Maharashtra

Nanded

CC/08/335

Rameshwar Nivarti Thorat - Complainant(s)

Versus

Giriraj Motors - Opp.Party(s)

13 Feb 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/335
1. Rameshwar Nivarti Thorat Hadgaon Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Giriraj Motors Nanded Road Hadgaon Dist.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 13 Feb 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  335/2008.
                          प्रकरण दाखल तारीख - 15/10/2008
                          प्रकरण निकाल तारीख 13/02/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर          -  सदस्‍या
                 मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
थोरात रामेश्‍वर निवृत्‍ती
रा.मु.पो. हरडफ ता.हदगांव जि. नांदेड.                       अर्जदार
 
विरुध्‍द.
 
श्री. राजेंद्र गोपाळराव मनाठकर,
डिलर्स, गिरीराज मोटर्स प्रो. प्रा. हदगांव                    गैरअर्जदार जि. नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील             - स्‍वतः
गैरअर्जदारा तर्फे वकील            - अड.चंद्रशेखर देशमुख.
 
                               निकालपञ
                 (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
              गैरअर्जदार गिरीराज मोटार्स यांचे सेवेतील ञूटी बद्यल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              प्रकरणाची हकीकत खालील प्रमाणे, अर्जदार यांनी मोटार सायकल खरेदी करण्‍यासाठी गिरीराज मोटार्स याचेंशी संपर्क केला. तयांनी मोटार सायकलची किंमत रु.36,000/- सांगितली.  तेव्‍हा अर्जदार यांनी त्‍यांचेकडे रु.10,000/- असल्‍याचे सांगितले. गैरअर्जदाराने रु.12,000/- दयावे व बाकीचे अर्थसहाय फायनान्‍स कडून आवश्‍यक ती कागदपञ देऊन फायनान्‍स घ्‍या असे सांगितले. अर्जदार हे अशोक अन्‍ना ओम फायनान्‍स कडे गेले. त्‍यांना पण त्‍यांनी रु.10,000/- व उर्वरीत रक्‍कम कर्जाद्वारे दया असे सांगितले. अर्जदार यांनी नंतर सांगतो असे सांगितले. गैरअर्जदार यांनी रु.10,000/- मध्‍ये रु.878/- अर्जदाराकडून घेतले. त्‍या सोबत अर्जदाराने एस.बी. एच. बँकेचे 25 चेक, 7/12, बँक स्‍टेटमेंट इत्‍यादी कागदपञ दिले. गैरअर्जदार यांनी यानंतर बजाज फायनान्‍स नंबर बी-284507 या करारावर अर्जदार व गॅरंटरच्‍या सहया घेतल्‍या व लगेच गिरीराज मोटार्स शोरुममधून चेसीस नंबर एम.डी.-2-डीडीडी-222 पीडब्‍ल्‍यूजे-74855 इंजिन क्र. डियुएम.बीपीजे-58839 या क्रंमाकाची गाडी अर्जदाराला दिली. पासींग 7 ते 8 दिवसांत करुन देऊ असे सांगितले. काही दिवसांनी मागणीप्रमाणे अजून रु.2,000/- दिले परंतु आश्‍वासन देऊनही दि.15.12.2007 पासून दि.22.08.2008 पर्यत केवळ आश्‍वासन दिले व दि.22.8.2008 ला गाडी माझेकडून कब्‍जात घेतली व उर्वरित रक्‍कम आणून दे तरच तूला गाडी मिळेल असे सांगितले. उज्‍वल इंटरप्रायजेसशी संपर्क केला असता फायनान्‍स होत नसले तर दोन हप्‍ते पाडून बाकीची रक्‍कम दया व गाडी वापस घ्‍या असे सांगितले. चेक फक्‍त राहू देण्‍यास सांगितले. गाडीची पूर्ण रक्‍कम भरल्‍यावरच आर.