Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/13/720

Mr. Sitaram Domaji Tidke, - Complainant(s)

Versus

Gruhlaxmi Construction & Land Developers - Opp.Party(s)

Adv. Pritesh Bansod

03 Jan 2018

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/13/720
 
1. Mr. Sitaram Domaji Tidke,
R/o:- 428/25, Shubhan Nagar, Near Hanuman Mandir, Bhandara Road, Nagpur.
nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Gruhlaxmi Construction & Land Developers
Gruhlaxmi Tower, Opp.Chandralok Building, Beside Bhagwaghar police chowki, Central Avenue Road, Nagpur.-02.
nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 03 Jan 2018
Final Order / Judgement

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्‍या.)

(पारीत दिनांक03 जानेवारी, 2018)                   

 

01.   उपरोक्‍त नमुद तक्रारीं मध्‍ये उभय तक्रारदारानीं मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेल्‍या तक्रारी हया जरी स्‍वतंत्ररित्‍या वेगवेगळया दाखल केलेल्‍या असल्‍या, तरी नमुद तक्रारींमधील उभय तक्रारदार हे एकच असून या सर्व तक्रारीं मधील विरुध्‍दपक्ष हे सुध्‍दा एकच  आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता, ज्‍या कायदे विषयक तरतुदींचे आधारे हया दोन्‍ही तक्रारी निकाली निघणार आहेत, त्‍या कायदे विषयक तरतुदी सुध्‍दा दोन्‍ही  तक्रारींमध्‍ये एक सारख्‍याच आहेत आणि म्‍हणून आम्‍ही नमुद दोन्‍ही तक्रारीं मध्‍ये एकत्रितरित्‍या निकाल पारीत करीत आहोत. दोन्‍ही तक्रारी या विरुध्‍दपक्ष गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स विरुध्‍द असून तक्रारदारानी आरक्षीत केलेल्‍या भूखंडांचे विक्रीपत्र विरुध्‍दपक्षाने नोंदवून दिले नाही या कारणास्‍तव दाखल केलेल्‍या आहेत.

 

02.   तक्रारदारांचे  संक्षीप्‍त कथन खालील प्रमाणे-

     विरुध्‍दपक्ष प्रोप्रायटरी फर्म असून सुरेश कोंडबाजी बुरेवार हा त्‍या फर्मचा प्रोप्रायटर आहे.  विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे प्रोप्रायटर म्‍हणून श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचा शेतीचे अकृषीक निवासी भूखंडात रुपांतरण करुन विक्रीचा व्‍यवसाय आहे. तक्रारदारानीं विरुध्‍दपक्षाचे प्रस्‍तावित ले-आऊट मधील भूखंड विकत घेण्‍याचे ठरविले, त्‍या प्रमाणे दोन्‍ही तक्रारदारानीं विरुध्‍दपक्षाशी संपर्क साधून भूखंडाचे इसारपत्र/बयानापत्र करुन घेतले व इसारपत्र/बयानापत्रा व्‍दारे भूखंडा पोटी विरुध्‍दपक्षास रकमा अदा केल्‍यात. उभय तक्रारदारानीं विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे प्रोप्रायटर श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचेशी भूखंडापोटी केलेले इसारपत्र/बयानापत्र, भूखंड क्रमांक, भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ, भूखंडाची एकूण किम्‍मत, दाखल केलेल्‍या पावत्‍यांच्‍या प्रतींवरुन भूखंडापोटी दिलेली एकूण रक्‍कम इत्‍यादीचा संपूर्ण तपशिल परिशिष्‍ट-अ मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे पुढील  प्रमाणे आहे-

 

 

परिशिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्‍कम (दाखल केलेल्‍या पावत्‍यांच्‍या प्रतींवरुन)व शेवटचे किस्‍तीचा दिनांक

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

1

RBT/CC/13/720

सिताराम डोमाजी तिडके,

कृषी जमीन मौजा बोथली, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-13

सर्व्‍हे क्रं-204

60/A

1501 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

60,040/-

Dt-30/09/09

 

भूखंड क्रं- 60/A च्‍या ईसारपत्रा मध्‍ये असे लिहून देण्‍यात आलेले आहे की, सदर प्‍लॉटधारकास जागा (भूखंड क्रं) क्रं-17/A, 17/B, 18/A, 18/B, 43/A या पाच भूखंडांवर सदर भूखंड क्रं-60/A फ्री देण्‍यात आलेला आहे.

