Maharashtra

Nagpur

CC/171/2017

Shri Jaidev Laxman Borkar - Complainant(s)

Versus

General Manager/Regional Manager/General Executive Officer, Axis Bank - Opp.Party(s)

Adv. Prabhakar Doble

25 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/171/2017
( Date of Filing : 27 Mar 2017 )
 
1. Shri Jaidev Laxman Borkar
R/o. Govt.Medical College, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. General Manager/Regional Manager/General Executive Officer, Axis Bank
Credit Card Department, 4th floor, Building No. 1, MIDC, Aroli Knowledge Park, New Mumbai 400708
New Mumbai
Maharashtra
2. Branch Manager, Axis Bank
Civil Lines, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. General Manager/Regional Manager/General Executive Officer/Director, Axis Bank
Office- Trishul, 3rd floor, Opp. Samrtheshwar Temple, New Lal Garden, Elies Bridge, Ahmadabad 380006
Ahmedabad
GUJRAT
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Adv. Prabhakar Doble, Advocate
For the Opp. Party:
Dated : 25 Jun 2020
Final Order / Judgement

आदेश

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून त्‍यांचे एक्झिक्‍युटिव आशिष यांच्‍या मार्फत क्रेडिट कार्ड घेतले होते व ते तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडून दि. 21.09.2016 रोजी प्राप्‍त झाले. तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे बचत खाते असून त्‍याचा बचत खाते क्रं. 909010039467770 हा आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 हे नोंदणीकृत कार्यालय असून त्‍याची विरुध्‍द पक्ष 1 व 2 वर देखरेख आहे.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की,  त्‍याला प्राप्‍त झालेल्‍या कार्डवर स्‍पष्‍टपणे लिहिलेले आहे की, कार्ड धारकाला रुपये 4,00,000/-पर्यंत वापर करता येईल. सदर कार्डचा नंबर 5305620204560375 हा असून त्‍याद्वारे फक्‍त खरेदी, तिकिट बुकिंग करता येईल, परंतु त्‍याद्वारे कोणत्‍याही प्रकारे रक्‍कम वटविता येणार नाही. तक्रारकर्ता हा माहे सप्‍टेंबर ते नोव्‍हेबंर पर्यंत कुठेही बाहेरगावी गेला नाही अथवा त्‍याने सदर कार्डचा कधीही खरेदीकरिता उपयोग केला नाही. तक्रारकर्त्‍याला दि. 25.10.2016 रोजी त्‍याचा मोबाईल क्रमांक 8975613236 या क्रमांकावर 5:42:30 वा. रुपये 40,653/- थकित आहे, त्‍यापैकी रुपये 2,033/- चा भरणा दि. 01.11.2016 पर्यंत करायचा आहे असा संदेश आला. तसेच पुन्‍हा दि. 13.10.2016 ला 12.59 वा. परत रुपये 40,635/- चे बिल जनरेट झाले असून कमीत कमी 2,033/- चा भरणा दि. 01.11.2016 पर्यंत करा . त्‍यानंतर दि. 12.11.2016 ला रुपये 44,133/- चे स्‍टेटमेंट जनरेट केल्‍याचा संदेश पाठविण्‍यात आला. त्‍याचा भरणा कमीत कमी 4,137/- इतका दि. 02.12.2016 पर्यंत करावा. परत पुन्‍हा दि. 18-19.11.2016 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईल क्रं. 8975613236 वर बिलाचे रुपये बाकी असल्‍याचे स्‍टेटमेंट जनरेट करण्‍यात आलेले आहे, त्‍यापैकी रुपये 4,137/- चा भरणा करावा असा संदेश पाठविण्‍यात आला.
  3.      तक्रारकर्ता दिनांक 18.11.2016 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍याकडे क्रेडिट कार्डच्‍या स्‍टेटमेंटची मागणी व त्‍यास प्राप्‍त झालेल्‍या संदेशाबाबत विचारणा करण्‍याकरिता गेला असता, तेथील कर्मचा-यांनी  www
  4.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने सदर कार्डचा वापर कुठे, कोणत्‍या ठिकाणी करण्‍यात आला याबाबतचे स्‍टेटमेंट पाठविण्‍याबाबत विरुध्‍द पक्षाला कळविले, परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍याबाबत कुठलीही दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि. 23.01.2017 रोजी विरुध्‍द पक्षाला क्रेडिट कार्ड सेवा बंद करण्‍याबाबत पत्र पाठविले व कपात केलेली रक्‍कम रुपये 49,144/- परत करण्‍याबाबत ही कळविले. सदर पत्र विरुध्‍द पक्ष यांना प्राप्‍त होऊन ही त्‍यांनी त्‍याची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 23.01.2017 ला सायबर क्राईम विभाग नागपूर यांच्‍याकडे तक्रार केली. तसेच दि. 08.02.2017 ला विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली, सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल घेतली नाही.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की,  विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी  तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातून कपात केलेली रक्‍कम रुपये 49,144/- परत करावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  5.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी आपला लेखी जबाब एकत्रितरित्‍या दाखल केला असून त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍याकडे बचत खाते असून त्‍याचा बचत खाते क्रं. 909010039467770 हा आहे. दि. 25.02.2016 रोजी तक्रारकर्ता स्‍वतः विरुध्‍द पक्ष क्रं. 2 च्‍या शाखेत येऊन अॅक्‍सीस  बॅंक निओ मास्‍टर कार्ड या क्रेडिट कार्डबाबत चौकशीकरिता आला असता संबंधित अधिका-यांनी कार्डबद्दलची संपूर्ण माहिती दिली व त्‍यानंतर सदर कार्ड प्राप्‍त करण्‍याकरिता रीतसर अर्ज केला. तक्रारकर्त्‍याला कार्ड प्राप्‍त करण्‍याकरिता अटी व शर्ती मंजूर असल्‍यानंतरच त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 ने क्रेडिट कार्ड क्रमांक 5305 6202 0456 0375 हे अटी व शर्तीनुसार जारी केले.  उपरोक्‍त कार्ड जारी करतांना कार्डच्‍या वापराबद्दल बुकलेट देखील जारी करण्‍यात आले होते. या बुकलेट मध्‍ये नमूद केल्‍यानुसार क्रेडिट कार्ड धारकाने कार्डचा वापर करुन 45 दिवसाच्‍या मुदतीत रक्‍कम न भरल्‍यास त्‍या रक्‍कमेवर 3 टक्‍के व्‍याज व उशिरा रक्‍कम भरल्‍याबाबतचे रुपये 300/- व सर्व्‍हीस टॅक्‍स लावण्‍यात येतात.
  6.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याला वि.प. च्‍या आशिष नाव्‍याच्‍या एक्‍झीकेटिव अॅक्सिस बॅंक निओ मास्‍टर कार्ड या क्रेडिट कार्ड बाबत माहिती दिली व त्‍यावेळी त्‍याने तक्रारकर्त्‍याला या कार्डद्वारे त्‍याला भरपूर कामे करता येईल असे सांगितले व त्‍याच्‍या सांगण्‍यावर विश्‍वास ठेवून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांची क्रेडीट कार्ड सेवा घेण्‍यास तयार झाला होता  हे कथन अमान्‍य केलेले आहे. तक्रारकर्त्‍याला दि. 21.09.2016 ला अॅक्‍सीस बॅंक निओ क्रेडिट कार्ड प्राप्‍त झाले. उपरोक्‍त कार्डप्रमाणे तक्रारकर्त्‍याला रुपये 4 लाखा पर्यंत उधार खरेदी, तिकिट बुकिंग इत्‍यादी करता येईल. तसेच उपरोक्‍त कार्डचा ए.टी.एम. मध्‍ये वापर करुन उपरोक्‍त रुपये 4 लाख रक्‍कमेच्‍या 20 टक्‍के रक्‍कम रोख काढता येऊ शकेल. क्रेडीट कार्ड वापरण्‍याकरिता पिन क्रमांक देण्‍यात येतो व त्‍याची माहिती केवळ कार्ड धारकालाच असते आणि या पिन द्वारे या कार्डचा वापर करता येतो. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तावेज यादीतील कागदपत्र क्रं. 1 दि. 21.09.2016 च्‍या पत्रात क्रेडीट कार्ड देतांना त्‍याला पिन दहा दिवसात पोस्‍टाने पाठविण्‍यात येईल असे नमूद केलेले आहे व तक्रारकर्त्‍याला पिन न मिळाल्‍यास त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या कस्‍टमर सेवेला फोन द्वारे कळवावे असे लिहिलेले होते. तक्रारकर्त्‍याने त्‍याला पिन क्रमांक मिळाला नाही याबद्दल कधी ही तोंडी अथवा लेखी तक्रार केली नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या प्रतिउत्‍तरामध्‍ये खोटे नमूद केले आहे की, त्‍याला कार्ड प्राप्‍त झाल्‍याच्‍या दिवशी त्‍याच्‍या क्रेडीट कार्डचा पिन कोड व पिनचा वापर कसा करावा हे त्‍याला माहिती नव्‍हते.
  7.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केले की, त्‍याने अजून पर्यंत क्रेडिट कार्डचा वापर कधीही खरेदी अथवा कोणत्‍याही इतर कामासाठी केलेला नाही. तसेच तक्रारकर्ता सप्‍टेंबर ते नोव्‍हेबंर पर्यंत कुठेही बाहेरगावी गेलेला नाही, त्‍यामुळे सदर कार्डचा वापर व उपयोग केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने सदर कार्डचा वापर दि. 21.09.2016 रोजी रुपये 40,653/- चे खरेदीकरिता अॅपल ऑनलाईन स्‍टोअर मधून वस्‍तू विकत घेण्‍याकरिता वापर केल्‍याचे दिसून येते. त्‍यानुसार वरील रक्‍कम त्‍याच्‍या खात्‍यावर नांवे दाखविण्‍यात येते. तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त रक्‍कम न दिल्‍यास त्‍याला कमीत कमी 5 टक्‍के म्‍हणजे रुपये 2,033/- जमा करण्‍याबाबत मॅसेज जात असतो. परंतु त.क.ने ही रक्‍कम न दिल्‍यास त्‍यावर व्‍याज व उशिरा भरणा करण्‍याबाबतचा मॅसेज पाठविला जातो. उपरोक्‍त सर्व मॅसेजेस मास्‍टर कार्ड ही आंतरराष्‍ट्रीय कंपनी (सर्व्‍हीस  प्रोव्‍हायडर) जनरेट करुन पाठवित असतात.  तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे क्रेडिट कार्डचे स्‍टेटमेंट घेण्‍याकरिता व विचारपूस करण्‍याकरिता दि. 18.11.2016 रोजी आलेला नाही व

 

  1.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तावेज  व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽहोय

 

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत – तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्ष क्रं. 2  च्‍या बॅंकेत बचत खाते असून त्‍याचा बचत खाते क्रं. 909010039467770 हा आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून क्रेडिट कार्ड घेतले व त्‍याच्‍या क्रेडिट कार्डचा नंबर 5305620204560375 हा असून त्‍या द्वारे खरेदी व तिकिट बुकिंग करता येईल व त्‍याचा कार्डधारकाला रुपये 4,00,000/- पर्यंत वापर करता येईल हे उभय पक्षांना मान्‍य आहे, यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष बॅंकेचे एक्ण्क्यिुटिव यांच्‍या मदतीने क्रेडिट कार्ड घेतले होते व सदरच्‍या क्रेडिट कार्ड अप्‍लीकेशन फॉर्मवर "आशिष" यांच्‍या नावांचा रिमार्क असल्‍याचे दिसते. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष बॅंकेने क्रेडिट कार्ड निर्गमित केले व ते तक्रारकर्त्‍याला दि. 21.09.2016 ला प्राप्‍त झाले. विरुध्‍द पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज क्रं. 2 चे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने दि.21.09.2016 ला अॅपल ऑनलाईन स्‍टोअर क्रमांक 80067627755305620202041899  मधून रुपये 40,653/- इतक्‍या रक्‍कमेची खरेदी केली. तसेच तक्रारकर्त्‍याला सदर क्रेडिट कार्ड देण्‍यापूर्वी त्‍याचा उपयोग करणारा अन्‍य व्‍यक्‍ती असल्‍याचे दिसून येते व त्‍याचा कार्ड क्रमांक 5305620204560375 हा आहे. नि.क्रं. 2(1) वर दाखल दस्‍तावेज प्रमाणे तक्रारकर्त्‍याला क्रेडिट कार्ड सोबत देण्‍यात आलेल्‍या माहिती पत्रकानुसार त्‍याचा पिन हा क्रेडिट कार्ड प्राप्‍त झाल्‍यापासून 10 दिवसाच्‍या आत पुरविण्‍यात येईल असे सूचविण्‍यात आले होते. परंतु तक्रारकर्त्‍याला क्रेडिट कार्ड प्राप्‍त झाल्‍याच्‍या दिवशी म्‍हणजेच दि. 21.09.2016 ला क्रेडिट कार्डवरुन खरेदी कशी करण्‍यात आली व तक्रारकर्त्‍याला किती तारखेला क्रेडिट कार्ड उपयोगाबाबतचा पिन पुरविण्‍यात आला याबाबतचे कुठलेही दस्‍तावेज विरुध्‍द पक्ष बॅंकेने सादर केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने मागणी करुन ही त्‍याचे क्रेडिट कार्ड द्वारे कोणत्‍या तारखेला, कुठून व किती वाजता क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी करण्‍यात आली याबाबतचे कुठलेही दस्‍तावेज मंचासमक्ष दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्षाने दि. 21.09.2016 ला तक्रारकर्त्‍याला पुरविण्‍यात आलेल्‍या क्रेडिट कार्डचे पिन पुरविण्‍या पूर्वीच त्‍याच दिवशीच म्‍हणजेच दि. 21.09.2016 ला तक्रारकर्त्‍याच्‍या क्रेडिट कार्ड द्वारे रुपये 40,653/- इतक्‍या रक्‍कमेची खरेदी करण्‍यात आली याबाबतची कोणतीही चौकशी न करता व तक्रारकर्त्‍याला याबाबतची कोणतीही माहिती न पुरविता तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातून रुपये 49,144/- कपात करण्‍यात आले ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  

                सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला

त्‍याचे बचत खात्‍यातून कपात करण्‍यात आलेली रक्‍कम रुपये 49,144/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व सदर रक्‍कमेवर दि. 13.01.2017 पासून ते प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व  तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये 10,000/- द्यावा.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.