Maharashtra

Nagpur

CC/281/2017

Shri Tomi Prothasis - Complainant(s)

Versus

General Manager/Regional Manager/CEO, Bharat Sanchar Nigam Ltd., Maharashtra Circle - Opp.Party(s)

Adv. Prabhakar Doble

03 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/281/2017
( Date of Filing : 04 Jul 2017 )
 
1. Shri Tomi Prothasis
R/o. C-45, Link Road, Sadar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. General Manager/Regional Manager/CEO, Bharat Sanchar Nigam Ltd., Maharashtra Circle
Juter Danda, Administrative Building, Santakruz (E), Mumbai 400054
Mumbai
Maharashtra
2. Branch Manager, Bharat Sanchar Nigam Ltd.
Zero Miles, Civil Lines, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
3. Account Officer (Mobile)
3rd Floor, C.T.O.Compound, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
4. S.D.E. (P.G.)
Telephone Bhawan, Zero Miles, Civil Lines, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
5. Central Government, Through Secretary
Telegram Contact and Telecommunication Department, Mantralaya, Sanchar Bhawan, 20, Ashoka Road, New Delhi 110001
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. Prabhakar Doble, Advocate for the Complainant 1
 Adv. Ranjit Sardey/ Salpekar/Rathi, Advocate for the Opp. Party 1
Dated : 03 Aug 2021
Final Order / Judgement
  • आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.   तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तो कर सल्‍लागार असून त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ते 4 कडून भ्रमणध्‍वनी क्रं. 09422114061 करिता पोस्‍ट पेड बिलिंगची सेवा महिन्‍यावारी करिता घेतलेली आहे व त्‍यामध्‍ये कॉलिंग व नेटचा वापर करण्‍याची सोय रुपये 720/- इतक्‍या रक्‍कमेत उपलब्‍ध करुन दिली होती व त्‍याचा वापर तक्रारकर्ता मागील 10 वर्षापासून कोणताही खंड न पाडता करीत आहे.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याला युनायटेड किंगडम व जर्मनीला जायचे असल्‍याने त्‍याने दि. 23.11.2016 ला विरुध्‍द पक्षाकडे इंटरनॅशनल रोमिंगसाठीच व आय.ए.डी. साठी सेवा मिळण्‍याची मागणी केलेली होती. याकरिता तक्रारकर्त्‍याने दिनांक 28.11.2016 ला विरुध्‍द पक्ष 3 कडे इंटनॅशनल रोमिंग व आय.एस.डी. सेवा सोयीठीच रुपये 5000/- Security deposit म्‍हणून जमा केले होती व त्‍याची पावती सुध्‍दा वि.प.ने दिलेली आहे. त्‍याचप्रमाणे इंटरनॅशनल रोमिंग सोयीकरिता नविन मोबाईल मिळण्‍याबाबत अर्ज केलेला होता.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, दि. 13.12.2016 ला पहिल्‍यां युनायटेड किंगडम लंडन येथे व जर्मनीच्‍या फॅन्‍कफर्ट शहरामध्‍ये दोन दिवस इंटरनॅशनल रोमिंग सेवेचा वापर केलेला होता. त्‍यानंतर दि. 15.12.2016 ला तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर  संदेश आले की, (i) Dear Customer you are advised to deactivate the data services in your mobile phone if you do not intend to use the data services in international roaming., (ii) Dear Customer, Kindly visit www.ir.bsnl.co.in’ for data tariff. Data tariff during international roaming is higher as compared to tariff during national roaming,  (iii) Mandatory Selection Procedure – 1) Select Cellone/ BSNL mobile menu (Sim  Tool (SKT) or sim application.  2) Select Network, (iii) Select International.  4) Select Cellone/BSNL Mobile, wait for 1-2 mins, N/W will come automatically. If fails, then go for manual searching if available operators list and select any of the roaming partners of BSNL.
