Maharashtra

Nagpur

CC/575/2020

VIDYADHAR B. MALPE - Complainant(s)

Versus

GOVARDHAN R. CHAUDHARI - Opp.Party(s)

SELF

18 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/575/2020
( Date of Filing : 29 Dec 2020 )
 
1. VIDYADHAR B. MALPE
R/O. 20 A-1, BHOOP APARTMENT, KHARE TOWN, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. GOVARDHAN R. CHAUDHARI
R/O. PLOT NO.43, FLAT NO.103, HIRANMAYI APARTMENT, NEXT TO HEART BEASTS, NEAR SHRI SAI SABHAGRUHA, MOKHARA COLLEGE ROAD, SURVEYNAGAR, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 
Dated : 18 Apr 2023
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारदाराने वि.प.यांना त्यांचे घरातील रेफ्रीजीरेटर दुरुस्तीकरिता बोलविले. वि.प.ने दुरुस्तीपूर्वी रेफ्रीजीरेटर मधील थरमोस्टेट व कॉम्प्रेसर वाईंडींग व कॉम्प्रेसर काम करील असल्याचे नक्की केले. तक्रारदाराने वि.प.ला कॉम्प्रेसर वाईंडींगला होत असलेला विद्युत पूरवठा तपासण्‍यास सांगीतले व तो 0.9 अॅम्पीअर असल्याचे नक्की केले. त्यानंतर वि.प.ने फ्रीज मधील इतर तपासणी केली असता तक्रारदाराला जळण्‍याचा वास आला म्हणुन तक्रारदाराने विचारणा केला असता वि.प.ने कॉम्प्रेसर जळल्याचे सांगीतले म्हणुन तक्रारदाराने विद्युत प्रवाह तपासण्‍यास सांगीतले व विद्युत पूरवठा बंद करण्‍यास सांगीतले असता कॉम्प्रेसरला होत असलेला विद्युत पूरवठयात 4 अॅम्पीअर असल्याचे आढळले व तो परमिसिबल एरर 1.2 अॅम्पीअर पेक्षा जास्त होता म्हणुन तक्रारदाराचे रेफ्रीजीरेटर मधील कॉम्प्रेसर  जळला. तक्रारदारास असे दिसुन आले की वि.प.ने सरळ विद्युत पूरवठा  केला होता व त्यानंतर विद्युत प्रवाह वायरमध्‍ये कॅपेसेटरव्दारे केला त्यामूळे कॉम्प्रेसर वाईंडींगला कॅपेसटरचा वापर केल्यामूळे विद्युत पूरवठा ण्‍9 पासून 4.0 पर्यत वाढला तो परमिसिबल एरर लिमीट 1.2 एमपीआरपेक्षा जास्त असल्याने कॉम्प्रेसर वाईंडींग जळले. तक्रारदाराने त्यानंतर वि.प.ने केलेल्या कामाचे अवलोकन केले असता असे दिसुन आले की, वि.प.ने कॉम्प्रेसरला विद्युत पूरवठयामध्‍ये कॅपेसटरचा वापर न करता सरळ विद्युत पूरवठा दिला होता. वि.प.ने सुरुवातीला Relay  ची तपासणी करावयास पाहिजे होती व त्यानंतर नादुरुस्त रिले बदलवून नवीन रिले लावावयास हवा होता पण तसे न करता वि.प.ने तक्रारदाराचे कॉम्प्रेसर वाईंडिग जाळले त्यामूळे तकारकर्ता वि.प.कडुन नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे.
  2. तक्रारदार व वि.प.यांचेमध्‍ये दिनांक 16.7.2019 रोजी झालेल्या संभाषणानुसार वि.प.ने तक्रारदाराचे घरी भेट देऊन प्रकरण निकाली काढणार होता परंतु आजतागायत वि.प.ने तक्रारदाराचे घराला भेट दिली नाही व प्रकरणात समझोता केला नाही त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 3.3.2020 ला वि.प.ला वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवि‍ली परंतु वि.प.ने सदर नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन वि.प.ने तक्रारदाराचे रेफ्रीजीरेटर मध्‍ये नवीन कॉम्प्रेसर बसवून त्यामध्‍ये गॅस रिचार्ज करुन द्यावा व रेफ्रीजीरेटर अभाची झालेल्रया नुकसानीबाबत रुपये 1,000/- प्रतीमाही खर्च मिळावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
  3.  तक्रार दाखल करुन वि.प.यांना नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस मिळुन वि.प. मंचासमक्ष हजर झाले व आपले लेखी उत्तर सादर केला.
  4. वि.प.आपले लेखी उत्तरात नमुद करतात की , तकारदाराने वि.प. यांना कोणतेही दुरुस्तीची रक्कम अदा केली नाही व त्याबाबतची पावती अभिलेखावर दाखल नाही. तसेच वि.प.ने तक्रारदाराचा कॉम्प्रेसर जाळला याबाबत कोणताही पूरावा अभि‍लेखावर दाखल नाही.
  5. वि.प.ने तकारदाराचे परिच्‍छेदनिहाय म्हणणे नाकारले व पूढे असे नमुद केले की, तक्रारदाराचे घरी दिनांक 8.5.5019 ला त्यांचे बोलावण्‍यावरुन रेफ्रीजीरेटर दुरुस्तीकरिता भेट दिली होती. वि.प.ने तक्रारदाराचे वापरात असलेल्या रेफ्रीजीरेटरचे कॉम्प्रेसर काम करीत नसल्याचे सांगीतले होते व ते बदलवून देण्‍याबाबत सूचविले होते.
  6. तकारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्तऐवतांचे व वि.प.ने दाखल लेखी उत्तराचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

मुद्दे                               उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍दपक्षाचा ग्राहक आहे काय ?         नाही
  2. वि.प.तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे काय ?     नाही
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा

अवलंब केला आहे काय ?                         नाही

  1. काय आदेश ?                            अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. वि.प.ने तक्रारदाराचे घरी दिनांक 8.5.2019 ला त्यांचे बोलावण्‍यावरुन रेफ्रीजीरेटर दुरुस्तीकरिता भेट दिली होती परंतु त्याकरिता तक्रारदारालकडुन कोणतेही शुल्क किंवा भेट फी दिल्याबाबत कोणतेही दस्तऐवज /पावती अभिलेखावर दाखल केले नाही. यावरुन तक्रारकर्ता व वि.प.चा ग्राहक नाही असे स्पष्ट होते. तसेच वि.प. ने दुर्लक्षामूळे व तक्रारदाराचे रेफ्रीजीरेटरमधील कॉम्प्रेसर जळला याबाबत कोणताही कोणताही तज्ञ अहवाल दाखल करण्‍यात तक्रारकर्ता अपयशी ठरला यावरुन वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचे स्पष्‍ट होत नाही असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.
  3. तक्रारदाराला प्रकरणाची ब व क फाईल परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.