Maharashtra

Nagpur

CC/483/2019

SAU. KIRAN GOVIND MALKE - Complainant(s)

Versus

GRUHALAXMI CONSTRUCTION & LAND DEVELOPERS, THROUGH PROPRIETOR SHRI. SURESH KONDBAJI BUREWAR - Opp.Party(s)

ADV. P.N. KHADGI

01 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/483/2019
( Date of Filing : 27 Aug 2019 )
 
1. SAU. KIRAN GOVIND MALKE
R/O. PLOT NO. 43, SAIBABA NAGAR, NEAR SIDHYESHWAR NAGAR, KHARBI RING ROAD, DIGHORI, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. GRUHALAXMI CONSTRUCTION & LAND DEVELOPERS, THROUGH PROPRIETOR SHRI. SURESH KONDBAJI BUREWAR
R/O. PLOT NO.5, COSMOPOLITAN SOCIETY, WESTERN SIDE OF SOMALWADA RAILWAY GATE, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. P.N. KHADGI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 01 Nov 2021
Final Order / Judgement

मा. सदस्या श्रीमती चंद‍्रिका बैस, यांच्‍या आदेशान्‍वये

  1. तक्रारदारकर्तीने सदर ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्ती आपले तक्रारीत नमुद करते की, वि.प. यांचा गृहलक्ष्‍मी कन्स्ट्रक्शन व डेव्हलपर्स  या नावाचा व्यवसाय चंद्रलोक बिल्डींग, सेंट्रल एव्हेन्य, नागपूर येथे सुरु होता. परंतु नंतर त्यांनी स्वत्ः चा व्यवसाय भुखंड क्रं.28 अलंकार नानक सोसायटी, पोद्दार शाळा, नागपूर येथे स्थानांतरीत झाला आणि आता वर्तमान पत्ता भुखंड क्रं.5 कॉस्मोपोलीटन सोसायटी, सोमवाडा रेल्वे गेटजवळ, वर्धा रोड येथुन करीत आहे.  तकारकर्तीने नमुद केले की त्यांनी वि.प.कडुन भुखंड क्रं.17, मौजा –घोगली, प.ह.न.38 सर्वे नं.22, ता.जि.नागपूर, ज्याचे क्षेत्रफळ 1695 चौ.फुट असुन त्यांनी एकुण मोबदला रुपये 235,000/- मधे विकत घेण्‍याचा करार केला. त्यापोटी त्यांनी दिनांक 26.2.2007 रोजी वि.प.ला रुपये 50,000/- अग्रीम म्हणुन दिले. त्याबाबत वि.प.ने पावती क्रं.3522 दिली. त्यानंतर रुपये 3,000/- प्रती माह वि.प. ला देण्‍याचे निश्‍चीत केले व उर्वरित रक्कम नोंदणीकृत विक्रीपत्र करतेवेळी देण्‍याचे ठरले होते. करारपत्र करते वेळी वि.प.ने तकारकर्तीस आश्‍वासीत केले होते की, ते सदर ले-आऊटचा एनएटीपी , करुन सदर लेआऊट विकसित करुन करुन त्यात रस्ते , विद्युत पुरवठा, मलनिस्सारणाची व्यवस्था, इतर सोईसुविधा वि.प. स्वखर्चाने पुरविणार होते. तसेच सदर जमीन ही अकृषक करण्‍याची जबाबदारी ही वि.प. ची होती व त्यांनी सर्व दस्तऐवज तक्रारकर्तीचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्‍याचे आधी दस्तऐवज आणणे आवश्‍यक होते. तकारकर्तीने पूढे नमुद करतात की तिने दिनाक 25.2.2007 ते 4.6.2013 या कालावधीत वि.प.कडे 3,000/- प्रतीमाह प्रमाणे एकुण 34 हप्ते जमा केले ती एकंदरीत रक्कम रुपये 2,35,000/- एवढी आहे. वि.प.ने तक्रारकर्तीस या सर्व रक्कमेच्या पावत्या दिलेल्या आहेत.
