Maharashtra

Nagpur

CC/13/468

Swapnil S/o Vivek Dhakate - Complainant(s)

Versus

Gruhalaxmi Construction and Developers - Opp.Party(s)

D. Y. Kumbhare

25 Mar 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/13/468
 
1. Swapnil S/o Vivek Dhakate
68, Sawarkar Nagar Khamla Road Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Gruhalaxmi Construction and Developers
Shri Suresh Burrewar. Gruhalaxmi Towers. Dosar Bhavan Squaer. Central Avenue Road Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
PRESENT:D. Y. Kumbhare , Advocate for the Complainant 1
 
ORDER

सौ. मंजुश्री खनके, सदस्‍या यांचे कथनांन्‍वये.

 

 

 

 

 

- आदेश -

 (पारित दिनांक 25/03/2014)

 

 

1.                तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात असा  आहे की, वि.प. ही पंजीकृत फर्म असून, ते जमिन विकत घेऊन, त्‍याचे नियमितीकरण करुन, असे भूखंडावर फॉर्म हाऊस बांधून विक्री करतात. वि.प.च्‍या मौजा-रहाडी येथील लेआऊटमधील ग्रीन व्‍हॅली फार्मस या योजनेतील, ख.क्र.120, 121, 132, 136, 140 व 141, प.ह.क्र.64, फार्म हाऊस क्र. 99 , व 120, एकूण क्षेत्रफळ 19366.20 चौ.फु. असलेला रु.2,32,392/- किंमतीमध्‍ये घेण्‍याचे ठरविले. दि.26.05.2007 रोजी विक्रीचा करारनामा होऊन त्‍याचवेळी तक्रारकर्त्‍याने संपूर्ण रक्‍कम बयानाचे वेळेस दिली. तक्रारकर्त्‍याने विक्रीपत्र करुन मागितले. परंतू वारंवार विक्रीपत्राची मागणी करुन विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. याऊलट, वि.प.ने तक्रारकर्त्‍याला दि.07.12.2011 रोजी नोटीस पाठवून त्‍याचे दोन्‍ही फार्म हाऊसचे एकूण क्षेत्रफळ 19366.20 वरुन 15,524.22 चौ.फु. कमी केले व भुखंडाचे अकृषीकरण झाल्‍याने आणि संबंधित विभागाची मंजूरी मिळाल्‍याने रु.8,07,730/- ची मागणी केली व ही रक्‍कम सात दिवसाचे आत भरण्‍यास सांगितली. तसेच सदर जमिन विकसित करण्‍याकरीता मे. अहेड एम्‍युझमेंट कंपनी प्राय.लिमि., नागपूर यांना हस्‍तांतरीत केल्‍याने सर्व जुनी कागदपत्रे परत करुन नविन कागदपत्रे ही एक महिन्‍याच्‍या आत करुन घ्‍यावी असेही वि.प.ने कळविले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन दोन्‍ही फार्म हाऊसचे बयानात नमूद क्षेत्रफळाचे विक्रीपत्र करुन द्यावे, मानसिक त्रासापोटी भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.

 

2.                सदर प्रकरण मंचासमोर दाखल झाल्‍यावर मंचाने वि.प.वर नोटीस बजावला. नोटीस प्राप्‍त होऊनही वि.प. मंचासमोर हजर झाले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला.

 

3.                सदर प्रकरणी मंचाने तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद ऐकला. तसेच दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्‍कर्ष खालीलप्रमाणे.

 

-निष्‍कर्ष-

4.                तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत ईसारप्रत्राची/बयानापत्राची प्रत नि.क्र. 1 व 2 वर दाखल केली आहे. त्‍यात तक्रारकर्त्‍यांनी वि.प.सोबत तक्रारीत नमूद वर्णनाचा भूखंड क्र. 99 व 120 हा रु.2,32,392/- मध्‍ये विकत घेण्‍याचा दि.26.05.2007 रोजी करार केलेला आहे व बयानादाखल रु.2,32,392/- मिळाल्‍याचे नमूद केलेले आहे. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.

