Maharashtra

Pune

CC/09/350

Vijay Vinayak Pande - Complainant(s)

Versus

Gruh Finance ltd - Opp.Party(s)

V K Barlinge

15 Feb 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/09/350
 
1. Vijay Vinayak Pande
Balajinagar Medankarwadi dist Pune
...........Complainant(s)
Versus
1. Gruh Finance ltd
Near Hotel Rangoli Pune 411004
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा-  श्री. एस. के. कापसे, मा. सदस्‍य 

                                     निकालपत्र

                      दिनांक 15 फेब्रुवारी 2012

तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-

1.                     तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍याकडून दिनांक 26/7/2006 रुपये 3,85,000/- 8.75 टक्‍के बदलत्‍या व्‍याजदराने 20 वर्ष कालावधीकरिता गृहकर्ज घेतले होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून धनादेश क्र.958789 रुपये 3,85,000/- घेतला होता. तक्रारदार डिफॉल्‍टर झाल्‍यास धनादेश क्र.958789 भरावयाचा होता. व दुसरा कोरा धनादेश सिक्‍युरिटी म्‍हणून तक्रारदारांकडून जाबदेणार यांनी घेतला होता. जाबदेणार तक्रारदारांकडून व्‍याजापोटी अधिक रक्‍कम वसूल करीत होते. तक्रारदारांनी दिनांक 21/5/2008 रोजी रुपये 6000/- भरले होते.  दिनांक 16/1/2009 रोजी रुपये 5000/- चा धनादेश तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिला होता. तक्रारदार दरमहा हप्‍त्‍यांमध्‍ये डिफॉल्‍टर नाहीत. दिनांक 7/2/2009 च्‍या पत्रान्‍वये जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून 11,605/- रकमेची मागणी केली. तक्रारदारांनी दिनांक 10/2/2009 रोजी सर्व आऊटस्‍टॅन्डिंग रक्‍कम भरली होती. दिनांक 11/6/2009 रोजी तक्रारदारांनी खातेउता-याची मागणी करुनही जाबदेणार यांनी खातेउतारा दिला नाही. जाबदेणार क्र.1 यांनी दिनांक 17/3/2009 रोजीच्‍या नोटीसद्वारे तक्रारदारांकडून रुपये 3,85,000/- ची मागणी केली, तसेच सदरहू रकमेचा तक्रारदारांनी दिलेला धनादेश डिसऑनर झाल्‍याचेही तक्रारदारांना कळविले. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍या नोटीसला दिनांक 4/4/2009 रोजी उत्‍तर दिले. दिनांक 1/6/2009 रोजी तक्रारदारांकडून रुपये 4711/- ची मागणी केली. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार क्र.1 यांच्‍याकडून खातेउतारा,नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 30,000/-, नुकसान भरपाईपोटी तक्रारदार क्र.1 यांना रुपये 1,00,000/- व तक्रारदार क्र.2 यांना रुपये 50,000/- मिळावेत अशी मागणी करतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.

