जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 360/2008. प्रकरण दाखल दिनांक – 18/11/2008. प्रकरण निकाल दिनांक – 21/05/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. मनोहर पि. नागोराव नगारे वय, 52 वर्षे, धंदा शेती, अर्जदार रा.कोल्हारी ता.किनवट जि. नांदेड. विरुध्द 1. गुलाम एंटरप्रायजेस माता गुजरीजी कॉम्पलेक्स,चीखलवाडी, गैरअर्जदार नांदेड. 2. महिंन्द्रा फायनान्स, पहिला मजला, साईबाबा मोटर्स, एन.टी.सी.मील रोड, बसस्टँड जवळ, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.कीशन कूलकर्णी. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे - अड.डी.के.ढेंगे गैरअर्जदार क्र.2 तर्फे - अड.ऐ.व्ही.पाटील. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी त्यांचे शेतीच्या कामासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.20.12.2004 रोजी ट्रक्टर गैरअर्जदार क्र.2 यांचे अर्थसहयाने खरेदी केले. ट्राली ही नंतर पाच महिन्यानंतर अर्जदारास मिळाली. ट्रॅक्टर घेते वेळेस न्यू महिन्द्रा शक्तीमान असे इंग्रजी अक्षरात त्यावर लिहीलेले होते. याविषयी शंका व्यक्त केल्यानंतर हे ट्रॅक्टर महिन्द्रा कंपनीचे नवीन सूधारीत मॉंडेल आहे व त्यांचे सर्व सूवीधा उदा. स्पेअर पार्टस, तज्ञ मॅकेनिक, सर्व्हीस सेंटर हे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर सहा महिन्याचे आंत त्यांचे मागील हाउजिंगचे मोठे बुल गिअरचे दात तूटलेले हे गैरअर्जदार क्र.1 यांना दाखविण्यात आले. दूरुस्तीसाठी ब-याच चकरा मारल्यानंतर असे लक्षात आले की, ट्रक्टरच्या आतील इंजन व इतर सामान हिंन्दूस्थान ट्रॅक्टर 45 अश्वशक्ती जी-4 या कंपनीचे आहे. त्यांचे स्पेअर पार्टस बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामूळे ट्रॉलीसाठी लागलेला खर्च रु.81,168/-, दूरस्तीसाठी इतर खर्च रु.54,500/- असे एकूण रक्कम रु.1,35,668/- दूरुस्तीसाठी अर्जदारास लागले. तसेच ट्रॅक्टर बंद असल्यामूळे बँकेचे व्याजही वाढले व मिळणारे उत्पन्न बंद झाले. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून कर्ज पूरवठा घेते वेळेस महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरसाठी सहया घेण्यात आल्या त्यासाठी गैरअर्जदार क्र.2 यांनी 9 टक्के व्याजदर ठरला असताना नंतर दीशाभूल करुन 18 टक्के व्याजदर आकारुन दर हप्त्याची रु.7200/- असे सहा हप्त्याचे एकूण जास्तीची रक्कम रु.43,200/- व्याजापोटी वसूल केले आहेत. रु.68100/- कोणतेही कारण नसताना जास्तीचे वसूल केले आहेत. त्यामूळे रु.1,11,300/- त्यांचेकडून मिळावेत. तसेच दि.20.1.2008 पासून ट्रॅक्टरचे इंजीनचे काम नीघाल्यामूळे व ट्रॅक्टर बंद असल्यामूळे त्यांना झालेल्या नूकसानीपोटी रु.1,10,000/- ते ही मिळावेत. शारीरिक,मानसिक ञासापोटी रु.1,00,000/- व शिवाय गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांचे ताब्यात असलेले ट्रॅक्टर उर्वरित रक्कमेसाठी बळाचा वापर करुन ओढून नेऊ नये त्यामूळे त्यांचे विरुध्द मनाई हूकूम दयावा इत्यादी मागण्यासाठी हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही मूदतबाहय आहे. तशी ती चूकीची असल्याकारणाने खारीज होणेस पाञ आहे. अर्जदार यांनी मूददे निहाय मांडलेे मूददे स्पष्टपणे नाकारण्यात येतात. सत्य परिस्थिती अशी आहे की, तक्रारदाराने दि.3.12.2004 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून महिंद्रा गुजरात कंपनीचे ट्रॅक्टर रु.80,000/- चे अडव्हान्स देऊन बूकींग केले. यानंतर दि.20.12.2004 रोजी रु.5,000/-, दि.11.1.2005 रोजी रु.10,000/- दि.25.1.2005 रोजी रु.2500/-, दि.28.1.2005 रोजी रु.10,000/- असे एकूण रु.1,07,500/- गैरअर्जदार यांना दिले. उर्वरित रक्कम रु.3,60,000/- ही गैरअर्जदार क्र.2 यांना महिंद्रा फायनान्सकडून कर्जाने घेतली. यानंतर दि.20.12.2004 रोजी सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीचे इन्शूरन्ंस दि न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीकडे करुन दिले. दि.1.1.2005 रोजी सदरील महिंद्रा गूजरात ट्रॅक्टरची आर.