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

Total

60,040/-

 

………

 

 

परिशिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-A

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके/ सुरज सिताराम तिडके

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

10

1806.90 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

72,276/-

Dt-04/03/09

ईसारपत्रात असेही नमुद केलेले आहे की, सदर भूखंड क्रं 10 वर सेक्‍टर-23मधील भूखंड क्रं-28 फ्री देण्‍यात आलेला आहे.

ईसारपत्रात भूखंडाची संपूर्ण किम्‍मत मिळाल्‍याचे नमुद केलेले आहे.

पावती दिनांक-15/11/2011

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स  

 

 

 

Total

72,276/-

 

72,276/-

 

 

- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-B

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके/ सुरज सिताराम तिडके

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

12

2097.36 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

83,894/-

Dt-04/03/09

ईसारपत्रात असेही नमुद केलेले आहे की, सदर भूखंड क्रं 12 वर सेक्‍टर-23मधील भूखंड क्रं-28 फ्री देण्‍यात आलेला आहे.

ईसारपत्रात भूखंडाची संपूर्ण किम्‍मत मिळाल्‍याचे विरुध्‍दपक्षाने मान्‍य केलेले आहे.

पावती दिनांक-15/11/2011

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

 

Total

83,894/-

 

83,894/-

 

 

परिशिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-C

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके/ सुरज सिताराम तिडके

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

13

1614 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

58,104/-

Dt-01/01/09

 

ईसारपत्रात ईसारा दाखल रुपये-64,560/- मिळाल्‍याचे मान्‍य केलेले आहे.  पावती दिनांक-31/12/2008

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

Total

58,104/-

 

64,560/-

 

 

 

 

परिशिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-D

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके,

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

14

1614 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

64,560/-

Dt-01/01/09

 

ईसारपत्राचे दिवशी ईसारा दाखल रुपये-58,104/- मिळाल्‍याचे विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे मान्‍य केलेले आहे.

पावती दिनांक-31/12/2008

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

Total

64,560/-

 

58,104/-

 

तक्रारदाराच्‍या तक्रारीतील मागणी वरुन सदर भूखंड क्रं-14 संबधाने उभय पक्षां मध्‍ये झालेल्‍या समझोत्‍या नुसार तक्रारदारांना काही रक्‍कम प्राप्‍त झालेली असून त्‍यापैकी उर्वरीत रक्‍कम रुपये-7862/- तक्रारदारानां वार्षिक-18 टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेश्ति व्‍हावे अशी मागणी केलेली आहे.

शिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-E

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके/ सुरज सिताराम तिडके

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

18

1614 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

64,560/-

Dt-04/03/09

 

ईसारपत्रात भूखंडाची संपूर्ण किम्‍मत मिळाल्‍याचे मान्‍य केलेले आहे.

पावती दिनांक-15/11/2011

 

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

Total

64,560/-

 

64,560/-

 

ईसारपत्रात असेही नमुद केलेले आहे की, सदर भूखंड क्रं 18 वर सेक्‍टर-23 मधील भूखंड क्रं-30 फ्री देण्‍यात आलेला आहे.

 

परिशिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-F

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके/ सुरज सिताराम तिडके

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

19

1614 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

56,072/-

Dt-04/03/09

 

ईसारपत्रात भूखंडाची संपूर्ण किम्‍मत मिळाल्‍याचे मान्‍य केलेले आहे.

पावती दिनांक-15/11/2011

 

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

Total

56,072/-

 

56,072/-

 

ईसारपत्रात असेही नमुद केलेले आहे की, सदर भूखंड क्रं 19 वर सेक्‍टर-23 मधील भूखंड क्रं-30  फ्री देण्‍यात आलेला आहे.

परिशिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-G

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके,

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

28

1775.40 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

71,016/-

Dt-20/07/09

 

ईसारपत्राचे दिवशी रुपये-6016/- मिळाल्‍याचे विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे मान्‍य केलेले आहे.                  (फ्री भूखंड क्रं-28)

 

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

Total

71,016/-

 

6016/-

 

ईसारपत्रात असेही नमुद केलेले आहे की, सदर भूखंड क्रं 28 हा सेक्‍टर-23 मधील भूखंड क्रं-10,क्रं-12 व क्रं-13  या तीन भूखंडांवर फ्री देण्‍यात आलेला आहे.

 

परिशिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-H

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके,

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

29

1775.40 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

71,016/-

Dt-20/07/09

 

ईसारपत्राचे दिवशी रुपये-6016/- मिळाल्‍याचे विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे मान्‍य केलेले आहे.

(फ्री भूखंड क्रं-29)

 

 

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

Total

71,016/-

 

6016/-

 

ईसारपत्रात असेही नमुद केलेले आहे की, सदर भूखंड क्रं 29 हा सेक्‍टर-23 मधील भूखंड क्रं-14,क्रं-15क्रं-16  या तीन भूखंडांवर फ्री देण्‍यात आलेला आहे.

परिशिष्‍ट- अ

अक्रं

तक्रार क्रमांक,  त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन

भूखंड क्रमांक

भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्‍ये व प्रतीचौरस फुट दर

भूखंडाची एकूण किम्‍मत

भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्‍ट्रीची मुदत

भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्‍कम (दाखल केलेल्‍या पावत्‍यांच्‍या प्रतींवरुन)व शेवटचे किस्‍तीचा दिनांक

बयानापत्र करुन  देणा-या फर्मचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

2-I

RBT/CC/13/837

सिताराम डोमाजी तिडके,

कृषी जमीन मौजा मरमझरी, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर.

प.ह.क्रं-25

खसरा क्रं-23/24/26/28 & 56 To 58           (Sector-23)

30

1775.40 Sq.Ft.

Rs.-40/- Per Sq.Ft.

71,016/-

Dt-20/07/09

 

ईसारपत्राचे दिवशी रुपये-6016/- मिळाल्‍याचे विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे मान्‍य केलेले आहे.

(फ्री भूखंड क्रं-30)

 

 

 

गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स

 

 

 

Total

71,016/-

 

6016/-

 

ईसारपत्रात असेही नमुद केलेले आहे की, सदर भूखंड क्रं 30 हा सेक्‍टर-23 मधील भूखंड क्रं-17,क्रं-18क्रं-19  या तीन भूखंडांवर फ्री देण्‍यात आलेला आहे.

          

     तक्रारदारां तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे दिवाली ऑफर योजने अंतर्गत एकूण 03 भूखंडावर 01 भूखंड फ्री देण्‍यात येणार होता. तक्रारदारानीं भूखंड क्रं-12 आणि भूखंड क्रं-13 ते क्रं-17 आणि भूखंड क्रं-18 व क्रं-19 विकत घेण्‍याचे करार केलेत. तक्रारदारांचे असेही म्‍हणणे आहे की, भूखंड क्रं-17/A, 17/B, 18/A, 18/B, 43/A या पाच भूखंडांवर भूखंड क्रं-60/A फ्री देण्‍यात आलेला आहे. तर भूखंड क्रं-10, क्रं-12 आणि क्रं-13 वर भूखंड क्रं-28 फ्री देण्‍यात आलेला आहे. तर भूखंड क्रं-14, क्रं-15 व क्रं-16 वर भूखंड क्रं-29 फ्री देण्‍यात आलेला आहे. तर भूखंड क्रं-17, क्रं-18 व क्रं 19 वर भूखंड क्रं-30 फ्री देण्‍यात आलेला आहे. तक्रारदारानीं एकूण 09 भूखंड प्रतीचौरसफूट रुपये-40/- प्रमाणे विकत घेण्‍याचे ठरविले. तसेच दोन वर्षाचे मुदती नंतर भूखंडांचे विक्रीपत्र न लागल्‍यास प्रतीचौरसफूट निश्‍चीत दराच्‍या डबल दर विरुध्‍दपक्षाने परत करण्‍याचे करारात मान्‍य केले होते. विरुध्‍दपक्षाने दिनांक-05/03/2011 रोजी भूखंड क्रं-10,12,13,18 व 19 चे मूळ दस्‍तऐवज परत घेऊन डबल रक्‍कम देण्‍याचे आश्‍वासित केले होते. प्रथम भूखंड विक्रीचे करार हे तक्रारकर्ता सितारामजी तिडके यांचे नावे व नंतर सुरज तिडके यांचे नावे करण्‍यात आले. परंतु आज पावेतो विरुध्‍दपक्षाने करारातील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही किंवा योजने प्रमाणे भूखंडाचे डबल दरा प्रमाणे रक्‍कम परत केली नाही. तक्रारदारानीं करारा प्रमाणे संपूर्ण रक्‍कमा दिलेल्‍या आहेत. तक्रारदारानीं विरुदपक्षास दिनांक-28/03/2013 रोजी पत्र दिले व त्‍यानंतर दिनांक-15/06/2013 रोजी नोटीस पाठविली परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