2.                जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍याकडून दिनांक 26/7/2006 रोजी रुपये 3,85,000/- चे गृहकर्ज 20 वर्ष कालावधीकरिता 8.75 टक्‍के बदलत्‍या व्‍याजदराने घेतले होते. तक्रारदार डिफॉल्‍टर असल्‍यामुळे दिनांक 30/1/2009 रोजीच्‍या नोटीसद्वारे संपुर्ण रकमेची मागणी करण्‍यात आली होती. तक्रारदारांनी दिलेला धनादेश दिनांक 25/2/2009 रुपये 3,85,000/-डिसऑनर झाला. सिक्‍युरिटीपोटी धनादेश घेण्‍यात आलेला नव्‍हता. दिनांक 26/12/2008 रोजी तक्रारदारांकडून दरमहा हप्‍त्‍यांपोटी रुपये 17,427/- बाकी होती. तक्रारदारांनी दिनांक 31/5/2008 चा धनादेश रुपये 6000/-चा दिला त्‍यावेळी त्‍यांच्‍याकडून दरमहा हप्‍त्‍यांपोटी रुपये 53,076/- बाकी होते. तक्रारदारांकडून दरमहा हप्‍त्‍यांपोटी रुपये 21,893/- येणे बाकी होते. तक्रारदारांनी रुपये 5000/- भरल्‍यानंतर तक्रारदारांकडून रुपये 16,893/- येणे बाकी होते. दिनांक 31/1/2009 रोजी तक्रारदारांकडून दरमहा हप्‍त्‍यांपोटी रुपये 11,605/- बाकी होते. दिनांक 7/2/2009 रोजी तक्रारदारांकडून मागण्‍यात आलेली रक्‍क्‍म रुपये 11,605/- तक्रारदारांनी दिनांक 10/2/2009 रोजी भरली. तक्रारदारांना दिनांक 17/3/2009 रोजी पाठविण्‍यात आलेली नोटीस ही धनादेशाच्‍या रकमेची मागणी करणारी होती. दिनांक 30/1/2009च्‍या नोटीसद्वारे तक्रारदारांकडून संपुर्ण कर्जाच्‍या रकमेची मागणी करण्‍यात आली होती. दिनांक 1/6/2009 रोजी तक्रारदारांकडून दरमहा हप्‍त्‍यांपोटी रुपये 4711/- बाकी होते. तक्रारदार जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत. तक्रार दाखल करण्‍यास कारण घडलेले नाही म्‍हणून तक्रार खर्चासह खारीज करावी, तक्रारदारांनी जाबदेणार यांना खातेउता-यानुसार देय असलेली रक्‍कम दयावी व नुकसान भरपाई पोटी रक्‍कम अदा करण्‍याचे तक्रारदारांना आदेश देण्‍यात यावेत अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र, कागदपत्रे, कर्ज करारनामा व खातेउतारा दाखल केला.

3.                उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍याकडून घेतलेल्‍या गृहकर्ज संदर्भातील असल्‍यामुळे तक्रारदार जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांच्‍या कथनाप्रमाणे व्‍याजदर बदलणारा नव्‍हता. जाबदेणार यांनी दाखल केलेल्‍या तक्रारदारांच्‍या गृहकर्ज करारनाम्‍याच्‍या शेडयूलचे अवलोकन केले असता कर्जावरील व्‍याजदर बदलणार होता हे दिसून येते.

             जाबदेणार यांनी दिनांक 30/1/2009 रोजीच्‍या नोटीसीद्वारे तक्रारदारांकडून  एकूण रुपये 4,04,296.63 ची मागणी केल्‍याचे दाखल नोटीस वरुन दिसून येते. तसेच दिनांक 5/2/2009 च्‍या पत्रान्‍वये रुपये 11,596/- ची व 7/2/2009 च्‍या पत्रान्‍वये रुपये 11,605/- मागणी तक्रारदारांकडून केल्‍याचे दाखल पत्रांवरुन दिसून येते. जाबदेणार यांनी दिनांक 17/3/2009 पत्रान्‍वये धनादेश क्र.958789 डिसऑनर झाल्‍यामुळे रुपये 3,85,000/-ची मागणी केल्‍याचे दिसून येते. जाबदेणार यांनी दिनांक 1/6/2009 च्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांकडून एप्रिल व मे 2009 दरमहा हप्‍त्‍यांपोटी रुपये 4711/- देय असल्‍याचे नमूद करण्‍यात आल्‍याचे दिसून येते.

           जाबदेणार यांनी दाखल केलेल्‍या तक्रारदारांच्‍या गृहकर्ज खातेउतारा कालावधी दिनांक तर 2008-2009 या कालावधीकरिताच्‍या खातेउता-यात “Net Outstanding As on 31/3/2009 EMI  Rs.4371/- ” नमूद केल्‍याचे दिसून येते.

