::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक–30 डिसेंबर, 2017)
01. उपरोक्त नमुद तक्रारदारांनी मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेल्या तक्रारी हया जरी स्वतंत्ररित्या वेगवेगळया दाखल केलेल्या असल्या, तरी नमुद तक्रारींमधील विरुध्दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता, ज्या कायदे विषयक तरतुदींचे आधारे हया तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदे विषयक तरतुदी सुध्दा नमुद तक्रारींमध्ये एक सारख्याच आहेत आणि म्हणून आम्ही नमुद तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहोत. सर्व तक्रारी या विरुध्दपक्ष गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स आणि अहेड अम्युजमेंट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे तिचा प्रोप्रायटर सुरेश कोंडबाजी बुरेवार याचे विरुध्द असून नमुद तक्रारदारानीं आरक्षीत केलेल्या भूखंडांचे विक्रीपत्र विरुध्दपक्षाने नोंदवून दिले नाही या कारणास्तव दाखल केलेल्या आहेत.
02. तक्रारदारांचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) ही प्रोप्रायटरी फर्म असून विरुध्दपक्ष क्रं-(3) सुरेश कोंडबाजी बुरेवार हा त्या फर्मचा प्रोप्रायटर आहे. तक्रारदारांनी स्वतःचे निवासासाठी भूखंड विकत घेण्याचे ठरविले. विरुध्दपक्ष फर्म तर्फे प्रोप्रायटर म्हणून श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचा शेतीचे अकृषीक निवासी भूखंडात रुपांतरण करुन विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदारांनी विरुध्दपक्षाचे मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-120, 121 आणि क्रं 132, 140 व 141 मधील पटवारी हलका क्रं-64 येथील प्रस्तावित ले-आऊट मधील भूखंड विकत घेण्याचे ठरविले, त्या प्रमाणे त्यांनी विरुध्दपक्षाशी संपर्क साधून भूखंडाचे इसारपत्र/बयानापत्र करुन घेतले व इसारपत्र/बयानापत्र तसेच मासिक किस्तीव्दारे भूखंडा पोटी विरुध्दपक्षास रकमा अदा केल्यात. तक्रारदारानीं विरुध्दपक्ष फर्म तर्फे प्रोप्रायटर श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचेशी भूखंडापोटी केलेले इसारपत्र/बयानापत्र, भूखंड क्रमांक, भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ, भूखंडाची एकूण किम्मत, दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन भूखंडापोटी दिलेली एकूण रक्कम इत्यादीचा संपूर्ण तपशिल परिशिष्ट-अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे खालील प्रमाणे आहे-
“परिशिष्ट- अ”
अक्रं | तक्रार क्रमांक, त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन | भूखंड क्रमांक | भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये व प्रतीचौरस फुट दर | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्ट्रीची मुदत | भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम (दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन)व शेवटचे किस्तीचा दिनांक | बयानापत्र करुन देणा-या फर्मचे नाव |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
1 | CC/15/235 सौ.संगिता सुनिलकुमार जैन मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-64 खसरा क्रं-120,121,132,140, 141 | 11 | 9683 Rs.-15/- Per Sq.Ft. | 1,45,247/- | Dt-03/02/07 (03Years) | Rs- 1,45,247 /- Dt.-25/03 /2010 | गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स |
| | | Total | 1,45,247/- | | 1,45,247/- | |
अक्रं | तक्रार क्रमांक, त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन | भूखंड क्रमांक | भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये व प्रतीचौरस दर | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्ट्रीची मुदत | भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम (दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन) व शेवटचे किस्तीचा दिनांक | बयानापत्र करुन देणा-या फर्मचे नाव |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
2 A | CC/15/239 सौ.अर्चना प्रशांत जैन मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-64 खसरा क्रं-120,121,132 | I-16-A | 5496.37 (Rs.-12/- Per Sq.Ft.) | Rs-65,956.44 | Dt-18/09/12 | Rs.-1,82,153/- (Along with Dev.Charges) Dt-19.02.2013 | अहेड अम्युजमेंट प्रायव्हेट लिमिटेड |
2B | CC/15/239 सौ.अर्चना प्रशांत जैन मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-64 खसरा क्रं-120,121,132 | I-16-B | 5496.37 (Rs.-12/- Per Sq.Ft.) | Rs-65,956.44 | Dt-18/09/12 | Rs.-1,82,153/- (Along with Dev.Charges) Dt-19.02.2013 | Rs.-1,31,912/- (Total Consideration Amt. of 02 Plots) (+) Rs.-2,32,394/-Development Charges & Other Charges of 2 plots paid by Complainant Total paid Amt. of -Rs.-3,64,306/- |
| | | Total | 1,31.912/- | | 3,64,306/- | |
अक्रं | तक्रार क्रमांक, त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन | भूखंड क्रमांक | भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये व प्रतीचौरस दर | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्ट्रीची मुदत | भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम (दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन) व शेवटचे किस्तीचा दिनांक | बयानापत्र करुन देणा-या फर्मचे नाव |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
3A | CC/15/240 प्रशांत नरेंद्रकुमार जैन, मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-64 खसरा क्रं-120,121,132 | I-25-A | 5308.67 (Rs.-12/- Per Sq.Ft.) | 63,704/- | Dt-18/09/12 | Rs.-1,79,901/- (Along with Dev.Charges) Dt-19/02/2013 | अहेड अम्युजमेंट प्रायव्हेट लिमिटेड |
3B | CC/15/240 प्रशांत नरेंद्रकुमार जैन, मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-64 खसरा क्रं-120,121,132 | I-25-B | 5313.38 (Rs.-12/- Per Sq.Ft.) | 63,761/- | Dt-18/09/12 | Rs.-1,79,958/- (Along with Dev.Charges) Dt-19.02.2013 | Rs.-1,27,465/- (Total Consideration Amt. of 02 Plots) (+) Rs.-2,32,394/-Development Charges & Other Charges of 02 plots paid by Complainant Total paid Amt. of Rs.-3,59,859/- |
| | | Total | 1,27,465/- | | 3,59,859/- | |
| | | | | | | |
अक्रं | तक्रार क्रमांक, त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन | भूखंड क्रमांक | भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये व प्रतीचौरस दर | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्ट्रीची मुदत | भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम (दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन) व शेवटचेकिस्तीचा दिनांक | बयानापत्र करुन देणा-या फर्मचे नाव |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
4 | CC/15/261 धनेशकुमार इंदरचंद जैन. मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-64 खसरा क्रं-120,121,132. | I-67-A | 5659.17 (Rs.-12/- Per Sq.Ft.) | Rs-67,910/- | Dt-24/09/12 | Rs.-2,28,635/- (Along with Dev.Charges) Dt-24/09/2012 | अहेड अम्युजमेंट प्रायव्हेट लिमिटेड |
| | | | | | | Rs.-67,910/- (Total Consideration Amt. of Plot) (+)Rs.-1,60,725/-Development Charges & Other Charges paid by Complainant Total Paid Amt. Rs.-2,28,635/- |
| | | Total | 67,910/- | | 2,28,635/- | |
या व्यतिरिक्त तक्रारकर्ता श्री धनेशकुमार इंदरचंद जैन यांनी तक्रारी मध्ये दिनांक-01/10/2012 रोजी रुपये-80,000/- विरुध्दपक्षाला दिल्याचे नमुद केले परंतु पावती दिली नसल्याचे नमुद केले. रुपये-80,000/- विरुध्दपक्षाला दिल्या बाबतचा कोणताही लेखी पुरावा अतिरिक्त ग्राहक मंचा समोर आलेला नसल्याने रुपये-80,000/- चे पेमेंट हिशोबात धरण्यात येत नाही. |
| | | | | | | | | | | | | |
अक्रं | तक्रार क्रमांक, त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन | भूखंड क्रमांक | भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये व प्रतीचौरस दर | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्ट्रीची मुदत | भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम (दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन) व शेवटचे किस्तीचा दिनांक | बयानापत्र करुन देणा-या फर्मचे नाव |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
