अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
वसुली अर्ज क्रमांक : ई-31/2006
मुळ तक्रार अर्ज क्रमांक : एपीडीएफ/124/04
वसुली अर्ज दाखल दिनांक : 10/10/2006
वसुली निकाल दिनांक : 04/01/2012
डॉ. सौ. अनुपमा डब्यू. पानवलकर, ..)
राहणार – 59, पवनानगर, ..)
चिंचवडगाव,पुणे – 411 033. ..).. अर्जदार
विरुध्द
1. गोल्डन ग्लेडस् लिमीटेड, ..)
महर्षि वेदिक कन्सट्रक्शन कॉर्पोरेशन लिमीटेड, ..)
व्हिलेज गोवित्री, ..)
तालुका – मावळ, जिल्हा – पुणे. ..)
..)
2. मुख्य कार्यालय, ..)
ए-14, मोहन को.ऑप् इंडस्ट्रियल इस्टेट, ..)
मथुरा रोड,न्यू दिल्ली – 110 044. ..)... आरोपी
********************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूत प्रकरणातील अर्जदारांना आपण मंचाच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण रक्कम अदा केलेली असल्यामुळे प्रकरण निकाली करावे अशी विनंती आरोपीमार्फत प्रतिनिधींनी केली आहे. दाखल कागदपत्रांवरुन आरोपींनी अर्जदारांना रक्कम अदा केल्याचे सिध्द होते. अर्जदार ब-याच तारखांना गैरहजर असून त्यांनी रकमेबाबत काहीही विवेचन उत्पन्न केलेले नाही याचा विचार करता सदरहू अंमलबजावणी अर्ज आदेशाची पूर्तता झाली आहे असा निष्कर्ष काढून निकाली करण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –04/01/2012