ग्राहक तक्रार क्रमांकः-377/2009 तक्रार दाखल दिनांकः-29/05/2009 निकाल तारीखः-17/04/2010 कालावधीः-0वर्ष10महिने19दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे सौ.प्रतिभा प्रकाश अय्यर रा.ए-9,पौर्णिमी अपार्टमेंट, नामदेववाडी,पाचपाखाडी,ठाणे(प) ...तक्रारकर्ता विरुध्द 1)मॅनेजर,गोदरेज अँड बायस मॅन्युफॅक्चरींग कं.लि. अप्लायन्स डिव्हीजन,फिरोजशहा नगर, मुंबई.400 079 ...वि.प.1 2)मॅनेजर,कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स, पत्ताः-शॉप नं.1, होशबानु मेन्शन, आईस फॅक्टरी,गोखले रोड, नौपाडा,ठाणे(प) ... वि.प.2 3)मॅनेजर, मानसी एंटरप्राईझेस, 13/14,ओम शांती कमर्शिअल कॉम्प्लेक्स, सेक्टर1, ऐरोली,नवी मुंबई. ... वि.प.3 उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्रीमती एस.एस.पटारे विरुध्दपक्षातर्फे वकीलः-प्रिया बोरगांवकर गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.सौ.भावना पिसाळ, सदस्या 3.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-17/04/2010) सौ.भावना पिसाळ, सदस्या यांचेद्वारे आदेशः- 1)सदरहू तक्रार श्रीमती प्रतिभा अय्यर यांनी गोदरेज अँड वायस मॅन्युफॅक्चरींग कंपनी लि व इतर यांचेविरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी दोषयुक्त रेफ्रिजरेटरची किंमत रुपये12,500/- व्याजासकट परत 2/- मागितली आहे. तसेच विरुध्दपक्षकार नं.3 बरोबर 5वर्षाचा फ्रीज दुरुस्तीचा करार करुनही सेवा न दिल्याबद्दल रुपये 1,378/- व्याजासकटर परत मागितले आहेत. तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार नं.2 वितरक यांचेकडून दिनांक10/05/2005 रोजी रु.12,500/- किंमत भरुन 260 लि.चा मॉडेल नं.जीएफपी 280 हा रेफ्रिजरेटर विकत घेतला होता. त्याला 5 वर्षाची वॉरंटी होती. तदनंतर सहा महीन्यानी म्हणजे दि.06/12/2005 रोजी फ्रीजमध्ये कुलींग प्रॉब्लेम आढळला. म्हणून विरुध्दपक्षकार नं.3अधिकृत सर्व्हीस सेंटर बरोबर तत्सम फ्रीज दुरुस्तीबाबत दि.12/05/2005 पासून दिनांक11/05/2010 पर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्याबाबत करार केला. तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार 3 कडे दि.06/12/2005 पासून दि.13/05/2009 पर्यंत सोळावेळा तक्रारी नोंदवल्या आहेत. परंतु कुलींगचा दोष विरुध्दपक्षकार नं.2व3 निवारण करु शकले नाहीत. शेवटी जुलै2008 मध्ये विरुध्दपक्षकार नं.3 यांनी फ्रीजचा कॉम्प्रेसर खराब झाला, म्हणून बदलून दिला. परंतु अद्यापी फ्रिजमध्ये थंड होण्याबाबत दोष असून त्यामुळे आतील पदार्थ खराब होत आहेत. म्हणून तक्रारदार यांनी सदर फ्रीज परत करुन त्यांची भरलेली किंमत परत मागितलेली आहे. विरुध्दपक्षकार 1व3 यांनी त्यांची लेखी कैफीयत नि.5वर दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटंले आहे की, तक्रारदार यांना वेळोवेळी त्यांच्या तक्रारीनुसार सेवा उपलब्ध करुन देऊन सदर फ्रिजची योग्य ती दुरुस्ती करुन दिली आहे. तसेच दोन वेळा क्रॉम्प्रेसरही बदलून दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी सेवा देण्यात कोणतीही कमतरता दाखवलेली नाही. तसेच रेफ्रीजरेटरची वॉरंटी 1वर्षाचीच होती व फ्रीजच्या कॉम्प्रेसरची वॉरंटी 4 वर्षाची होती. अशी एकूण 5 वर्षाचा वॉरंटी होती. तक्रारदार यांनी फ्रिज दुरुस्तीचा करारनामा विरुध्दपक्षकार 3 बरोबर दि.26/03/2006 पासून दि.25/02/2010 पर्यंतचा केला होता. विरुध्दपक्षकार यांचे कर्मचारी टेक्नीशियन जेव्हा भेट द्यायला जायचे तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी तक्रारदार यांना फ्रिज हवेशीर ठेवा म्हटंले, कुलींगमध्ये बाधा येणार नाही यांची समज दिली होती व तक्रारदार यांनी फ्रिज कपॅसिटीच्या बाहेर नाशवंत खाद्यपदार्थ भरले होते. तक्रारदार यांच्या फ्रिज वापरण्यामध्ये चुका होत आहेत असे विरुध्दपक्षकार यांचे म्हणणे आहे. दि.10/07/2009 रोजी विरुध्दपक्षकार यांचा टेक्नीशियन त्यांच्या इंजिनियर श्री.