तक्रार क्र. - 659/2009 दाखल दिनांक - 05/10/2009 निकालपञ दिनांक - 14/07/2010 कालावधी - 00 वर्ष 09 महिने 09 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे 1. उदय कृष्णराव नेने 2. चारुता उदय नेने सी-1/303, गोल्डन पार्क को-ऑप हाऊसिंग सो. लि., बिल्डींग सि-1, गोकुळ नगर, नवनीत मोर्टस समोर लाल बहादूर शास्त्री मार्ग, ठाणे(प) 400 601. .. तक्रारकर्ता विरूध्द गोल्डन पार्क को-ऑप हाऊसिंग सो. लि., द्वारा चेअरमन, सि-1/403, गोल्डन पार्क को-ऑप हाऊसिंग सो. लि., बिल्डींग सि-1 , गोकुळ नगर,नवनीत मोर्टस समोर लाल बहादूर शास्त्री मार्ग, ठाणे(प) 400 601. .. गैरअर्जदार
समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्री.पी.एन.शिरसाट - मा. सदस्य उभय पक्षकार गैरहजर आदेश (दिः 14/07/2010 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर प्रकरण आज रोजी सुनावणीस आले असता उभय पक्षकारांचा तीन वेळा पुकारा करण्यात आला, ते अथवा त्यांचे वतिने कोणीही हजर झाले नाही. रोजनाम्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की तक्रारकर्ता हे दि.16/11/2010, दि.09/03/2010, दि.28/04/2010 व आज दि.14/07/2010 या सर्व तारखांना सातत्याने गैरहजर आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता सदर प्रकरण चालविण्यास इच्छुक नाहीत असे स्पष्ट होते. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- अंतीम आदेश 1.तक्रारकर्ता यांच्या सततच्या गैरहजेरीच्या कारणाखातर तक्रार क्र.659/2009 खारीज करण्यात येते. 2.न्यायीक खर्चाचे वहन उभयपक्षाने स्वतः करावे.
दिनांक – 14/07/2010 ठिकाण - ठाणे (श्री.पी.एन.शिरसाट) (श्री.एम.जी.रहाटगावकर) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|