        म्‍हणून शेवटी तक्रारदारांनी सदर तक्रार दाखल करुन तीव्‍दारे भूखंड भूखंड क्रं-60/ए तसेच भूखंड क्रं-10,क्रं-12,क्रं-13,क्रं-18 आणि क्रं-19 यांचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्ता क्रं-2 याचे नावे तर भूखंड क्रं-28, क्रं-29 व क्रं-30 या भूखंडांचे विक्रीपत्र तक्रारकर्ता क्रं-1 याचे नावे नोंदवून देण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे. तक्रारनिहाय रुपये-5,00,000/- नुकसान भरपाई दाखल तक्रारदारांना विरुध्‍दपक्षा कडून मिळावेत तसेच भूखंड क्रं-14 ची विरुध्‍दपक्षाला तक्रारदारानां देणे असलेली रक्‍कम रुपये-7862/- वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षाला आदेशित व्‍हावे. प्रत्‍येक तक्रारीचा खर्च रुपये-15,000/- विरुध्‍दपक्षाला देण्‍याचे आदेशित व्‍हावे अशा मागण्‍या केल्‍यात.

 

03.    विरुध्‍दपक्षा तर्फे लेखी उत्‍तर दाखल करण्‍यात आले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा नुसार तीन भूखंडावर एक भूखंड फ्री योजना  होती हे तक्रारदारांचे म्‍हणणे चुकीची असून या प्रमाणे फ्री भूखंड देण्‍याचा कोणताही करार झालेला नाही. तसेच तक्रारदारां सोबत झालेले करार सुध्‍दा नाकबुल केलेत. विरुध्‍दपक्ष फर्म कार्यालयातील एजंट लोकांनी खोटे शिक्‍के तयार करुन ग्राहकां सोबत खोटे करार  विरुध्‍दपक्षाचे पःश्‍चात करुन दिलेत. एजंटसला या तक्रारीत प्रतिपक्ष न केल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती विरुध्‍दपक्षा तर्फे करण्‍यात आली.     

 

 

04.  तक्रारदारां तर्फे वकील श्री बनसोड तर विरुध्‍दपक्षा तर्फे वकील कु.रामटेके यांचा  मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

05.  तक्रारदारांच्‍या तक्रारी, तक्रारनिहाय विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तर,  तक्रारदारां  तर्फे दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाच्‍या प्रती यावरुन अतिरिक्‍त ग्राहक मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे-

                    ::निष्‍कर्ष ::

 

06.  विरुध्‍दपक्षाचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारां सोबत केलेले भूखंड विक्रीचे व्‍यवहार त्‍याच्‍या एजंटने त्‍याला न विचारता तसेच कुठलीही सुचना न देता केलेत, तसेच भूखंड व्‍यवहारापोटी तक्रारदारां कडून एजंटने स्विकारलेली रक्‍कम विरुध्‍दपक्षाला दिलेली नाही आणि विरुध्‍दपक्षा कडून एजंटानीं मिळविलेल्‍या रसिदा व बयानापत्राचा दुरुपयोग करुन तक्रारकर्त्‍याचे नावे खोटे बयानापत्र तयार करुन विरुध्‍दपक्षाची फसवणूक केली, अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने असा बचाव घेतला की, तक्रारदारां सोबत झालेले तथाकथीत भूखंड विक्रीचे व्‍यवहार विरुध्‍दपक्षा सोबत झालेले नसून त्‍याच्‍या एंजटनी त्‍याला न सांगता आणि कुठलीही माहिती न देता केले असल्‍याने तो या व्‍यवहारानां जबाबदार नाही.

