::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या
१. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदाराने भिसी गावामध्ये महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या घरकुल योजने अंतर्गत प्लॉट नं. ५४ वर घर बांधले. तक्रारदारांनी दिनांक २२.०१.२०१६ रोजी विरुद्ध पक्ष क्र. १ व २ यांच्याकडे नळजोडणीकरिता रककम रु. २,०००/- व सन २०१५-२०१६ या वर्षाकरिता घरपट्टीचे रक्कम रु. २००/- जमा केले. विरुद्ध पक्ष क्र. १ व २ यांनी तक्रारदाराकडून घरपट्टी व नळजोडणी शुल्क स्विकारल्यानंतरही तक्रारदार यांच्या नळजोडणीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराला सदर नळजोडणी न दिल्याने व पाणी जीवनाकरिता आवश्यक असल्याने तक्रारदाराला पाणी विकत घ्यावे लागले. त्याकरिता तक्रारदाराला रक्कम रु. २०,०००/- खर्च आला. तक्रारदाराने वारंवार नळजोडणीची मागणी केल्यावरही विरुद्ध पक्ष यांनी नळजोडणी न दिल्याने तक्रारदारने दिनांक २१.११.२०१६ रोजी विरुद्ध पक्ष यांना नोटीस पाठविली. परंतु विरुद्ध पक्ष यांनी सदर नोटीसची पूर्तता केली नाही. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारास नळजोडणी न देऊन तक्रारदाराप्रती सेवेत न्यूनता दिल्याने तक्रारदाराने विरुद्ध पक्षां विरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करुन तक्रार खर्चासह मान्य करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
३. विरुद्ध पक्ष क्र. १ व २ यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊन देखील मंचासमक्ष हजर न राहिल्याने दिनांक ०७.११.२०१७ रोजी विरुद्ध पक्ष क्र. १ व २ विरुध्द तक्रार एकतर्फा पुढे चालविण्यात येते, असे आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
४. तक्रारदारांची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व तक्रारकर्त्याने केलेला तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्त्याचे कथना वरुन खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
(१) तक्रारकर्ता विरुद्ध पक्ष क्र.१ यांचा ग्राहक आहे काय ? होय
(२) विरुद्ध पक्ष क्र.१ यांनी तक्रारदाराप्रती न्यूनता पूर्ण सेवा
दिली आहे काय ? होय
(३) तक्रारदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
(४) अंतीम आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ बाबत :-
५. तक्रारदाराने त्याचे घर क्र. १४४३ मध्ये नळ घेण्याकरिता दिनांक २२.०१.२०१६ रोजी विरुध्द पक्षांकडे कडे नळजोडणीकरिता अर्ज करुन त्याकरिता लागणारे शुल्क, अनामत रक्कम रु. २०००/- व सन २०१५-२०१६ या वर्षाकरिता घरपट्टीचे रक्कम रु. २००/- जमा केले. त्याप्रमाणे पावत्या वि.प. यांनी तक्रारदार यांना दिल्या. सदर दोन्ही पावत्या तक्रारीत दाखल आहेत. यावरून तक्रारदार हा वि.प.चा ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. २ व ३ बाबत :-
६. तक्रारदाराने तक्रारीत दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने त्याचे घरी नळजोडणीकरिता वि.प. कडे अर्ज करुन त्याकरिता आवश्यक असणारे शुल्क / अनामत रक्कमेचा भरणा वि.प कडे केला. तरीसुद्धा वि.प.ने तक्रारदाराला नळजोडणी करुन दिली नाही. वि.प. ने तक्रारदारला दि. २१.०८.२०१७ रोजी पत्र पाठवून माहे ऑगस्ट २०१७ व मार्च २०१८ चा विशेष पाणीपट्टी कर, गृह कर, नळजोडणी शुल्क असे एकूण रु. २००७ चा कर भरणा करण्यास सांगितले. तक्रारदाराने सन २०१५-२०१६ या वर्षाकरिता घरपट्टीचे रक्कम रु. २००/- व नळजोडणीकरिता अनामत रककम रु. २,०००/- चा दि. ०६.०६.२०१६ पूर्वीच वि.प. कडे भरणा केला होता. सदर पत्र प्राप्त झाल्यानंतर तक्रारदाराने पाणीकर २०१७-२०१८ रु. १००/- व इमारत कर सन २०१६-२०१७,२०१७-२०१८ रु. १३७४/- चा दि. २३.०८.२०१७ रोजी वि.प. कडे भरणा केला, हे दाखल दस्तावेज / पावत्यावरून सिद्ध होते. परंतु तरीसुद्धा वि.प.क्र.१ यांनी तक्रारकर्त्याला आजपर्यंत नळजोडणी करुन दिली नाही. तक्रारदाराने वि.प. ने दि. २१.०८.२०१७ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार सदर रक्कमेचा भरणा वि.प. कडे केलेला आहे, व तरीसुध्दा वि.प. यांनी तक्रारकर्त्याला आजपर्यंत नळजोडणी करुन दिली नाही असे तक्रारकर्त्याने दि. २२.११.२०१७ रोजी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये नमूद केलेले आहे.वि.प. ने तक्रारदाराचे शपथपत्रामधील सदर कथन कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून खोडून काढलेले नाही. तसेच वि.प. यांनी आपले बचावाकरिता तक्रारदाराचे कथन लेखी कथन दाखल करुन सुध्दा खोडून काढलेले नाही. तक्रारीत दाखल दस्तावेजावरून तक्रारदाराने वि.प. कडे नळजोडणी करिता अर्ज करुन आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतरही, वि.प. यांनी आजपर्यंत तक्रारदार यांना नळजोडणी करुन दिली नाही, हे सिद्ध होते. परंतु वि.प. क्र. १ ने नळजोडणी न दिल्याने तक्रारदाराला पाणी आणावे लागले व त्याकरिता तक्रारदाराने रक्कम रु. २०,०००/- खर्च केले, हे तक्रारदाराने दस्तावेज दाखल करून सिद्ध केलेले नसल्याने सदर मागणी मान्य करणे न्यायोचित नाही. वि.प. ने तक्रारदार यांना नळजोडणी न देवून तक्रारदाराप्रती न्यूनता पूर्ण सेवा दिली असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराला शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने त्याकरिता तक्रारकर्ता वि.प.क्र.१ कडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र.२ व ३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ४ बाबत :-
७. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ७८/२०१७ अंशतः मान्य करण्यात येते.
२. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी तक्रारदारास नळजोडणी विहीत मुदतीत न
करुन देवुन सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात
येते.
३. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी तक्रारदार यांच्या घर क्र. १४४३ मध्ये नियमानुसार
नळजोडणी या आदेश प्राप्ती दिनांकापासून ३० दिवसांत तक्रारदार यांना
करून द्यावी.
४. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी तक्रारदारास मानसीक, शारिरीक त्रास व तक्रार खर्चापोटी एकत्रित नुकसान भरपाई रक्कम रू. ५,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासून ३० दिवसांत अदा करावी.
५. विरुद्ध पक्ष क्र. २ विरुद्ध कोणताही आदेश नाही.
६. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि.जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अ