Maharashtra

Nagpur

CC/230/2020

SHRI. ANILKUMAR THAKURDAS SAWAL - Complainant(s)

Versus

GO-AIRLINES INDIA LTD. THROUGH CHAIRMEN/ MANAGING DIRECTOR/ MARKETING MANAGER/ BUSINESS CUSTOMER OFF - Opp.Party(s)

ADV. SHRI. B.D. DAVE

09 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/230/2020
( Date of Filing : 14 Jul 2020 )
 
1. SHRI. ANILKUMAR THAKURDAS SAWAL
R/O. PLOT NO. 694, JAI BABERI, JALALPURA, CHITNIS PARK, MAHAL, NAGPUR-440032
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. GO-AIRLINES INDIA LTD. THROUGH CHAIRMEN/ MANAGING DIRECTOR/ MARKETING MANAGER/ BUSINESS CUSTOMER OFFICER
BRITANIA INDUSTRIES LTD., A-33, LORENCE ROAD, INDUSTRIAL ARIA, NEW DELHI-110035 COR. OFF. C.A WADIA INTERNATIONAL CENTER (WIC) PANDURANG BHUTKAR MARG, WARLI, MUMBAI-400025./ 6TH FLOOR, LILA BUSINESS PARK, ANDHERI KURLA ROAD, ANDHERI (EAST), MUMBAI-400059
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SHRI. B.D. DAVE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 09 Mar 2022
Final Order / Judgement

मा. सदस्‍यश्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारकर्त्‍याने त्‍याची पत्‍नी, आई व पुतनी यांच्‍या नांवे नागपूर ते अहमदाबाद दि. 12.11.2019 व दिनांक 16.11.2019 रोजी अहमदाबाद ते नागपूर या परतीच्‍या विमान प्रवासाची तिकीट श्री.सालसरा ट्रॅव्‍हल्‍स एजन्‍सी मार्फत एकूण रक्‍कम रुपये 18,872/- मध्‍ये बुक केली होती. परंतु दि. 09.11.2019 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या आईचे निधन झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या विमानाची तिकीट एजंट मार्फत दि. 10.11.2019 ला ई-मेल पाठवून रद्द केली. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष स्‍पाईट जेट यानी तक्रारकर्त्‍याला रद्द केलेल्‍या तिकिटाची रक्‍कम रुपये 18,871/- परत केली नाही.  याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या कंपनीशी ई-मेल द्वारे वारंवांर संपर्क करुन व सर्व दस्‍तावेज पाठवून ही रक्‍कम परत केली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 29.04.2020 ला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली, सदरची नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 18,871/- दि. 16.11.2019 पासून व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.  
  2. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, त्‍याने तिकीट रद्द करण्‍याच्‍या पॉलिसीनुसार तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने उर्वरित शिल्‍लक रक्‍कम रुपये 7072/- (PNR No. N99544) आणि रुपये 6093/- (PNR No. VYNB2Q) दि. 03.12.2020 ला ज्‍यांच्‍या मार्फत तक्रारकर्त्‍याने विमान प्रवासाची तिकीट बुक केली होती, त्‍या श्री. सालसर ट्रॅव्‍हल एजन्‍सीला परत केले आहे.
  3. विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने श्री.सालसर ट्रॅव्‍हल एजन्‍सी यांना सदर प्रकरणात पक्षकार केलेले नाही आणि संपूर्ण व्‍यवहार हा ट्रॅव्‍हल एजन्‍सी आणि विरुध्‍द पक्ष यांच्‍यात झालेला आहे. तक्रारकर्त्‍याने ट्रॅव्‍हल  एजन्‍सी मार्फत नागपूर ते अहमदाबाद दि. 12.11.2019 चे आणि दि. 16.11.2019 चे अहमदाबाद ते नागपूर या प्रवासाचे तिकीट आरक्षित केले होते.  विरुध्‍द पक्षाने प्रवासाची तिकीट रद्द करण्‍याच्‍या पॉलिसीसनुसार दि. 10.11.2019 ला PNR No. N99544 या नंबरच्‍या प्रवासाचे तिकिटाचे रुपये 3768/- आणि व PNR No. VYNB2Q या प्रवासाच्‍या तिकिटाचे रुपये 1938/- दि. 11.11.2019 ला श्री. सालसर ट्रॅव्‍हल यांच्‍या (त.क.ने तिकीट काढलेले एजंट)  खात्‍यात जमा केलेले आहे. तक्रारकर्त्‍याने ज्‍या एजन्‍सी मार्फत तिकीट काढलेले होते त्‍या एजन्‍सीला वरीलप्रमाणे रक्‍कम परत केल्‍यानंतर ही उर्वरित रक्‍कम मिळण्‍यास पात्र नसतांना ही विरुध्‍द पक्षाने माणुसकी या नात्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या ट्रॅव्‍हल एजंटच्‍या खात्‍यात  PNR No. N99544 चे रुपये 7072/- व PNR No. VYNB2Q चे रुपये 6,093/- दि. 03.12.2019 ला पॉलिसीनुसार  पार्शल रक्‍कम काही रक्‍कम सुरुवातीला अदा केली व उर्वरित रक्‍कम नंतर परत केलेली आहे,त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून कोणतीही रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही.  तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही, म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  4. उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता आणि त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविलेली आहेत.

मुद्दे                                                               उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?      होय
  3. काय आदेश ?                                                                    अंतिम आदेशानुसार 
  1. मुद्दा क्रमांक 1 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने श्री. सालसर ट्रॅव्‍हल एजन्‍सी मार्फत  विरुध्‍द पक्षाच्‍या गो-एअर लाईन्‍स इंडिया लि. यांच्‍याकडून 4 व्‍यक्‍तींकरिता  दि. 12.11.2019 रोजी PNR No. N995GG चे  नागपूर ते अहमदाबाद या प्रवासाची व दि. 16.11.2019 या तारखेचे PNR No. VYNB2Q प्रमाणे अहमदाबाद ते नागपूर या विमान प्रवासाचे एकूण रक्‍कम रुपये 18,872/- चे तिकीट काढले होते हे नि.क्रं. 2(1) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते व याबाबत उभय पक्षात वाद नाही.  यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याच्‍या आईचे दि.10.11.2019 रोजी निधन झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने एजन्‍सी मार्फत ई-मेल द्वारे प्रवासाची सर्व तिकीट ऑनलाईन रद्द केली हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याने रद्द केलेल्‍या तिकिटाची रक्‍कम मिळण्‍याकरिता अनेक वेळा विरुध्‍द पक्षाकडे ई-मेल ही पाठवून ही विरुध्‍द पक्षाने रक्‍कम परत केली नाही, परंतु विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात तक्रारकर्त्‍याने ज्‍या श्री.सालसरा ट्रॅव्‍हल्‍स एजन्‍सी मार्फत विमानाची तिकीट बुक केली होती त्‍या श्री.सालसरा ट्रॅव्‍हल एजन्‍सीच्‍या एंजटच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा केली असल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍याला धनादेश क्रं. 925857  दि. 01.01.2022 कॅनरा बॅंक अन्‍वये रुपये 13,165/- प्राप्‍त झाले आहे. विरुध्‍द पक्षाने सालसरा ट्रॅव्‍हल्‍स एजन्‍सीला रुपये 13,165/- दि. 03.12.2020 ला अदा केले आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने दि. 29.04.2020 ला वि.प. ला नोटीस पाठविल्‍यानंतर तसेच आयोगा समक्ष दि. 06.07.2020 ला प्रस्‍तुत तक्रार दाखल केल्‍यानंतर  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 03.12.2020 ला सालसरा ट्रॅव्‍हल्‍स एजन्‍सी यांच्‍याकडे रक्‍कम जमा करण्‍याची कार्यवाही केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व देय रक्‍कमेवर दि. 29.04.2020 ते दि. 03.12.2020 या कालावधीकरिता देय रक्‍कमेवर म्‍हणजे रुपये 13,165/- या रक्‍कमेवर 12 टक्‍के दराने व्‍याज म्‍हणजे रुपये 948/- मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम रुपये 948/- अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 3,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.