जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/110 प्रकरण दाखल दिनांक – 06/05/2009. प्रकरण निकाल दिनांक – 11/08/2009. समक्ष - मा.श्री.सतीश सामते, अध्यक्ष प्र मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. हरीभाऊ अंबादास माने वय, 59 वर्षे, धंदा नोकरी रा.अष्टविनायक नगर, भावसार चौक जवळ, तरोडा (खु) ता.जि.नांदेड. अर्जदार विरुध्द गौरव बिल्डर्स अन्ड डेव्हलपर्स, द्वारा आकाश बिल्डर्स अन्ड डेव्हलपर्स आकाश दिप अपार्टमेंट विरहनुमंतवाडी रोड, मोती नगर, लातूर ता.जि. लातूर आणि गौरव बिल्डर्स अन्ड डेव्हलपर्स, मंञी बिल्डर्स अन्ड डेव्हलपर्स प्रा.लि. टी.डी.टी. तरोडेकर कॉम्प्लेक्स, हवाई अडडा रोड, गैरअर्जदार वर्कशॉप कॉर्नर, माणिकनगर, तरोडा (बु.) ता.जि.नांदेड. आणि गौरव बिल्डर्स अन्ड डेव्हलपर्स, शाखा कार्यालय, गौरव नगर, मंञी कॉलनी, मालेगांव रोड, तरोडा (खु.) ता.जि.नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.अनुप कूर्तूडीकर गैरअर्जदारा तर्फे - अड.पी.एस. भक्कड. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली म्हणून ही तक्रार अर्जदार यांनी दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी मंञी कॉलनी तरोडा (खु) येथे घरकूल योजना आखली होती. सदर योजनेमध्ये अर्जदार यांनी महल स्वंतञ बंगला 32 51 एकूण 1632 चौ. फुट सदर प्लॉटमध्ये 800चौ. फुट जागेमध्ये तिन खोल्या, संडास बाथरुम, पाय-या पोर्च इत्यादी करिता जागेच्या व बांधकामाच्या किंमतीसी रु.6,00,000/- मध्ये देण्याचे कराराद्वारे ठरले. सदर करारानुसार अर्जदाराने गैरअर्जदारास दि.25.1.2005 रोजी रु.1,00,000/- रोख दिले. सदर रक्कमेची पावती मंचात दाखल केली आहे. तसेच अर्जदाराने आयसीआयसीआय होम फायनान्स क्षरे डी.डी. नंबर 089811 रु.2,90,000/- हे गैरअर्जदारास दिले. सदर पावती तक्रारीसोबत दाखल केली आहे. दि.23.3.2004 रोजी रोख रु.10,000/- गैरअर्जदारास दिले. असे एकूण रु.4,56,000/- अर्जदाराने गैरअर्जदारास सन 2005 मध्ये दिली. सन 2009 पर्यत गैरअर्जदाराने अर्जदारास घर पूर्ण करुन दिले नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास सदर घर पूर्ण होण्याच्या आधीच रजिस्ट्री करण्यास भाग पाडले त्यांचा क्र.352/2005 दि.25.1.2005 असा आहे. आजही ते घर पूर्ण झालेले नसून ते राहण्यास योग्य नाही. अर्जदाराने आजपर्यत बँकेचे कर्जावर रु.91,317/- व्याज भरले आहे. उर्वरित रक्कम देऊन ही गैरअर्जदार हा घर पूर्ण करणार नव्हता त्यामूळे अर्जदाराने उर्वरित रक्कम दिली नाही. गैरअर्जदार यांनी त्यांच्या महल योजनेअंतर्गत अर्जदारास पूर्ण घर बांधून दिले नाही व त्यामध्ये कोणत्याही सूवीधा दिल्या नाहीत. सदर पूस्तीकेची सत्यप्रत तक्रारीसोबत जोडली आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या पॅनेलवर असणारे श्री. तिवाडी यांनी सदर घर पूर्ण करण्यास रु.2,98,000/- लागतात. दि.4.4.2009 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदारास नोटीस दिली. सदर नोटीसी हया परत आल्या आहेत. फक्त लातूर च्या गैरअर्जदार यांनी नोटीस स्विकारली आहे.अर्जदार हा अपंग आहे. अर्जदाराची आर्थिक स्थिती ही खराब झाली आहे त्यांस गैरअर्जदार जबाबदार आहेत. त्यामूळे अर्जदाराचं मागणी आहे की, अर्जदारास अपूर्ण घर बांधून ञास दिला आहे त्याबददल रु.5,00,000/- व तसेच अर्जदाराचा रु.5,00,000/- चेक परत करावा, अर्जदारास घर बांधून दयावे, मानसिक व शारीरिक व आर्थिक ञासाबददल रु,200,000/- व प्रकरणाचा खर्च रु.5,000/- दयावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. अर्जदार हा त्यांचा ग्राहक नसल्यामूळे तक्रार खारीज करावी. अर्जदारास तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही. सदरची तक्रार ही मूदतीमध्ये नाही म्हणून तक्रार खारीज करावी. अर्जदाराने तक्रारीमध्ये केलेली मागणी योग्य नाही.अर्जदाराने स्वतंचे नांवाने प्लॉट करुन घेतलेला आहे व परत आता गैरअर्जदाराकडून रु.5,00,000/- ची मागणी करीत आहेत हे चूक आहे.