Babarao Pandurangji Deshmukh filed a consumer case on 28 Dec 2010 against Gunwanta Sheshraoji Gotmare in the Additional DCF, Nagpur Consumer Court. The case no is CC/10/150 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Additional DCF, Nagpur
CC/10/150
Babarao Pandurangji Deshmukh - Complainant(s)
Versus
Gunwanta Sheshraoji Gotmare - Opp.Party(s)
Adv.Rupali Botkute
28 Dec 2010
ORDER
importMahashtraNagpur
Complaint Case No. CC/10/150
1. Babarao Pandurangji DeshmukhR/o Plot No.49,Bholeshwarnagar, NagpurNagpurM. S.
...........Appellant(s)
Versus.
1. Gunwanta Sheshraoji GotmareR/o Plot No.177,Govindnagar,New Narsala Road, Narsala,NagpurNagpurM. S.
...........Respondent(s)
BEFORE:
HONORABLE Shri V. N. Rane ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yangal ,MEMBERHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :
Dated : 28 Dec 2010
JUDGEMENT
तक्रारदार श्री. बाबरावजी पांडुरंगजी देशमुख, रा. प्लॉट नं.49, भोलेश्वर नगर, नागपूर यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्ष गुणवंता शोषरावजी गोतमारे, प्लॉट नं.177, गोविंद नगर, न्यू नरसाळा रोड, नरसाळा नागपूर यांचेविरुध्द दाखल करुन मंचास मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने त्यांचेत झालेल्या करारानुसार भूखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे, आणि आजपावेतो विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- आणि तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
उभय पक्षात भूखंड क्र.177 आराजी 55.74 चौ.फुट, नरसाळा येथे दिनांक 21/6/2004 रोजी रुपये 1 लक्ष मध्ये खरेदी करण्याचा सौदा झालेला होता आणि त्याकरीता उभयपक्षांत करारनामा सुध्दा झालेला होता. करारनामा करतांना तक्रारदाराने रुपये 25,000/- नगदी दिले होते. त्यावेळी तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाने कबूल केले होते की, ज्यावेळी जय गंगा मॉ हाऊसिंग सोसायटी ज्यांचेकडून विरुध्द पक्ष यांनी भूखंड खरेदी केले होते. विरुध्द पक्षाचे नावाने वर नमूद भूखंडाचे विक्रीपत्र करुन देतील व त्यानंतर विरुध्द पक्ष तक्रारदाराचे नावाने विक्रीपत्र करुन देतील आणि भूखंडाचा ताबा सुध्दा देतील.
उभय पक्षात झालेल्या करारानंतर बरेच वेळा तक्रारदाराने विरुध्द पक्षाला सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याकरीता विनंती केली, परंतू विरुध्द पक्षाने सोसायटी वाल्यांनी अजुनपर्यंत विरुध्द पक्षाचे नावे विक्रीपत्र करुन दिले नाही असे कारण सांगून तक्रारदाराचे नावे विक्रीपत्र करुन दिलेले नाही. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारदाराला सूचविले की, सोसायटी विरुध्द पक्षाचे नावाने विक्रीपत्र करुन द्यायला तयार आहे, परंतू सोसायटीत पूर्ण पैसे भरणे आवश्यक आहे. त्याकरीता विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडे अधिक पैशाची मागणी केली असता, तक्रारदाराने दिनांक 20/7/2005 रोजी रुपये 20,000/-, दिनांक 15/6/2007 रोजी रुपये 15,000/- आणि दिनांक 19/6/2007 रोजी रुपये 25,000/- अशी एकूण रुपये 60,000/- आणि करारनामा करतेवेळी दिलेली रक्कम रुपये 25,000/- याप्रमाणे एकूण रुपये 85,000/- एवढी रक्कम तक्रारदाराने विरुध्द पक्षाला दिली.