  4.      तक्रारकर्त्‍याने आय.एस.डी. सेवा व इंटरनॅशनल रोमिंग सेवा दि. 17 व 18 डिसेंबर 2016 सुट्टया असल्‍यामुळे बंद करण्‍याकरिता विनंती केली होती, परंत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर येणारे जाणारे कॉल्‍सची सेवा बंद केल्‍यामुळे गैरसोय झाली. तसेच तक्रारकर्त्‍याला मदत क्रं. 1503/1800 1801 503 वरुन ही कोणतेही समाधानकारक उत्‍तर वि.प.कडून न मिळता त.क.ची सेवा बंद केली. त्‍यानंतर दि. 20.12.2016 ला तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर 13.42 वा. ‘‘Dear Customer Your usage has reached Rs. 57, 938.46/- which exceeds allowable limits your credit limit Rs. 5,000/- Plz contact CSR  or Visit www.bsnl.co.in for online payment and pay immediately for re-connection’’.  तक्रारकर्त्‍याला  सदरचा भ्रमणध्‍वनी क्रं. हा ग्राहकांसाठी व त्‍याच्‍या नातेवाईक किंवा मित्रमंडळीनी करिता सुरु करणे आवश्‍यक असल्‍यामुळे त्‍याला त्‍वरित रुपये 57,000/- च्‍या बिलाचा नाईलाजास्‍तव भरणा करावा लागला.
  5.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याला दि. 05.01.2017 ला दि. 01.12.2016 ते 13.12.2016 या कालावधीचे रुपये 60,125/- चे बिल पाठविले आणि तक्रारकर्त्‍याची दि. 01.01.2017 ते 31.01.2017 च्‍या कालावधीचे मोबाईलवरची क्रेंडिट मर्यादा रुपये 57048/- इतकी वाढविली असल्‍याचे कळल्‍यावर आश्‍चर्यचकित होऊन धक्‍काच बसला. याबाबत तक्रारकर्त्‍याने दि. 31.01.2017 व 10.02.2017 या तारखांना विरुध्‍द पक्ष 1 ते 5 कडे तक्रार केली. परंतु विरुध्‍द पक्ष 3 याने विभागाचे बचावार्थ खोटे उत्‍तर पाठविले व त्‍यात नमूद केले की, त्‍यांच्‍या ऑनलाईन प्रणालीद्वारे 4 ते 5 दिवसानंतर माहिती मिळते, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने/ ग्राहकाने ही माहिती इंटरनॅशनल सुविधा घेते वेळी सुचविल पाहिजे व हे त्‍याचे कर्तव्‍य व जबाबदारी आहे.
  6.      तकारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने बिलापोटी जास्‍तीची भरलेली रक्‍कम परत विरुध्‍द पक्षाने परत केली नाही व खोटे उत्‍तर दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 20.03.2017 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्षाने नोटीसला उडवाउडवीचे उत्‍तर दिले. विरुध्‍द पक्षाने अपूर्ण सेवा देऊन बेकायदेशीरपणे कोणतीही सूचना न देता सुरु न केलेल्‍या सेवेकरिता व बंद मोबाईल सुरु करण्‍याकरिता भरलेले पैसे परत करण्‍यासाठी विनंती करुन त्‍याकडे दुर्लक्ष केले. तसेच वेळोवेळी लेखी पत्राद्वारे कळवून ही त्‍याच्‍या तक्रारीची दखल न घेतल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे.       
  7.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्षाकडे  जास्‍तीच्‍या पाठविलेल्‍या बिलाचा भरणा केलेली रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  8.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 यांनी आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील आक्षेप नाकारलेले आहेत. त्‍यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्ता हा मागील 10 वर्षापासून पोस्‍टपेड मोबाईल कनेक्‍शनकरिता 325 चा प्‍लानचा वापर करीत होता व त्‍यात तक्रारकर्त्‍याला  250 एम.बी.डाटा मिळत होता. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने प्‍लान बदलविण्‍याकरिता अर्ज केला व दि. 18.04.2014 पासून रुपये 225/- चा प्‍लॉन सुरु करण्‍यात आला व त्‍यात 2 जी.बी.डाटा. मुफ्त होता.
  9.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने भ्रमणध्‍वनी क्रं. 9422114062 वर अंतराष्‍ट्रीय रोमिंग व आई.एस.डी. सेवा सुरु करण्‍याकरिता दि. 23.11.2016 ला अर्ज केला होता.  सदरची सेवा प्राप्‍तीकरिता तक्रारकर्त्‍याने सुरक्षा जमा राशी म्‍हणून रुपये 5000/- दि. 28.11.2016 ला जमा केले होते व त्‍याच दिवसापासून तक्रारकर्त्‍याच्‍या भ्रमणध्‍वनीकरिता आंतरराष्‍ट्रीय रोमिंग सुविधा व आई.एस.डी. सेवा सुरु करण्‍यात आली होती. त्‍याचप्रमाणे आंतरराष्‍ट्रीय रोमिंग व आई.एस.डी. सुविधा करण्‍या-या ग्राहकांना  सुविधांबाबतच्‍या सूचना असणारी लिखीत माहिती असलेले कागद देण्‍यात येते.

