तक्रार दाखल ता.11/12/2013
तक्रार निकाल ता.29/07/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे ग्रामपंचायत पनोरी, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. तर वि.प.क्र.1 ही स्वायत्त संस्था असून वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 चे सरपंच, तर वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.1 चे ग्रामसेवक आहेत. तसेच वि.प.क्र.4 हे यातील आवश्क विरुध्द पक्षकार आहेत. वि.प.क्र.2 व 3 यांचे मार्गदर्शनाखाली वि.प.क्र.1 संस्थेचा कारभार चालतो.
तक्रारदारने ग्रामपंचायत पनोरी, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर येथील तत्कालीन ग्रामपंचायत नं.16 त्याचा चालू ग्रामपंचायत मिळकत नं.27 क्षेत्र 743.79चौ.मी. यासी चतु:सिमा:-
पुर्वेस : शामराव चौगुले यांची पडसर जागा
पश्चिमेस : पांडूरंग बाळा पार्टे यांची घर मिळकत
दक्षिणेस : विठ्ठल शिवाजी चौगुले वगैरे यांची मिळकत
उत्तरेस : रस्ता
वर नमुद मिळकत ही तक्रारदाराने श्री.वसंत बाळासो सुर्यवंशी यांचेकडून दि.22.04.1999 रोजी दस्त क्र.742/1999 अन्वये खरेदी घेतली आहे. प्रस्तुत मिळकतीमध्ये तक्रारदारांची पिठाची गिरणी, मिरची कांडप मशीन आहे. तसेच त्यासाठी तक्रारदाराने लाईट कनेक्शनही घेतलेले आहे. तसेच सदर मिळकतीत तक्रारदारांची कब्जे वहिवाट आहे.
पनोरी ग्रामपंचायतीमध्ये मिळकतीचा मालकी हक्काबाबत हस्तांतरण दस्ताद्वारे नोंदणीचे काम ग्रामपंचायत करते. वास्तविक रजिस्टर खरेदी पत्रानंतर खरेदी मिळकतीचे कर आकारणी तक्त्यास आपोआप नावाची नोंद व्हावी व त्यासाठी गावातील खरेदी दस्ताच्या नोंदी ग्रामसेवक यांनी द्याव्यात असे महसुल कायद्यात स्पष्टपणे नमुद केले आहे. अशा स्थितीत खरेदीपत्रांप्रमाणे तक्रारदाराचे नावाची नोंद वर नमुद मिळकतीचे कर आकारणी पत्रही नोंद होणे आवश्यक होते. मात्र तशी नोंद वि.प.यांनी न केलेने तक्रारदाराने प्रथम अर्ज देऊन सदरची नोंद करणेची मागणी वि.प.कडे केली. परंतु वि.प.यांनी नोंद केली नाही. सबब, तक्रारदाराने रजिस्टर पोस्टाने खरेदीपत्र, इंडेक्स-2 तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे जोडून नावाची नोंद करावी अशी मागणी वि.प.कडे केली. तथापि वि.प.ने तक्रारदाराचे नावाची नोंद सदर मिळकतीचे रेकॉर्डवरती केली नाही. सदर मिळकातीचा कर तक्रारदार नियमीत भरत असतात. मात्र वारंवार विनंती करुनही वि.प. तक्रारदाराचे नावाची नोंद सदर मिळकतीचे रेकॉर्डवरती नोंदवत नाहीत व नोंद केलेली नाही. सबब, तक्रारदाराने वि.प.यांना वकीलांमार्फत नोटीस दि.05.02.2013रोजी पाठविली व सदर तक्रारदाराचे नांव मिळकतीचे रेकॉर्डवरती नोंदविणेबाबत कळविले. परंतु वि.प. यांनी प्रस्तुत नोटीसा उत्तरही दिले नाही व तक्रारदाराचे नावाची नोंदही मिळकतीचे रेकॉर्डवरती केली नाही. अशा प्रकारे वि.प.यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी/कमतरता केली आहे. सबब, तक्रारदाराने वि.प.यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
3. प्रस्तुत कामी वि.प.यांनी तक्रारदाराचे नाव ग्रामपंचायत, पनोरी येथील तत्कालीन ग्रामपंचायत नं.16 त्याचा चालू ग्रामपंचायत मिळकत नं.27 या मिळकतीचे कर आकारणी तक्त्यात नमुद न करणेचे वि.प.चे कृत्य सेवेतील त्रुटी आहेत असे मानून वि.प.यांनी तक्रारदाराने नाव ग्रामपंचायत, पनोरी येथील तत्कालीन ग्रामपंचायत नं.16 त्याचा चालू ग्रामपंचायत मिळकत नं.27 अथवा सध्या बदललेला नंबर असेल त्या मिळकतीचे कर आकारणी तक्यास नमुद करुन देणेबाबत आदेश व्हावेत. तक्रारदाराला आर्थिक व मानसिक त्रासापोटी वि.प.यांनी रक्कम रु.10,000/- देणेचे आदेश व्हावेत. तसेच अर्जाचा खर्च तक्रारदाराला वि.प.ने द्यावा अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
4. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.1 अ कडे प्रतिज्ञापत्र, नि.3 चे कागद यादीसोबत नि.3/1 ते नि.3/11 कडे अनुक्रमे ग्रामपंचायत मिळकत नं.16 चे खरेदीपत्र, तक्रारदाराने वि.प.कडे नाव नोंदणीसाठी दिलेला अर्ज, तक्रारदाराने पोस्टाने नाव नोंदणीसाठी दिलेला अर्ज, आर.पी.ए.डी.ची पावती, तक्रारदाराने वि.प.ला वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, वि.प.यांना नोटीस पाठविलेल्या पोस्टाच्या पावत्या, वि.प.ने नोटीस न स्विकारलेले परत आलेली नोटीस व नोटीस वि.प.क्र.2 ने स्विकारलेली पोहच पावती, नि.11 कडे थर्ड पार्टी म्हणून सामील करुन घेणच्या अर्जास म्हणणे, नि.14 कडे दुरुस्तीप्रत, नि.21 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि.23 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केलेली आहेत.
5. प्रस्तुत कामी वि.प.नं.1 ते 3 यांनी नि.5, 6, 7 कडे त्यांचे म्हणणे /कैफियत दाखल केली आहे. नि.19 कडे वि.प.क्र.4 चे म्हणणे, नि.10 चे कागद यादीसोबत नि.10/1 ते नि.10/3 कडे अनुक्रमे रे.क.नं.55/2000 मधील दिवाणी न्या.क. स्तर, राधानगरी यांचा निकाल, रे.दि.अपील क्र.32/2004 मधील जिल्हा न्यायाधीश यांचा निकाल, ग्रामपंचायत, पनोरी यांना वि.प.क्र.4 ने दिलेली नोटीस, नि.8 कडे वि.प.4 ने थर्ड पार्टी म्हणून तक्रार अर्जात सामील करुन घेणेबाबतचा अर्ज, नि.13 चे कागद यादीसोबत ग्रामपंचायत, पनोरी, ता.राधानगरी यांचेकडील मिळकत नं.27 चा कर आकारणी तक्ता, नि.20 कडे वि.प.क्र.4 चे पुराव्याचे शपथपत्र, नि.22 कडे वि.प.क्र.4 चा लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे वि.प.यांनी या कामी दाखल केली आहेत.
6. प्रस्तुत कामी वि.प.नं.1 ते 4 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवले आहेत.
अ) तक्रारदाराचा तक्रार अर्ज मान्य व कबुल नाही.
ब) तक्रारदाराने खरेदी केले ग्रामपंचायत मिळकत नं.27 च्या संदर्भाने खरेदी दस्त नं.742/22/4/1999 अन्वये खरेदी घेतलेली मिळकतीचे प्रत्यक्षात ग्रामपंचायत, पनोरी घरठाण पत्र क्र.नमुना नं.8 नुसार मिळकत नं.27, दगड, विटा, मातीचे कौलारु घर अशी नोंद आहे. तिचे क्षेत्रफळ हे 900 चौ.फुट इतके आहे. तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राधानगरी रे.क.नं.55/2000 या दाव्याच्या निकालाविरुध्द अपील मे.जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायालय, कोल्हापूर अपील नं.32/2004 चे निकालामध्ये उपरोक्त दाव्यामधील तक्रारदाराचा रजि.खरेदीपत्राचा दस्त नं.742/22/4/99 ने मिळकत नं.27 संदर्भातील खरेदीपत्र हे संदिग्ध व बेकायदेशीर असलेने तक्रारदाराचे कोणतेही हक्क शाबीत होत नव्हते. प्रस्तुत तक्रारदाराने वादातीत मिळकतीचे केलेले खरेदीपत्र हे ग्राहय मानने योग्य होणार नसलेने प्रस्तुत तक्रारदाराने वादातीत मिळकतीचे केलेले खरेदीपत्र हे ग्राहय मानने योग्य होणार नसलेची माहिती तक्रारदाराचा अर्ज दाखल तारखेनंतर लगतच्या ग्रामपंचायत मासिक सभेत संबंधीतांना सविस्तर दिला. त्यामुळे तक्रारदाराचा नाव नोंदणी करणेबाबतचा अर्ज ग्रामपंचायतीचे मासिक सभेपुढे ठेवला नाही. नमुद मिळकतींच्या संदर्भातील उपरोक्त न्यायालयातील दाव्यांच्या संदर्भातील माहिती अद्यापही संबंधीतांनी/ तक्रारदाराने मे.मंचात सादर केलेली नाही. तक्रारदारांचा तक्रार अर्ज मे.मंचाने मंजूर केलेस त्यानुसार अंमलबजावणी करणेस तयार आहोत असे म्हणणे वि.प.नं.1 ते 3 यांनी दाखल केले आहे.