 

07.   विरुध्‍दपक्षाच्‍या या बचावा मध्‍ये मंचाला फारसे तथ्‍य दिसून येत नाही कारण केवळ त्‍याच्‍या लेखी बयाना व्‍यतिरिक्‍त आधार म्‍हणून विरुध्‍दपक्षाने कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही, जर तथाकथीत भूखंड विक्रीचे व्‍यवहार विरुध्‍दपक्षाच्‍या अपरोक्ष त्‍याच्‍या एजंटने त्‍याची फसवणूक करुन तक्रारदारां सोबत केले होते आणि जेंव्‍हा ही बाब विरुध्‍दपक्षाचे लक्षात आली होती, तेंव्‍हा विरुध्‍दपक्षाने त्‍या  बद्दल पोलीस मध्‍ये तक्रार करणे अपेक्षीत होते तसेच तक्रारदारानां पण त्‍याची सुचना विरुध्‍दपक्षाने द्दावयास हवी होती. दोन्‍ही प्रकरणातील ईसारपत्रावरील विरुध्‍दपक्षाने केलेल्‍या सहया आणि दोन्‍ही प्रकरणातील लेखी उत्‍तरावरील विरुध्‍दपक्षाच्‍या सहया या एकमेकांशी ताळमेळ खातात त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाचे बचावात कोणतेही तथ्‍य अतिरिक्‍त ग्राहक मंचास दिसून येत नाही.

 

08.    प्रकरणातील दाखल विरुध्‍दपक्ष फर्मचे शिक्‍का असलेल्‍या एका पावती वरुन विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे तक्रारकर्ता सिताराम तिडके यांचे नावावर एकूण 04 धनादेशाव्‍दारे भूखंड क्रं-10 संबधाने दिनांक-04/03/2011 रोजी                  रुपये-1,30,096/-, भूखंड क्रं-12 संबधाने दिनांक-04/03/2011 रोजी            रुपये-1,51,008/- तर भूखंड क्रं-18 संबधाने दिनांक-01/01/2011 रोजी    रुपये-1,16,208/- तर भूखंड क्रं-19 संबधाने दिनांक-04/03/2011 रोजी  रुपये-1,00,928/- अशाप्रकारे एकूण रक्‍कम रुपये-4,98,240/- परत करण्‍यात आल्‍याचे नमुद करण्‍यात आलेले आहे तसेच या भूखंड क्रं-10,12,18 व क्रं-19 संबधी मूळ दस्‍तऐवज कार्यालयात जमा करण्‍यात यावे असेही नमुद केलेले आहे.

 

9.     यावरुन असे दिसून येते की, तक्रारदारानीं करारातील नमुद भूखंड क्रं-10, क्रं-12, क्रं-18 व क्रं-19 परत करुन विरुध्‍दपक्षा तर्फे धनादेशाव्‍दारे एकूण रक्‍कम रुपये-4,98,240/- स्विकारलेत परंतु नंतर विरुध्‍दपक्षा तर्फे दिलेले धनादेश हे पुढे अनादरीत झाल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष सुरेश बुरेवार याचे विरुध्‍द न्‍यायालयात फौजदारी प्रकरण दाखल केल्‍याचे दिसून येते.     प्रकरणातील दाखल मा.जिल्‍हा मध्‍यस्‍थी प्राधिकरण, नागपूर    श्री नांदगावकर साहेब यांचे समोरील विरुध्‍दपक्ष सुरेश बुरेवार याचे विरुध्‍द खालील नमुद फौजदारी प्रकरणां  मध्‍ये  दिनांक-30/08/2012 रोजी तक्रारदार आणि विरुध्‍दपक्षा मध्‍ये झालेल्‍या समझौता पत्रा नुसार विरुध्‍दपक्षाने दिलेले धनादेश अनादरीत झाल्‍याने परत करावयाच्‍या रकमेचा तपशिल पुढील प्रमाणे आहे-

