तक्रार दाखल दि.11/03/2016
तक्रार निकाली दि.28/06/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. प्रस्तुतची तक्रार अर्ज स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. यांना नोटीस लागू होऊनही गैरहजर. सबब, प्रस्तुत वि.प. विरुध्द दि.04.06.2016 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की–
तक्रारदार हे कायमचे रहिवासी असून वि.प.हे व्यवसायाने कुंभार असून वि.प. यांचा मातीच्या विटेचा आवा- विटभट्टी आहे. वि.प.हे बांधकामाकरीता लागणा-या विटा तयार करुन त्याची विक्री करणेचा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी घराचे बांधकामाकरीता लागणा-या विटा वि.प.यांचेकडून खरेदी करणेचे ठरविले. तक्रारदारांना घराचे बांधकामाकरीता विटा खरेदी करावयाच्या असलेने तक्रारदारांनी वि.प.यांचेकडे विट खरेदीकरीता मजुरांचा पगार भागविणेकरीता विटेच्या अॅडव्हान्स रक्कमेची मागणी केली म्हणून तक्रारदारांनी वि.प.यांना 5 x 4 x 3 या साईजच्या 1,20,000 (एक लाख वीस हजार) विटांची ऑर्डर तक्रारदारांनी वि.प.यांना दिली. सदर विटांची एक रक्कमी रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख फक्त) अदा केले. सदरची रक्कम वि.प.यांनी स्विकारताना तक्रारदारांना विट खरेदीबाबतचे दि.28.07.2014 रोजी करारपत्र लिहून दिले. करारपत्र केलेपासून सहा महिन्याचे कालावधीमध्ये वि.प.यांनी तक्रारदारांना विट पोहच करणेचे कबूल केले होते. तथापि वि.प.यांनी त्यानंतर आजअखेर तक्रारदाराना विटा पोहच केल्या नाहीत अथवा विटांचे मोबदल्याची स्विकारलेली रक्कम देखील वि.प.यांनी तक्रारदारांना दिलेली नाही. तक्रारदारांनी वेळोवेळी मागणी करुनही ऑर्डरच्या विटा पोहच केलेल्या नाहीत, म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली. वि.प.यांनी कराराचे मुदतीत विटा पोहच केल्या असत्या तर तक्रारदारांचे घराचे बांधकाम पूर्ण होऊन तक्रारदारांना राहणेस घर मिळाले असते. परंतु चौदा महिन्यापासून तक्रारदारांना राहणेस घर मिळाले असते तर तक्रारदारांना विनाकारण दरमहा रक्कम रु.6,000/- (अक्षरी रक्कम रुपये सहा हजार फक्त) प्रमाणे भाडे देऊन कुटूंबासह बाहेर रहावे लागत आहे. तक्रारदारांनी वि.प.यांना विटांची अदा केलेली रोख रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख फक्त) व तक्रारदारांना गेल्या चौदा महिन्यापासून दरमहा रक्कम रु.6,000/- (अक्षरी रक्कम रुपये सहा हजार फक्त) प्रमाणे घरभाडे देऊन रहावे लागलेमुळे नुकसानीदाखल रक्कम रु.84,000/-(अक्षरी रक्कम रुपये च्यौ-याऐंशी फक्त), तक्रारदारांनी वकीलांमार्फत पाठविलेल्या नोटीस फी ची रक्कम रु.1,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार फक्त) व सदरहू प्रसतुत तक्रारीचा टायपिंग, झेरॉक्स, पोस्टेजसह, स्टॅम्प डयुटीसह खर्चाची रक्कम रु.7,500/- (अक्षरी रक्कम रुपये सात हजार पाचशे फक्त) अशी एकूण रक्कम रु.2,92,500/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख ब्यान्नव हजार पाचशे फक्त) अशी रक्कम व विटांची संख्या 1,20,000 (एक लाख वीस हजार) वि.प. यांचेकडून तक्रारदारांना अदा होऊन मिळावी अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
4. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दि.25.06.2014 रोजीचे तक्रारदार व वि.प.यांचेमधील करारपत्र तसेच दि.08.10.2015 रोजी तक्रारदारांनी वि.प.यांना रजि.ए.डी.ने पाठविलेली नोटीस व दि.04.06.2016 रोजीचे तक्रारदाराचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
5. प्रस्तुत कामी, वि.प. यांना नोटीस लागू होऊनही ते मे.मंचात गैरहजर आहेत. सबब, वि.प. क्र.1 व 2 यांचे विरुध्द निशाणी क्र.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प.यांनी तक्रारदारांचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
6. तक्रारदारांची तक्रार, अनुषांगिक कागदपत्रे व शपथपत्र तसेच तक्रारदारांचे वकीलांचा युक्तीवादाचा विचार करीता पुढील मुद्दे निष्कर्षाप्रत उपस्थित होतात.
क्र. | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारदार हे वि.प.यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
7. मुद्दा क्र.1 व 2:-
वर नमुद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण तक्रारदाराने वि.प.यांचेकडे 5 x 4 x 3 या साईजच्या 1,20,000 (एक लाख वीस हजार) वीटांची ऑर्डर देऊन त्यापोटी रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख फक्त) वि.प. यांना अदा केले होते. प्रस्तुत रक्कम स्विकारताना वि.प.यांनी विट खरेदीबाबतचे दि.28.07.2014 रोजी करारपत्र लिहून दिले आहे. प्रस्तुत करारपत्र तक्रारदाराने निशाणी-4 चे कागद यादीसोबत निशाणी-4/1 कडे दाखल केले आहे. प्रस्तुत करारपत्रामध्ये वि.प.यांनी सदर रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख फक्त) तक्रारदाराकडून 1,20,000 (एक लाख वीस हजार) विटांची रक्कम मिळाली असलेने व प्रस्तुत विटा करारपत्रापासून सहा महिनेचे आत सर्व विटा वि.प.यांनी तक्रारदारांना पोहोच करणेचे वि.प.ने मान्य व कबूल केलेचे स्पष्ट होते. तथापि तक्रारदारांना वि.प.यांनी नमूद करारात ठरलेप्रमाणे वि.प.कडून सर्व रक्कम स्विकारुनही 1,20,000 (एक लाख वीस हजार फक्त) विटा पोहोच केल्या नाहीत. तसेच तक्रारदाराने वि.प.यांचेकडे वेळोवेळी विटांची मागणी केली असता, विटा पोहोच केल्या नाहीत व तक्रारदारांकडून विटांसाठी स्विकारलेली रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख फक्त) ही तक्रारदाराला अदा केली नाही. तक्रारदाराने वि.प.कडे विटांची किंवा जमा केले रक्कमेची वारंवार मागणी केली. वि.प.ला वकीलांमार्फत नोटीस दिली. तरीही वि.प.यांनी तक्रारदाराला विटा किंवा रक्कम अदा केले नाही. ही बाब तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट व सिध्द होते. तसेच वि.प.यांनी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदार हे वि.प.यांचे ग्राहक आहेत व वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे, हे निर्वीवार सत्य आहे. सबब, मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
सबब, वरील कारणमिमांसा/विवेचन विचारात घेता, तक्रारदार हे वि.प.यांचेकडून 1,20,000 (एक लाख वीस हजार) विटा व नुकसान भरपाईची रक्कम किंवा विटांपोटी वि.प.ला तक्रारदाराने अदा केलेली रक्कम रु.2,00,000/-(अक्षरी रक्कम रुपये दोन लाख फक्त) व नुकसानभरपाई मिळणेस तक्रारदार हे पात्र आहेत असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे. परंतु घरभाडे तक्रारदाराने भरलेबाबत कोणताही कागद या कामी तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
(2) वि.प.यांनी तक्रारदारांना करारात ठरलेप्रमाणे 1,20,000 (एक लाख वीस हजार फक्त) विटा पोहोच कराव्यात. विटा देणे वि.प.यांना शक्य नसलेस वि.प. यांनी तक्रारदाराने विटापोटी जमा केलेली रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख फक्त) तक्रारदारांना परत अदा करावी. प्रस्तुत रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज वि.प.यांने तक्रारदाराला अदा करावे.
(3) तक्रारदारांना वि.प.यांनी कोर्ट खर्चाकरीता रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावे.
(4) वर नमुद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत अदा करावी.
(5) विहीत मुदतीत वि.प.यांनी आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदाराला वि.प.यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे अन्वये कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
(6) आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.