तक्रारदाराला अचानक माहित पडले की, जय गंगा मॉ हाऊसिंग सोसायटीने भूखंड क्र.177 चे विक्रीपत्र दिनांक 7/6/2006 रोजी विरुध्द पक्षाचे नांवे करुन दिले आहे. परंतू विरुध्द पक्षाने ही बाब तक्रारदारापासून लपवून ठेवली. वर नमूद विक्रीपत्राची बाब तक्रारदाराला एप्रिल, 2008 मध्ये कळली असता तक्रारदाराने त्याबद्दलची माहिती नोंदणी कार्यालयातून नकलेची सत्यप्रतिलिपी दिनांक 22/8/2008 ला काढली.
तक्रारदाराचे म्हणण्यानुसार वर नमूद माहिती उपलब्ध झाल्यावर तक्रारदाराने विरुध्द पक्षाला दिनांक 23/6/2009, 16/9/2009 आणि 30/12/2009 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून विरुध्द पक्षाला कळविले की, करारनाम्यानुसार उर्वरित रक्कम देऊन विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे नांवे विक्रीपत्र करुन द्यावे, परंतू विरुध्द पक्ष सतत गैरहजर या कारणास्तव नोटीस परत आली. त्यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करुन वर नमूद मागण्या केलेल्या आहेत.
तक्रारदाराने आपले तक्रारीसोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केली असून, त्यामध्ये उभय पक्षात झालेला करारनामा, सोसायटीने विरुध्द पक्षाचे नांवे करुन दिलेले विक्रपत्र, विरुध्द पक्षाला पाठविलेली नोटीस आणि पोचपावती या कागदपत्रांचा समावेश आहे.
विरुध्द पक्षाला मंचातर्फे पंजीकृत डाकेद्वारे नोटीस बजाविली, विरुध्द पक्षाने मंचाची नोटीस घेण्यास नकार या कारणास्तव ती नोटीस परत आली. त्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
रेकॉर्डवरील सर्व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता, मंचाचे गुणवत्तेवर निरीक्षण व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. उभय पक्षांत भूखंड क्र.177 नरसाळा याबाबत विक्रीचा सौदा झालेला होता आणि त्यावेळेस तक्रारदाराने विरुध्द पक्षाला रुपये 25,000/- एवढी रक्कम दिलेली होती आणि विरुध्द पक्षाने भूखंड त्याचे नावावर झाल्यास तक्रारदाराला सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन देईल असे कबूल केले होते ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या करारनाम्यावरुन सिध्द होते.
जयगंगा र्मा हाऊसिंग सोसायटीने दिनांक 6/7/2006 रोजी विरुध्द पक्षाचे नांवे सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले होते हे सुध्दा रेकॉर्डवरील कागदपत्रांवरुन आढळून येते. प्रथम विरुध्द पक्षाचे विरुध्द एकतर्फी आदेश पारीत केल्यामुळे तक्रारदाराचे म्हणण्यात सत्यता आहे, आणि तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन त्यांनी ही बाब सिध्द केलेली आहे असे मंचाचे मत आहे. तसेच विरुध्द पक्षाचे सेवेत त्रुटी सुध्दा आढळलेली आहे. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-/// अं ती म आ दे श ///-
1) तक्रारदाराची तक्रार अंशता मंजूर.
2) विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे नांवे, मौजा नरसाळा नागपूर खसरा नं.156 येथील भूखंड क्र.177 ज्याची आराजी 55.74 चौ.फुट चे विक्रीपत्र कराराप्रमाणे
उर्वरित रक्कम रुपये 15,000/- तक्रारदाराकडून घेऊन करुन द्यावे.
3) विरुध्द पक्षाने तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- आणि तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 1,000/- याप्रमाणे एकूण रुपये 6,000/-
रुपये सहा हजार केवळ) एवढी रक्कम द्यावी.
4) विरुध्द पक्षाने उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासून एक महिन्याचे आत करावे.
[HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.