 

अक्रं

धनादेश क्रं

धनादेश अनादरीत दिनांक

धनादेश रक्‍कम

प्रकरण क्रमांक

समझोत्‍या नुसार परत करावयाची रक्‍कम

01

909946

08/12/2011

2,44,034/-

2675/12

2,76,970/-

02

909945

08/12/2011

2,44,036/-

2676/12

2,76,972/-

03

909948

08/12/2011

1,08,460/-

2677/12

2,,26,709/-

 

 

 

 

एकूण रक्‍कम

6,80,651/-

विरुध्‍दपक्ष सुरेश बुरेवार याने सदर एकूण रक्‍कम ही दिनांक-30/10/2012 पर्यंत एकूण 03 किस्‍तीत देण्‍याचे समझोता पत्रात मान्‍य केलेले आहे. परंतु विरुध्‍दपक्ष हा समझोता पत्रा नुसार न वागल्‍याने तक्रारदारांनी या तक्रारी ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेल्‍या आहेत.

   

 

 

 

10.  विरुध्‍दपक्षा तर्फे तक्रारकर्ता सुरज सिताराम तिडके याचे नावे दिनांक-28/03/2013 रोजी तीन पत्र युपीसीव्‍दारे पाठविण्‍यात आल्‍या बद्दल पत्राच्‍या प्रती दाखल आहेत, त्‍यावरुन विकासशुल्‍काच्‍या थकीत रकमा देण्‍या बाबत नमुद करण्‍यात आलेले असून त्‍यामध्‍ये भूखंड क्रं-12 संबधी रुपये-83,894/-, भूखंड क्रं-13 संबधी रुपये-64,560/-, भूखंड क्रं-19 संबधी रुपये-56,072/- अशा रकमा पंधरा दिवसांचे आत जमा करण्‍याचे नमुद असून दिनांक-15 एप्रिल, 2013 पर्यंत विक्रीपत्र सुरु होत असल्‍याचे नमुद केलेले आहे.

 

 

11.  तक्रारदारांचे वकील श्री बन्‍सोड यांनी मौखीक युक्‍तीवादात असे सांगितले की, विरुध्‍दपक्ष सुरेश बुरेवार याने भूखंडाचे दिलेले धनादेश अनादरीत झालेत आणि नंतर न्‍यायालया समोर झालेल्‍या समझोता पत्रा नुसार तक्रारदारानां भूखंडाच्‍या रकमा परत केल्‍या नाहीत, त्‍यामुळे तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष यांचे मध्‍ये झालेले भूखंडाचे करार आजही अस्तिवात आहेत, ते रद्द झालेले नाहीत. अशा परिस्थितीत तक्रारदार हे आजही करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र विरुध्‍दपक्षा कडून नोंदवून मिळण्‍यास पात्र आहेत.

 

 

12.   दाखल दस्‍तऐवजांच्‍या प्रतीं वरुन तक्रारदारांनी करार केलेले भूखंड विरुध्‍दपक्षाला परत देऊ केलेत आणि विरुध्‍दपक्षाने त्‍या प्रित्‍यर्थ्‍य धनादेश दिलेत आणि पुढे ते धनादेश अनादरीत झालेत आणि अनादरीत झालेल्‍या भूखंडा संबधाने तक्रारदारांनी न्‍यायालयात विरुध्‍दपक्ष सुरेश बुरेवार याचे विरुध्‍द फौजदारी प्रकरण दाखल केलेत आणि त्‍यामध्‍ये झालेल्‍या समझोता पत्रा नुसार विरुध्‍दपक्षाने रक्‍कम परत केली नाही.