5 | CC/16/266 आशिष अजयकुमार जैन.मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-64 खसरा क्रं-120,121,136. | C-45 | 12,460.62 (Rs.-12/- Per Sq.Ft.) | 1,49,527/- | Dt-18/12/12 | Rs.-4,32,394/- (Along with Dev.Charges) Dt-05/04/2014 | अहेड अम्युजमेंट प्रायव्हेट लिमिटेड |
| | | | | | | Rs.-1,49,527/- (Total Consideration Amt. of Plot) (+) Rs.-2,82,867/-Development Charges & Other Charges paid by Complainant Total Paid Amt. of Rs.-4,32,394/- |
| | | Total | 1,49,527/- | | 4,32,394/- | |
तक्रारदारांचे पुढे असेही म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाने त्यांना करारातील भूखंडा संबधाने त्यांच्या-त्यांच्या नावे स्टॅम्प पेपरवर बयानापत्र लिहून दिले. काही तक्रारदारानीं करारातील भूखंडाचे संपूर्ण किमती व्यतिरिक्त भूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्यासाठी येणारा संभाव्य खर्च तसेच संभाव्य विकासशुल्काची रक्कम सुध्दा विरुध्दपक्षाला अदा केलेली आहे व पावत्या प्राप्त केलेल्या आहेत. तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी विरुध्दपक्षाला वेळोवेळी करारातील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची विनंती केली परंतु विरुध्दपक्षाने योग्य तो प्रतिसाद दिला नाही.
तक्रारदारांनी विरुध्दपक्षाला भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळण्यासाठी कायदेशीर नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविल्यात परंतु रजिस्टर नोटीस घेण्यास नकार या पोस्टाचे शे-यासह परत आल्यात. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने भूखंडापोटी रकमा स्विकारुनही विक्रीपत्र नोंदवून दिले नसल्याने दोषपूर्ण सेवा दिली तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, म्हणून तक्रारदारांनी विरुध्दपक्षा विरुध्द या स्वतंत्र तक्रारी अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
(1) तक्रारदारांनी विरुध्दपक्षाशी केलेल्या करारातील नमुद भूखंडांचे विक्रीपत्र त्या-त्या तक्रारदारांचे नावे नोंदवून देऊन प्रत्यक्ष्य मोजमाप करुन ताबे देण्याचे विरुध्दपक्षाला आदेशित व्हावे परंतु करारातील नमुद भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नसल्यास तक्रारदारांनी करारातील भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे.
(2) तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रासा बद्दल तसेच भूखंडाचे किमती मध्ये झालेल्या वाढी बद्दल नुकसान भरपाई आणि नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च देण्याचे विरुध्दपक्षाला आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्षा तर्फे तक्रारनिहाय स्वतंत्र लेखी उत्तर अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष सादर करण्यात आले. विरुध्दपक्षाचे उत्तरा मध्ये विरुध्दपक्ष प्रोप्रायटरी फर्म असून सुरेश बुरेवार हा त्यांचा प्रोप्रायटर असल्याची बाब नाकबुल केली. त्यांनी ले आऊटचे माहितीपत्रक छापल्याची तसेच ले आऊट मध्ये नागरी सोयी सुविधा देण्याचे आश्वासन दिल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. विरुध्दपक्षाने तक्रारदारांच्या संपूर्ण तक्रारी, भूखंडाचे केलेले करार, तक्रारदारांनी भूखंडाचे किम्मती संबधी तसेच विकासशुल्क व विक्रीपत्र नोंदणीसाठी लागणा-या शुल्का संबधी विरुध्दपक्षास रकमा दिल्याची बाब व त्या अनुषंगाने पावत्या निर्गमित केल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र तसेच आर्थिक अधिकारक्षेत्र अतिरिक्त ग्राहक मंचास येत असल्याची बाब नामंजूर केली. मौजा रहाडी, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-120, 121 आणि 136 ही जमीन व्यवसायिक आणि औद्दोगिक उपयोगा करीता असल्याने तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत, त्यामुळे त्यांना तक्रारी दाखल करण्याचे अधिकार नाहीत. सबब तक्रारदारांच्या तक्रारी या खर्चासह खारीज करण्याचा आक्षेप विरुध्दपक्षा तर्फे घेण्यात आला.
04. उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये तक्रारदारानीं तक्रारनिहाय भूखंडाच्या करारनाम्यांच्या प्रती, भूखंडाच्या रकमा दिल्या बाबत विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रती, प्रतीउत्तर व लेखी युक्तीवाद सादर केला.
05. विरुध्दपक्षा तर्फे लेखी उत्तरा सोबत एक पुरसिस दाखल करण्यात येऊन काही पोलीस दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्यात.
06. तक्रारदारां तर्फे वकील श्री जैन यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षा तर्फे मौखीक युक्तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित नव्हते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारी व दस्तऐवज तसेच त्यावरील विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर व विरुध्दपक्षाची पुरसिस व त्या सोबतचे दस्तऐवज यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष::
07. तक्रारदारांच्या तक्रारी प्रमाणे त्यांनी विरुध्दपक्षाचे प्रस्तावित ले आऊट मधील करारातील भूखंड विकत घेण्याचे ठरविले व त्या नुसार उभय पक्षां मध्ये सन-2007 व सन-2012 मध्ये भूखंड विक्री संबधी करार करण्यात आलेत. विरुध्दपक्षाचे उत्तरा प्रमाणे तक्रारदारांच्या संपूर्ण तक्रारी विरुध्दपक्षाला मान्य नाहीत. विरुध्दपक्षाने त्याचेशी तक्रारदारानीं करारातील केलेले भूखंडांचे व्यवहार व त्यापोटी तक्रारदारांनी भरलेल्या रकमा या नामंजूर केलेल्या आहेत.
तक्रारदारानीं आपल्या या म्हणण्याचे पुराव्यार्थ करारातील भूखंड विक्री कराराच्या प्रती तसेच करारातील भूखंडापोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये रकमा जमा केल्या बाबत पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत त्यावरुन त्यांचे उपरोक्त नमुद कथनास बळकटी प्राप्त होते.
08. विरुध्दपक्षा तर्फे लेखी उत्तरात असाही आक्षेप घेण्यात आला की, मौजा रहाडी, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-120, 121 आणि 136 ही जमीन व्यवसायिक आणि औद्दोगिक उपयोगा करीता असल्याने तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत, त्यामुळे त्यांना तक्रारी दाखल करण्याचे अधिकार नाहीत.
विरुध्दपक्षा तर्फे भूखंड विक्री संबधी जे बयानापत्र तक्रारदारांना करुन देण्यात आलेले आहे, त्यामध्ये सदर जमीन ही भूखंड म्हणूनच विक्री करण्याचे करार विरुध्दपक्षाने केलेले आहेत, तसेच करारा मध्ये असे कुठेही नमुद केलेले नाही की, सदर भूखंड हे व्यवसायिक आणि औद्दोगिक हेतूने आरक्षीत केलेले आहेत तसेच भूखंडा संबधी ज्या पावत्या निर्गमित केल्यात त्यावर सुध्दा सदर भूखंड हे व्यवसायिक व औद्दोगिक वापरा करीता असल्याचे नमुद केलेले नाही. तसेच विरुध्दपक्षाने सुध्दा त्या संबधी पुरावा म्हणून दस्तऐवज दाखल केलेले नाहीत, त्यामुळे तक्रारदारांनी करार केलेले भूखंड हे व्यवसायिक व आणि औद्दोगिक हेतु करीता होते हा विरुध्दपक्षाचा आक्षेप अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे फेटाळण्यात येतो.