अर्जदाराने करारातील शर्तीचे व अटीचे पालन केलेले नाही. अर्जदाराने आजपर्यत गैरअर्जदारास रु.3,56,000/- दिलेले आहेत, पण रु.4,56,000/- दिले हे मान्य नाही. अर्जदाराने आजपर्यत रु.56,000/- जमा करुन त्यांचा धनादेश वापस नेलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रु.5,00,000/- चा धनादेश सेक्यूरिटी म्हणून ठेवले होते व गैरअर्जदाराने विक्री खताचा खर्च रु.6,000/- केला आहे. आजपर्यत गैरअर्जदारास रु.3,56,000/- अर्जदाराकडून मिळालेले आहेत व अजून रु.2,50,000/- येणे बाकी आहेत. गैरअर्जदाराने अर्जदारास वारंवार सूचना दिली की, स्लॅब लेवल पर्यत रु.5,50,000/- देणे जरुरी आहे. अर्जदाराने ठरल्याप्रमाणे रक्कम दिली नाही त्यामूळे नाईलाजाने गैरअर्जदारास बांधकाम बंद करावे लागले. एवढेच नव्हे तर अर्जदाराने बँकेला पञ देऊन रु.2,10,000/-चे कर्ज कमी करुन घेतले व रु.2,90,000/-चे हप्ते पाडून घेतले. अर्जदाराने कराराचा भंग केल्यामूळे सदरचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. अर्जदाराने व्याजाने रक्कम घेतली होती त्यामूळे ते गैरअर्जदाराकडून व्याजाची रक्कम मागू शकत नाहीत. अर्जदाराने वेळेवर पैसे दिले असते तर ही वेळच आली नसती. अर्जदाराने ठरल्याप्रमाणे थकीत रक्कमेवर 18 टक्के व्याज थकीत तारखेपासून दिल्यास गैरअर्जदार आजही बांधकाम करुन देण्यास तयार आहेत तसेच अर्जदारास घर नको असल्यास गैरअर्जदार हे त्यांना रु,3,50,000/- देऊन परत विक्रीखत करुन घेण्यास तयार आहेत. अर्जदाराने खोटया नियतीने व गैरअर्जदाराकडून पैसे उकळण्याच्या उददेशाने सदरची तक्रार दाखल केली आहे म्हणून ती तक्रार खर्चासह फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून कागदपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय होय 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय? नाही. 3. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मूददा क्र.1 - अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये घर बांधून देण्यासाठी करार झालेला आहे. सदरचा करार अर्जदार व गैरअर्जदार या दोघानाही मान्य आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून घराचे बांधकाम करुन घेण्यासाठी गैरअर्जदार यांना हप्त्यामध्ये रक्कम देण्याचे व त्यानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे बांधकाम करण्याचे दोघामध्ये ठरलेले होते. ही बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ, अर्जदार व गैरअर्जदार यांचमध्ये झालेला करार या कागदपञाचा विचार होतो अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांचे घराचे बांधकाम गैरअर्जदार यांनी करुन देण्याचे अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्ये ठरलेले होते. त्याप्रमाणे अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्ये करार ही झालेला आहे. अर्जदार यांनी घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गैरअर्जदार यांना एकूण रक्कम रु.6,00,000/- देण्याचे ठरलेले होते.ही बाब अर्जदार व गैरअर्जदार या दोघानाही मान्य आहे. अर्जदार हे या मंचामध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास फसवले आहे सदर घर अपूर्ण बांधून विनाकारण ञास दिला म्हणून नूकसान भरपाईची रक्कम मिळावी अशा प्रकारची तक्रार गैरअर्जदार यांचे विरुध्द घेऊन आलेले आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांच्या खाजगी बांधकाम संपूर्ण करण्यासाठी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रु.6,00,000/- एवढी रक्कम देण्याचे ठरले आहे. परंतु प्रत्यक्षात अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना पूर्ण रक्कम घराचे बांधकाम पूर्ण करुन देण्यासाठी दिलेली नाही. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी आयसीआयसीआय होम फायनान्स यांना दि.07.07.2005 रोजी दिलेले पञ दाखल केलेले आहे. सदर पञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांना बँकेकडून रु.5,00,000/- कर्ज मंजूर झालेले आहे. परंतु प्रत्यक्षात रु.2,90,000/- अर्जदार यांना मिळालेले आहेत उर्वरित रक्कम रु.2,10,000/- बँकेने देऊ नये असे अर्जदार यांनी बँकेला कळवल्याचे स्पष्ट होत आहे.