Maharashtra

Nagpur

CC/171/2018

MR. MATHURADAS GOPALRAO RAUT - Complainant(s)

Versus

GRACELAND REALITIES PVT. LTD., THROUGH MANAGING DIRECTOR SHRI. SHEKHAR JADHAO - Opp.Party(s)

ADV. VRUSHALI P. KALANTRE

23 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/171/2018
( Date of Filing : 16 Feb 2018 )
 
1. MR. MATHURADAS GOPALRAO RAUT
PLOT NO. 8, PANCHDEEP SOCIETY, SAHAKAR NAGAR, NAGPUR-440025
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. GRACELAND REALITIES PVT. LTD., THROUGH MANAGING DIRECTOR SHRI. SHEKHAR JADHAO
GRACELAND REALITIES GRACEHOUSE J-12, WHC ROAD, LAXMI NAGAR, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Feb 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्षाचा जमीण खरेदी करुन, विकसन करुन प्‍लॉट विकण्‍याचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे फॉरचून मिलीनेअर मधील प्‍लॉट क्रमांक ६, एकूण क्षेञफळ २३३४.०४ चौरस फुट रुपये ४५०/- प्रती चौरस फुट प्रमाणे एकूण किंमतीच्‍या ६० टक्‍के रक्‍कम रुपये ६,३५,०००/- विरुध्‍द पक्षाकडे जमा करुन बुक केला. तक्रारकर्त्‍याने सदरची रक्‍कम विरुध्‍द पक्षाकडे धनादेश क्रमांक ३९५२२४, दिनांक ३०/०१/२००८ अन्‍वये रुपये ३,१५,०००/- आणि धनादेश क्रमांक ४१०३०१, दिनांक ८/३/२००८ अन्‍वये रुपये ३,२०,०००/- जमा केले. विरुध्‍द पक्षाने प्‍लॉटचे बुकींगवेळी तक्रारकर्त्‍याला सांगितले की, प्‍लॉटची विक्रीपञ नोंदणी २-३ महिण्‍यांत करण्‍यात येईल. परंतु २-३ महिण्‍यानंतर प्‍लॉटचे विक्रीपञ नोंदणी करण्‍यात आली नाही. तक्रारकर्त्‍याने वारंवार विरुध्‍द पक्षाकडे त्‍याबाबत विचारणा केली परंतु विक्रीपञ करुन देण्‍यात आले नाही. तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट खरेदीपोटी अदा केलेली रक्‍कम परत मिळण्‍याबाबत विरुध्‍द पक्षाला विनंती केली व पञव्‍यवहार सुद्धा केला. शेवटी विरुध्‍द पक्षाने दिनांक १३/१०/२०१४ रोजी तक्रारकर्त्‍याला रुपये ४,००,०००/- अदा केले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत दिनांक २७/६/२०१७ रोजी पञ पाठवून त्‍याव्‍दारे उर्वरीत रक्‍कम रुपये २,३५,०००/- व्‍याजासह तसेच आधीच्‍या रकमेवर व्‍याज मिळण्‍याबाबत पञ पाठविले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक २७/७/२०१७ रोजी पञ पाठवून त्‍याव्‍दारे रुपये २,३५,०००/- परत करण्‍याचे आश्‍वासीत केले परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये ६,५०,०००/- वर २००८ ते २०१४ या कालावधीतील व्‍याज देण्‍याचे करावे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, त्‍याने तक्रारकर्त्‍याला उर्वरीत रक्‍कम रुपये २,३५,०००/- सन २०१४ पासून १८ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी.
  3. मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. विरुध्‍द पक्षाने मंचासमोर त्‍याचा लेखी जबाब मुदतीत सादर केला नाही म्‍हणून विरुध्‍द   पक्षाविरुध्‍द प्रकरण बिना लेखी जबाब चालविण्‍याचा आदेश दिनांक ३१/८/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद याचे वाचन केल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

अ.क्र.                  मुद्दे                                                                       उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                          होय
  3. काय आदेश ?                                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे फॉरचून मिलीनेअर मधील प्‍लॉट क्रमांक ६, एकूण क्षेञफळ २३३४.०४ चौरस फुट रुपये ४५०/- प्रती चौरस फुट प्रमाणे एकूण किंमतीच्‍या ६० टक्‍के रक्‍कम रुपये ६,३५,०००/- विरुध्‍द पक्षाकडे जमा करुन बुक केला. तक्रारकर्त्‍याने सदरची रक्‍कम विरुध्‍द पक्षाकडे धनादेश क्रमांक ३९५२२४, दिनांक ३०/०१/२००८ अन्‍वये रुपये ३,१५,०००/- आणि धनादेश क्रमांक ४१०३०१, दिनांक ८/३/२००८ अन्‍वये रुपये ३,२०,०००/- जमा केले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.  विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे.
  2. विरुध्‍द पक्षाने प्‍लॉटचे बुकिंग वेळी तक्रारकर्त्‍याला सांगितले की, प्‍लॉटचे विक्रीपञ नोंदणी २-३ महिण्‍यात करण्‍यात येईल. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटचे विक्रीपञ नोंदणी करुन दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट खरेदीपोटी अदा केलेल्‍या रकमेची मागणी केली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट विक्रीपोटी धनादेश क्रमांक ३९५२२४, दिनांक ३०/०१/२००८ व धनादेश क्रमांक ३९५२२४ दिनांक ८/३/२००८ अन्‍वये स्विकारलेली रक्‍कम रुपये ६,३५,०००/- पैकी रुपये ४,००,०००/- तक्रारकर्त्‍याला दिनांक १३/१०/२०१४ रोजी परत केली. परंतु उर्वरीत रक्‍कम  रुपये २,३५,०००/- तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला विनंती करुनही परत केली नाही. ही विरुध्‍दपक्षाची तक्रारकर्ता प्रती ञुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापार प्रथेचा वापर करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये ६,३५,०००/- या रकमेवर दिनांक ८/३/२००८ पासून दिनांक १३/१०/२०१४ पर्यंत १० टक्‍के दराने व्‍याज अदा करावे. सदर व्‍याजाची रक्‍कम आदेशाच्‍या दिनांकापासून ३० दिवसाचे आत न दिल्‍यास सदर रकमेवर  १२ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला संपूर्ण व्‍याजाची रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला रक्‍कम रुपये २,३५,०००/- द्यावे आणि सदरहु रकमेवर दिनांक १४/१०/२०१४ पासून द.सा.द.शे. १२ टक्‍के दराने व्‍याज रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.