नि.11 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 199/2010 नोंदणी तारीख – 25/8/2010 निकाल तारीख – 30/10/2010 निकाल कालावधी – 65 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री बिपीन अरविंद केदारे वर्ग 1/1, उरमोडी वसाहत, संगमनगर सातारा ----- अर्जदार विरुध्द गुरुकृपा ट्रॅव्हल्स (प्रो.सुधीर गायकवाड) हेम हाईटस, पोवई नाका, सिव्हील हॉस्पीटल रोड, सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी त्यांची पत्नी व दोन मुलांचे पारपत्र काढणेसाठी जाबदार यांना रक्कम रु.3,500/- दि.5/10/2009 रोजी दिलेले आहेत. परंतु दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही जाबदार यांनी पारपत्राबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही अगर पारपत्र काढून दिलेले नाही. त्यांचेशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी टाळाटाळीची उत्तरे दिली आहेत. सबब सदरची रक्कम रु.3,500/- परत मिळावी, तसेच मानसिक त्रासापोटी, प्रवास खर्चापोटी व दाव्याचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा नि.6 ला दाखल आहे. जाबदार हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारतर्फे दाखल शपथपत्र नि.2 व नि.3 सोबतची कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 6. अर्जदार यांची तक्रार अशी आहे की, त्यांनी जाबदार यांचेकडे त्यांचे पत्नी व दोन मुलांसाठी पारपत्र काढणेसाठी रक्कम रु.3,500/- दिले परंतु जाबदार यांनी अद्यापही पारपत्र काढणेबाबत काहीही कार्यवाही केलेली नाही. सबब सदरची रक्कम परत मिळावी अशी अर्जदार यांची मागणी आहे. अर्जदार यांनी त्यांचे कथनाचे पृष्ठयर्थ नि.3 सोबत जाबदार यांना अदा केलेल्या रक्कम रु.3,500/- ची पावती दि.5/10/09 दाखल केली आहे. सदरची पावती पाहता अर्जदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.3,500/- पारपत्र काढणेसाठी दिले होते ही बाब शाबीत होत आहे. 7. अर्जदार यांनी नि.3/2 ला दि.5/3/2010 रोजी त्यांनी जाबदार यांना दिलेल्या लेखी पत्राची प्रत दाखल केली आहे. नि.3/4 ला सदर पत्र जाबदार यांना मिळालेची पोच दाखल आहे. सदरचे दोन कागद व अर्जदार यांचे शपथपत्रातील कथन पाहता अर्जदार यांनी मागणी करुनही जाबदार यांनी अर्जदार यांना पारपत्र अगर रु.3,500/- परत दिलेले नाहीत हे स्पष्टपणे दिसून येते. जाबदार यांनी या मंचासमोर हजर राहून अर्जदारचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन नाकारलेले नाही. सबब जाबदार यांनी अर्जदार यांचेकडून रक्कम स्वीकारुनही त्यांचे पारपत्र न देवून सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. 10. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. रक्कम रु.3,500/- परत द्यावेत. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 30/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |