Maharashtra

Chandrapur

CC/20/33

Shri.Omprakash Jhangiramji Saluja - Complainant(s)

Versus

Golf Services - Opp.Party(s)

Y.C.Itankar

29 Oct 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/33
( Date of Filing : 21 May 2020 )
 
1. Shri.Omprakash Jhangiramji Saluja
Azadhind chowk, Rasraj hotelchya bajula, Tukum,Chandrapur Tah.Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Golf Services
Wasade hospitalche mage,Zilla madhyavarti sahakari bank jawal,Nagpur road,Chandrapur Tah.Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Oct 2021
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                    (पारीत दिनांक २९/१०/२०२१ )

 

                                            

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे  कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याच्‍या बहिणीच्‍या मुलाने नोव्‍हेंबर २०१५ मध्‍ये रिलायंन्‍स रिटेल या दुकानातून सॅमसंग कंपनीचा जी.एस.एम.ए. ८०० एफ हा मोबाईल रुपये ३०,७९६/- मध्‍ये विकत घेतला. सदर मोबाईल चा आय.एम.ई.आय. क्रमांक ३५३००००००७०५४६३६६ हा आहे. विरुध्‍द पक्ष हे सॅमसंग कंपनीचा मोबाईल तसेच इतर उपकरणे दुरुस्‍ती करणारे कंपनीचे अधिकृत दुरुस्‍ती सेवा पुरविणारे प्रतिष्‍ठाण आहे. तक्रारदाराचा सदर मोबाईल हा अचानक बंद पडल्‍याने त्‍याने दिनांक ०३/१/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष यांचेकडे दुरुस्‍तीसाठी नेला असता त्‍याने त्‍यांच्‍या दुकानातील तंञज्ञ व्‍यक्‍तीकडून त्‍या मोबाईलची तपासणी केल्‍यानंतर सदर मोबाईलची बॅटरी खराब असल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारदाराकडून रुपये १,४३६/- घेवून नवीन बॅटरी सदर मोबाईल मध्‍ये लावून दिली. तसेच त्‍या मोबाईल च्‍या बॅटरीची तिन महिण्‍यापर्यंत गॅरंटी असून सदर बॅटरीत कोणतेही बिघाड झाल्‍यास त्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष यांची राहील असे सांगून बॅटरीच्‍या बिलावर तिन महिने वॉरंटी आहे असे नमूद करुन दिले. तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, मोबाईलच्‍या बॅटरीत बिघाड आल्‍यास सदर बॅटरी बदलवल्‍याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला दिलेल्‍या बॅटरीच्‍या बिलावर गॅरंटी ऐवजी वॉरंटी ची नोंद करुन दिली व सांगतांना तिन महिने गॅरंटी आहे असे सांगितले. यावरुन विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदाराची फसवणूक केल्‍याची दिसून येते. त्‍यानंतर अवघ्‍या ४५ दिवसाचे आत पुन्‍हा तक्रारदाराच्‍या मोबाईल मध्‍ये बिघाड होवून तो बंद पडला. त्‍यासाठी पुन्‍हा तक्रारदाराने विरुध्‍द पक्ष यांचेकडे मोबाईल दिला असता त्‍यांनी पुन्‍हा  बॅटरीमध्‍ये बिघाड असल्‍याचे सांगितले. त्‍यावर तक्रारदाराने बॅटरी बदलवून पुन्‍हा  मोबाईल पुर्ववत करुन द्यावा असे विरुध्‍द पक्षाला सांगितले. परंतु सेवा केंद्राचा मालक उपस्थित नसल्‍याने त्‍यांनी तक्रारदाराला दुस-या दिवशी येण्‍यास सांगितले. परंतु नंतर आजपर्यंत विरुध्‍द पक्ष तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्‍ती  करुन दिलेला नाही. विरुध्‍द पक्षाचे हे वर्तन तक्रारदाराप्रति सेवेतील न्‍युनता आहे. त्‍यासाठी तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठवून मोबाईल दुरुस्‍त  करुन द्यावा असे सांगितले. परंतु त्‍या नोटीसचे उत्‍तर विरुध्‍द पक्षाने दिले नाही. सबब नवीन बॅटरीची रक्‍कम भरुन सुध्‍दा तक्रारदाराला विरुध्‍दपक्षाकडून कोणतीही योग्‍य सेवा न मिळाल्‍यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार विरुध्‍द पक्षाविरुध्‍द दाखल केली आहे.
  3. तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्‍याच्‍या मोबाईल मध्‍ये नवीन बॅटरी टाकून त्‍याचा मोबाईल दुरुस्‍त करुन द्यावा. तसेच त्‍यांना झालेल्‍या शारीरिक, मा‍नसिक ञासापोटी रुपये ३०,०००/- मिळण्‍यात यावे.
  4. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षाविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले परंतु विरुध्‍द पक्षाला नोटीस प्राप्‍त होवून सुध्‍दा प्रकरणात उपस्थित न झाल्‍यामुळे दिनांक २७/१०/२०२१ रोजी विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञाबद्दल दाखल केलेली पुरसिस व तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्‍याकरिता खालील कारणमीमांसा व त्‍यावरील निष्‍कर्ष कायम करण्‍यात आले.

 

 

कारणमीमांसा

  1. तक्रारदाराने रिलायन्स रिटेल मधून दिनांक १५/११/२०१५ रोजी सॅमसंग कंपनीचा मोबाईल विकत घेतला त्याबद्दलचे देयक निशानी क्रमांक ५ वर दस्त ५ क्रमांक ३ वर दाखल आहे परंतु त्या नंतर सदर मोबाईल अचानक बंद झाल्यामुळे दिनांक ३/१/२०२० रोजी दुरुस्तीकरिता विरुध्द् पक्षाकडे दिला जे मोबाईल चे अधिकृत सेवा केंद्र आहे. त्यांनी तक्रारदाराकडून रुपये १,४३६/- रुपये घेवून मोबाईल मध्ये नवीन बॅटरी लावून दिली. नवीन बॅटरीची वॉरंटी ९० दिवस होती त्याबद्दलचे दस्तावेज निशानी क्रमांक ५ वर दस्त  क्रमांक १ वर दाखल आहे. विरुध्द पक्षाने तक्रारदारच्‍या मोबाईल मध्ये नवीन बॅटरी टाकल्यावरही अवघ्या ४५ दिवसाच्या आत पुन्हा मोबाईल बंद झाल्यावर पुन्हा दुरुस्ती करिता विरुध्द पक्षाकडे तक्रारदार गेला असता विरुध्द पक्ष यांनी मोबाईलची बॅटरी पुन्हा दोष आल्याचे सांगून सदर मोबाईल स्‍वतः जवळ ठेवून आज तीन महिने होवूनही तक्रारदाराच्या  मोबाईलची बॅटरी नवीन बदलवून दिली नाही. सदर मोबाईलची बॅटरी हमी कालावधीमध्ये असून सुध्दा विरुध्द पक्ष यांनी वेळेत तक्रारदाराचा मोबाईलची नवीन बॅटरी टाकून मोबाईल दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारदाराच्या कामात व्‍यत्‍यय आला व त्यांना मोबाईल व्‍दारा वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेता आला नाही, ही कृती तक्रारदाराप्रती विरुध्‍द पक्षाने केलेली सेवेतील न्‍युनता आहे.
  2. सदर तक्रारीत विरुध्द पक्ष यांना आयोगातर्फे नोटीस प्राप्त होऊन सुध्दा  प्रकरणात उपस्थित न राहिल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश करण्यात आले. आयोगाचे मते विरुध्द  पक्ष यांनी तक्रारदारप्रती सेवेत न्युनता दिली आहे हे सिध्द झालेले असल्यामुळे आयोग खालिल आदेश पारित करीत आहे.

 

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराच्या मोबाईल मध्ये नवीन बॅटरी टाकून सदर मोबाईल दुरुस्त करुन द्यावा.
  3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी एकञीत रुपये ५,०००/- रुपये द्यावे.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.

 

    

 

     (किर्ती वैद्य (गाडगीळ))     (कल्‍पना जांगडे (कुटे))       (अतुल डी. आळशी)

            सदस्‍या                सदस्‍या                  अध्‍यक्ष

                  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.