  3. तक्रारकर्तीने पूढे नमुद केले की, तकारकर्तीने 169000/- जमा केले आहे व उर्वरित रक्कम रुपये 66,000/- नोंदणीकृत विक्रीपत्र करतेवेळी देण्‍याचे ठरले. त्यानंतर वि.प.ने दिनांक 19.10.2011 रोजी तक्रारकर्तीस नोटीस पाठविले व त्यांना रुपये 55/- प्रती चौ.फुट प्रमाणे एकुण 93225/- रुपये मागीतले व त्यानंतर रुपये 38,000/- भुखंडाची उर्वरित रक्कम मागणी केली. वि.प.ने परत दिनांक 10.10.2012 रोजी व दिनांक 3.12.2021 रोजी तक्रारकर्तीस नोटीस पाठविली त्यामूळे तक्रारकर्तीने पुन्हा दि.12.4.2012 ते 4.6.2013 पर्यत दरमहा रुपये 5000/- याप्रमाणे रुपये 35,000/- वि.प.कडे जमा केले. त्याच्या रितसर वि.प. ने तक्रारकर्तीस दिलेल्या आहेत. त्यानंतर तक्रारकर्तीने वि.प.कडे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्‍याकरिता विनंती केली परंतु वि.प.ने त्याची दखल घेतली नाही. त्यामूळे तक्रारकर्तीने दिनांक 30.10.2014 रोजी रजिस्टर ए.डी.ने पत्र पाठविले व त्यात नमुद केले की, भुखंडापोटी ठरलेली संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीने अदा केलेली आहे व भुखंडाचे विकसनापोटी रुपये 6,000/- अतिरिक्त रक्कम सुध्‍दा भरलेली आहे. परंतु वि.प.ने या पत्रावर कोणतेही उत्तर दिले नाही त्यामूळे तक्रारकर्तीने पुन्हा दिनांक 11.12.2014 रोजी व त्यानंतरही वारंवार पत्रव्यवहार केला परंतु ते परत आले. कारण त्यांनी वि.प.आपला पत्ता वारंवार बदलत होते.
  4. यावरुन  वि.प.ने तकारकर्तीसोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेते त्रुटी केल्याचे दिसुन येते म्हणुन तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्ती आपले तक्रारीत पुढीलप्रमाणे मागणी करीत आहे. वि.प.ला आदेशीत करण्‍यात यावे की त्यंनी सदर भुखंड क्रं.17, मौजा-घोगली,प.ह.न.38, खसरा क्रं.22, नागपूर येथील एकुण क्षेत्रफळ 1695 चौ.फुट याचे तकारकर्तीचे नावे विक्रीपत्र नोंदवून दयावे व भुखंडाचा प्रत्यक्ष ताबा द्यावा. हे कायदेशीररित्या व तांत्रीकदृष्‍टया शक्य नसल्यास वि.प. ने तकारकर्तीस सदरच्या भुखंडाच्या क्षेत्रफळा ईतके बाजारभावाप्रमाणे किंमत देण्‍यात यावी हे जरी शक्य नसेल तर परिच्‍छेद क्रं.14 प्रमाणे तक्रारकर्तीस रुपये 519670/- द.सा.द.शे.12टक्क व्याजदाने तक्रारकर्तीस परत करण्‍यात यावे. तसेच तक्रारर्कीस झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  5. तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन वि.प.नोटीस काढण्‍यात आली. तक्रारीची नोटीस मिळुन वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार त्यांचे विरुध्‍द दिनांक 14.2.2020 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  6. तक्रारकर्ती आपले तक्रारीत नमुद करते की, वि.प. यांचा गृहलक्ष्‍मी कन्स्ट्रक्शन व डेव्हलपर्स  या नावाचा व्यवसाय चंद्रलोक बिल्डींग, सेंट्रल एव्हेन्य, नागपूर येथे सुरु होता परंतु नंतर त्यांनी स्वत्ः चा व्यवसाय भुखंड क्रं.28 अलंकार नानक सोसायटी, पोद्दार शाळा, नागपूर येथे स्थानांतरीत झाला आणि आता वर्तमान पत्ता भुखंड क्रं.5 कॉस्मोपोलीटन सोसायटी, सोमवाडा रेल्वे गेटजवळ, वर्धा रोड येथुन करीत आहे.  तकारकर्तीने नमुद केले की त्यांनी वि.प.कडुन भुखंड क्रं.17, मौजा –घोगली, प.ह.न.38 सर्वे नं.22, ता.जि.नागपूर, ज्याचे क्षेत्रफळ 1695 चौ.फुट असुन त्यांनी एकुण मोबदला रुपये 235,000/- मधे विकत घेण्‍याचा करार केला. त्यापोटी त्यांनी दिनांक 26.2.2007 रोजी वि.प.ला रुपये 50,000/- अग्रीम म्हणुन दिले. त्याबाबत वि.प.ने पावती क्रं.3522 दिली. त्यानंतर रुपये 3,000/- प्रती माह वि.प. ला देण्‍याचे निश्‍चीत केले व उर्वरित रक्कम नोंदणीकृत विक्रीपत्र करतेवेळी देण्‍याचे ठरले होते. करारपत्र करते वेळी वि.प.ने तकारकर्तीस आश्‍वासीत केले होते की, ते सदर ले-आऊटचा एनएटीपी , करुन सदर लेआऊट विकसित करुन करुन त्यात रस्ते , विद्युत पुरवठा, मलनिस्सारणाची व्यवस्था, इतर सोईसुविधा वि.प. स्वखर्चाने पुरविणार होते. तसेच सदर जमीन ही अकृषक करण्‍याची जबाबदारी ही वि.प. ची होती व त्यांनी सर्व दस्तऐवज तक्रारकर्तीचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्‍याचे आधी दस्तऐवज आणणे आवश्‍यक होते. तकारकर्तीने पूढे नमुद करतात की तिने दिनाक 25.2.2007 ते 4.6.2013 या कालावधीत वि.प.कडे 3,000/- प्रतीमाह प्रमाणे एकुण 34 हप्ते जमा केले ती एकंदरीत रक्कम रुपये 2,35,000/- एवढी आहे. वि.प.ने तक्रारकर्तीस या सर्व रक्कमेच्या पावत्या दिलेल्या आहेत.
  7. तक्रारकर्तीने पूढे नमुद केले की, तकारकर्तीने रुपये 1,69,000/-, वि.प.कडे जमा केले आहे व उर्वरित रक्कम रुपये 66,000/- नोंदणीकृत विक्रीपत्र करतेवेळी देण्‍याचे ठरले. त्यानंतर वि.प.ने दिनांक 19.10.2011 रोजी तक्रारकर्तीस नोटीस पाठविली व त्यांना रुपये 55/- प्रती चौ.फुट प्रमाणे एकुण 93,225/- रुपये मागीतले व त्यानंतर रुपये 38,000/- भुखंडाची उर्वरित रक्कम मागणी केली. वि.प.ने परत दिनांक 10.10.2012 रोजी व दिनांक 3.12.2021 रोजी तक्रारकर्तीस नोटीस पाठविली त्यामूळे तक्रारकर्तीने पुन्हा दि.12.4.2012 ते 4.6.2013 पर्यत दरमहा रुपये 5000/- याप्रमाणे रुपये 35,000/- वि.प.कडे जमा केले. त्याच्या रितसर वि.प. ने तक्रारकर्तीस दिलेल्या आहेत. त्यानंतर तक्रारकर्तीने वि.प.कडे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्‍याकरिता विनंती केली परंतु वि.प.ने त्याची दखल घेतली नाही. त्यामूळे तक्रारकर्तीने दिनांक 30.10.2014 रोजी रजिस्टर ए.डी.ने पत्र पाठविले व त्यात नमुद केले की, भुखंडापोटी ठरलेली संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीने अदा केलेली आहे व भुखंडाचे विकसनापोटी रुपये 6,000/- अतिरिक्त रक्कम सुध्‍दा भरलेली आहे. परंतु वि.प.ने या पत्रावर कोणतेही उत्तर दिले नाही त्यामूळे तक्रारकर्तीने पुन्हा दिनांक 11.12.2014 रोजी व त्यानंतरही वारंवार पत्रव्यवहार केला परंतु ते परत आले. कारण त्यांनी वि.प.आपला पत्ता वारंवार बदलत होते.