 

5.                तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या बयानापत्र/इसारपत्र यामध्‍ये नमूद दोन्‍ही फार्म हाऊसची किंमत ही रु.2,32,392/- अशी दर्शविण्‍यात आलेली आहे व ती तक्रारकर्त्‍याने संपूर्ण अदा केल्‍याचेही नमूद केले आहे. पुढे विक्रीपत्र हे ठरलेल्‍या मुदतीत करुन घ्‍यावे असे लिहिले असले तरीही सदर बयानापत्रात विक्रीपत्राचा कालावधी नमूद नाही. जमिनीचे अकृषीकरण करण्‍याची जबाबदारी वि.प.वर टाकलेली आहे. जर अकृषीकरण झाले नाही तर रक्‍कम देण्‍याची जबाबदारी वि.प.ची आहे. त्‍यामुळे पुढे वि.प.ने अकृषीकरण करण्‍याकरीता वेगळी रक्‍कम नंतर मागणे हे मंचास अनुचित वाटते.

 

6.                दि.07.12.2011 रोजी वि.प.ने प्‍लॉटचे विक्रीपत्र करण्‍याबाबत सुचना पत्र देऊन अतिरिक्‍त रक्‍कम फार्म हाऊस क्र. 99 व 120 करीता अनुक्रमे रु.4,99,642/- व रु.3,08,088/- ची मागणी केलेली आहे. तसेच भुखंडाचे क्षेत्रफळ बदलले व कमी झाल्‍याचे नमूद करुन एन.ए.टी.पी. झाल्‍याने नविन प्‍लॉट क्र. J-1/A, J-2/B दिलेले आहे.  नि.क्र. 2 वर इसारपत्राच्‍या प्रतीमध्‍ये विकास खर्च हा तक्रारकर्त्‍यास द्यावा लागेल असे स्‍पष्‍टपणे नमूद करण्‍यात आलेले आहे. प्रत्‍यक्षात मात्र वि.प.ने एन.ए.टी.पी. बाबत रकमेची मागणी केलेली आहे. त्‍यामुळे ईसारपत्र/बयानापत्र यामध्‍ये ही बाब नमूद नसतांना त्‍याची मागणी करणे म्‍हणजे अनुचित व्‍यापार प्रथेचा वि.प.ने अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. प्रत्‍येकवेळेस जमिन गैरकृषी करण्‍याची जबाबदारी ही वि.प.ची आहे असे वि.प.ने दस्‍तऐवजात नमूद केले असतांना, फार्म हाऊसच्‍या किंमतीबाबत संपूर्ण रक्‍कम अदा केल्‍यावर विविध बाबीखाली रकमेची मागणी करणे व किंमतीबाबत रक्‍कम घेऊनही विक्रीपत्र करुन न देणे ही वि.प.च्‍या सेवेतील न्‍यूनता आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्त्‍याला दोन फार्म हाऊसचे किंमतीबाबत संपूर्ण रक्‍कम देऊनही विक्रीपत्र वि.प.ने करुन न दिल्‍याने त्‍याला भुखंडाचे वैधानिक हक्‍कापासून वंचित राहावे लागले, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांना साहजिकच मानसिक व शारिरीक त्रास झाला असावा. करिता तक्रारकर्ते त्‍याबाबत नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे, म्‍हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

-आदेश-

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत असून, वि.प.ने तक्रारकर्त्‍यांना त्‍यांनी अदा केलेली एकूण रक्‍कम रु.2,32,392/- ही दि.26.05.2007 पासून तर     प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजाने द्यावी.

2)    वि.प.ने तक्रारकर्त्‍यांना मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल   रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चादाखल रु.5,000/- द्यावे.

3)    सदर आदेशाची पूर्तता वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत करावे.

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.