त्‍यातील शर्ती व अटीं मध्‍ये नमूद आहे की,

ए. ...

बी.... व

               सी. बिलिंग और भुगतान 

  1. ग्राहक जब विदेश में रोमिंग में होता है तो सेवा चेष्‍टा के तौर पर, भारत संचार निगम लिमिटेड सामान्‍यतः क्‍लाइ्ंट क्रेडिट सीमा को बढाने के आपके उपयोग को प्रतिबंध नहीं करता है ा अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग में युसेज के भारी प्रभार को ध्‍यान में रखते हुए, ग्राहक को लगातार पहॅुंच मिलती रहे इसे लिए यह किया जाता है ा
  2. उपयोग पर आवधिक अद्यतन जानकारी प्राप्‍त करने के लिएए हमारी मुफ्त यूसेज एलर्ट सेवा लें और इसके लिए "USG"  53333 पर एस एम एस करे ा अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग के दौरान आपके खर्च के प्रभार, अंतर्राष्‍ट्रीय ऑपरेटर द्वारा हमें भेजे जाते हैं और इसमें 3 दनों या इससे अधिक का समय लगता है, अतः हो सकता है कि आपको प्राप्‍त अलर्ट में अद्यतन स्थिती प्रतिबिम्बित न हो और हमें जो अंतिम अद्यतन स्थिति प्राप्‍त हुई है उसमें वही लक्षित हो ा

       विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याने दि. 28.11.2016 ला अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग सुविधा असणा-या मोबाईलकरिता अर्ज केला होता व त्‍याप्रमाणे त्‍याला ती पुरविण्‍यात ही आली होती.  तक्रारकर्त्‍याने दि. 13.12.2016 पासून लंदन (युनाइटेड किंगडम) आणि फ्रेंकफ्रंर्ट (जर्मनी) या दोन दिवशीय दौ-या दरम्‍यान नेटचा वापर केला आणि रुपये 49,732/- रुपयाचे कॉल केले होते. विरुध्‍द पक्षाने पुढे असे नमूद केले की, ग्राहक / तक्रारकर्ता जेव्‍हा विदेश रोमिंग सेवेत असतो तेव्‍हा विरुध्‍द पक्ष / भारत संचार निगम लिमिटेड द्वारा सामान्‍यतः क्‍लांईट क्रेडिट सीमा वाढविण्‍यास ग्राहकाला प्रतिबंधित करीत नाही. अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग मध्‍ये असतांना भारी प्रभारचे विशेष लक्ष ठेवून ग्राहकाला त्‍याची पोच मिळत राहावी याकरिता विशेष लक्ष ठेवण्‍यात येते. तसेच विरुध्‍द पक्षाने दि. 15.12.2016 ला तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर एस.एम.एस. पाठविला होता व अधिक माहितीकरिता USG 53333 वर एस.एम.एस. करण्‍याचा संदेश पाठविला होता व सदरची सेवा ही निःशुल्‍क असल्‍याचे ही कळविले होते. अंतर्राष्‍ट्रीय रोमिंगच्‍या प्रवासा दरम्‍यान तक्रारकर्त्‍याच्‍या खर्चाचा भार हा अंतर्राष्‍ट्रीय ऑपरेटर मार्फत विरुध्‍द पक्षाला प्राप्‍त होते व यात 3 दिवस अथवा त्‍याहून अधिक वेळ लागतो. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला प्राप्‍त झालेल्‍या अलर्ट मॅसेज मध्‍ये रोमिंग सेवेकरिता वापर झालेल्‍या खर्चाची स्थिती दिसून न येता विरुध्‍द पक्षाला त्‍याची अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग मध्‍ये झालेल्‍या खर्चाची स्थिती निदर्शनास आली.