 

 

 

 

 13.   अतिरिक्‍त ग्राहक मंचा तर्फे येथे विशेषत्‍वाने नमुद करण्‍यात येते की,  भूखंडाच्‍या करारां वरुन दोन्‍ही तक्रारदार हे एकाच कुटूंबातील सदस्‍य असून एकाच ठिकाणी राहत आहेत. तक्रारकर्ता क्रं-1) हे, तक्रारकर्ता क्रं-2 चे वडील आहेत आणि त्‍यांनी तक्रारीतील प्रार्थनेत  भूखंड क्रं-10, क्रं-12, क्रं-13, क्रं-18 आणि क्रं-19 असे मिळून एकूण-05 भूखंडां संबधी मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी एकूण-05 भूखंडां संबधी मागणी केलेली आहे. तक्रारदारानीं एकूण-06 भूखंड आरक्षीत केलेली होती, त्‍यापैकी आरक्षीत भूखंड क्रं-14 मध्‍ये समझोता होऊन अद्दापही काही रक्‍कम तक्रारदारानां विरुध्‍दपक्षा कडून घेणे आहे. तसेच विरुध्‍दपक्षाचे योजने प्रमाणे तीन भूखंडावर एक भूखंड फ्री अशी योजना असल्‍याने भूखंड क्रं-65 ए तसेच भूखंड क्रं-28, क्रं-29 आणि क्रं-30 ही फ्री मिळालेली भूखंडे आहेत.  तक्रारदारानीं मागणी केलेल्‍या भूखंडांचे क्षेत्रफळ अनुक्रमे-1806.90 चौरसफूट, 2097.36 चौरसफूट आणि 1614 चौरसफूटा प्रमाणे 03 भूखंड असे असून  या एकूण 05 भूखंडाचे क्षेत्रफळ-8746.26 एवढे येते. तक्रारदारांनी नोंदणी केलेली ही 05 भूखंडे जवळपास लगतची नसून ती काहीशा अंतरा-अंतरावर आहेत आणि तक्रारदारानीं ही 05 भूखंडे नोंदणी करण्‍याचे कारण हे निवासासाठी दिसत नसून ते गुंतवणूकीचे दृष्‍टीने भविष्‍यात पुर्नविक्रीतून नफा कमाविण्‍यासाठी आरक्षीत केल्‍याचे दिसून येतात. तक्रारदारांनी केलेले भूखंडाचे करार हे वैयक्तिक राहण्‍यासाठी किंवा वापरासाठी केलेले नसून त्‍या भूखंडांची पुर्नविक्री करुन नफा कमाविण्‍याचे उद्देश्‍याने केल्‍याचे दिसत असून ते भूखंड खरेदीचे व्‍यवहार हे व्‍यवसायिक कारणासाठी केलेले आहेत आणि जेंव्‍हा एखाद्दा व्‍यवहार हा व्‍यवसायिक कारणासाठी करण्‍यात येत असेल आणि त्‍या व्‍यवहारा मध्‍ये जर काही वाद उपस्थित होत असेल तर  अशा व्‍यवसायिक व्‍यवहाराचा वाद हा ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी प्रमाणे ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही, अशा व्‍यवसायिक व्‍यवहारा मधील व्‍यक्‍ती ही ग्राहक होत नाही, म्‍हणून केवळ या एकमेव  कारणास्‍तव या दोन्‍ही तक्रारी  खारीज होण्‍यास पात्र आहेत.

 

 

