Maharashtra

Beed

CC/12/114

Nagnath Bhagwanrao Ghute - Complainant(s)

Versus

Ghodse Rajendra Gopinath,Ariyarup Tursim and Club Resorts,Pvt Ltd - Opp.Party(s)

R.D.Thorat

08 Jul 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/12/114
 
1. Nagnath Bhagwanrao Ghute
Ambasakar Waghala Ta Ambajogai
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Ghodse Rajendra Gopinath,Ariyarup Tursim and Club Resorts,Pvt Ltd
Back gurav Hospital Saigaon naka Ambajogai
Beed
Maharashtra
2. Chairman,Ariyarup Tursim and Club Resorts,Pvt Ltd
Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 08.07.2014

                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)

            तक्रारदार नागनाथ भगवानराव गुटटे  यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये  सामनेवाले  यांनी सेवा देण्‍यास कसूर केला म्‍हणून  नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात येणे प्रमाणे,. आर्यरुप टूरिझम अँन्‍ड क्‍लब रेसोर्टस प्रा.लि.ही कंपनी श्री.रविंद्र देशमूख, श्री.पालेवार, श्री. पांडे या तिघांनी स्‍थापन केली. श्री.रविंद्र देशमूख हे मॅनेजिंग डायरेक्‍टर म्‍हणून काम पाहत होते. कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीची नोंदणी सन 2009 मध्‍ये करण्‍यात आली. कंपनीच्‍या नांवाने आयकर विभागा मार्फत पॅनकार्डही काढण्‍यात आले.रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट घेऊन आर्यरुप टुरिझम अँन्‍ड क्‍लब रेसोर्टस प्रा.लि. या नांवाने कंपनी सूरु करण्‍यात आली. तसेच कंपनीची वेबसाईटही सूरु करण्‍यात आली. कंपनीने ग्राहकांनी गुंतवणूक करण्‍यासाठी प्‍लॅन तयार केले. ग्राहकांना प्रवेश करण्‍यासाठी रक्‍कम रु.1500/- चार्ज करण्‍यात आला. कंपनीच्‍या पॅकेजनुसार खालील बाबी ठरविण्‍यात आल्‍या आहेत.

1.अल्‍ट्रा

2.नोव्‍हा

3.अल्‍टो

4.जेट स्‍टॅर्डड

5.जेट डिलक्‍स

6.जेट सुपर

7.जेट सेक्‍यूअर

         वर नमूद केलेल्‍या पॅकेजच्‍या अनुषंगाने ग्राहकांनी गुंतवणूक करावी व ग्राहकाचा विश्‍वास संपादन व्‍हावा म्‍हणून आर्यरुप टुरिझम अँन्‍ड क्‍लेब रेसोर्टस प्रा.लि. व तिन डायरेक्‍टर यांनी मिळून स्‍टेट बँक ऑफ इंडिया शाखा पुणे या बँकेचे चेक वरील पॅकेजनुसार टी.डी.एस. ची कपात करुन स्‍पीड पोस्‍टाद्वारे ग्राहकाच्‍या पत्‍त्‍यावर पाठविण्‍यात आले.तसेच आय.डी.बी.आय.बँक लि. शाखा मुंबई या बँकेचे चेक सुध्‍दा गुंतवणूक केलेल्‍या ग्राहकांना वरील पॅकेजनुसार टी.डी.एस. कपात करुन स्‍पीड पोस्‍टा द्वारे ग्राहकांच्‍या पत्‍त्‍यावर पाठविण्‍यात आले.  ग्राहकांना कंपनीने दिलेल्‍या चेक बददल विश्‍वास येऊ लागला. कंपनीने तक्रारदार यांना आश्‍वासन दिले की, ते देशातील सर्वातज नंबर एकची कंपनी तयार करणार आहोत व आमची उदिष्‍टे फार मोठे आहे. कमीत कमी वेळामध्‍ये ग्राहकाचा फायदा होण्‍यासाठी कंपनीची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे. कंपनीचे खालील नमूद केलेले व्‍यवसाय आहेत.

