Maharashtra

Nagpur

CC/535/2021

RAMAN ANILKUMAR NAIDU - Complainant(s)

Versus

GODRE ENTERPRISES THE ARVIND STORE - Opp.Party(s)

25 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/535/2021
( Date of Filing : 17 Sep 2021 )
 
1. RAMAN ANILKUMAR NAIDU
R/O. FLAT NO.401, ACHARAJ RIVIERA APARTMENTS, PURUSHOTTAM SUPER MARKET, MANKAPUR TO GOREWADA RING ROAD, ZINGABAI TAKLI, NAGPUR-440030
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. GODRE ENTERPRISES THE ARVIND STORE
GROUND FLOOR, PLOT NO.17, SHILPA SOCIETY, SOMALWADA BESA ROAD, MANISH NAGAR, NAGPUR-440033
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 25 Feb 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैसे यांच्‍या आदेशान्‍वे -

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 (1) नुसार प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त.क.ने दि. 12.02.2020 रोजी वि.प. च्‍या दुकानातून 2 कपडा  सुट विकत घेतले असून त्‍याची किंमत 2785/- इतकी होती व त्‍याचा बिल नं D94IN2000986 असा आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याच दुकानात सदरचे सुट शिवण्‍याकरिता वि.प.कडे दिनांक 12.02.2021 रोजी एकूण रक्‍कम रुपये 950/- अदा केली. त्‍यामध्‍ये शर्ट शिऊन देण्‍याकरिता रुपये 420/- आकारले व पॅन्‍टकरिता रुपये 530/- शुल्‍क आकारले होते व त्‍याकरिता पावती क्रं. 0015102 देण्‍यात आली होती, अशा प्रकारे सुटच्‍या कपडयासह शिलाई मिळून एकूण रक्‍कम रुपये 3,735/- चे बिल देण्‍यात आले  होते. त्‍यापैकी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रक्‍कम रुपये 2,500/- अग्रिम राशी म्‍हणून जमा केली होती व उर्वरित रक्‍कम रुपये 1235/- शिवलेले कपडे स्‍वीकारतांना द्यावयाचे होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या दुकानातील टेलर श्री.राव यांच्‍याकडे  सुटचा कापड मापाप्रमाणे शिवण्‍याकरिता दिला होता व त्‍यानंतर सदरच्‍या सुटची मापाप्रमाणे फिटींग व्‍यवस्थितीतरित्‍या झाली अथवा नाही हे पाहण्‍याकरिता दिले असता सदरचा सुट योग्‍यरित्‍या मापाप्रमाणे फिटींगप्रमाणे शिवण्‍यात आले नसल्‍याचे आढळून आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे सदरचा सुट हा दुरुस्‍तीकरिता 2-3 वेळा दिला. विरुध्‍द पक्षाच्‍या टेलरने तक्रारकर्त्‍याचा सुट व्‍यवस्थितीतरित्‍या शिऊन न दिल्‍यामुळे याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे ई-मेल द्वारे कळविले. त्‍यानंतर देखील विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही, अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, वि.प.ने नविन कपडयाचा सुट तक्रारकर्त्‍याच्‍या मापाचा शिऊन द्यावा. अथवा वि.प.ने त.क.कडून कपडयाच्‍या सुटसह शिलाई पोटी स्‍वीकारलेली अग्रिम राशी रुपये 2500/- दिनांक 12.02.2021 पासून व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा अशी विनंती केली.
  3.      विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्ष आयोगा समक्ष हजर झाले नाही. त्‍यामुळे वि.प. विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 25.02.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  4.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?              होय

2 विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय?      होय

3 काय आदेश ?                                अंतिम आदेशानुसार

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या दुकानातून दि. 10.02.2020 रोजी रुपये 2540/- चा कपडा सुट घेतला असून  त्‍याचा बिल नं D94IN2000986 असा आहे हे नि.क्रं. 2(1) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या दुकानात असलेल्‍या टेलरकडे मापाप्रमाणे  सुट शिवण्‍याकरिता दि. 12.02.2021 रोजी दिले असता विरुध्‍द पक्षाने शर्टकरिता रुपये 420/- व पॅन्‍टकरिता रुपये 530/- असे एकूण शुल्‍क रुपये 950/- आकारले होते हे नि.क्रं. 2(2) वर दाखल पावती क्रं. 0015102 वरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाच्‍या टेलरने तक्रारकर्त्‍याच्‍या मापाप्रमाणे सुट न शिवल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरचा सुट वारंवांर दुरुस्‍तीकरिता विरुध्‍द पक्षाकडे देऊन ही तो योग्‍यरित्‍या फिटींगप्रमाणे सुट शिऊन दिला नव्‍हता व याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे ई-मेल द्वारे तक्रार केली असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे तक्रार करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे दिसून येते. म्‍हणून तक्रारकर्ता सुटची रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सुटच्‍या कपडयाची रक्‍कम रुपये 2500/- परत करावी व सदर रकमेवर दिनांक 12.02.2021 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करावी.  
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 2,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 1,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.