अजीत भिलारे यांचे बरोबर तक्रारदार यांच्या घरी भेट देण्यास गेला होता. तेव्हा सदर फ्रिज अतिशय समाधानकारक कुलींग देत होता असे आढळले 3/- त्यांना फ्रिज बदलून देण्याची तयारी दाखवूनही तक्रारदार या गोष्टीस तयार झाले नाहीत. तरीही विरुध्दपक्षकार हे सदर फ्रिजबद्दलची कोणतीही तक्रार दुर करण्यास आजही तयार आहेत. अगोदर केलेल्या दुरुस्तीचे जॉब कार्डवर तक्रारदार यांनी सही केलेली आहे. अद्यापी सदर फ्रिज तक्रारदार यांच्या ताब्यात वापरत आहे. उभय पक्षकारांची शपथपत्रे, पुरावा कागदपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळून पाहीले व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होतो. विरुध्दपक्षकार यांनी विरुध्दपक्षकार यांनी दिलेल्या सेवेत त्रुटी आढळतात का.? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असून पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारदार यांनी घेतलेल्या गोदरेज रेफ्रिजरेटरमध्ये विकत घेतल्या नंतर अवघ्या 6 महिन्यात दोष निर्माण झाला होता. त्याच्या वॉरंटीच्या म्हणजे 1वर्षाच्या काळात त्यात 2/3 वेळेस दुरुस्ती करण्यात आली होती. कारण फ्रिज कुलींग नीट करत नव्हता. विरुध्दपक्षकार नं.3 बरोबर 5 वर्षाचा दुरुस्तीबाबत करारनामा झाला होता. त्यामुळे विरुध्दपक्षकार नं.3 यांनी वेळोवेळी येऊन फ्रिज दुरुस्ती करुन देऊन त्याच्या योग्य रितीने वापराबाबत निर्देशही दिले होते. त्यात फ्रिजला हवेशीर जागेत ठेवल्यास कुलींग बरोबर होऊ शकते अशी समज दिली होती. तसेच कॉम्प्रेसरही विरुध्दपक्षकार यांनी दोन वेळेस बदलून दिला होता. कारण त्याची वारंटी 4 वर्षाची होती. त्यांच्या इंजिनिअरने फ्रीज समाधानकारक काम करत असल्याचे म्हटंले आहे. त्यामुळे वेळोवेळी विरुध्दपक्षकार नं.2 व 3 यांनी सेवा उपलब्ध करुन दिलेल्या दिसतात. परंतु तक्रारदार यांनी सदर फ्रीज दोषयुक्त वाटत असल्यास तो अद्यापी बदलून का मागितला नाही यांचे मंचास अप्रुप वाटले. विरुध्दपक्षकार यांच्या म्हणण्याप्रमाणे सदर फ्रीजचे कोणतेही भाग बदलून देणेस ते तयार आहेत. म्हणजे अजूनही समाधानकारक दुरुस्ती व सेवा देण्यास विरुध्दपक्षकार नं.1व3 हे तयार आहेत. त्यामुळे तक्रारदार यांची पैसे मिळण्याची मागणी मान्य करता येत नाही. मंचाच्या मते विरुध्दपक्षकार 1 यांनी सदर फ्रीज परत घेऊन त्याचे पुर्णपणे योग्य दुरुस्ती करुन कुलींग मधील दोष निर्मुलन करुन तसा तज्ञ रिपोर्ट सोबत घेऊन सदर फ्रीज तक्रारदार यांच्या ताब्यात द्यावा असे या मंचाचे मत आहे. म्हणून हे मंच पुढील अंतीम आदेश देत आहे. 4/- -आदेश - 1)तक्रार क्रमांक 377/2009 ही अंशतः मंजूर करण्यात येत आहे. या तक्रारीचा खर्च रुपये 1,000/-(रु.एक हजार फक्त) विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2)विरुध्दपक्षकार नं.1 यांनी तक्रारदार यांचा सदर फ्रीज ताब्यात घेऊन त्यातील मॅन्युफॅक्चरींग दोष असल्यास निष्णात तत्रंज्ञान वापरुन दुर करुन द्यावा. तसा तज्ञ रिपोर्ट सोबत असावा. परंतु दोष निवारण करणे त्यांना शक्य झाले नाही तर सदर फ्रीजच्या बदल्यात नवीन तत्सम फ्रीज तक्रारदारास द्यावा. या आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2महिन्याच्या आत करावे.. 3)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रासाचे रुपये 1,500/-(रुपये एक हजार पांचशे फक्त) द्यावेत. 4 )सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-17/04/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|