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तो ग्राहकांना / तक्रारकर्त्‍याला नेहमी सूचना देतो की, अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग दरम्‍यान जर तुम्‍हाला डाटा सेवा उपयोग करावयाची नसल्‍यास आपल्‍या मोबाईल मध्‍ये डाटा सेवा निष्‍क्रीय करावी. तसेच ग्राहकाला डाटा टैरिफ करिता वेबसाईट  www.bsnl.co.in  पाहावे, कारण अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग दरम्‍यान डाटा टैरिफ सामान्‍य टैरिफ ( नॅशनल रोमिंग) पेक्षा जास्‍त असतो. तसेच निवड प्रक्रिया  1 सेलवर/बी एस एन एल मोबाईल विकल्‍प यादी मधील  निवड (सिम टूल (एस टी के ) अथवा सिम एप्‍लीकेशन  2. नेटवर्क ची निवड करावी. 3. अंतर्राष्‍ट्रीय ची निवड करावी. 4. सेलवन / बी एस एन एल  मोबाईलची निवड करावी.    1-2 मनिट वाट पाहावी, संदेश आपोआप येतो.
  2.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, दि. 19.12.2016 ला मिळालेल्‍या सी.डी.आर.डाटानुसार क्रेडिट सीमा समाप्‍तीचा संदेश तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर पाठविण्‍यात आला होता. परंतु तक्रारकर्त्‍याकडून कुठलेही उत्‍तर प्राप्‍त न झाल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याचा मोबाईल क्रं. 942214062 वरील क्रेडिट सीमा समाप्‍त झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवरील सेवा खंडित करण्‍यात आली.  तसेच तक्रारकर्त्‍याने वापरलेली अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग सेवेकरिता रक्‍कम रुपये 57,938.46 रुपयाचे देयक प्राप्‍त झाले होते व त्‍याचा भरणा तक्रारकर्त्‍याने करणे आवश्‍यक होते. तक्रारकर्त्‍याला  मोबाईलवर मिळालेल्‍या संदेशानुसार त्‍याने दि. 20.12.2016 रोजी रुपये 57,000/-  चेक क्रं. 950544 नुसार भरणा केलेला आहे. विरुध्‍द पक्षाने सदरची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे मोबाईलची सेवा पुर्ववत सुरु केली. तसेच तक्रारकर्त्‍याने अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग सेवा प्राप्‍त करिता सुरक्षा रक्‍कम म्‍हणून रुपये 5,000/- जमा केली असल्‍याची बाब मान्‍य असल्‍याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने चिकित्‍सक असलयामुळे विरुध्‍द पक्षाने त्‍यांना मोबाईलची सेवा वापर करण्‍याकरिता क्रेडिट देण्‍यात आले होते.
  3.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, दि. 05.01.2017 रोजी रुपये 60,125/- चे बिल दिले होते व त्‍यात स्‍पष्‍ट नमूद होते की, तक्रारकर्त्‍याने रुपये 58,325/- चे भुगतान केलेले आहे. म्‍हणून मोबाईल क्रं. 9422114062 वरुन वापरलेल्‍या सेवेकरिता त्‍याला रुपये 3125/- च्‍या देयकाचा भरणा करावयाचा आहे. जर ग्राहकाने आपल्‍या निश्चित केलेल्‍या क्रेडिट सीमा पेक्षा जास्‍त कॉलचा वापर केला असल्‍यास त्‍याकरिता  येणारे बिल भरण्‍याची जबाबदारी सर्वस्‍वी ग्राहकाची असते. विरुध्‍द पक्षाने नमूद केले की, अटी व शर्ती मधील परिच्‍छेद क्रं. 12.6 मध्‍ये नमूद केले आहे की, ग्राहकाने निवडलेल्‍या विविध सेवा / प्‍लान अनुसार त्‍यांच्‍यावर वेगवेगळे किंमती/ शुल्‍क निरनिराळया प्रकारे आकारले जातात. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नाही, करिता सदरची सदरची तक्रार  खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  4.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे व त्‍यांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

             अ.क्रं.      मुद्दे                                                                 उत्‍तर   

