जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 396/2008. प्रकरण दाखल तारीख - 20/12/2008 प्रकरण निकाल तारीख –10/02/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य जसमितकौर भ्र. सरताजसिंघ वय, 30 वर्षे, धंदा घरकाम रा.नांदेड, ता.जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. जनरल मॅनेजर/ मॅनेजिंग डायरेक्टर जय शिवराय नागरी सहकारी बँक लि. नांदेड. 2. प्रशासक/संचालक, जय शिवराय नागरी सहकारी बँक लि. गैरअर्जदार नांदेड. 3. व्यवस्थापक/मुख्य व्यवस्थापक, जय शिवराय नागरी सहकारी बँक लि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.अ.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र. 1 2 व 3 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार जय शिवराय नागरी सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बद्यल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेत मंगल ठेव योजनें द्वारे रु.17,000/-दि.13.05.2003 रोजी गुंतविले होते. त्यांचा पावती क्र.6330 असा आहे. गूंतवणूकीचा कालावधी हा पाच वर्षाचा होता म्हणजे दि.13.05.2003 ते 13.05.2008 असा होता. मूदतीनंतर बँक अर्जदारास रु.34,000/- देणार होती. मूदत संपल्यानंतर अर्जदार हिने रक्कमेची मागणी केली परंतु बँकेने रक्कम देण्यास नकार दिला, अशा प्रकारे गैरअर्जदार बँकेने ञूटीची सेवा दिली. अर्जदार यांना मूलांच्या शिक्षणासाठी रक्कमेची आवश्यकता आहे. गैरअर्जदार अर्जदारास रक्कम देण्यास तयार नाहीत म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, रक्कम रु.34,000/- या रक्कमेवर दि.13.05.2008 पासून 24 टक्के व्याज मिळावे व मानसिक व शारीरिक ञासापोटी व दावा खर्च म्हणून रु.15,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1, 2 व 3 यांना मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर राहीले. म्हणून प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराने गैरअर्जदार बँकेत मंगल ठेव योजनें द्वारे रु.17,000/-दि.13.05.2003 रोजी गुंतविले होते. त्यांचा पावती क्र.6332 असा होता. गूंतवणूकीचा कालावधी हा पाच वर्षाचा होता म्हणजे दि.13.05.2003 ते 13.05.2008 असा होता. मूदतीनंतर बँक अर्जदारास रु.34,000/- देणार होते हे अर्जदाराने दाखल केलेल्या पावतीवरुन स्पष्ट होते. मूदत संपल्यानंतर अर्जदार यांनी रक्कमेची मागणी केली परंतु बँकेने रक्कम देण्यास नकार दिला. पण अर्जदार यांच्या मूलांच्या शिक्षणासाठी रक्कमेची आवश्यकता असल्याचे हे त्यांनी शपथपञाद्वारे म्हटलेले आहे. अर्जदाराचे म्हणणे गैरअर्जदार बँकेने हजर होऊन खोडलेले नाही म्हणजे त्यांना अर्जदाराची मागणी मान्य आहे असे दिसून येते. अर्जदाराची रक्कम न देऊन गैरअर्जदार बँकेने सेवेत ञूटी केलेली आहे. तसेच रक्कम न मिळाल्यामूळे अर्जदारास निश्चितच मानसिक व शारीरिक ञास झाला आहे. त्याबददल नूकसान भरपाई मिळण्यास देखील अर्जदार पाञ आहेत. या प्रकरणात गैरअर्जदार बँक ही हजर न झाल्यामूळे मूळ ठेव पावती समोर आलेली नाही, जर अर्जदाराना काही रक्कम जर गैरअर्जदाराने दिलेली असेल तर उर्वरीत रक्कमेचा व व्याजाचा हिशोब करुन उर्वरीत रक्कम अर्जदार मिळण्यास पाञ आहेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांना गैरअर्जदार बँकेने हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत रक्कम रु.34,000/- व त्यावर दि.13.05.2008 पासून ते पूर्ण रक्कम मिळेपर्यत 14 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यु.पारवेकर लघूलेखक. |