टी.ओ. कडे पासिंग करुन दिले. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास ट्रॅक्टरची पून्हा एकदा माहीती देऊन, वॉरटी बददल व सर्व्हीसींगची माहीती दिली व जे की ट्रॅक्टर खरेदीपासून एक वर्ष वॉरंटीत आहे. त्यामूळे सदर ट्रॅक्टर हे आर.टी.ओ. कंपाऊड मध्ये ठेऊन गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.8.6.2005 रोजी पासींग करुन दिले. त्यामूळे तक्रारदाराला पाच महिन्यापर्यत ट्रेलर दिले नाही हे म्हणणे खोटे आहे. जेव्हा केव्हा अर्जदाराने ट्रक्टर दूरुस्तीसाठी आणले तेव्हा गैरअर्जदाराने ट्रॅक्टर दूरुस्त करुन दिले. वॉरंटीच्या कालावधीनंतर ही अर्जदाराने ते ट्रॅक्टर कूठे दुरुस्त केले यांची त्यांना माहीती नाही. तक्रारदारांनी ट्रॅक्टर निकृष्ट असल्या बाबत त्यांचेकडे लेखी किंवा तोंडी तक्रार केलेली नाही. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही रु.25,000/- खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी वकिलामार्फत आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावट मूददयावर आहे. अर्जदाराने मनाई हूकूम हा मंचासमोर मागितला असता दि.18.1.2008 रोजी मा. मंचाने जैसे थे असे आदेश केलेले आहेत. या बाबतची कल्पना दि.19.12.2008 रोजी पर्यत नव्हती, अर्जदाराचे ट्रॅक्टर दि.19.11.2008 रोजी दूपारी 4 वाजता मनूष्य बळाचा वापर करुन ओढून नेले हे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराचा ट्रॅक्टर दि.19.11.2008 रोजी नेला असल्याचे अर्जदार नमूद करतात. ही बाब त्यांनी न्यायमंच समक्ष सांगितली म्हणजे पूर्ण एक महिना झाला होता. ही बाब सत्य असती तर अर्जदाराने ही बाब न्यायमंचा समोर आणून दिली असती, अर्जदार आजपर्यत गप्प का राहीले ? खरी गोष्ट गैरअर्जदार यांनी उर्वरित हप्त्याची रक्कम अर्जदार यांना मागू नये व ती बूडवता यावी या उददेशाने सदर अर्ज दाखल केल्याचे दिसून येते. वस्तूस्थिती अशी आहे की, गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून रु.3,60,000/- द.सा.द.शे 11 टक्के व्याजाने ट्रॅक्टर खरेदीसाठी दि.20.11.2004 रोजी कर्ज घेतले. सदर कर्जाची परतफेड रहफ.64,800/- असे एकूण 4 वार्षिक हप्त्यामध्ये चार वर्षाचे मूदतीमध्ये करण्याचे आवश्यक होते परंतु अर्जदाराने एकही हप्ता ठरल्याप्रमाणे व योग्य वेळेत जमा केलेला नाही. ट्रॅक्टरचे उत्पन्न बंद झाले पूढील हप्त्याची रक्कम अर्जदार भरु शकणार नाही, व्याज व दंडाची रक्कम वाढत जाईल व अधीक बोजा आपल्यावर येईल व गैरअर्जदाराच्या तगादयामूळे अर्जदाराने स्वतः ते ट्रॅक्टर दि.8.11.2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडे सूपूर्द केले व तशी पोहच पावती घेतली. त्यामूळे अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे हे खोटे आहे. अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदाराचा पहिला आक्षेप असा आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराची फसवणूक करुन महिद्रा कंपनीचे 45 अश्वशक्तीचे ट्रॅक्टर देतो असे सांगून प्रत्यक्षात हिदूस्थान ट्रॅक्टर 45- अश्वशक्ती जी-4 हे ट्रॅक्टर अर्जदारास दिले. अर्जदाराने दाखल केलेले इन्व्हाईस बिल व डिसी पाहिले असता त्यावर महिद्रा शक्तीमान ट्रॅक्टर असे स्पष्टपणे लिहीलेले आहे व यावर अर्जदार यांची सही देखील आहे. आरसी बूक बारकाईने पाहिले असता असे दिसते की, यांची पासींग करण्यात आलेली असून त्यावर महिद्रा अन्ड महिद्रा असे स्पष्ट लिहीलेले आहे. आर.टी.