1.    हॉटेल मध्‍ये गुंतवणूक

2.    टुर्स अँण्‍ड ट्रॅव्‍हल्‍स गुंतवणूक

3.    पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक

4.    परदेशी व्‍यापार गुंतवणूक

5.    प्‍लॉटींग व जमिन खरेदी व विक्रीचा व्‍यवसाय गुंतवणूक

6.    अनाथ आश्रमांना देणगी देतो.

            कंपनीने ग्राहकांना आश्‍वासन दिले की, ते जमिनीमध्‍ये गुंतवणूक करुन कंपनीचा पहिला प्रोजेक्‍ट लेकव्‍यू, बालेगांव  दुसरा प्रोजेक्‍ट जलसा,जयपूर, तिसरा प्रोजेक्‍ट आर्यवर्त पेशवाई पूणे या प्रोजेक्‍ट मध्‍ये फार मोठी गुंतवणूक केलेली आहे व त्‍या प्रोजेक्‍टरची किंमत करोडे रुपयाचे घरात आहे. ग्राहकांना आर्कषीत करण्‍यासाठी कंपनीने वेगवेगळया कृल्‍प्‍या केल्‍या आहेत. त्‍यामुळे ग्राहक कंपनीकडे जास्‍त प्रमाणात आर्कषीत झाला. तसेच कंपनीचा व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी कंपनीने एजट यांची नेमणूक केली. सर्व एजन्‍टंनी कंपनी विषयक अचूक व विश्‍वसनीय माहीती सांगून ग्राहकांला पैसे गुंतवणूकीस भाग पाडले. कंपनीने आर्यवर्त श्रूंखलेख पहिला प्रकल्‍पाच्‍या कंपनीचा प्रोजेक्‍ट लेकव्‍यू उदघाटन दि.23.11.2009 रोजी बालेगांव, मुरबाड जि.ठाणे येथे केला. श्री.रविंद्र देशमूख यांनी अगोदर स्‍थापन केलेल्‍या कंपनीच्‍या माध्‍यमातून करोडे रुपये उत्‍पन्‍न मिळवले होते. कंपनीचे जास्‍त काम केल्‍याबददल श्री.रविंद्र देशमूख यांना इंदिरा गांधी सदभावना परस्‍कार/कंपनीमध्‍ये बदल कसे होत गेले, कंपनीने गुंतवणूक कोठे कोठे केली आहे. ग्राहकांनी कंपनीमध्‍ये गुंतवणूक का करावी, कंपनीचा विकास कसा होणार आहे व कंपनीचे भविष्‍यातील कोंणते उदिष्‍टये असेल यांचा तपशील व्‍हीडीओ,सीडी  तयार करुन ग्राहकाला आर्कषित करण्‍यासाठी त्‍यांचे वाटप करण्‍यात आले व ग्राहकास पैसे गुंतवणूकीस भाग पाडले आहे.

            कंपनीने नमूद केलेल्‍या वेगवेगळया आर्कषणामुळे तक्रारदार यांनी पैसे भरण्‍यास भाग पाडले. सामनेवाले यांनी पैसे वेळेवर परत केले नाही व ग्राहकांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही. ग्राहकांना पैसे मिळण्‍यास उशिर होत असल्‍यामुळे नाराज होउ नये म्‍हणून ग्राहकांना दिलासा यावा म्‍हणून वैयक्‍तीक पत्र पाठविले तसेच पेपरमध्‍ये जाहीर प्रगटन केले की, कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्‍याने कंपनीचे आर्थिक व्‍यवहार पूर्ण होण्‍यास विलंब होत आहे व ग्राहकांची गुंतवणूक प्रॉप्रटीज मध्‍ये सुरक्षित आहे.ग्राहकांनी घाबरुन जाऊ नये.

