Maharashtra

Jalgaon

CC/09/205

Suresh Ramdas Wagh - Complainant(s)

Versus

Gujrathi urban co.op society - Opp.Party(s)

Adv.Kulkarni

05 Oct 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/09/205
 
1. Suresh Ramdas Wagh
Jalgaon
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Gujrathi urban co.op society
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      निशाणी
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                        तक्रार क्रमांक 205/2009
                        तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः- 10/02/2009
                        सा.वा. यांना नोटीस लागल्‍याची तारीखः- 16.04.2009
                        तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-05/10/2009
 
सुरेश रामदास वाघ,
वय- सज्ञान, धंदा-
रा.17 ब, साईनाथ मंदीर जवळ,
जिल्‍हापेठ, जळगांव, ता.जि.जळगांव.             ..........      तक्रारदार
      विरुध्‍द
1.     गुजराथी अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी,
179 ते 182, सेंट्रल फुले मार्केट, जळगांव,
ता.जि.जळगांव.
(समन्‍सची बजावणी व्‍यवस्‍थापक यांचेवर करण्‍यात यावी.)
2.    व्‍यवस्‍थापक,
 गुजराथी अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी,
179 ते 182, सेंट्रल फुले मार्केट, जळगांव,
ता.जि.जळगांव.
3.    प्रशासक,
 गुजराथी अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी,
179 ते 182, सेंट्रल फुले मार्केट, जळगांव,
ता.जि.जळगांव.
4.    श्री.चंद्रकांत जयंतीलाल कोठारी,(माजी चेअरमन)
      रा.विसनजी नगर, जळगांव, ता.जि.जळगाव.       ......... सामनेवाला
 
 
                        न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 05/10/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
            तक्रारदार तर्फे  श्री.प्रदीप नि.कुलकर्णी वकील हजर
सामनेवाला क्रं. 1 ते 3 तर्फे श्री.संजय जी.शर्मा वकील हजर.
सामनेवाला क्र. 4 तर्फे श्री.विक्रम पद्यमाकर केसकर वकील हजर.
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्‍तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे.    वेगवेगळया प्रकारच्‍या ठेवी स्विकारणे, त्‍यावर व्‍याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत.   तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, मुदत ठेवी तपासल्‍या असता त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-

अ.क्र.
पावती /खाते क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
55572
16/07/2001
20,000/-
19/07/2007
2
59730
29/12/2003
10,000/-
29/06/2007
3
63537
25/11/2005
16,864/-
27/07/2007
4
59821
16/01/2004
10,000/-
16/07/2007
5
58993
19/07/2003
20,000/-
21/07/2007

 
                  तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावतीची मुदत संपलेली असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने, तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी तसेच त्‍यांना झालेल्‍या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.      
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आल्‍यानंतर, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या.   सामनेवाला क्र. 1 ते 4 यांनी प्रस्‍तुत प्रकरणी हजर होऊन म्‍हणणे सादर केलेले आहे.
            3.    सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   सामनेवाला संस्‍था ही सहकार कायदयाअंतर्गत स्‍थापन झालेली संस्‍था असल्‍याने प्रस्‍तुतचा वाद चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र या मंचास नाही.   सदर पतसंस्‍थेतील संचालकांनी स्‍वतःच्‍या व कुटूंबीयाच्‍या नावावर कर्ज घेतलेले आहे ते भरणा करीत नाही तसेच पतसंस्‍थेतील सभासदांनी एकदम रक्‍कम काढण्‍यासाठी मागणी केल्‍याने जेवढा नि धी उपलब्‍ध होता तेवढा ठेवीदार यांना परत केला तथापी रक्‍कम कर्ज वसुली अभावी सदरची रक्‍कम देता आलेली नाही.   कर्ज रक्‍कम जशी जशी वसुल होईल त्‍या प्रमाणे रक्‍कम परत करण्‍यात येत आहेत.   तसेच संचालक मंडळावर फौजदारी स्‍वरुपाची कारवाई देखील केलेली आहे.   सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासहीत रद्य करण्‍यात यावा व यदाकदाचित मे.मंच तक्रारदाराचा अर्ज मंजुर करीत असलेस ठेवीच्‍या रककमेचे रु.1,000/- प्रमाणे मासिक बिन व्‍याजी हप्‍ते पाडुन देण्‍याचे आदेश व्‍हावेत, तसेच संस्‍थेची आर्थिक परिस्थिती पाहता व्‍याज व दंड यांचे आदेश करु नयेत अशी विनंती सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी केली आहे.
            4.    सामनेवाला क्र. 4 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   प्रस्‍तुत तक्रारीकामी तक्रारदार हा ग्राहक नसल्‍याने प्राथमीक मुद्या काढुन तक्रार फेटाळण्‍यात यावी.   प्रस्‍तुतकामी सामनेवाला क्र. 4 हे सोसायटीचे माजी संचालक असल्‍यामुळे त्‍यांचा आता काहीएक संबंध राहीला नसल्‍याने व सोसायटीचे कामकाज प्रशासकाकडुन चालविले जात असल्‍याने सामनेवाला क्र. 4 यांचा प्रस्‍तुत तक्रारीशी काहीएक संबंध नाही.   प्रस्‍तुत तक्रार कायदयानुसार सहकार न्‍यायालयात उपस्थित होऊ शकते. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजुर करण्‍यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र. 4 यांनी केली आहे.  
            5.  तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे, याचे अवलोकन केले असता व  तक्रारदाराचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             6.  मुद्या क्रमांक 1   सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्‍तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहेतसेच सदरील तक्रार दाखल केल्‍यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्‍यांचे शपथपत्र दाखल केल्‍यानंतरही सदरील रक्‍कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्‍या सेवेत कसूर केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्‍यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्‍कम मागणेस हक्‍कदार आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
                        आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं. 1 ते 4 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांची  उपरोक्‍त आदेश कलम 1 मध्‍ये नमुद मुदत ठेव पावत्‍या मॅच्‍युअर्ड झालेल्‍या असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे. 5 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
( क )       सामनेवाला क्रं. 1 ते 4 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं. 1 ते 4 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं. 1 ते 4 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       सदरील तक्रारीच्‍या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्‍यास सामनेवाला क्रं. 1 ते 4 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.  
            ( फ )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 05/10/2009
                              (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )         ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.