानंतर त्‍यांना पहिली नोटीस प्राप्‍त झाली. त्‍यांनी दिनांक 09/11/2009 व 31/12/2009 या तारखांना दस्‍तांची मागणी केली. ती न मिळाल्‍याने त्‍यांनी दिनांक 31/12/2009 रोजी Repudiation Letter पाठवून  “No Claim” म्‍हणून केस बंद केल्‍याचे तक्रारकर्तीला कळविले.
 
15.   सदर प्रकरणामध्‍ये मंचाचा निष्‍कर्ष आहे की, तक्रारकर्तीने तिची तक्रार सिध्‍द केली नाही. ही तक्रार दाखल करण्‍याच्‍या कारणांचा शोध घेतला असता रेकॉर्ड पान नंबर 55 वर तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या पत्राचा उल्‍लेख अनिवार्य वाटतो. हे पत्र म्‍हणजे तक्रारकर्ती आणि महिन्‍द्रा फायनान्‍स यांच्‍यामधील कर्ज कराराबद्दल आहे. यावरून तक्रारकर्तीने वाहनासाठी कर्ज घेतले होते ते रू. 1,44,172/- एवढे थकित दाखविले आहे. त्‍यात विलंब चार्जेस रू. 25,729/- आहे. तक्रारकर्तीवर या वाहनाचे कर्ज रू. 1,79,901/- एवढे आहे. हे कर्ज किंवा त्‍याचे हप्‍ते न भरल्‍याने फायनान्‍स कंपनीने कर्ज करार संपुष्‍टात आणून एकमुस्‍त रकमेची मागणी केली. असे दिसते की, यासाठी तक्रारकर्तीने अपघाताचा खोटा बहाणा करून विम्‍याची रक्‍कम मिळविण्‍याचा प्रयत्‍न केला असावा. यासंदर्भात दोन्‍ही पक्षांनी दाखल केलेले केस लॉ तपासले.    
             
सबब आदेश.      
     
आदेश
 
1.     तक्रारकर्तीने तिची तक्रार सिध्‍द केली नाही म्‍हणून खारीज करण्‍यात येते.
 
2.    खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.  

HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBERHONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENTHONABLE MRS. Geeta R Badwaik, Member