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? नाही

3. काय आदेश ?                          अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून  भ्रमणध्‍वनी क्रं. 09422114061 करिता  पोस्‍ट पेड बिलिंगची सेवा रुपये 720/- इतक्‍या रक्‍कमेत घेतली होती व त्‍याचा वापर तक्रारकर्ता मागील 10 वर्षापासून कोणताही खंड न पाडता करीत आहे. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.  तक्रारकर्त्‍याला विदेशात जायचे असल्‍याने त्‍याने दि. 23.11.2016 ला विरुध्‍द पक्षाकडे इंटरनॅशनल रोमिंगसाठीच व आय.ए.डी. साठी सेवा मिळण्‍याची मागणी केलेली होती. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक 28.11.2016 ला विरुध्‍द पक्ष 3 कडे इंटनॅशनल रोमिंग व आय.एस.डी. सेवा सोयीसाठी रुपये 5000/- Security deposit म्‍हणून जमा केले होती व त्‍याची पावती सुध्‍दा वि.प.ने दिलेली आहे. तक्रारकर्ता दि.  13.12.2016 ला पहिल्‍यां युनायटेड किंगडम लंडन येथे व जर्मनीच्‍या फॅन्‍कफर्ट शहरामध्‍ये दोन दिवस इंटरनॅशनल रोमिंग सेवेचा वापर केलेला होता. तक्रारकर्त्‍याने आय.एस.डी. सेवा व इंटरनॅशनल रोमिंग सेवा दि. 17 व 18 डिसेंबर 2016 सुट्टया असल्‍यामुळे बंद करण्‍याकरिता विनंती केली असल्‍याचे तक्रारी नमूद केले आहे व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर येणारे जाणारे कॉल्‍सची सेवा बंद केल्‍यामुळे गैरसोय झाली. तसेच तक्रारकर्त्‍याला मदत क्रं. 1503/1800 1801 503 वरुन ही कोणतेही समाधानकारक उत्‍तर वि.प.कडून न मिळता त.क.ची सेवा बंद केली. त्‍यानंतर दि. 20.12.2016 ला तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर 13.42 वा. तक्रारकर्त्‍याला  सदरचा भ्रमणध्‍वनी क्रं. हा ग्राहकांसाठी व त्‍याच्‍या नातेवाईक किंवा मित्रमंडळीनी करिता सुरु करणे आवश्‍यक असल्‍यामुळे त्‍याला त्‍वरित रुपये 57,000/- च्‍या बिलाचा नाईलाजास्‍तव भरणा करावा लागला.  तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी आहे व त्‍यामुळे त्‍याने या आयोगात तक्रार दाखल केलेली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 यांनी आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील आक्षेप नाकारलेले आहेत. विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने भ्रमणध्‍वनी क्रं. 9422114062 वर अंतराष्‍ट्रीय रोमिंग व आई.एस.डी. सेवा सुरु करण्‍याकरिता दि. 23.11.2016 ला अर्ज केला होता.  सदरची सेवा प्राप्‍तीकरिता तक्रारकर्त्‍याने सुरक्षा जमा राशी म्‍हणून रुपये 5000/- दि. 28.11.2016 ला जमा केले होते व त्‍याच दिवसापासून तक्रारकर्त्‍याच्‍या भ्रमणध्‍वनीकरिता आंतरराष्‍ट्रीय रोमिंग सुविधा व आई.एस.डी. सेवा सुरु करण्‍यात आली होती. त्‍याचप्रमाणे आंतरराष्‍ट्रीय रोमिंग व आई.एस.डी. सुविधा करण्‍या-या ग्राहकांना  सुविधांबाबतच्‍या सूचना असणारी लिखीत माहिती असलेले कागद देण्‍यात आला होता.