यावरुन  वि.प.ने तकारकर्तीसोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेते त्रुटी केल्याचे दिसुन येते म्हणुन तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्ती आपले तक्रारीत पुढीलप्रमाणे मागणी करीत आहे. वि.प.ला आदेशीत करण्‍यात यावे की त्यंनी सदर भुखंड क्रं.17, मौजा-घोगली,प.ह.न.38, खसरा क्रं.22, नागपूर येथील एकुण क्षेत्रफळ 1695 चौ.फुट याचे तकारकर्तीचे नावे विक्रीपत्र नोंदवून दयावे व भुखंडाचा प्रत्यक्ष ताबा द्यावा.

 

 

 

 

  1. तक्रारदाराची तक्रार व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थीत होतात.

मुद्दे                                                           उत्तरे

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?                होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्राराचे सेवेत त्रुटी व अनुचित
  3. व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ?                          होय
  4. आदेश       ?                                                           अंतीम आदेशाप्रमाणे
    •    मि मां सा
  1. तक्रारकर्ती आपले तक्रारीत नमुद केले की,   तक्रसाकर्तीपे वि.प.कडुन उपरोक्त भुखंड क्रं.17,  ज्याचे क्षेत्रफळ 1695 चौ.फुट असुन त्यांनी एकुण मोबदला रुपये 235,000/- मधे विकत घेण्‍याचा करार दिनांक 26.2.2007 रोजी केला होता. त्यापोटी त्यांनी वि.प.ला रुपये 50,000/- अग्रीम राशी म्हणुन दिले व त्यानंतर रुपये 3,000/- तक्रारकर्तीने प्रती माह वि.प. ला देण्‍याचे निश्‍चीत केले व उर्वरित रक्कम नोंदणीकृत विक्रीपत्र करतेवेळी देण्‍याचे ठरले होते. करारपत्र करते वेळी वि.प.ने तकारकर्तीस आश्‍वासीत केले होते की, ते सदर ले-आऊटचा एनएटीपी, करुन सदर लेआऊट विकसित करुन करुन त्यात रस्ते , विद्युत पुरवठा, मलनिस्सारणाची व्यवस्था, इतर सोईसुविधा वि.प. स्वखर्चाने पुरविणार होते. तसेच सदर जमीन ही अकृषक करण्‍याची जबाबदारी ही वि.प. ची होती..

त्यानंतर वि.प.ने दिनांक 19.10.2011 रोजी तक्रारकर्तीस नोटीस पाठविले व त्यांना रुपये 55/- प्रती चौ.फुट प्रमाणे एकुण 93,225/- रुपये मागीतले व त्यानंतर रुपये 38,000/- भुखंडाची उर्वरित रक्कम मागणी केली. तकारकर्तीने पूढे नमुद केले की, तिने दिनाक 25.2.2007 ते 4.6.2013 या कालावधीत वि.प.कडे भुखंड खरेदीपोटी व विकसनापोटी एकुण रक्कम रुपये 2,41,000/- जमा केले. वि.प.ने तक्रारकर्तीस या सर्व रक्कमेच्या पावत्या दिलेल्या आहेत. त्यानंतर तक्रारकर्तीने वि.प.कडे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्‍याकरिता विनंती केली परंतु वि.प.ने त्याची दखल घेतली नाही. तक्रारकर्तीने वि.प.सोबत वारंवार पत्रव्यवहार करुन सदर भुखंडाची विक्रीपत्र करुन देण्‍याची विनंती केली. परंतु वि.प.ने त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही व वारंवार आपले कार्यालयीन पत्ते बदलवित राहीले.  

  1. यावरुन  वि.प.ने तकारकर्तीसोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेते त्रुटी केल्याचे दिसुन येते असे मंचाचे स्पष्‍ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.यांना आदेशीत येते की त्यांनी, भुखंड क्रं.17, मौजा –घोगली, प.ह.न.38 सर्वे नं.22, ता.जि.नागपूर, ज्याचे क्षेत्रफळ 1695 चौ.फुट चे तक्रारकर्तीचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे व भुखंडाची प्रत्यक्ष ताबा द्यावा. सदर विक्रीपत्र नोंदणीचा  खर्च    तक्रारकर्तीने सोसावा. अथवा हे कायदेशीर व तांत्रीकदृष्‍टया शक्‍य नसल्‍यास किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असल्‍यास  विरुध्‍द पक्षाने  1695.00 चौ.फु. इतके क्षेत्रफळ असलेल्‍या भूखंडासाठी मौजा घोगली,प..नं. 38, सर्वे नं.22, ता.जि.नागपूर या मिळकतीच्‍या झोन मधील अथवा वादातीत भूखंडापासून सर्वात जवळ असलेल्‍या इतर  झोन मध्‍ये १1695.00 चौ.फुटाच्‍या अकृषक भूखंडाकरिता शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याच्‍या आंत द्यावी आणि  सदरहू रक्‍कम एक महिन्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रक्‍कमेवर आदेशाच्‍या दिनांकापासून द.सा..शे. 9 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.  
  3. वि.प. ने तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक नुकसानापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/- तकारदारास द्यावे.
  4.  तक्रारकर्त्याला आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  5. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

  

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.