सी. बूक तूमच्‍या स्‍वाधीन केल्‍या जातील असे सांगितल्‍यानंतर गैरअर्जदार यांचेकडून बाकी रक्‍कमेचा किस्‍ता पाडून घेतला. याप्रमाणे रु.21,133/- या पैकी दि.7.9.2008 रोजी पहिली किस्‍त रु.7050/- ची दिली. त्‍यावेळी गैरअर्जदाराने पावती दिली नाही. यानंतर पून्‍हा दि.11.9.2008 रोजीला दूसरी किस्‍त रु.7040/- व तिसरी किस्‍त दि.17.8.2008 रोजी ला गैरअर्जदारांना दिली. रक्‍कम घेतल्‍यानंतर गैरअर्जदाराने करार फाडून टाकला. व गाडी त्‍यांचे ताब्‍यात देतो असे सांगितले. मी आज पूर्ण रु.34011/- दिल्‍यानंतर गैरअर्जदार यांचेकडे भरलेल्‍या रक्‍कमेची मूळ पावती मला दिली नाही व रु.828/- डाऊन पेमेंट दिले ते त्‍यांनी त्‍यांचे लेटर पॅडवर लिहून दिले. अशा प्रकारे गैरअर्जदारयांनी माझी फसवणूक केली आहे व त्‍यामूळे मला योग्‍य न्‍याय दयावा अशी विनंती केली आहे.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले. अर्जदाराची तक्रार ही पूर्णतः खोटी व निराधार आहे. गैरअर्जदार हे बजाज कंपनीचे दूचाकी वाहन विकतात. बजाज कंपनीची प्‍लॅटींना मोटार सायकल खरेदीसाठी अर्जदार आल्‍यानंतर त्‍यांनी त्‍याचेतून किंमत रु.36,000/- सांगितले. अर्जदार हे एकदम रक्‍कम देऊ शकत नाही म्‍हटल्‍यावर गैरअर्जदारांनी त्‍यांना फायनान्‍स घेण्‍याचे सूचविले व कर्ज हवे असल्‍यास कमीत कमी रु.12,000/- व विम्‍याचे रु.878/-  दयावे लागतील असे सांगितले. अर्जदाराने सर्व कागदपञे बजाज फायनान्‍सकडून लोन मिळण्‍यासाठी त्‍यांचेकडे दिले. कर्ज मंजूर होण्‍यासाठी थोडा वेळ लागणार होता म्‍हणून अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे रु.10,000/- जमा करुन त्‍या रक्‍कमेची पावती त्‍यांचेकडून घेतली व त्‍या सोबत वाहनाचा चेसीस नंबर MD-2DDDZZZPWJ74855  व इंजिन नंबर DUMBPJ58839  ही मोटार सायकल दि.15.12.2007 रोजी गैरअर्जदाराकडून घेतली. यानंतर बजाज फायनान्‍स या संस्‍थेत तांञिक अडचण आल्‍यामूळे त्‍यांनी अर्जदाराच्‍या नोंदणीची संबंधीत कागदपञे मूळ धनादेश इत्‍यादी कागदपञ कर्ज देण्‍यास असमर्थता दर्शविली व कर्ज दिले नाही. आता फायनान्‍स न झाल्‍यामूळे वाहनाची बाकी राहीलेली रक्‍कम गैरअर्जदार यांचे दूकानात जमा करुन रितसर पावती घेऊन जावे असे सांगितले. यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारास रु.2,000/- दि.12.04.2008 रोजी जमा केला होता व त्‍यांची पावती ही अर्जदाराने घेतली. अशा रितीने अर्जदार यांचे रु.12,000/- देऊन वाहन घेऊन गेलेले आहेत व राहिलेली रक्‍कम दिल्‍यामूळे अर्जदारास वाहन खरेदीचे बिल व आर.टी.