            तक्रारदार व इतर ग्राहकांनी कंपनीने दिलेल्‍या वेगवेगळया आर्कषक योजनेमुळे तक्रारदार व इतर ग्राहकांनी आपल्‍या कूवती प्रमाणे व्‍यावसायीक कर्ज, शेती कर्ज, दागदागिने गहान ठेऊन, प्‍लॉट बँकेत गहान ठेऊन, खाजगी सावकाराकडून पैसे काढून गुंतवणूक केली. तक्रारदार यांनी भरलेले पैसे वेळेवर परत न आल्‍यामुळे त्‍यांची फसवणूक झाली. कंपनीने ग्राहकांची दिशाभूल करुन दिलेले आश्‍वासन पाळले नाही. कंपनी विरुध्‍द अदिलाबाग टाऊन सर्कल, पोलिस स्‍टेशन, आंध्रप्रदेश येथे फौजदारी स्‍वरुपाचा गुन्‍हा दाखल झाला आहे. कंपनीने ग्राहकाचा गैरसमज निर्माण होऊ नये म्‍हणून मेमोरडम ऑफ अंडरस्‍टॅंडींग व प्रिन्‍सीपल अमाऊंट परत देतो असे म्‍हणून प्रत्‍येक ग्राहकाला पत्र पाठविण्‍यात आले. तक्रारदार व ग्राहकाकडून फॉर्म  भरुन घेतला व काही ग्राहकांना चेक दिले. काही ग्राहकाना चेक देण्‍यास टाळाटाळ केली. कंपनीच्‍या बेकायदेशीर व्‍यवहारामुळे कंपनी विरुध्‍द राज्‍यात बरेच ठिकाणी गून्‍हे दाखल झाले व त्‍यांची चौकशी सीआयडी यांचेकडे सोपविण्‍यात आली.

            तक्रारदार यांनी कंपनीमध्‍ये गुंतवणक केलेल्‍या रकमेची इंटरनेट द्वारे मिळालेली पोहच पावती व काही ग्राहकांची गुंतवणूकी बददल आयडी नंबर दिलेला आहे. तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेल्‍या पॅकेजची रक्‍कम खालील प्रमाणे

Sr.no.

ID no.

Date of purchase

Package Name

Surrender value

Company performance bonus

Date of Redemption

Total amount

1

50310113251

6.3.2010

Jet Deluxe

1,00,000

2,60,000

6.12.2010

3,60,000

2

50110105364

6.1.2010

Alto

27,000

54,000

6.4.2010

81,000

3

50110105256

4.1.2010

Alto

27,000

54,000

4.4.2010

81,000

                                                                             Total amount of                   Rs.5,22,000/-

तक्रारदार यांचे कथन की, दि.1.1.2011  रोजी तक्रारदार यांनी कंपनीकडून रु.5,22,000/- येणे होते. कंपनीने आजतागायत ती रक्‍कम दिली नाही. कंपनीच्‍या नियमानुसार तक्रार दाखल दिनांकापर्यत ती रक्‍कम रु.8,22,000/- होईल असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. तक्रारदार यांना शारीरिक व मानसीक त्रास झाला त्‍याबददल तक्रारदार यांनी रु.1,00,000/- ची मागणी केली आहे असे तक्रारदार यांनी एकूण रककम रु.9,22,000/- ची मागणी केली आहे.

            सामनेवाले क्र.1 हे  या मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी त्‍यांचे नांव या तक्रारीतून कमी करावे म्‍हणून अर्ज दिला. तो अर्ज नाकारण्‍यात आला. तदनंतर सामनेवाले क्र.1 यांनी लेखी निवेदन दाखल केले. सामनेवाले यांचे कथन की,आर्यरुप कंपनी ही श्री. रविंद्र देशमूख डायरेक्‍टर पालेवार व श्री. पांडे यांनी तिघांनी मिळून स्‍थापन केली आहे. सदरील  तक्रारीमध्‍ये तिघेही आवश्‍यक पक्षकार आहेत. तक्रारदार यांनी त्‍यांना पार्टी केलेले नाही.  सामनेवाले क्र.1 चे कथन की, कंपनीला होणा-या नफयामध्‍ये गुंतवलेल्‍या रक्‍कमेवर गैरअर्जदार यांचे खात्‍यावर रक्‍कम जमा होईल असे सांगितले.

            सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, सामनेवाले यांने सदरील  कंपनीचे चेअरमन श्री. रविंद्र देशमुख यांचेकडे रु.10,00,000/- रककमेचा धनादेश बॉन्‍स झाला म्‍हणून कलम 138 निगोशिएबल इन्‍स्‍टुमेंट अँक्‍ट प्रमाणे प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी अंबाजोगाई यांचे न्‍यायालयात एस.सी.सी. नं.18/2011 दाखल केली आहे. ती केस आरोपीच्‍या हजेरीसाठी प्रलंबित आहे. आर्यरुप कंपनीने सामनेवाले यांना रु.10,00,000/- चेक देऊन फसवणूक केली आहे. सामनेवाले क्र.1 हा कंपनीचा चेअरमन अथवा डायरेक्‍टर नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतेही आश्‍वासन दिलेले नाही अगर फसवणूक केलेली नाही. सामनेवाले क्र.1 यांनी दयावयाच्‍या सेवेत त्रूटी ठेवली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार सामनेवाले क्र.1 विरुध्‍द रदद करण्‍यात यावी.

            सामनेवाले क्र.2 यांना रजिस्‍ट्रर पोस्‍टाने  नोटीस पाठविण्‍यात आली. लिफाफयावर  लेफट  असा शेरा आला. तदनंतर तक्रारदार यांनी दैनिक लोकमत दि.26.11.2013 रोजीचे दैनिकामध्‍ये जाहीर प्रगटन करुन नोटीस बजावण्‍या बाबत कार्यवाही केली. सदरील जाहीर प्रगटन करण्‍यात आले तदनंतर सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले नाही.  सबब, त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करयात आला.

            तक्रारदार यांनी तक्रारीसोबत तक्रारदार यांचे नांवे कंपनीचा एक चेकची झेरॉक्‍स प्रत व तसेच पॅकेज डिटेल बाबत इंटरनेट वरुन काढलेली प्रत हजर केली आहे. तक्रारदार  यांनी स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री. थोरात यांना युक्‍तीवादासाठी ब-याच तारखा देण्‍यात आल्‍या. त्‍यांनी हजर राहून यूक्‍तीवाद केला नाही. सदरील केसमध्‍ये पुरावा आल्‍यामुळे या मंचाने तक्रार गुणदोषावर निकाली काढण्‍याचा निर्णय घेतला. न्‍यायनिर्यासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

            मुददे                                            उत्‍तर

1.    सामनेवाले यांनी तक्रारदार यांना  दयावयाचे सेवेत

      त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार  शाबीत करतात काय ?      नाही.

2.    तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रककम मिळण्‍यास पात्र

      आहेत काय ?                                           नाही.

3.    काय आदेश ?                                   अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                        कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2 ः-

            प्रथम तक्रारदार यांनी त्‍यांचे तक्रारीमध्‍ये सामनेवाले यांनी कोणती सेवा दयावयास पाहिजे होती या बाबत विचार करणे आवश्‍यक आहे. आम्‍ही तक्रारीचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार यांनी दि.6.3.2010 रोजी मेंबरशिप नंबर 50310113251 अन्‍वये जेट डिलक्‍स पॅकेज पॉलिसी जिचा सरेंडर व्‍हल्‍यू रु.1,00,000/- आहे ही घेतली होती. तसेच दि.6.1.2010 रोजी मेंबरशिप नंबर 50110105364 अन्‍वये अल्‍टो पॅकेज ज्‍यांचा सरेंडर व्‍हॅल्‍यू रु.27,000/- ही घेतली होती.तसेच दि.4.1.2010 रोजी मेंबरशिप नंबर 50110105256 अन्‍वये अल्‍टो पॅकेज ज्‍यांचा सरेंडर व्‍हॅल्‍यू रु.27,000/- ही घेतली होती त्‍या पॉलिसीच्‍या अनुंषगाने सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रु.5,22,000/- देणे होते ते सामनेवाले यांनी दिले नाही. ते देण्‍यात कसूर केला आहे.

