Maharashtra

Nagpur

CC/194/2017

Mr. Dharmendra Bansilalji Choudhari - Complainant(s)

Versus

Grace Toyota, Cosmic Grace Auto (I) Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Mahendra Limaye

25 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/194/2017
( Date of Filing : 20 Apr 2017 )
 
1. Mr. Dharmendra Bansilalji Choudhari
R/o. 44, Prasad Nagar, Near Ravivar Bazar, Mangalmurti Square, Jaytala Road, Nagpur 440036
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Grace Toyota, Cosmic Grace Auto (I) Pvt. Ltd.
NH.No. 37, Opp. Air, Kamptee Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Grace Toyota, Cosmic Grace Auto (I) Pvt. Ltd.
222, Vishnu Vaibhav, Palm Road, Civil Lines, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Adv. Mahendra Limaye, Advocate
For the Opp. Party:
Dated : 25 Jun 2020
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  वि.प. हा Grace Toyoto Cosmic Grace Auto Pvt. Ltd. या कंपनीचा विक्रेता असून त्‍याने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या विनंतीवरुन ETIOS (Cross) या वाहनाची दि. 20.03.2015 ला रुपये 7,00792/- इतकी किंमत असलेली कमिटमेंट चेक लिस्‍ट पुरविली. तक्रारकर्ता व ETIOS या वाहनाचे विक्रेता यांच्‍यामध्‍ये बोलणी होऊन विक्रेत्‍याने ETIOS हे वाहन तक्रारकर्त्‍याला टॅक्‍स इनव्‍हाईस दि. 28.03.2015 अन्‍वये रुपये 6,14,593/- इतक्‍या रक्‍कमेत विकण्‍याचे ठरले. ज्‍यामध्‍ये आर.टी.ओ. रजिस्‍ट्रेशनचा समावेश नव्‍हता.  वि.प.क्रं. 1 ने तक्रारकर्त्‍याला ETIOS ही गाडी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 च्‍या आवारात हस्‍तांतरीत केली आणि तक्रारकर्त्‍याने विक्रेत्‍याला रुपये 7,00,500/- अदा केले आणि या व्‍यतिरिक्‍त रुपये 292/- नगदी दिले. तक्रारकर्त्‍याचा वाद सदर खात्‍यावरील खर्ची घातलेल्‍या रुपये 6,90,740/- बाबत आहे. ज्‍यामध्‍ये विमा रक्‍कम रुपये 22,393/- चा समावेश आहे. जी रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी सुरुवातीलाच देण्‍याचे कबूल केले होते परंतु चुकिने तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात लावण्‍यात आला( इनव्‍हाईस नं. 305/2014-15  दिनांक 28.03.2015 वरुन स्‍पष्‍ट होते). आहे. सदर इनव्‍हाईस दर्शविते की, हायपोथिकेशन चार्जेस आणि विमा रक्‍कमेचा त्‍यामध्‍ये समावेश आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने दि. 22.05.2015 रोजी नोटीस पाठवून जास्‍तीची दिलेली रक्‍कम रुपये 30,535/- विरुध्‍द पक्षाच्‍या लक्षात आणून दिले. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडून एच.डी.एफ.सी.चे धनादेश दि. 08.04.2015 अन्‍वये रुपये 1231/- प्राप्‍त झाले. ते तक्रारकर्त्‍याने घेण्‍यास नाकारले व सदरचा धनादेश परत पाठविला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने अनेक वेळा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 ला दूरध्‍वनी वरुन संपर्क साधला असता प्रत्‍येक वेळेस सदर प्रकरणात लक्ष देऊन आवश्‍यक रक्‍कम परत करण्‍याबाबत कळविले. परंतु  रक्‍कम परत केली नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि. 21.02.2017 ला वि.प. 1 व 2 ला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही वि.प.ने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की,  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याकडून जास्‍तीची घेतलेली रक्‍कम रुपये 30,535/- व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक , मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून त्‍यात असे नमूद केले की, वि.प. क्रं. 1 यांचा टोयाटो कंपनी याने निर्मित केलेल्‍या वाहनाचा विक्री करण्‍याचा व्‍यवसाय आहे. माहे मार्च-2015 मध्‍ये तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे वाहन खरेदीकरिता संपर्क साधला विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वाहनाच्‍या किंमतीबाबत माहिती दिली व संपूर्ण वाटाघाटीनंतर वि.प.क्रं. 1  ने तक्रारकर्त्‍याला दि. 20.03.2017 ला कमिटमेंट चेक लिस्‍ट पुरविली.