7. वि.प.क्र.4 यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीत पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
अ) तक्रारदाराने तक्रार अर्ज कलम-2 मधील मिळकतीचे वर्णन पुर्णपणे चुकीचे व संदिग्ध आहे. त्यामुळे त्याविषयी दाद मागता येणार नाही. प्रस्तुत तक्रारदाराने दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर यांचे कोर्टात वि.प.क्र.4 विरुध्द रे.क.नं.55/2000 दाखल केला होता. प्रस्तुत दावा मे.कोर्टाने नामंजूर केला होता. प्रस्तुत निकालाविरुध्द तक्रारदाराने रे.दिवाणी अपील नं.32/2004 हे जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. प्रस्तुत अपीलसुध्दा मे.जिल्हा न्यायालयाने फेटाळलेले आहे. प्रस्तुत अपीलाचे निकालाविरुध्द तक्रारदाराने मे.उच्च न्यायालयांत अपील दाखल केलेले नाही. सबब, मे.जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम झाला आहे व प्रस्तुत न्यायनिर्णय रद्द करणेचा अधिकार या मे.मंचास नाही. सबब, तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे. कारण तक्रारदाराचे नावाची नोंद ग्रामपंचायत मिळकत रेकॉर्ड सदरी होणेसाठी तक्रारदाराने त्याची मालकी सिध्द करणे आवश्यक आहे. जिल्हा न्यायाधिश यांनी दिले निकालाचे बाहेर जाऊन कोणतीही कार्यवाही करता येणार नाही. प्रस्तुत कामी तक्रारदाराचे नाव अॅसेसमेंट उता-यास नमुद करणेसाठी आदेश केलेस दिवाणी जिल्हा न्यायालयाने दिलेले आदेश रद्द केलेप्रमाणे होईल.
ब) तक्रारदार हे मुळत: वि.प.यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत. त्यामुळे तक्रारदाराला कोणतीही दाद मागता येणार नाही. तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्हणणे /कैफियत वि.प.क्र.1 ते 4 यांनी दाखल केले आहे.
8. प्रस्तुत कामी तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प.चे ग्राहक आहेत काय ? | नाही |
2 | वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा:-
9. मुद्दा क्र.1 व 2:- मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्हीं नकारार्थी देत आहोत कारण ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-2(1)(डी) नुसार,
Section 2(1)(d) in the Consumer Protection Act, 1986
(d) “consumer” means any person who,—
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who 12 [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose];
सदर कामी तक्रारदाराने वि.प.यांना नमुद सेवेसाठी वि.प.यांना कोणतीही रक्कम Consideration दिलेले नाही व देणेची आवश्यकताही नाही. सबब, वर नमुद ग्राहक या संज्ञेत तक्रारदार येत नाहीत. तसेच तक्रारदार यांची नमुद मिळकतीची मालकी (ownership) सिध्द झालेली नाही. त्यामुळे वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविणेच प्रश्नच उदभवत नाही.
10. वरील सर्व विवेचन लक्षात घेता, प्रस्तुत तक्रारदार हे वि.प.यांचे ग्राहक होत नाहीत अथवा तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहक या संज्ञेत येत नसलेने सदर क्रार अर्ज खर्चासह फेटाळणेस पात्र आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत येतो.
2 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.