Dated the 25 Jan 2017
तक्रार दाखल कामी आदेश.
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
तक्रारदार श्री देवेंद्र सिंग स्वतः हजर,
तक्रारदारांनी सदर प्रकरणात सामनेवाले यांचेकडुन रक्कम रुपये 125000/- भरण्याच्या अटीवर सामनेवाले यांच्या हॉलीडे क्लबची 6 वर्षासाठीची मेंबरशीप टाईप जीटी 1 बाबत करार केला, तक्रारदारांनी सदर स्किममधील हॉलीडेसाठी पहिल्या वर्षाकरीता मेंमरशिप 6 रात्री व 7 दिवसांकरीता आरक्षित केली होती. सदर हॉलीडे मेंबरशिपचा कालावधी एकुण 6 वर्षाचा असल्याने करारनाम्यातील अटींनुसार तक्रारदारांनी दि.17/09/2016 रोजी रक्कम रुपये 10,000/- सामनेवाले यांना अदा केले. त्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.17/09/2016 रोजी पावती दिली, व उर्वरित रक्कम तक्रारदार सामनेवाले यांना त्यांच्या अटीशर्तीनुसार दिलेल्या विहित मुदतीमध्ये अदा करणार होते. परंतु तक्रारदारांनी त्यानंतर दोन दिवसांनी सामनेवाले यांना तक्रारदारांची मेंबरशिप रद्द करण्याबाबत सामनेवाले यांच्या कार्यालयास भेट देऊन सांगितले, व सामनेवाले यांना भरलेली रक्कम रुपये 10,000/- परत मागितली, तसेच त्याबाबत सामनेवाले यांना पत्र पाठविले.
तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिलेले पत्र तसेच सामनेवाले यांचेशी तक्रारदारांनी दि.17/09/2016 रोजी सदर क्लब मेंबरशिप बाबत स्वाक्षरीत केलेला करारनामा तक्रारदारांनी अभिलेखावर सादर केलेला आहे.
तक्रारदार यांनी दि 17/09/2016 रोजी सामनेवाले यांचेशी स्वाक्षरीत केलेल्या क्लब मेंबरशिप बाबतच्या करारनाम्यातील कन्वेनंट्स ऑफ मेंबरशिप मधील क्लॉज नंबर-5 व 6 वर खालीलप्रमाणे नमुद करण्यात आलेले आहे.
CONVENANTS OF MEMBER (Annexure-II)
1. I have understood the benefit available under the GTHSL membership, which is listed out in this purchase agreement. I further understand that no benefits other than those listed in this purchase agreement will be available to me under this membership program.
2. I understand that this purchase Agreement SUPERCEDES communication if any, issued by the GTHSL representatives (including on Company Letter Head or STAMP PAPER ) and the benefits and terms of membership listed here and amendment to rules and regulation and bye laws are final ad binding on GTHSL
3. I hereby declare that particulars given above are true, correct and are completely in order, if any transaction is delayed or not affected at all for the reason of incomplete or incorrect information, I shall not hold GTHSL responsible for any loss/damage/inconvenience caused out of same
4. I acknowledge and confirm that all the Terms and Conditions, Rules & Regulation, Bye-laws of GTHSL, Shall be fully and completely binding on me after this Purchased Agreement is singed.
5. I confirm that is shall not use the complimentary offer, if any or the facility offered towards the complimentary offer if any, for any improper or illegal or unlawful purpose /activities or adopt or alter the same for any improper or illegal gain.
6. I acknowledge that I have been treated pleasantly and courteously and I enter into this agreement at our own free will and accord and there is no compulsion or coercion exercised by GTHSL.
त्यावरुन तक्रारदार यांनी स्वेच्छेने सदर करारनामा स्वाक्षरीत केल्याचे दिसून येते, तसेच सदर करारनाम्यातील अटी शर्ती तक्रारदारांना मान्य असल्याने सदर करारनामा स्वाक्षरीत केल्यावर तक्रारदारांनी सामनेवाले यांना रक्कम रुपये 10,000/- भरल्याचे दिसून येते.
सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या पावतीवर मेंबरशिप फीज इज ऑन्ली ट्रान्सफरेबल नॉट रिफंडडेबल असे नमुद केल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदारांनी सामनेवाले यांचे मेंबरशिप घेण्याचा निर्णय रद्द करण्याबाबत सामनेवाले यांना स्वेच्छेने कळविले असून त्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोष पुर्ण सेवा दिली असे म्हणणे असंयुक्तीक आहे.
तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये त्यांना सदर करारनामा स्वाक्षरीत करण्यासाठी तसेच रक्कम रुपये 10,000/- भरण्यासाठी सामनेवाले यांनी जबरदस्ती केली याबाबतचा कोणताही पुरावा अथवा साक्षीदार तक्रारदारांनी अभिलेखावर सादर केलेला नाही.
यावरुन तक्रारदारांनी सदर तक्रार सामनेवाले यांचेकडुन रक्कम रुपये 10,000/- व्याजासह वसुल करण्यासाठी दाखल केली असल्याने ती डेफिसिअन्सी इन सर्व्हिस या सदरामध्ये मोडत नाही. सबब, सदर तक्रार दाखल करुन घेण्याच्या टप्प्यावर तक्रारदारांनी ती योग्य त्या न्यायालयात दाखल करण्याचे सुचवुन फेटाळण्यात येते प्रकरण निकाली.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- अंतिम आदेश -
1. तक्रार क्रमांक-846/2016 दाखल करुन घेण्याच्या टप्यावर फेटाळण्यात येते.
2.खर्चाबाबत आदेश नाहीत.
3 आदेशाच्या प्रती तक्रारदारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टोने पाठविण्यात याव्यात.
4 तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
5. तक्रार वादसुचीतुन काढुन टाकण्यात यावी.
ता.25.01.2017
जरवा/