Maharashtra

Nagpur

CC/13/110

Jaysing MohanSing Bawariya - Complainant(s)

Versus

Gruhlaxmi Construction And Developers - Opp.Party(s)

B S Warma

10 Jan 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/13/110
 
1. जयसिंग मोहणसिंग बावरीया
वय 56 वर्षे, धंदा निल रा. 18, वॅक्‍स कुलर फॅक्‍ट्रीसमोर ओमनगर, नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्रा
...........Complainant(s)
Versus
1. गृहलक्ष्‍मी कंस्‍ट्रक्‍शन अॅएड डेव्‍हलपर्स
रं. नं. 57-406 व्‍दारा संचालक/भागीदार तिसरा माळा, कार्पोरेशन हाऊस चंद्रलोक बिल्‍डींगजवळ हॉटेल कॅपीटल समोर, सेंट्र्रल एव्‍हेन्‍यु रोड, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्रा
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:बी. एस. वर्मा , Advocate
For the Opp. Party:
ORDER

        (मंचाचा निर्णय : श्री. प्रदीप पाटील - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)

 

                          -//  आ दे श  //-

 

 (पारित दिनांकः 10/01/2014)

 

1.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे...

 

2.          तक्रारकर्ता नागपूर येथील रहीवासी असुन त्‍याने भविष्‍यात राहण्‍याचे उद्देशाने विरुध्‍द पक्षाचे मौजा-बोथली येथील प.ह.नं.13, खसरा नं.14, तह. उमरेड, जिल्‍हा नागपूर येथील खाजगी ले आऊट मधील प्‍लॉट क्र.21/सी, एकूण क्षेत्रफळ 1412.25 चौ.फूट चे रु.40/- प्रती फूट प्रमाणे रु.56,490/- देऊन दि.09.02.2010 रोजी बुकींग केले. त्‍याबाबत विरुध्‍द पक्षाने पावती क्र.29400 तक्रारकर्त्‍यास दिली तसेच त्‍याच दिवशी इसारपत्र करुन दिले. आवश्‍यक ती कायदेशिर बाबींची पूर्तता केल्‍यानंतर विक्रीपत्र करुन देण्‍याची हमी तक्रारकर्त्‍याला देण्‍यांत आली, अन्‍यथा सदरहू प्‍लॉटची किंमत रु.80/-  प्रती चौ.फूट प्रमाणे 24 महिन्‍यांनंतर तक्रारकर्त्‍यास परत करण्‍यांत येईल असे कबुल केलेले होते. परंतु त्‍याप्रमाणे सदरहू रु.1,12,980/- चा धनादेश दि.09.02.2012 रोजीचा तक्रारकर्त्‍यास देण्‍यांत आला. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास विक्रीपत्र करुन दिलेले नाही व रक्‍कमही  परत केली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने वकीलांमार्फत कायदेशिर नोटीस पाठविली पण नोटीसला कोणतेही उत्‍तर दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे.

 

3.          नोटीसची बजावणी होऊनही विरुध्‍द पक्ष सदर प्रकरणी हजर झाले नाही व त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे तक्रारीला लेखीउत्‍तर सादर करुन तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोडून काढले नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने पारित केला.

 

  • कारणमिमांसा -
  •  

4.          तक्रार दाखल केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षास मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यांत आल्‍यानंतर, विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष उपस्थित झाले नाही व त्‍यांनी तक्रारीस उत्‍तर दाखल न केल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला व तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे ऐकूण घेण्‍यांत आले. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे ऐकल्‍यानंतर तसेच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे असे मत आहे की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास मौजा-बोथली येथील प.ह.नं.13, खसरा नं.14, तह. उमरेड, जिल्‍हा नागपूर येथील खाजगी ले आऊट मधील प्‍लॉट क्र.21/सी, एकूण क्षेत्रफळ 1412.25 चौ.फूट प्‍लॉटचे बदल्‍यात विरुध्‍द पक्षाने बयाणापत्रात कबुल केल्‍याप्रमाणे रु.1,12,980/- परत करावयास पाहीले असे मंचाचे मत आहे.  तसेच तक्रारकर्त्‍याला मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला, त्‍यामुळे नुकसान भरपाईबद्दल रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.3,000/- मिळण्‍यांस तक्रारकर्ता पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.

 

            करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे...

 

                        -//  अं ति म आ दे श  //-

 

                

1.    तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

2.    विरुध्‍द पक्षाने बयाणापत्रात कबुल केल्‍याप्रमाणे रु.1,12,980/- तक्रारकर्त्‍यास परत       करावे.

3.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/-       व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.3,000/- द्यावे.

4.    विरुध्‍द पक्षाने आदेशाचे पालन आदेश प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत     करावे.

5.    उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

6.    तक्रारकर्त्‍यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.