 

  1.      वि.प.क्रं. 1 ने पुरविलेल्‍या कमिटमेंट चेक लिस्‍ट मध्‍ये वाहनाची किंमत रुपये 6,29,593/- नमूद करण्‍यात आली आहे आणि वाहनाची ऑन रोड किंमत रुपये 7,00,792/- नमूद करण्‍यात आली आहे. यामध्‍ये इन्‍श्‍युरन्‍स ( Zero Depreciation) रुपये 4,290/-, रजिस्‍ट्रेशन आणि रोड टॅक्‍स रुपये 57,538/- आणि Depot Handling & TGA Package रुपये 9,371/- चा समावेश आहे. कमिटमेंट चेक लिस्‍टवरुन स्‍पष्‍ट दिसून येते की, वाहनाची ऑनरोड किंमत रुपये 7,00,792/- एवढी आहे. सदर कमिटमेंट चेक लिस्‍टमधील इन्‍श्‍युरन्‍स ( नॉर्मल) या मथळया खाली कॉलम निरंक दर्शविला आहे. कारण वि.प. कडून माहे मार्च-2015 मध्‍ये ग्राहकांना फ्री इन्‍श्‍युरन्‍स (नार्मल) देण्‍याची योजना Fload करण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याला मिळत असलेल्‍या मोठया डिस्‍काऊंटमुळे तक्रारकर्त्‍याने वाहन रुपये 7,00,792/- एवढया खरेदी किंमतीत घेण्‍याचे कबूल केले. तक्रारकर्त्‍याने रुपये 7,00,500/- आर.टी.जी.एस. द्वारे व  रुपये 292/- नगदी स्‍वरुपात विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ला अदा केले व तक्रारकर्त्‍याला त्‍याचे वाहन दि. 28.03.2017 ला देण्‍यात आले. वाहनाची डिलिवरी तक्रारकर्त्‍याला दिल्‍यावर, तक्रारकर्त्‍याला टॅक्‍स इनव्‍हाईस, डिलिव्‍हरी नोट आणि लेजर अकाऊन्‍ट देण्‍यात आले.

 

  1.      वि.प.ने पुढे नमूद केले की, टॅक्‍स इनव्‍हाईस रुपये 6,14,593/- दि. 28.03.2015 मध्‍ये वाहनाची किंमत आणि त्‍यावर लागणा-या व्‍हॅटचा समावेश आहे. कमिटमेंट चेक लिस्‍ट मध्‍ये वाहनाची किंमत रुपये 6,29,593/- नमूद करण्‍यात आली आहे. विरुध्‍द पक्षाने कबूल केल्‍याप्रमाणे इन्‍श्‍युरन्‍स मध्‍ये डिस्‍काऊन्‍ट देण्‍यात येऊन टॅक्‍स इनव्‍हाईस देण्‍यात आला होता. आर.टी.ओ. यांनी दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे आणि स्‍वतंत्र लावावयास पाहिजे. त्‍यामुळे टॅक्‍स इनव्‍हाईस मध्‍ये वाहनाची किंमत आणि लागणारा वॅटचा समावेश आहे. आर.टी.ओ. टॅक्‍स आणि नोंदणी फी ची आकारणी ही टॅक्‍स इनव्‍हाईसवरुन केल्‍या जाते आणि त्‍यामुळे त्‍यामध्‍ये विम्‍याची किंमत अंतर्भूत नाही.

