--- आदेश ---
(पारित दि. 02-11-2007 )
द्वाराश्रीमतीप्रतिभाबा.पोटदुखे, अध्यक्षा–
तक्रारकर्ता महेश गोपीलाल अग्रवाल यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1. त.क. हे वि.प.क्रं. 1 यांचे दि. 25.06.1982 पासून ग्राहक असून त्यांचा नोंदणी क्रं. 500640 असा आहे. तसेच त्यांनी अतिरिक्त सिलेंडर मिळण्याकरिता दि. 20.03.1985 ला पैसे भरले.
2. वि.प.क्रं. 1 हे गॅस सिलेंडरचा पुरवठा करतांना विलंब करायचे, त.क. यांनी चौकशी केली असता, वि.प.यांनी उत्तर दिले की, त्यांना वि.प.क्रं. 2 यांच्याकडून गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्याने ते वेळेवर ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करु शकत नाही.
3. त.क.यांनी चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, वि.प.क्रं. 1 हे हॉटेल व्यावसायिकांना जास्त पैसे घेऊन गॅस सिलेंडर पुरवितात . तसेच वि.प.क्रं. 1 यांनी गॅस सिलेंडरचा खोटा तुटवडा निर्माण केला आहे.
4. दि. 03.07.1996 रोजी त.क. यांनी वि.प.क्रं. 1 यांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी फोन केला असता वि.प.क्रं. 1 यांच्याकडून त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली. तक्रारकर्ता यांनी त्यांचा रिपोर्ट उप-विभागीय अधिकारी, श्री. तलांजे यांना दिला. तेव्हा श्री.तलांजे यांनी वि.प.क्रं. 1 यांच्या गोडाऊनवर छापा मारला व अवैध साहित्य जप्त केले. त्याबद्दलची केस नं. 333/2000 ही जिल्हा न्यायाधीश भंडारा यांच्याकडून सुरु आहे.
5. या घटनेचा बदला घेण्यासाठी वि.प.क्रं. 1 यांनी त.क.यांना गॅस सिलेंडर पुरविणे थांबविले. ते कधी 8 महिन्यानी तर कधी 10 महिन्यांनी गॅस सिलेंडरचा पुरवठा करु लागले, त्यामुळे त.क. यांना अतिशय मानसिक त्रास झाला.
6. त.क.यांनी मागणी केली आहे की, त्यांना रु.5,00,000/- नुकसान भरपाई मिळावी व इतर योग्य ती दाद मिळावी.
7. वि.प.क्रं. 1 यांनी त्यांचे लेखी बयाण निशाणी क्रं. 12 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, त्यांनी कधीही गॅस पुरवठा करण्यास नकार दिलेला नाही. जर कां 6 महिन्यात गॅस सिलेंडरची मागणी करण्यात आली नाही तर वि.प.यांचे कर्तव्य असते की, त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गॅस संबंधित उपकरणाची तपासणी केली पाहिजे. त.क.यांच्याकडून गॅस सिलेंडरची बुकिंग करण्यात आली नाही. वि.प.क्रं. 1 यांनी कधीही ग्राहकाकडून जास्त पैसे घेऊन पुरवठा केलेला नाही अथवा गॅस सिलेंडरचा तुडवटा ही निर्माण केलेला नाही. त्यांनी कधीही त.क. यांना गॅस सिलेंडर पुरविण्यास 6 महिन्याचा वेळ लावला नाही. त.क.हे रुपये 5,00,000/- ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळण्यास पात्र नाहीत. त.क. यांनी त्यांची तक्रार ही विलंबाने केली आहे. त.क.यांची तक्रार ही खोटी व बनावट असल्यामुळे ती रुपये 10,000/- च्या नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
8. वि.प.क्रं. 2 यांनी त्याचे लेखी बयाण निशाणी क्रं. 14 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, त्यांच्याकडून गॅस सिलेंडर पुरविण्यास कधीही कमतरता नव्हती. वि.प.क्रं. 2 यांना 7 वर्षापासून गॅस सिलेंडर संबंधित समस्यांना समोर जावे लागत आहे या संबंधी त.क. हे 3 गॅस सिलेंडर उपयोगात आणतात हे अवैध आहे. त.क. हे रुपये 5,00,000/- मिळण्यास पात्र नसून त्यांनी केलेली तक्रार ही नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
9. त.क व वि. प. यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की,त.क.यांनी कधी गॅस सिलेंडर बुक केले व ते वि.प.यांनी किती दिवसांनी पुरविले व अथवा पुरविले नाही याबद्दलची त.क.यांनी दिलेली माहिती ही अस्पष्ट व संदिग्ध आहे. त.क.यांनी त्यांना शेवटचा गॅस सिलेंडर कधी पुरविण्यात आला याबद्दल सुध्दा माहिती ग्राहक तक्रारीत दिलेली नाही. त.क. यांनी गॅस सिलेंडरच्या अनियमित पुरवठयाबद्दल वि.प.क्रं. 1 किंवा 2 यांना कधी पत्र लिहिल्याचे निदर्शनास येत नाही. त.क. त्यांचे शपथपत्रात म्हणतात की, त्यांना एक वर्ष गॅस पुरविले नाही परंतु त्याबद्दल त.क. यांनी कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.
10. त.क.यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीत परिच्छेद क्रं. 2 मध्ये म्हटले आहे की, त्यांना दि. 17.07.07 च्या नंतर त्यांचा गॅस सिलेंडरचा पुरवठा हा गोठवण्यात आल्याची निश्चित माहिती मिळाली. त.क. यांनी श्री. अशोक सहारे यांचे शपथपत्र निशाणी क्रं. 16 रेकॉर्डवर दाखल केलेले आहे. त्यामध्ये श्री. अशोक सहारे यांनी असे नमूद केले आहे की, दि. 17.07.07 रोजी ते त.क.श्री. महेश अग्रवाल यांच्या बरोबर वि.प.क्रं. 1 यांच्या गोंदिया गॅस एजन्सी मध्ये गेले होते व त्यांनी गॅस सिलेंडर पुरवठयाची मागणी श्री. बबलू यांच्याकडे केली, परंतु त.क.यांच्या तक्रारी मध्ये हे मुद्दे नोंदविण्यात आलेले नाहीत. तसेच वि.प.यांच्या तर्फे दाखल करण्यात आलेले श्री. पुष्पक जसानी व श्री. बबलू राऊत यांचे शपथपत्रामध्ये त.क. श्री. महेश अग्रवाल हे अशोक सहारे यांच्या बरोबर गोंदिया गॅस एजन्सी मध्ये आल्याचे नाकारलेले आहे. त्यावरुन सदर ग्राहक तक्रार ही मुदतीत आणण्याच्या एकमेव उद्देशाने त.क. श्री. महेश अग्रवाल हे श्री.अशोक सहारे यांच्या बरोबर दि. 17.07.07 रोजी गोंदिया गॅस एजन्सीत गेल्याचे सांगण्यात आल्याचे दिसते.
11. त.क. यांनी दि. 03.07.1996 रोजी वि.प.क्रं. 1 यांना फोन करुन गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याचे सांगितले असे त.क. यांनी त्यांच्या तक्रारीत लिहिले आहे. तसेच त.क. यांनी त्यांच्या तक्रारीत असे ही नमूद केले आहे की, वि.प.क्रं. 1 पुष्पक जसानी यांनी त्यांना दूरध्वनीवरुन अर्वाच्य शिवीगाळ केली व त्याची तक्रार त्यांनी दि. 03.07.1996 रोजी श्री. तलांजे, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली. श्री. तलांजे यांनी वि.प.यांच्या गोडाऊनवर छापा मारला व वि.प.यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविला. या सगळया घटना 1996 च्या असल्याचे दिसून येतात. त.क. यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या सिलेंडर पुरवठयाच्या रसीद सुध्दा दि. 20 मार्च 1985 व दि. 31 मार्च 1988 अश्या आहेत.
12. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम – 24 (अ) प्रमाणे कोणतीही ग्राहक तक्रार ही दाव्यास कारण घडल्या पासून दोन वर्षाच्या आत टाकावयाची असते. परंतु सदर ग्राहक तक्रार ही त.क. यांनी मुदतीच्या आत टाकल्याचे दिसून येत नाही. वकिला मार्फत नोटीस पाठविल्यामुळे दाव्यास कारण (cause of action ) सुरु होत नाही.
13. त.क. यांनी वि.प.यांनी त्यांना नियमित गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा अशी मागणी त्यांच्या ग्राहक तक्रारीत केलेली नाही. त्यांनी रुपये 5,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. मात्र त्यांनी ग्राहक तक्रारीत त्यांचे रुपये 5,00,000/- चे कोणत्या प्रकारे नुकसान झाले याबद्दलची स्पष्ट माहिती व पुरावा दिलेला नाही. त.क. यांच्यानुसार जर दाव्यास कारण हे दि. 17.07.07 रोजी घडले तर त्या तारखेपासून ग्राहक तक्रार दाखल करे पर्यंत म्हणजेच दि. 23.08.07 पर्यंत अथवा त्याच्या दोन वर्षापूर्वी पासून त्यांच्या झालेल्या नुकसानीचे विवरण त.क.यांनी द्यावयास पाहिजे होते. वि.प.यांनी त्यांच्या लेखी बयानात असे म्हटले आहे की, त.क. यांची ग्राहक म्हणून नोंदणी ही रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे त.क. यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीत परिच्छेद क्रं. 2 मध्ये दिलेली माहिती ही की, दि. 17.07.07 ला त्यांचा गॅस सिलेंडरचा पुरवठा गोठविण्यात आला ही निश्चित माहिती मिळाली ही खोटी ठरते.
14. त.क.यांनी त्यांचे ग्राहक तक्रारीत असे नमूद केले आहे की, त्यांच्या वापरात 3 गॅस सिलेंडर होते. श्री.महेश शिवहारे या ग्राहकाचे सिलेंडर हे वि.प.यांनी त.क.यांना वापरण्यास सांगितले याबद्दलचा पुरावा रेकॉर्डवर नाही. THE LIQUEFIED PETROLEUM GAS REGULATION OF SUPPLY & DISTRIBUTION ORDER 2000 च्या कलम – 3 मध्ये असे नमूद केले आहे की, एका व्यक्तिस एका पेक्षा जास्त कनेक्शन हे परवानगी शिवाय ठेवता येत नाही. मात्र त.क. यांच्याकडे 2 कनेक्शन असल्याचे दिसून येते ही सुध्दा अवैध बाब आहे.
15. त.क.यांनी दाखल केलेली तक्रार ही निराशाजनकरित्या मुदतबाहय आहे. शिवाय त्यांनी त्यांचे रुपये 5,00,000/- चे नुकसान झाले याबद्दलचा सबळ पुरावा रेकॉर्डवर दाखल केलेला नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 तक्रारकर्ता यांची तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.