ओ. कार्यालयामध्ये एखादया वाहनाची पासींग करताना त्यांची पूर्ण तपासणी केली जाते. या कागदपञावरुन असे स्पष्ट दिसते की, अर्जदारास गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरवलेले ट्रॅक्टर हे महिद्रा कंपनीचे आहे. हिदूस्थान कंपनीचे ट्रॅक्टर बददल काहीही स्पष्ट पूरावा नाही. गैरअर्जदाराच्या मते ट्रॅक्टरची वॉरंटी ही दि.20.12.2004 ते 19.12.2005 असल्याकारणाने या दरम्यान झालेली बीघाड त्यांनी दूरुस्त करुन दिलेली आहे व यानंतर तो वॉरंटी कालावधीमध्ये नाही. अर्जदार यांनी या बाबत गेरअर्जदार यांचे जे जॉब कार्ड दाखल केलेले आहे ते दि.1.12.2005, 16.12.2004, 2.2.2005, 15.3.2005 व 23.5.2005 असे असून या दिनांकाला अर्जदाराने आपले ट्रॅक्टर गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे आणले होते. यात ट्रॅक्टरची सर्व्हीसिंग करुन दिली, इंजन ऑईल चेंज केले व सर्व पार्टस चेक केले व वांशिग केले, फिल्टर ऑईल चेंज केले असा उल्लेख आहे. या बाबी सर्व सव्हीसिंग मधील आहेत. यात बीघाडाचा प्रकार दिसून येत नाही. परंतु दि.1.10.2005 रोजीचा जॉब कार्डवरुन रोलर बेरिंग क्रॅक, टॅपर रोलर बेरिंग क्रॅक, थ्रीस्ट बॉल बेरिंग तूटली आहे, सर्व तूटलेले पार्टस गैरअर्जदार क्र.1 यांनी बदलून दिले असे म्हटले आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून सेवा देण्यात काहीही कमतरता झाली असे वाटत नाही. याशिवाय अर्जदाराने जी दूरुस्तीची बिले दाखल केलेली आहेत ही अधिकृत विक्रेत्याची नसून जूगल अटो परभणी यांचे बिल दि.13.2.2006 रोजीचे आहे तसेच दि.27.4.2006 रोजीचे, त्यानंतर सहारा डिझेल सर्व्हीस यांचे दि.26.6.2006 चे आहे. रमनलाल अन्ड कंपनी जळगांव योच दि.28.12.2006 चे बिल आहे.नॅशनल डिझेल यांचे दि.30.3.2007 चे बिल आहे. म्हणजे एकंदरीत बिले ही 2006 ते 2007 या दरम्यानची आहेत व काही बिलामध्ये पार्टस तेच तेच दिलेले आहेत. काही बिलामध्ये सर्व्हीसींगची बिले आहेत. एक तर अर्जदार यांनी त्यांचे ट्रॅक्टर गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दूरुस्त करावयास पाहिजे होते तेव्हाच त्यांची जबाबदारी राहीली असती. बाहेरील काम केलेल्याची माहीती गैरअर्जदार क्र.1 यांना नसणार व अर्जदार यांनी दाखल केलेल्या काही पावत्यावर दिनांक ही नाही. परत तेच-तेच पार्टस बदलल्यांचे सांगितले आहे. या बिलाचा कालावधी पाहिला असता ते वॉरंटीमध्ये नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांचेवर मोफत दूरुस्त करण्याची जबाबदारी येत नाही. ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर ते साधारणतः एक दिड वर्ष चांगले चाललेले दिसते. यानंतर ट्रॅक्टरची जी दूरुस्ती करण्यात आली ते पाहिले असता असे दिसते की, ट्रॅक्टर चालवीणे त्यांची योग्य निगराणी न घेणे इत्यादी गोष्टीमूळे ट्रॅक्टरचे पार्टस खराब झालेले होते. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 विरुध्द सेवेतील ञूटी सिध्द होऊ शकत नाही. गैरअर्जदार क्र.2 हे फायनान्सर आहेत. यातील दर साहमाहीक हप्ता रु.64800/- अर्जदार यांना भरणे भाग होते. अर्जदाराने नियमित रक्कम भरली नाही.त्यामूळे त्यावर दंड व्याज लागलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी 11 टक्के कर्जावर व्याजदर होता हे दाखवीणारी कागदपवे दाखल केलेले आहेत. त्यामूळे अर्जदार यांनी व्याजावीषयी केलेली तक्रार ही खोटी वाटते व त्यांचे म्हणण्याप्रमाणे जर 9 टक्के व्याज दर आकारला असता तर तसा त्यांनी पूरावा देणे आवश्यक होते. फायनान्सर यांना ट्रॅक्टर चालू आहे काय बंद आहे यावीषयी माणूसकीच्या दृष्टीने विचार करता येईल परंतु कायदयाप्रमाणे केल्यास त्यांना त्यांचा हप्ता वेळेवर आला पाहिजे एवढेच ते पाहतात. अर्जदार यांनी स्वमर्जीने आपण हप्ता भरु शकत नाही म्हणून ते ट्रॅक्टर गैरअर्जदार क्र.2 यांचे हवाली केलेलो आहे व तशा प्रकारची पोहच पावती घेतलेली आहे. त्यामूळे गेरअर्जदार क्र.2 यांनी त्यांचे ट्रॅक्टर जबरदस्तीने ओढून नेले हे सिध्द करु शकत नाहीत. वेळेवर हप्ता न भरणे ही अर्जदाराचीच चूक आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांनी सेवेतील ञूटी केली असे म्हणता येणार नाही. अर्जदाराने उचललेले सर्व मूददे व घेतलले आक्षेप ते सिध्द करु शकलेले नाहीत. उलट गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराने दिलेली तक्रार ही पूराव्यानीशी खोटी ठरवलेली आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी सेवेतील ञूटी केली हे अर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |