(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 02/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 20.05.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदार यांचेकडे खसरा नं.133/1, 133/2, मौजा पेवठा, प.ह.नं.4/अ, मधील भुखंड क्र.21, 1614.6 चौ.फूट करता दि.15.09.2007 रोजी रु.500/- देऊन आरक्षीत केला होता व उर्वरीत रकमेचे दि.26.09.2007 रोजी रु.40,000/- व दि.06.10.2007 रोजी रु.10,000/- धनादेशांव्दारे भुगतान केले होते. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने त्याला दि.06.10.2007 रोजी इसार पत्र करुन देऊन भुखंडाची एकूण किंमत रु.2,42,190/- ठरविण्यांत आली होती व उर्वरित रक्कम रु.7,987/- च्या हप्त्याप्रमाणे दि.06.11.2007 ते 06.11.2009 पर्यंत द्यावयाचे होते व संपूर्ण रकमेचे भुगतान झाल्यावर विक्रीपत्र करुन देण्यांचे गैरअर्जदारांनी मान्य केले होते. तक्रारकर्त्याने भुखंडाची संपूर्ण रक्कम नियमीत हप्ते भरुनही गैरअर्जदारांनी भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच वेळोवेळी वचन व आश्वासन देऊन टाळाटाळ केली, तक्रारकर्त्याने दि.14.03.2010 रोजी गैरअर्जदाराला भुखंडाची विक्री करुन देण्याबाबत पत्र पाठवले असता त्यांनी कोणतीही पावले उचलली नाही तसेच पुन्हा दि. 26.03.2010 रोजी नोंदणीकृत डाकेव्दारा पत्र पाठविले असता सदर पत्र ‘घेण्यांस नकार’ या शे-यासह परत आले, त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली सदर तक्रारीत भुखंड क्र.21 चे विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केलेली आहे. जर गैरअर्जदाराने विक्रीपत्र करुन दिले नाही तर दाव्याच्या विवरणाप्रमाणे एकूण रक्कम रु.4,04,448/- व त्यावर दि.15.09.2007 ते 15.05.1020 पर्यंत व्याजाचे रु.1,17,268/-, शारीरिक व मानसिक त्रासाकरता रु.25,000/- व वकील फी व तक्रारीचा खर्चाचे रु.20,000/- ची मागणी केलेली आहे. 3. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नसुन त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. त्यामुळे मंचाने दि.21.10.2010 रोजी गैरअर्जदारां विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केलेला आहे. 4. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.25.11.2010 रोजी आली असता मंचाने तक्रारकर्तातर्फे वकीलांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला, गैरअर्जदार गैरहजर त्याच्या विरुध्द यापूर्वीच मंचाने एकतर्फी कारवाईचा आदेश पारित केलेला आहे. तक्रारकर्त्याने शपथपत्रासह दाखल केलेली तक्रार व दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. मंचाने तक्रारकर्तीची तक्रार व संपूर्ण दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंचाच्या निदर्शनास खालिल बाबी आल्या... 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडे खसरा नं.133/1, 133/2, मौजा पेवठा, प.ह.नं.4/अ, मधील भुखंड क्र.21, 1614.6 चौ.फूट करता दि.15.09.2007 रोजी रु.500/- देऊन आरक्षीत केला होता, ही बाब तक्रारीत दाखल दस्तावेज पान क्र.8 वरुन स्पष्ट होते. तसेच सदर भुखंडाच्या एकूण किंमत रु.2,42,190/- पैकी दि.26.09.2007 रोजी रु.40,000/- व दि.06.10.2007 रोजी रु.10,000/- धनादेशांव्दारे भुगतान केले होते व उर्वरीत रक्कम रु.7,987/- च्या हप्त्याप्रमाणे दि.06.11.2007 ते 06.11.2009 पर्यंत द्यावयाची होती, ही बाब दाखल दस्तावेजातील पान क्र.9 ते 13 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा सेवाधारक/ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदाराला मंचाव्दारे नोटीस पाठविण्यांत आली असता सदर नोटीस ‘घेण्यांस नकार’ या शे-यासह परत आली असुन ते मंचात उपस्थित झाले नाही व त्यांनी तक्रारीचे उत्तर देऊन तक्रारकर्त्याव्दारा लावलेल्या आरोपांचे खंडनही केले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवर आम्ही विसंबुन असुन प्रस्तुत बाब गैरअर्जदारांकडून त्यांचे सेवेत त्रुटी झाल्याचे सिध्द करते. 8. वरील संपूर्ण विवेचनावरुन तक्रारकर्त्याची तक्रार दाद मिळण्यांस पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला त्यांचेकडे आरक्षीत खसरा नं.133/1, 133/2, मौजा पेवठा, प.ह.नं.4/अ, मधील भुखंड क्र.21, 1614.6 चौ.फूट चे विक्रीपत्र करुन द्यावयास पाहिजे असे मंचाचे मत आहे. जर गैरअर्जदार सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यांस असमर्थ असेल तर तक्रारकर्त्याने दिलेली भुखंडाची किंमत रु.2,42,190/- शेवटचा हप्ता दिलेला दि.02.01.2010 पासुन द.सा.द.शे.9% दराने परत करावयास पाहिजे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीत शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- ची मागणी केलेली आहे परंतु सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 9. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्यांचेकडे आरक्षीत खसरा नं.133/1, 133/2, मौजा पेवठा, प.ह.नं.4/अ, मधील भुखंड क्र.21, 1614.6 चौ.फूट चे विक्रीपत्र करुन द्यावे. किंवा जर गैरअर्जदार सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यांस असमर्थ असेल तर तक्रारकर्त्याने दिलेली भुखंडाची किंमत रु.2,42,190/- शेवटचा हप्ता दिलेला दि.02.01.2010 पासुन द.सा.द.शे.9% दराने तक्रारकर्त्यास परत करावी. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |