Maharashtra

Ahmednagar

CC/17/249

Sou.Mangal Rajendra Rokade - Complainant(s)

Versus

Gramvikas Adhikari - Opp.Party(s)

Self

20 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/249
( Date of Filing : 12 Sep 2017 )
 
1. Sou.Mangal Rajendra Rokade
R/o.Mangalmurti Heights,Supa, Tq.Parner, Dist.Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Gramvikas Adhikari
Grampanchayat Karyalaya, Supa, Tq.Parner, Dist.Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Gatvikas Adhikari
Panchayat Samiti, Parner, Tq.Parner, Dist.Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Self, Advocate
For the Opp. Party: Adv.Kabra, Advocate
Dated : 20 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्तीने सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ती ही सुपा येथील रहिवाशी आहे. सुपा येथील गट नं.218/4 याचा ग्रामपंचायत मिळकत नंबर 1245 हा तक्रारकर्तीचे मालकीचा आहे. सदर प्‍लॉटवर तक्रारकर्तीने मंगलमुर्ती हाईटस् या नावाने इमारत बांधलेली असून, सदर इमारतीचे बांधकाम सन 2010 मध्‍ये पुर्ण झालेले आहे. तक्रारकर्तीने बांधलेल्‍या इमारतीमध्‍ये तक्रारकर्ती व तिचे कुटूंबासह राहत असून, इतर फ्लॅटमध्‍ये भाडेकरुन राहत आहेत. सामनेवाले हे ग्रामपंचायत सुपा या संस्‍थेचे प्रशासकीय अधिकारी असून सुपा या गावाकरीता नागरी सुविधा म्‍हणजेच लाईट, रस्‍ते, पाणी, स्‍वच्‍छता, सांडपाडी जाण्‍यासाठी गटार योजना इत्‍यादी पुरविण्‍याचे काम सामनेवाले संस्‍था करते.

3.   तक्रारकर्तीचे मालकीचे इमारतीमध्‍ये तक्रारकर्ती स्‍वतः तसेच इतरही  6-7 कुटूंब भाडेकरु म्‍हणून राहत असल्‍याने, दररोजच्‍या वापराकरीता पाण्‍याची आवश्‍यकता असल्‍याने, तसेच पाण्‍याची असलेली सुविधा ही पुरेशी नसल्‍याने तक्रारकर्तीने दिनांक 04.11.2013 रोजी सामनेवाले यांचेकडे अर्ज करुन तक्रारकर्तीचे इमारतीकरीता स्‍वतंत्र पाईपलाईन व चौदा नळ कनेक्‍शन देण्‍याची विनंती केली. तसेच तक्रारकर्तीने पाईपलाईन घेण्‍यासाठी लागणारा ग्रामविकास निधी भरण्‍याची तयारी दर्शविली. त्‍यानुसार सामनेवाले संस्‍थेच्‍या दिनांक 29.11.2013 रोजी झालेल्‍या मासिक सभेमध्‍ये तक्रारकर्तीचे स्‍वतंत्र पाईपलाईन तसेच नळ कनेक्‍शनसाठी ग्रामविकास निधी देण्‍यास तयार असल्‍यामुळे, तक्रारकर्तीचा ग्रामविकास निधी स्विकारणेबाबतचा ठराव मंजूर करण्‍यात आला. त्‍यानुसार तक्रारकर्तीची दिनांक 18.12.2013 रोजी रक्‍कम रुपये 1,50,000/- तसेच दिनांक 31.03.2014 रोजी रक्‍कम रुपये 3,00,000/- अशी एकुण रक्‍कम रुपये 4,50,000/- सामनेवाले यांचेकडे जमा केलेली आहे. तक्रारकर्तीने स्‍वतंत्र पाईपलाईन तसेच नळ कनेक्‍शन मिळण्‍यासाठी ग्रामविकास निधीची रक्‍कम भरलेली असल्‍याने, सामनेवाले यांनी तक्रारकर्तीचे मागणीनुसार स्‍वतंत्र नळ कनेक्‍शन देणे आवश्‍यक होते. परंतु स्‍वतंत्र नळ कनेक्‍शनसाठी तक्रारकर्तीकडून रक्‍कम स्विकारुन देखील, जुन्‍या असलेल्‍या पाईपलाईनवर जास्‍त कनेक्‍शन असल्‍याने नविन कनेक्‍शन देता येणार नाही. तसेच तक्रारकर्तीची इमारत ही नविन वसाहतीमध्‍ये असल्‍याने, तक्रारकर्तीसाठी असणारी नळ योजना ही सुजल जल प्राधिकरणांतर्गत येत असल्‍याने, त्‍यासाठी बराचसा खर्च अपेक्षित आहे. अशी विविध कारणे सांगून, सामनेवाले यांनी तक्रारकर्तीस नळ कनेक्‍शन देण्‍यास टाळाटाळ केली.

4.   नविन नळ कनेक्‍शन देण्‍यासाठी रक्‍कम स्विकारुनही बराचशा कालावधी उलटून देखील सामनेवाले यांनी तक्रारकर्तीस वेळोवेळी संपर्क करुन, तसेच लेखी अर्ज करुन, तक्रारकर्तीस स्‍वतंत्र नळ कनेक्‍शन देण्‍याची अथवा नळ कनेक्‍शनकरीता घेतलेला निधी व्‍याजासहीत परत करण्‍याची विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी निधी उपलब्‍ध नसून, निधी उपलब्‍ध झाल्‍यानंतर ताबडतोब स्‍वतंत्र पाईपलाईनचे काम करुन देतो अशी उडवाउडवीची उत्‍तरे देवून तक्रारकर्तीस स्‍वतंत्र पाईपलाईन देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारकर्तीने शेवटी दिनांक 26.04.2017 रोजी नळ कनेक्‍शन मिळण्‍याकरीता तक्रार अर्ज दिला.  परंतू सामनेवालाने त्‍यावर कोणतीही दखल घेतली नाही. व रक्‍कम स्विकारुनसुध्‍दा सामनेवालाने तक्रारकर्तीला नळ कनेक्‍शन दिले नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

5. तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्तीने सामनेवालाकडे स्‍वतंत्र पाईपलाईन व नळ कनेक्‍शन मिळणेसाठी रक्‍कम रु.4,50,000/- भरलेली असल्‍याने पाईपलाईन व नळ कनेक्‍शन दिले नसल्‍याने सदरची रक्‍कम व्‍याजासह परत करावी. तसेच तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम सामनेवालाकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

6. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सदरहू नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला प्रकरणात हजर झाले. परंतू त्‍यांनी प्रकरणात कोणतेही उत्‍तर दाखल केले नसल्‍याने सामनेवाला यांचे विरुध्‍द लेखी उत्‍तराशिवाय प्रकरण चालविण्‍याचा आदेश निशाणी क्र.1 वर पारीत करण्‍यात आला.

7. तक्रारकर्तीची दाखल तक्रार, दस्‍तावेज व तोंडी युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ती ही सामनेवालाची “ग्राहक” आहे काय.?                    

 

...नाही.

2.

तक्रारकर्ती व सामनेवाला या उभयतामध्‍ये असलेला वाद या मंचाला चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र आहे काय.?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

8.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्ती स्‍वतः सुपा येथील गट नं.218/4 याचा ग्रामपंचायत मिळकत नंबर 1245 चा प्‍लॉट मंगलमुर्ती हाईटस् या नावाने इमारत बांधकाम सन 2010 मध्‍ये पुर्ण केलेले आहे. सदर इमारतीमध्‍ये तक्रारकर्ती ही तिचे कुटूंबासह व इतर भाडेकरु सोबत राहते. याअर्थी तक्रारकर्तीने सदर ईमारतीमध्‍ये 6-7 कुटूंब भाडेकरु ठेवून इमारतीमध्‍ये वाणिज्‍य वापराकरीता इमारतीचा वापर करीत आहे असे प्राथमिकदृष्‍टया सिध्‍द होते. सदर भाडेकरु करता स्‍वतंत्र पाईपलाईन, नळ कनेक्‍शनकरता सामनेवालाकडून घेण्‍यासाठी विनंती केली असून, सदर नळ कनेक्‍शन वाणिज्‍य करीता घेत असून तक्रारकर्ती ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2 (1) (डी) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत बसत नाही असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

9.   मुद्दा क्र.2 – तक्रारकर्तीने तक्रारीत सामनेवालाकडे नळ कनेक्‍शन त्‍यांचे मालकीचे मंगलमुर्ती हाईटस् इमारतीकरीता पाईपलाईन व 14 नळ कनेक्‍शन देण्‍याकरीता रक्‍कम रु.4,50,000/- सामनेवालाकडे भरणा केले. सदर रक्‍कम परत मिळण्‍यासाठी तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. सदर वाद हा दिवाणी न्‍यायालयाचा असल्‍याने या मंचाला सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

10.  मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारकर्तीस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.