Maharashtra

Nagpur

CC/42/2022

SOU. MAYABAI WAMAN KOHAD - Complainant(s)

Versus

GURUKRUPA GRUHA NIRMAN SANSTHA MARYADIT, NAGPUR THROUGH SHRI. JIVAN RUPCHAND MESHRAM - Opp.Party(s)

ADV. MANOJ W. WASNIK

15 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/42/2022
( Date of Filing : 17 Jan 2022 )
 
1. SOU. MAYABAI WAMAN KOHAD
R/O. PLOT NO.28, JUNA KAMTI MARG, KALMNA ROAD, SHIVSHAKTI BAR MARG, NAGPUR-4400
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. GURUKRUPA GRUHA NIRMAN SANSTHA MARYADIT, NAGPUR THROUGH SHRI. JIVAN RUPCHAND MESHRAM
R/O. SHANTINAGAR, NEAR HANUMANNAGAR, NEAR WATER TANK, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MANOJ W. WASNIK, Advocate for the Complainant 1
 
Dated : 15 Feb 2023
Final Order / Judgement

आदेश पारीत व्दारा श्री. एस आर आजने, मा  सदस्य.

  1. तक्रारकर्तीने वि.प.कडुन मौजा-चिखली-कळमना, प.ह.न.17, मौजा-नंबर 136, रे.स.नागपूर वार्ड क्रं.43, ख.क्रं. 9/1,9/2-क. या जमीनीमध्‍ये वि.प.या संस्थेने पाडलेल्या ले-आऊट मधील भुखंड क्रं.28, एकुण क्षेत्रफळ- 750 चौ.फुट एकुण रुपये 75,000/- एवढया ,किमतीत विकत घेतला. वि.प.ने सदर भुखंडाचे विक्रीपत्र व ताबा पत्र करुन दिल्याचा लेख 100/- रुपयाचे स्टॅम्प पेपरवर करुन दिला आहे. ज्यावेळी नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयामधुन भुखंड नियमितीकरणाकरिता  तकारकर्तीला व इतर लोकांना डिमांड भरुन पैसे भरण्‍याकरिता सुधार प्रन्यासचे अधिकारी यांनी सांगीतले त्यावेळी तेथील अधिका-यांनी तक्रारकर्तीला सांगीतले की, वि.प.ने आपणास नोटरीकृत विक्रीपत्र करुन दिले आहे त्यामूळे तुमच्या भुखंडाचे नियमितीकरण होणार नाही कारण सोसायटीने आपणास नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्तीला फसवणूक झाल्याचे कळल्यावर तक्रारकर्तीने वारंवार वि.प.चे कार्यालयाला भेट दिली परंतु काहीही उपयोग झाला नाही व वि.प.ने भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही त्यामूळे तक्रारकर्तीने दिनांक 3.2.2021, 12.3.2021 रोजी वि.प.ला वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली असता वि.प.ने त्यांची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारकर्तीने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन  वि.प.ने तक्रारकर्तीला मौजा-चिखली कळमना, प.ह.न.17, मौजा-नंबर 136, रे.स.नागपूर वार्ड क्रं.43, ख.क्रं. 9/1,9/2 - क, भुखंड क्रं.28, एकुण क्षेत्रफळ- 750 चौ.फुट चे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे. तसेच वि.प. ने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी, तक्रारीचा खर्च देण्‍याची मागणी केली.
  2. तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन वि.प. यांना आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आली. वि.प. नोटीस प्राप्त होऊनही आयोगात हजर झाले म्हणुन सदर तक्रार दिनांक 18.05.2022 रोजी वि.प.क्रं. 1 व 2 यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे वाचन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.

मुद्दे                                                          उत्तर

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                       होय.
  2. वि.प.ने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय              होय.
  3. काय आदेश  ?                                                                अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. वि.प. तक्रारकर्तीला मौजा-चिखली कळमना, प.ह.न.17, मौजा- नंबर 136, रे.स.नागपूर वार्ड क्रं.43, ख.क्रं. 9/1,9/2-क. या जमीनीमध्‍ये वि.प.या संस्थेने पाडलेल्या ले-आऊट मधील भुखंड क्रं.28 एकुण क्षेत्रफळ- 750 चौ.फुट एकुण रुपये 75,000/- एवढया रक्कमेत विकल्याचे व रु.100/- चे स्टॅम्पवर विक्रीपत्र व ताबापत्र दिल्याचे नि.क्रं.2(1) वर दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते.  वि.प.ने तक्रारकर्तीकडुन भुखंड विक्रीपोटी संपूर्ण रक्कम स्व‍िकारुनही कायदेशीर विक्रीपत्र करुन दिले नाही ही वि.प.ची तक्रारकर्तीचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसुन येते म्हणुन तक्रारकर्ती भुखंडाचे खरेदीपोटीस जमा केलेली रक्कम मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे.....

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. यांना आदेशीत करण्‍यात येते की, तक्रारकर्तीकडुन भुखंडाचे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 75,000,  दिनांक 15.7.2004 पासुन द.सा.द.शे.10 टक्के व्याजदाराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेता येणारी रक्कम तक्रारकर्तीला परत करावी.  
  3. वि.प.ने तक्रारकर्तीला शारिरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- द्यावे. तसेच तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- द्यावे.
  4. सदर आदेशाचे पालन वि.प.क्रं.1 व 2 यांनी संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या करावे.
  5. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.