ओ. कडे नोंदणी करण्‍यात आलेले नाही. अर्जदार रक्‍कम न देताच वाहन वापरत होत. अर्जदाराकडे काम करणा-या कामगाराने अर्जदाराला दिलेल्‍या तक्रारीत पोलिस स्‍टेशन, हदगांव यांनी मोटार सायकल जप्‍त केली व चौकशी केल्‍यानंतर अर्जदाराच्‍या संमतीवरुन दि.22.8.2008 रोजी पोलिसांनी एक मोटार सायकल गैरअर्जदाराच्‍या ताब्‍यात दिली. उर्वरीत रक्‍कम रु.24,000/- मागणी करुनही अर्जदाराने दिले नाही. वाहन आजही गैरअर्जदाराने त्‍यांचे गोदामात ठेवलेले आहे. अर्जदाराने येथे असली रक्‍कम नगदी दिली तर वाहन अर्जदाराच्‍या ताब्‍यात देण्‍यास गैरअर्जदार तयार आहेत. अर्जदार हा सूशिक्षीत व मोठा व्‍यापारी आहे. त्‍यांचेकडे 20 ते 25 लोक कामास आहेत. तो हूशार प्रवृत्‍तीचा असून त्‍यांने गैरअर्जदारास फसवूण मोटार सायकल आठ महिने वापरली आहे. अर्जदाराचे म्‍हणणे पूर्णतः खोटे आहे त्‍यांने हप्‍ता हप्‍त्‍याने रु.21,133/- तिन हप्‍ते मिळून दिलेले आहेत. गैरअर्जदाराचा व्‍यवसाय हा कर्ज देण्‍याचा नसून फक्‍त वाहन विक्रीचा आहे. म्‍हणून गैरअर्जदाराची मागणी अर्जदार देणे असलेली रक्‍कम रु.24,000/- व त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज, तसेच दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार यांनी सूध्‍दा पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. तसेच दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                        उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांनी अनूचित व्‍यापार पध्‍दतीचा
     अवलंब केला आहे हे अर्जदार सिध्‍द करतात
     काय ?                                            नाही.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                         कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेशी व्‍यवहार केल्‍याबददल व त्‍यांना रु.12,000/- ची रक्‍कम दिल्‍याबददल कोणतीही पावती दाखल केलेली नाही. अर्जदार यांचा सूरुवातीपासून असा उजर राहीला आहे की, त्‍यांना गैरअर्जदारांनी कोणतीही पावती दिलेली नाही परंतु हे म्‍हणत असताना अर्जदार आपल्‍या तक्रार अर्जात सांगतात की, रु.12,878/- गैरअर्जदार यांनी मिळाल्‍याचे त्‍यांनी लेटर पॅडवर लिहून दिले असा उल्‍लेख केलेला आहे. परंतु असे कोणत्‍याही प्रकारचे लेटर पॅडवरील मजकूर असलेली पावती अर्जदार यांनी दाखल केलेली नाही. अर्जदाराची गाडी गैरअर्जदाराने जबरदस्‍तीने घेतली असे अर्जदार म्‍हणतात परंतु गैरअर्जदार यांचे मते पोलिसाकडून ती गाडी त्‍यांचे ताब्‍यात आली व यावीषयीचा उल्‍लेख अर्जदाराने आपल्‍या तक्रार अर्जात केलेला होता. दि.22.8.2008 रोजी गिरीराज मोटार्स अशा लेटर पँडवर बजाज प्‍लॅटीना मोटार सायकल दि.15.12.2007 रोजी ज्‍यांची किंमत रु.36,000/- होती. त्‍यातून फक्‍त रु.12,000/- गैरअर्जदारांना मिळालेले आहेत. अर्जदार यांने आठ महिने गाडी वापरली आहे. त्‍यामूळे गाडीचा मालक हे गैरअर्जदारच राहिले व पंचासमक्ष वाहन ताब्‍यात घेतलेले आहे व त्‍यावर अर्जदार व गैरअर्जदार या दोघाचेही सहया आहेत. किस्‍ता पाडून दिल्‍याबददल एक कागद समोर आलेला आहे व त्‍या रु.7045/- चे तिन हप्‍ते एकुन बॅलन्‍स रक्‍कम रु.21,133/- असे म्‍हटले आहे परंतु या कागदावर तो कागद अधिकृत असल्‍याबददल कोणाचीही सही किंवा शिक्‍का नाही. त्‍यामूळे हा कागद विचारात घेता येणार नाही. खरा वाद हा दि.22.08.2008 नंतरच होता. रु.12,000/- मिळाल्‍याबददल व वाहन गैरअर्जदाराच्‍या ताब्‍यात दिल्‍या बददल वाद नाही. वाद आहे तो यानंतरच्‍या रक्‍कमेचा. यानंतर अर्जदारांनी तिन किस्‍त्‍यामध्‍ये रक्‍कम दिली असे म्‍हणतात. पण त्‍या दिल्‍याच्‍या तारखा दि.7.9.2008, दि.11.09.2008 व 17.08.2008 म्‍हणजे 7 ते 8 दिवसांचे अंतराचे आहेत.अर्जदार खरे तर 5-5 दिवसांला रक्‍कम देणे ऐवजी एकदम रक्‍कम भरुन वाहन ताब्‍यात घेऊन शकला असता. 5-5 दिवसांचे अंतराने रक्‍कम दिली व त्‍या पावती ही घेतल्‍या नाहीत हे अर्जदाराचे म्‍हणणे खरे वाटत नाही. एकदा वाद उत्‍पन्‍न झाल्‍यावर पावती शिवाय कोणीही रक्‍कम देईल हे खरे वाटत नाही.गैरअर्जदारांनी त्‍यांचेकडे असलेले पावती पूस्‍तक दाखल केलेले आहे.  त्‍यात रु.10,000/- दिल्‍या बददलची डूप्‍लीकेट पावती आहे व ते पावतीबूक मध्‍ये अनेक ग्राहकाची नांवे आहेत. त्‍यामूळे ते पावती बूक खोटे आहे असे म्‍हणता येणार नाही. अर्जदार यांना देखील पावती दिलीच नाही असे म्‍हणायचे असेल तर गैरअर्जदार यांनी दाखल केलेली पावती खोटी आहे हे ही म्‍हणणे येणार नाही. अर्जदार हा मोठा व्‍यावसयीक आहे. त्‍यांची डांयमडंची फॅक्‍टरी आहे असे असताना त्‍यांचेकडे रक्‍कम नाही हे म्‍हणणे खोटे वाटते. गैरअर्जदार यांनी वाहन जप्‍ती बददलचे कागदपञ पोलिसाकडून घेण्‍यासाठी अर्ज दिलेला आहे. त्‍यांची आम्‍हाला गरज वाटत नाही. अर्जदाराने रक्‍कम जर पूर्ण दिली नसेल तर त्‍यांना बिल, आर.टी.ओ. मध्‍ये नोंदणी करुन देणे इत्‍यादी प्रकारची जबाबदारी गैरअर्जदार यांचेवर राहणार नाही. अर्जदार यांनी दिलेली तक्रार ही खोटी आहे असे निष्‍पन्‍न होते. त्‍यामूळे अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे ठरलेली किंमत रु.36,000/- व गैरअर्जदाराने मान्‍य केलेली रक्‍कम रु.12,000/- यातून वजा जाता उर्वरीत रक्‍कम रु.24,000/-  अर्जदाराने गैरअर्जदारास देऊन आपले वाहन ताब्‍यात घेतले पाहिजे. तसेच अर्जदार यांनी खोटी तक्रार दाखल केल्‍यामूळे प्रकरणाचा खर्च देखील मिळण्‍यास गैरअर्जदार पाञ आहेत. गैरअर्जदाराने अनूचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला हे अर्जदार सिध्‍द करु शकत नाहीत.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
              निकालापासुन 30 दिवसांचे आंत,
1.                 अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रु.24,000/- दयावेत व ही रक्‍कम मिळाल्‍या बरोबर गैरअर्जदारांनी बजाज प्‍लॅटीना मोटार सायकल चेसीस नंबर MD-2DDDZZZPWJ74855  व इंजिन नंबर DUMBPJ58839 अर्जदारास वापस दयावी तसेच कर्जासाठी घेतलेले जे काही कागदपञे असेल ते अर्जदारास वापस दयावेत.
2.                 अर्जदार यांनी तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रु.2000/- गैरअर्जदार यांना दयावेत.
 
3.                 पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे          श्रीमती सुजाता पाटणकर      श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                  सदस्‍या                             सदस्‍य
 
 
 
 
जे.यु.पारवेकर
लघूलेखक.