09. विरुध्दपक्षा तर्फे उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये एक पुरसिस दाखल करुन त्याव्दारे आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांचे तर्फे विरुध्दपक्ष सुरेश कोंडबाजी बुरेवार याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला असून विरुध्दपक्षाचे मालकीच्या शहराला असलेल्या निरनिराळया जमीनी या गुन्हयात संलग्नित करण्यात आल्याचे नमुद केले. पोलीस दस्तऐवजा मध्ये वादातील मौजा रेहाडी येथील खसरा क्रं-132/3 व 132/4 संलग्नित असून त्याच बरोबर मौजा बोरी, घुटी, वारंगा, जुनापाणी, बनवाडी, वेळाहरी, देवळी गुजर, नवरमारी, वरोडा, मोहगाव, सालई गोधनी, चिकना, चिमनाझरी, बोरखेडी, घोगली, सोनेगाव, सिंधीविहिरी, झरी, तालुका उमरेड येथील मौजा वडद, ठाणा, धारा, बोथली, पिटीचुहा, डव्हा खापारी, घोटी, फुकेश्वर, सालई, मटकाझरी, कच्छीमेठ, म्हसेपठार,तालुका सावनेर येथील मौजा जैतगड या मालमत्तेची खरेदी विक्री, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, आममुखत्यारपत्र, गहाणखतव्दारे हस्तांतरण करण्यात येऊ नये, या बाबतीत काही आक्षेप असल्यास मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-9 नागपूर यांचे न्यायालयात दाद मागावी असे आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर यांचे दिनांक-24 सप्टेंबर, 2016 रोजीचे पत्रात नमुद केलेले आहे तसेच त्या संबधीचा अहवाल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-09, नागपूर यांचे कडे सादर करण्यात आलेला आहे. त्या संबधाने विरुध्दपक्षाचे वकीलानीं आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी विरुध्दपक्ष सुरेश बुरेवार याला दिलेल्या पत्राच्या प्रती दाखल केल्यात तसेच फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत जाहिर नोटीस, एफआयआरची प्रत, तसेच श्री मोहन नारायणराव घोरपडे, राहणार अमरावती रोड, वाडी, नागपूर यांनी पोलीस स्टेशन गणेशपेठ, नागपूर यांचे कडे विरुध्दपक्ष सुरेश बुरेवार याचे विरुध्द केलेली लेखी तक्रार अशा दस्तऐवजाच्या प्रती सुध्दा दाखल केल्यात.
अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे येथे स्पष्ट करण्यात येते की, कायद्दाव्दारे तक्रारी सोडविण्यासाठी ज्या काही सोयी शासनाने निर्माण केलेल्या आहेत, त्यामध्ये ग्राहक मंचाची निर्मिती ही अतिरिक्त सोय म्हणून निर्माण केलेली आहे, कोणत्या ठिकाणी जाऊन तक्रार करावी हा अधिकार संबधित व्यक्तीस आहे, तक्रारदारांनी विरुध्दपक्षा विरुध्द अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर येथे तक्रारी दाखल केलेल्या असल्याने त्या सोडविण्याचे अधिकारक्षेत्र अतिरिक्त ग्राहक मंचास येते, पोलीसांनी नोंदविलेले गुन्हे तसेच सदर तक्रारीं मध्ये दाखल केलेले न्यायप्रविष्ट दस्तऐवज विचारात घेता नमुद तक्रारीं मधील वादातील जमीन मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर येथील विरुध्दपक्षाचे मालकीच्या वादातील मौजा रेहाडी येथील खसरा क्रं-132/3 व 132/4 य जमीनी गुन्हयात संलग्नित असून त्या संबधीचा अहवाल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-09, नागपूर यांचे कडे आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर यांनी सादर केलेला आहे आणि या जमीनीच्या विक्रीवर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बंदी घातलेली आहे त्यामुळे आता तक्रारदारांच्या नावे करारातील नमुद भूखंडाचे विक्रीपत्र विरुध्दपक्षाला नोंदवून देण्याचे आदेश अतिरिक्त ग्राहक मंचास देता येणार नाहीत, त्यामुळे तक्रारदार हे परिशिष्ट अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे त्यांनी विरुध्दपक्षाला भूखंडापोटी अदा केलेली प्रत्यक्ष्य संपूर्ण रक्कम शेवटची किस्त जमा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत, असे अतिरिक्त मंचाचे मत आहे.