                  जाबदेणार यांनी दाखल केलेल्‍या तक्रारदारांच्‍या गृहकर्ज खातेउतारा कालावधी दिनांक 1/4/2008 ते 8/1/2009 मध्‍ये Net Outstanding As on 8/1/2009 EMI Rs.16332/-”, तसेच 2009-2010 या कालावधीकरिताच्‍या खातेउता-यात “Net Outstanding As on 31/3/2010 EMI  0.00 नमूद केल्‍याचे दिसून येते. यासर्वांवरुन विलंबाने तक्रारदारांनी  दरमहा हप्‍ता भरलेला होता ही बाब स्‍पष्‍ट होते. तसेच जाबदेणार आणि तक्रारदार यांच्‍यात झालेला गृहकर्ज करारनामा दिनांक 26/7/2006 रदृ झाला होता, अथवा दरमहा हप्‍त्‍यांमध्‍ये काही बदल -रिशेडयुल झाले नव्‍हते हे स्‍पष्‍ट होते, तसा उल्‍लेख जाबदेणार यांनी कुठल्‍याही नोटीस मध्‍ये केलेला नाही. गृहकर्ज करारानुसार तक्रारदारांनी घेतलेल्‍या रक्‍कम रुपये 3,85,000/- कर्जाची परतफेड करण्‍याचा कालावधी 20 वर्षांचा होता हे स्‍पष्‍ट होते. गृहकर्ज करारनामा कलम 5.4 बी नुसार जाबदेणार तक्रारदारांकडून दरमहा हप्‍ता भरण्‍यास विलंब झाल्‍यास 18 टक्‍के व्‍याजदराने अतिरिक्‍त व्‍याजाची रक्‍कम मागू शकतात. त्‍यामुळे जाबदेणार यांनी दिनांक 30/1/2009 व 17/3/2009 च्‍या नोटीसद्वारे तक्रारदारांकडून कर्जाच्‍या संपुर्ण रकमेच्‍या परतफेडीची केलेली मागणी चुकीची आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या दिनांक 11/6/2009 च्‍या पत्राचे अवलोकन केले असता कर्ज खात्‍याचा खातेउतारा मागूनही जाबदेणार यांनी तो तक्रारदारांना दिलेला नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते. मागणी करुनही तक्रारदारांना कर्ज खात्‍याचा खातेउतारा न देणे ही जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना कर्ज खातेउताराचा दयावा असे आदेश देण्‍यात येत आहेत. तक्रारदारांनी तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 30,000/- ची केलेली मागणी अवास्‍तव आहे असे मंचाचे मत आहे. जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे असे मंचाचे मत आहे.  म्‍हणून नुकसान भरपाई पोटी एकत्रितरित्‍या तक्रारदार रुपये 25,000/-  मिळण्‍यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.  तक्रारदारांनी नुकसान भरपाई पोटी एकूण रुपये 1,50,000/- ची केलेली मागणी अवास्‍तव आहे असे मंचाचे मत आहे. यासदंर्भात मंचाने मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा 2000 DGLS 1448 चरणसिंह विरुध्‍द हिलींग टच हॉस्पिटल चा आधार घेतला. सदरहू निवाडयात नमूद केल्‍याप्रमाणे “It is for the Consumer Forum to grant compensation to the extent it finds it reasonable, fair and proper in the facts and circumstances of a given case according to established judicial standards where the claimant is able to establish his charge.”   

      जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून काऊंटर क्‍लेमची मागणी केलेली आहे ती नामंजुर करण्‍यात येत आहे.

      वर नमूद विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येत आहे-

                                    :- आदेश :-

[1]    तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.

[2]    जाबदेणार यांनी तक्रारदारांना कर्ज खातेउतारा आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत दयावा.

[3]    जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्‍कम रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावेत.

      आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.