अर्जदार यांनी बँकेला जूलै 2005 मध्ये उर्वरित रक्कम देऊ नये असे कळवलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये अर्जदार यांनी कराराचा भंग केल्यामूळे सदरचे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही असे नमूद केलेले आहे. गैरअर्जदार यांना अर्जदार यांचेकडून जितकी रक्कम प्राप्त झाली त्या रक्कमेचे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे घराचे बांधकाम करुन दिलेले आहे. प्रत्यक्षात अर्जदार यांचेकडून रक्कम थकीत झाल्यानंतरच गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे घराचे बांधकाम थांबवलेले आहे. याचा विचार होता अर्जदार यांनी, अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये झालेल्या करारामधील अटीचे व शर्तीचे पालन केलेले नाही, कराराचा भंग केलेला आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे विनंती कलमामध्ये रु.5,00,000/- नूकसान भरपाई, लोन प्रकरणी झालेली नूकसान भरपाई अशा प्रकारची मागणी केलेली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये झालेल्या कराराप्रमाणे अर्जदार यांनीच कराराचा भंग केलेला आहे त्यामूळे अर्जदार यांच्या घर अपूर्ण बांधून अर्जदारास विनाकारण ञास दिला त्यामूळे रक्कम रु.5,00,000/- ची नूकसान भरपाई मागणीस कोणताही कायदेशीर अर्थ नाही. अर्जदार यांनी घर बांधकाम करुन घेण्यासाठी बँकेकडून लोन मंजूर करुन घेतलेले आहे. एकूण मंजूर रक्कमेपैकी रु.2,90,000/- चे कर्ज उचलले आहे, उर्वरित रक्कम बॅकेने देऊ नये यासाठी अर्जदार यांनी बँकेला लेखी पञ जूलै 2005 मध्ये दिलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये अर्जदार यांची तक्रार मूदतीमध्ये नाही असे नमूद केलेले आहे. वास्तविक अर्जदार यांचे अर्जास कॉज ऑफ अक्शन जूलै 2005 मध्ये घडल्याचे दिसून येत आहे परंतु अर्जदार हे प्रत्यक्षात या मंचामध्ये सदरची तक्रार घेऊन दि.6.5.2009 रोजी आलेले आहेत. सदर अर्जासोबत अर्जदार यांनी कोणताही उशीर माफीचा अर्ज, शपथपञ दिलेले नाही. त्यामूळे अर्जदार यांचा अर्ज मूदतीच्या कारणावरुनही नामंजूर होण्यास पाञ आहे असे या मंचाचे मते आहे. अर्जदार यांनी श्री. गणेश तिवाडी आर्किटेक्चर यांचे अपूर्ण घराला पूर्ण करण्यासाठी रक्कम रु.2,98,700/- लागतील या बाबत प्रमाणपञ दाखल केलेले आहे. परंतु अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिलेल्या रक्कमेनुसार गैरअर्जदार यांनी त्यांचे घराचे बांधकाम केलेले नाही अगर सदरचे केलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे आहे असे दर्शवीणारा कोणताही पूरावा म्हणजेच तज्ञ अभिंयत्याचे किती रक्कमेचे बांधकाम झाले या बाबतचा अहवाल शपथपञ या अर्जाचे कामी पूरावा म्हणून दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी त्यांचे शेजारी रुस्तूम आडे यांचे शपथपञ याकामी दाखल केलेले आहे परंतु सदरच्या शपथपञाला या पूराव्याचे कामी तज्ञ व्यक्ती म्हणून विचार करता येणार नाही. अर्जदार यांनी या अर्जासोबत वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ दाखल केलेले आहेत. सदरच्या केस लॉ चा या अर्जाचे कामी विचार करता येणार नाही कारण प्रस्तूत केसमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना घर बांधणीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यामूळे सेवेत कमतरता व त्या अनुषंगाने नूकसान भरपाई देणे न्याय व उचित असे नाही. अर्जदार यांनी त्यांचे अर्जामध्ये रक्कम रु.5,00,000/- चा चेक क्रमांक 669858 नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अनामत रक्कम म्हणून गैरअर्जदार यांना दिलेला आहे. सदरचा चेक आजअखेर गैरअर्जदार यांचेकडेच असल्याचे नमूद केलेले आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपञामध्ये नाकारलेली नाही, यांचा विचार होता गैरअर्जदार यांना अर्जदार यांचा रक्कम रु.5,00,000/- चेक गैरअर्जदार यांनी परत दयावा असे आदेश करणे या अर्जाचे कामी न्याय व योग्य असे ठरणारे आहे. गैरअर्जदार यांचे वकिलानी यूक्तीवादाचे वेळी प्रस्तूतचा चेक अर्जदार यांस परत देण्याचे मान्यही केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, तसेच अर्जदारातर्फे दाखल लेखी यूक्तीवाद, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र, दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद व वरील सर्व विवेचनाचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते आहे. 2. गैरअर्जदार यांनी आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचा रक्कम रु.5,00,000/- चा चेक क्रमांक 669858 नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अर्जदार यांना परत करावा. 3. सेवेत कमतरता नसल्यामूळे मानसिक ञासाबददल व दाव्याच्या खर्चाबददल आदेश नाही. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.सतीश सामते श्रीमती.सुजाता पाटणकर अध्यक्ष प्र सदस्या जे.यु.पारवेकर लघूलेखक. |