निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 20/03/2013 तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2013 तक्रार निकाल दिनांकः- 04/03/2014 कालावधी 11 महिने 14 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, परभणी अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B. सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. विष्णु सखारामपंत जोशी अर्जदार वय 61 वर्षे, धंदा निवृत्त कर्मचारी, अWड.एस.एन.वेलणकर रा.तुळजाई आनंदनगर, कारेगाव नाका, परभणी, ता.जि.परभणी. विरुध्द महाप्रबंधक, गैरअर्जदार दूरसंचार, परभणी महाप्रबंधक यांचे कार्यालय, अWड.जी.एम.अनेराव टेलीफोन भवन, स्टेशन रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष. 2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या) गैरअर्जदाराने सेवाञुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार मंचात दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, गैरअर्जदाराने वर्ष 2012 मध्ये BSNL डबल धमाका या नावाने एक योजना ग्राहकासाठी खुली केली होती. या योजनेप्रमाणे गैरअर्जदाराचा GSM FWP हा रुपये 1500/- चा भ्रमणध्वनी व रुपये 1500/- चा टॉकटाईम असे एकुण रुपये 3000/- लागणारी सुविधा फक्त रुपये 1041/- मध्ये उपलब्ध करुन दिली होती ज्याची वैधता 1 वर्ष होती. प्रति सेकंद 1 पैसा प्रमाणे बिलींग महिना 12,500 सेकंद टॉकटाईम फ्री व इतरही अनेक सुविधांची वचन गैरअर्जदाराने त्यांच्या प्रसिध्दी प्रञकात दिली होती. अर्जदाराने या योजनेअंतर्गत भ्रमणध्वनी क्रमांक 9405471584 घेतला जो फेब्रुवारी 2012 मध्ये कार्यान्वीत झाला. उपरोक्त योजनेप्रमाणे रुपये 1500/- चा टॉकटाईम वर्षाला म्हणजे रुपये 125/- चा टॉकटाईम दरमहा भरणे आवश्यक होते परंतु फेब्रुवारी 2012 मध्ये गैरअर्जदारानी रुपये 125/- चा टॉकटाईम दिला नाही. त्यानंतरही अनेक पाठपुरावा करुन देखील त्यांनी मार्च 2012 ते जानेवारी 2013 या काळातही दरमहा रुपये 125/- प्रमाणे टॉकटाईम दिला नाही व तो वेगवेगळया तारखांना शंकास्पद पध्दतीने जमा करण्यात आला. म्हणजे फेब्रुवारी 2012 ते जानेवारी 2013 या 1 वर्षाच्या कालावधीत अर्जदारास फक्त रुपये 500/- चा टॉकटाईम दिला. पुढे अर्जदाराने दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक 9423931168 हा घेतला जो 1 जानेवारी 2013 मध्ये कार्यान्वीत झाला. त्याचा टॉकटाईम रुपये 125/- जानेवारी 2013 मध्ये मिळायला हवा होता परंतु टॉकटाईम फेब्रुवारी 2013 मध्ये मिळाला व मार्च 2013 चा टॉकटाईम अद्यापही जमा केला नाही. म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने भ्रमणध्वनी क्रमांक 9405471584 च्या न दिलेल्या टॉकटाईमची रक्कम रुपये 1000/- अर्जदारास तक्रारीच्या तारखेपासुन 9 टक्के व्याजासह द्यावी व भ्रमणध्वनी क्रमांक 9423931168 च्या जानेवारी 2013 ते डिसेंबर 2013 या कालावधीचा दरमहा रुपये 125/- चा टॉकटाईम दरमहा 10 तारखेपर्यन्त जमा करावा. तसेच मानसीक ञासापोटी रक्कम रुपये 500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- अर्जदारास मिळावेत अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि.2 वर व पुराव्यातील कागदपञ नि.4वर मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.13 वर मंचासमोर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदारास उपरोक्त योजनेनुसार टॉकटाईम देण्यात आलेला आहे. निव्वळ गैरअर्जदारास ञास देण्याच्या हेतुने अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार रक्कम रुपये 5000/- कॉम्पेनसेटरी कॉस्टसह खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत पुराव्यातील कागदपञ नि.13/2 व नि.16 वर मंचासमोर दाखल केली. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदाराने उपरोक्त योजनेअंतर्गत अर्जदारास टॉकटाईम न देवुन अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पाञ आहे ? अंतीम आदेशाप्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन वर्ष 2012 व वर्ष 2013 मध्ये BSNL डबल धमाका या योजनेअंतर्गत क्र.9405471584 व क्रमांक 9423931168 चे भ्रमणध्वनी घेतले होते. या योजनेप्रमाणे गैरअर्जदाराचा GSM FWP हा रुपये 1500/- चा भ्रमणध्वनी व रुपये 1500/- चा टॉकटाईम असे एकुण रुपये 3000/- ची लागणारी सुविधा फक्त रुपये 1041/- मध्ये उपलब्ध करुन दिली होती. परंतु गैरअर्जदाराने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अर्जदारास टॉकटाईम मिळाला नाही अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, उपरोक्त योजनेप्रमाणे अर्जदारास टॉकटाईम मिळालेला आहे. गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या पुराव्यातील कागदपञाची पडताळणी केली असता अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते. अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405471584 दिनांक 08.03.2012 मध्ये प्रत्यक्ष सुरु झाल्याचे स्पष्ट होते व टॉकटाईम रुपये 125/- चा दिनांक 09.03.2012 रोजी अर्जदारास मिळाला. त्यामुळे अर्जदारास फेब्रुवारी 2013 पर्यन्त टॉकटाईम मिळणे अपेक्षीत होते परंतु टॉकटाईमची Validity जानेवारी 2013 संपुष्टात आल्याचे निदर्शनास येते. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9423931168 संदर्भात फक्त मे 2013 पर्यन्तचे रेकॉर्ड दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदाराने लेखी निवेदनाच्या पृष्टयर्थ शपथपञ देखील मंचासमोर दाखल केलेले नाही. सबब गैरअर्जदाराने घेतलेला बचाव ग्राहय धरण्याजोगा नसल्याचे मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आ दे श 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येतो. 2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासुन 30 दिवसाच्या आत अर्जदारास सेवाञुटीपोटी व मानसीक ञासापोटी एकुण रक्कम रुपये 500/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रुपये 500/- अर्जदारास द्यावे. 3 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर सदस्या अध्यक्ष |