 

  1.      वि.प.ने पुढे नमूद केले की, त.क.ने ( 0 Depreciation) विमाची निवड केली होती, त्‍यामुळे नॉर्मल इन्‍श्‍युरन्‍स मधील फरकाची किंमत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने लावली. तक्रारकर्त्‍याला सर्व किंमती मध्‍ये केलेल्‍या तडजोडीची माहिती आहे आणि वाहनाची डिलिव्‍हरी घेतांना कोणत्‍याही प्रकारची तक्रार केलेली नव्‍हती.  तक्रारकर्त्‍याकडून प्राप्‍त झालेल्‍या रक्‍कमेची संपूर्ण माहिती खाते वही मध्‍ये नमूद आहे. Account Leger दिनांक 28.03.2015 मध्‍ये   ETIOS (Cross)  ची विक्री किंमत, विक्री वरील वॅट, आर.टी.ओ.टॅक्‍स, आर.टी.ओ.रजिस्‍ट्रेशन, इन्‍श्‍युरन्‍स व्‍हेकल स्‍पष्‍टपणे नमूद आहे. त्‍यामुळे संपूर्ण वाहनाची किंमत रुपये 7,90,740/- आहे. वि.प.क्रं. 1 ने तक्रारकर्त्‍याला विमा रक्‍कम मध्‍ये सुट देऊन त्‍याच्‍या खात्‍यात रुपये 2354/-चे क्रेडिट दिले आहे. वि.प.ने त.क.च्‍या वाहनाचे विमा खर्च वाहनाच्‍या किंमती मध्‍ये अॅडजेस्‍टमेंट करुन स्‍वतः वहन केला आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून वाहनाचे रुपये 8,529/- चे सुट भागे विकत घेतल्‍याची बाब लपवून ठेवली आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या तक्रारीत नमूद केले आहे की, खाते वही मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात रुपये 9,760/- शिल्‍ल्‍क दर्शवित आहे. विरुध्‍द पक्षाने वाहनाच्‍या सुट भागा पोटी रुपये 8,529/- कपात करुन उर्वरित रक्‍कम रुपये 1,231/- तक्रारकर्त्‍याला परत केली आहे, त्‍यामुळे मंचाने तक्रारकर्त्‍याची तक्रार दंडासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
  2.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवज , त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं.              मुद्दे                            उत्‍तर  

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?होय

  1.  प्रस्‍तुत तक्रार मुदतीत आहे काय ?   नाही 

4. काय आदेश ?अंतिम आदेशाप्रमाणे

 

                               निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने  Grace Toyoto Cosmic Grace Auto Pvt. Ltd. यांनी निर्मित केलेली ETIOS (Cross पेट्रोल)  वाहनाकरिता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी दिलेल्‍या कमिटमेंट लिस्‍टप्रमाणे रुपये 7,00,500/- अदा करुन विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कडून विकत घेतले होते हे नि.क्रं. 2 वर  दाखल दस्‍ताऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 5 वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन असे दिसून येते की, कंपनीने दि. 31 मार्च 2015 पर्यंतच्‍या अखेरपर्यंत ETIOS (Cross Diesel) व इतर डिझेल वाहनाकरिता योजना अंमलता आणली होती, त्‍यानुसार ETIOS (Cross)  attract a total benefit of Rs. 30,000/- that includes standard insurance at Rs. 1/- and TGA-Toyota Genuine Accessories  worth Rs.8,000/- योजनेनुसार वाहनाची उचल दि. 31.03.2015 पूर्वी करावयाची होती.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने वाहनाची उचल दि.31.03.2015 पूर्वी केली असली तरी तक्रारकर्त्‍याने ETIOS (Cross)  पेट्रोल वाहन विरुध्‍द पक्षाकडून विकत घेतल्‍यामुळे त्‍याला विरुध्‍द पक्षाने योजलेल्‍या वरील योजनेप्रमाणे त्‍याचा फायदा मिळू शकत नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून घेतलेल्‍या ETIOS (Cross)  पेट्रोल वाहनाचे Account Leger दिनांक 28.03.2015 नुसार विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून वाहन विक्री पोटी रुपये 6,93,094/- एवढी रक्‍कम स्विकारलेली आहे. शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानुसार वाहनाचा विमा उतरविणे बंधनकारक आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून वाहन विक्री पोटी रुपये 7,698/- (रु. 7,00,792 – 6,93,094) एवढी रक्‍कम स्विकारुन सेवेत त्रुटी केली आहे असे असले तरी तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मंचासमक्ष विहित मुदतीत दाखल न केल्‍यामुळे प्रस्‍तुत तकार मंचासमक्ष चालू शकत नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

 

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1.  उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.

 

  1.  उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1.  तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.