14.    विरुध्‍दपक्ष सुरेश कोंडबाजी बुरेवार तर्फे  याच अतिरिक्‍त ग्राहक मंचा समोर तक्रार क्रं- CC/15/235 ते CC/15/240, CC/15/261, CC/15/266 सौ.संगीता सुनिलकुमार जैन व इतर तक्रारदार या प्रकरणां मध्‍ये एक पुरसिस दाखल करुन त्‍याव्‍दारे  आर्थिक गुन्‍हे शाखा, नागपूर शहर यांचे तर्फे विरुध्‍दपक्ष सुरेश कोंडबाजी बुरेवार याचे विरुध्‍द गुन्‍हा नोंदविण्‍यात आलेला असून विरुध्‍दपक्षाचे मालकीच्‍या शहराला असलेल्‍या निरनिराळया जमीनी या गुन्‍हयात संलग्नित करण्‍यात आल्‍यात, त्‍यामध्‍ये मौजा रेहाडी येथील खसरा क्रं-132/3 व 132/4 संलग्नित असून त्‍याच बरोबर मौजा बोरी, घुटी, वारंगा, जुनापाणी, बनवाडी, वेळाहरी, देवळी गुजर, नवरमारी, वरोड, मोहगाव, सालई गोधनी, चिकना, चिमनाझरी, बोरखेडी, घोगली, सोनेगाव, सिंधीविहिरी, झरी, तालुका उमरेड येथील मौजा वडद, ठाणा, धारा, बोथली, पिटीचुहा, डव्‍हा खापारी, घोटी, फुकेश्‍वर, सालई, मरमझरी, कच्‍छीमेठ, म्‍हसेपठार,तालुका सावनेर येथील मौजा जैतगड या मालमत्‍तेची खरेदी विक्री, बक्षीसपत्र, मृत्‍यूपत्र, आममुखत्‍यारपत्र, गहाणखतव्‍दारे हस्‍तांतरण करण्‍यात येऊ नये, या बाबतीत काही आक्षेप असल्‍यास मा.प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-9 नागपूर यांचे न्‍यायालयात दाद मागावी  असे आर्थिक गुन्‍हे शाखा नागपूर शहर यांचे दिनांक-24 सप्‍टेंबर, 2016   रोजीचे  पत्रात  नमुद  केलेले  आहे.  सदर पोलीस दस्‍तऐवजा मध्‍ये वादातील मौजा मरमझरी तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर येथील जमीनीचा सुध्‍दा समावेश आहे. तसेच त्‍या संबधीचा अहवाल प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-09, नागपूर यांचे कडे सादर करण्‍यात आलेला आहे. त्‍या संबधाने  विरुध्‍दपक्षाचे वकीलानीं उपरोक्‍त नमुद प्रकरणांमध्‍ये अतिरिक्‍त ग्राहक मंचा समोर आर्थिक गुन्‍हे शाखा, नागपूर शहर यांनी विरुध्‍दपक्ष सुरेश बुरेवार याला दिलेल्‍या पत्राच्‍या प्रती दाखल केल्‍यात तसेच फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत जाहिर नोटीस, एफआयआरची प्रत, तसेच  श्री मोहन नारायणराव घोरपडे, राहणार अमरावती रोड, वाडी, नागपूर यांनी पोलीस स्‍टेशन गणेशपेठ, नागपूर यांचे कडे विरुध्‍दपक्ष सुरेश बुरेवार याचे विरुध्‍द केलेली लेखी तक्रार अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती सुध्‍दा दाखल केल्‍यात.

 

 

15.  तक्रारदारांची जरी फसवणूक झाली आहे, तरी त्‍यांना ग्राहक मंचा समक्ष दाद मागता येणार नाही कारण त्‍यांनी भूखंड खरेदीचे जे व्‍यवहार केलेले आहेत ते व्‍यवसायिक स्‍वरुपाचे असल्‍याने दोन्‍ही तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्दा-1986 चे तरतुदी प्रमाणे ग्राहक ठरत नाही. त्‍यामुळे उपरोक्‍त नमुद कारणास्‍तव उपरोक्‍त नमुद दोन्‍ही तक्रारीतील अन्‍य कोणत्‍याही विवादीत मुद्दानां स्‍पर्श न करता, आम्‍ही केवळ याच कारणास्‍तव या तक्रारी खारीज करीत असून  प्रकरणात  खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

     

                  ::आदेश::

(1)    ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/720 मधील तक्रारकर्ता श्री सिताराम डोमाजी तिडके आणि ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/837 मधील तक्रारदार श्री सिताराम डोमाजी तिडके आणि श्री सुरज सितराम तिडके यांच्‍या विरुध्‍दपक्ष मे.गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन एवं लॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे प्रोप्रायटर श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार  याचे विरुध्‍दच्‍या उपरोक्‍त नमुद दोन्‍ही तक्रारी या खारीज करण्‍यात येतात.

(2)     खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

(3)    निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध          करुन देण्‍यात याव्‍यात. निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/720 मध्‍ये लावण्‍यात यावी व अन्‍य ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/837 मध्‍ये  निकालपत्राची प्रमाणित प्रत लावण्‍यात यावी.

 

     

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.