            तक्रारदार यांनी त्‍यांचे मागणी प्रित्‍यर्थ कोणकोणते दस्‍त हजर केले आहे हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी कॉम्‍प्‍यूटर जनरेटर पावत्‍या हजर केल्‍या आहेत.  त्‍या पावत्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे मेंबरशिप नंबर, पॅकेज खरेदी केल्‍याचा दिनांक, कोणत्‍या पॅकेज खरेदी केले आहे त्‍याबददल माहीती व पॅकेजची सरेंडर व्‍हॅल्‍यू या बाबी नमूद केल्‍या आहेत. सदरील पावत्‍यामध्‍ये  कंपनी परफॉरमन्‍स बोनस नुसार सदरील पॅकेजवर फायदा देण्‍याचे निर्देश दिलेले आहेत.  तसेच मोड ऑफ रिडम्‍शन नेट प्रोजेक्ट आरटीजीएस व्‍हाया ई-व्‍हलेट ठरवलेला आहे. तक्रारदार यांनी म्‍हटले आहे की,त्‍यांनी जेट डिलक्‍स व अल्‍टो पॅकेज पॉलिसी घेतल्‍या आहेत. तक्रारदार यांनी सदरील पॅकेज पॉलिसीचे संदर्भात किती रककम भरली आहे व तक्रारदार व सामनेवाले याचेमध्‍ये जेट डिलक्‍स व अल्‍टो पॅकेज पॉलिसी घेण्‍याचा करार झाला आहे या बाबत दस्‍ताऐवज हजर केलेले नाहीत. तक्रारदार यांनी इंटरनेट वरुन आर्यरुप टुरिझम अँन्‍ड क्‍लेब रेसोर्टस प्रा.लि. यांचे संबंधीत एक कागद हजर केला आहे. त्‍यांचे अवलोकन केले असता, जेट डिलक्‍स पॅकेज पॉलिसी आयएनआर रु.3,00,000/- मिनिमम असे लिहीलेले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेंल्‍या दस्‍तावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे किती रक्‍कम गुंतवली आहे व सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोंणते फायदे अगर सेवा देण्‍याचे निश्चित केलेले आहे हे ठरवता येत नाही. तक्रारदार यांनी त्‍यांचे तक्रारीमध्‍ये ब-याचशा बाबी नमूद केलेल्‍या आहेत.  त्‍या तक्रारदाराच्‍या पॉलिसीशी  संबंधीत नाहीत. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेल्‍या बाबीवरुन असे स्‍पष्‍ट निदर्शनास येते की, तक्रारदार व तर व्‍यक्‍तीनी गुंतवलेले पैसे सामनेवाले यांनी वेगवेगळया क्षेत्रामध्‍ये गुंतवण्‍याचे ठरवलेले होते व त्‍यामधून जो फायदा येईल तो ग्राहकामध्‍ये वितरीत करण्‍याचे ठरले होते. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे बाबत काही बाबी कथन केल्‍या आहेत. सामनेवाले क्र.1 हे या मंचा समोर हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे सादर केले. तसेच सोबत दस्‍त हजर केले आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी पॉलिसीमध्‍ये दिलेल्‍या तक्रारीमध्‍ये असे नमूद केले आहे की, सामनेवाले क्र.2 यांनी होणा-या नफयामध्‍ये सामनेवाले क्र.1 यांनी नफा देण्‍याचे कबूल केले होते. त्‍यांनी रु.10,00,000/- सामनेवाले यांचेकडे  पाठविले. सामनेवाले क्र.2 यांनी चेक दिले परंतु सामनेवाले क्र.2 हया कंपनीचे खाते व्‍यवहार करण्‍यास पात्र नसल्‍यामुळे  दिलेले चेक वटले नाही म्‍हणून त्‍यांनी सामनेवाले क्र.2 विरुध्‍द अंबाजोगाई पोलिस स्‍टेशन मध्‍ये तक्रार दिली व तसेच सामनेवाले क्र.2 विरुध्‍द 138 निगोशिएबल इन्‍स्‍टुमेंट अँक्‍ट प्रमाणे प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी अंबाजोगाई येथे फिर्याद दिली.सदरील दोन्‍ही केसेस प्रलंबित आहेत.

               तक्रारदार यांनी तक्रारी सोबत चेकच्‍या एक झेरॉक्‍स प्रत हजर केली आहे. सदरील चेक हे सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना दिल्‍याचे दिसते. चेक नंबर 294012 हा चेक डिसीबी बँक एस.बी. रोड अंधेरी या शाखेचा तक्रारदार यांना रक्‍कम रु.94,017/- अदा करावा यासाठी दिला आहे.. सदरील चेक बाबत तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत उल्‍लेख केलेला नाही अगर सदरील रककमेचा चेक तक्रारदार यांचे खात्‍यात जमा झाले किंवा काय या बाबतही तक्रारदार यांनी स्‍पष्‍ट उल्‍लेख केलेला नाही.           

            तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्‍द दाद मागण्‍यासाठी तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात कसूर केला आहे हया बाबी शाबीत होणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी पैसे गुंतवलेले आहे असे जरी गृहीत धरले तरी त्‍या गुंतवलेल्‍या रककमेचा सामनेवाले क्र.2 यांनी वेगवेगळया कारणासाठी गुंतवणूक करुन त्‍यातून येणा-या फायदयातून तक्रारदार यांना रक्‍कम देण्‍याचे कबूल केल्‍याचे दिसते. तक्रारदार यांना निश्चित किती फायदा देण्‍यात येईल या बाबत तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये करार अथवा दस्‍त झाल्‍याचे दिसून येत नाही.. तक्रारदार यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे गुंतवणूक केलेल्‍या पॅकेजची रक्‍कम यांचा विचार केला असता त्‍यामध्‍ये कंपनी परफॉरमन्‍स बोनस या बाबीचा उल्‍लेख येतो, सदरील बाब ही कंपनीला किती नफा मिळाला आहे या बाबीवर अवलंबून असते. तक्रारदार यांनी कंपनीला नफा मिळाला आहे किंवा काय  या बाबत कोणताही दस्‍त हजर केलेला नाही. तक्रारदार यांना सामनेवाले यांनी एका चेक द्वारे पैसे अदा केलेले आहेत ते कशा संदर्भात अदा केलेले आहेत या बाबतही तक्रारीमध्‍ये स्‍पष्‍ट उल्‍लेख आढळून येत नाही.  तसेच अल्‍टो व जेट डिलक्‍स पॉलिसीच्‍या कोणत्‍या शर्ती व अटी आहेत हे ही शाबीत केलेले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे गुंतवलेल्‍या रक्‍कमे बाबत पावत्‍या हजर केलेल्‍या नाहीत.

            वर नमूद केलेल्‍या कारणावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणती सेवा दयावयास पाहिजे होती व त्‍यात सामनेवाले यांनी कसूर केला ही बाब सिध्‍द होत नाही. तक्रारदार यांचे वकील यूक्‍तीवादाचे वेळेस गैरहजर राहिले. तक्रारदार यांनी त्‍यांचे मागणी‍ प्रित्‍यर्थ आवश्‍यक ते दस्‍त हजर केलेले नाहीत. केवळ तक्रारीमध्‍ये ढोबळमानाने काही बाबी मांडल्‍या त्‍यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात कसूर केला असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. सबब, या मंचाचे मत की, तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.

 

            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

 

                         आदेश

 

            1)  तक्रारदाराची  तक्रार  नामंजूर  करण्‍यात  येत  आहे.          

2)

            3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

               20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

               करावेत.     

 

 

    श्री.रविंद्र राठोडकर        श्रीमती मंजूषा चितलांगे       श्री.विनायक लोंढे,

          सदस्‍य                 सदस्‍या                  अध्‍यक्ष

                    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 

 

 

 

जयंत पारवेकर

लघुलेखक

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.