जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 742/2008
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-13/06/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 20/06/2013.
श्री.मच्छिंद्र भालेराव बागुल,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.धानोरा, ता.अंमळनेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
गोरख बना पाटील,
रा.शिरुड, ता.अंमळनेर,जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.राजेंद्र विश्वासराव निकम वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः करारात ठरल्याप्रमाणे विहीर खोदुन बांधकाम पुर्ण
करुन न दिल्याने तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केलेला होता. प्रस्तुत तक्रार युक्तीवादावर नेमलेल्या तारखेस म्हणजे 20/06/2013 रोजी तक्रारदार हे त्यांचे वकीलामार्फत हजर झाले व तक्रारदार व विरुध्द पक्षात आपसात तडजोड झालेली असल्याने तक्रार पुढे चालवणे नाही अशी विनंती पुरसीस दाखल केली. सबब तक्रारदाराचे विनंती नुसार प्रस्तुत तक्रार काढुन टाकण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 20/06/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.