10. तक्रारदारांच्या तक्रारी या मुदतीत आहेत, या संदर्भात हे ग्राहक मंच पुढील मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयावर आपली भिस्त ठेवीत आहे-
“Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti Kumar & Ors.”- 2005(2) CPR-1 (NC).
सदर निवाडयामध्ये मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे भूखंडाचा कब्जा संबधित ग्राहकास देण्यास किंवा त्याने जमा केलेली रक्कम परत करण्यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात असेही नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करण्यास विकासक/बांधकाम व्यवसायिक काही प्रयत्न करीत नसेल किंवा त्याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्यामुळे असा आक्षेप जर विरुध्दपक्ष घेत असेल तर त्या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्याची गरज नसते.
11. उपरोक्त नमुद प्रकार पाहता यावरुन विरुध्दपक्षाला तक्रारदाराचीं एक प्रकारे फसवणूक करावयाची होती, असे म्हणणे गैर होणार नाही. या एकाच बाबी वरुन असे म्हणता येईल की, विरुध्दपक्षाचा, तक्रारदारानां करारा प्रमाणे भूखंड विक्री करुन देण्याचा हेतु नव्हता आणि तक्रारदारानां कडून रकमा मिळाल्या नंतर त्यांना केवळ फसविण्याचा विरुध्दपक्षाचा उद्देश्य दिसून येतो.
12. वरील सर्व कारणास्तव, आम्ही, या निष्कर्षाप्रत आलो आहोत की, विरुध्दपक्षाने केवळ सेवेत त्रृटीच ठेवली नसून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब सुध्दा केलेला आहे. तक्रारदारानीं परिशिष्ट-अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे करारातील भूखंडापोटी तसेच संभाव्य विकासशुल्क आणि संभाव्य विक्रीपत्र नोंदणीसाठी लागणारा खर्च यासाठी विरुध्दपक्षा कडे रकमा जमा केलेल्या आहेत परंतु करारातील मौजा रहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर येथील जमीनी नागपूर पोलीस शहर आर्थिक गुन्हे शाखा यांनी जप्त करुन न्यायप्रविष्ट असल्याने व सदर मालमत्तेच्या व्यवहारावर प्रतिबंधीत केलेले असल्याने करारातील भूखंडांची विक्रीपत्रे तक्रारदारांच्या नावे नोंदवून देणे शक्य नसल्याने अशा परिस्थितीत परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या नुसार त्या-त्या तक्रारकर्त्याने प्रत्यक्ष्य विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केलेली एकूण रक्कम, शेवटची किस्त अदा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेते द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्षाची राहिल. तसेच तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-10,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत.
13. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) उपरोक्त नमुद तक्रारदारांच्या तक्रारी, विरुध्दपक्ष गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स आणि अहेड अम्युजमेंट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे नमुद दोन्ही फर्मचा प्रोप्रायटर श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येतात.
(2) “विरुध्दपक्षाला” आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारीतील “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे तक्रारदारानीं करारातील भूखंडापोटी तसेच संभाव्य विकासशुल्क आणि विक्रीपत्र नोंदणीसाठीचा खर्च इत्यादीसह विरुध्दपक्ष फर्म मध्ये प्रत्यक्ष्य जमा केलेली एकूण रक्कम, त्या-त्या तक्रारदारांना त्यांची-त्यांची शेवटची किस्त जमा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह येणारी रक्कम परत करावी.
(3) तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-10,000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून प्रत्येकी रुपये-5,000/-(अक्षरी प्रत्येकी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्षाने उपरोक्त नमुद तक्रारदारांना द्दावेत.
(4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात. निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-CC/15/235 मध्ये लावण्यात यावी आणि अन्य ग्राहक तक्रारी मध्ये निकालपत्राच्या प्रमाणित प्रती लावण्यात याव्यात.