 

  1. ग्राहक जब विदेश में रोमिंग में होता है तो सेवा चेष्‍टा के तौर पर, भारत संचार निगम लिमिटेड सामान्‍यतः क्‍लाइ्ंट क्रेडिट सीमा को बढाने के आपके उपयोग को प्रतिबंध नहीं करता है ा अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग में युसेज के भारी प्रभार को ध्‍यान में रखते हुए, ग्राहक को लगातार पहॅुंच मिलती रहे इसे लिए यह किया जाता है ा

         विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याने दि. 28.11.2016 ला अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग सुविधा असणा-या मोबाईलकरिता अर्ज केला होता व त्‍याप्रमाणे त्‍याला ती पुरविण्‍यात ही आली होती.  तक्रारकर्त्‍याने दि. 13.12.2016 पासून लंदन (युनाइटेड किंगडम) आणि फ्रेंकफ्रंर्ट (जर्मनी) या दोन दिवशीय दौ-या दरम्‍यान नेटचा वापर केला आणि रुपये 49,732/- रुपयाचे कॉल केले होते. विरुध्‍द पक्षाने पुढे असे नमूद केले की, ग्राहक / तक्रारकर्ता जेव्‍हा विदेश रोमिंग सेवेत असतो तेव्‍हा विरुध्‍द पक्ष / भारत संचार निगम लिमिटेड द्वारा सामान्‍यतः क्‍लांईट क्रेडिट सीमा वाढविण्‍यास ग्राहकाला प्रतिबंधित करीत नाही. अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग मध्‍ये असतांना भारी प्रभारचे विशेष लक्ष ठेवून ग्राहकाला त्‍याची पोच मिळत राहावी याकरिता विशेष लक्ष ठेवण्‍यात येते. तसेच विरुध्‍द पक्षाने दि. 15.12.2016 ला तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर एस.एम.एस. पाठविला होता व अधिक माहितीकरिता USG 53333 वर एस.एम.एस. करण्‍याचा संदेश पाठविला होता व सदरची सेवा ही निःशुल्‍क असल्‍याचे ही कळविले होते. अंतर्राष्‍ट्रीय रोमिंगच्‍या प्रवासा दरम्‍यान तक्रारकर्त्‍याच्‍या खर्चाचा भार हा अंतर्राष्‍ट्रीय ऑपरेटर मार्फत विरुध्‍द पक्षाला प्राप्‍त होते व यात 3 दिवस अथवा त्‍याहून अधिक वेळ लागतो. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला प्राप्‍त झालेल्‍या अलर्ट मॅसेज मध्‍ये रोमिंग सेवेकरिता वापर झालेल्‍या खर्चाची स्थिती दिसून न येता विरुध्‍द पक्षाला त्‍याची अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग मध्‍ये झालेल्‍या खर्चाची स्थिती निदर्शनास आली.

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, दि. 19.12.2016 ला मिळालेल्‍या सी.डी.आर.डाटानुसार क्रेडिट सीमा समाप्‍तीचा संदेश तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर पाठविण्‍यात आला होता. परंतु तक्रारकर्त्‍याकडून कुठलेही उत्‍तर प्राप्‍त न झाल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याचा मोबाईल क्रं. 9422114062 वरील क्रेडिट सीमा समाप्‍त झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवरील सेवा खंडित करण्‍यात आली.  तसेच तक्रारकर्त्‍याने वापरलेली अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग सेवेकरिता रक्‍कम रुपये 57,938.46 रुपयाचे देयक प्राप्‍त झाले होते व त्‍याचा भरणा तक्रारकर्त्‍याने करणे आवश्‍यक होते. तक्रारकर्त्‍याला  मोबाईलवर मिळालेल्‍या संदेशानुसार त्‍याने दि. 20.12.2016 रोजी रुपये 57,000/-  चेक क्रं. 950544 नुसार भरणा केलेला आहे. विरुध्‍द पक्षाने सदरची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे मोबाईलची सेवा पुर्ववत सुरु केली. तसेच तक्रारकर्त्‍याने अंतर्राष्‍ट्रीय रोमिंग सेवा प्राप्‍त करिता सुरक्षा रक्‍कम म्‍हणून रुपये 5,000/- जमा केली असल्‍याची बाब मान्‍य असल्‍याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने चिकित्‍सक असलयामुळे विरुध्‍द पक्षाने त्‍यांना मोबाईलची सेवा वापर करण्‍याकरिता क्रेडिट देण्‍यात आले होते.
  2.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, दि. 05.01.2017 रोजी रुपये 60,125/- चे बिल दिले होते व त्‍यात स्‍पष्‍ट नमूद होते की, तक्रारकर्त्‍याने रुपये 58,325/- चे भुगतान केलेले आहे. म्‍हणून मोबाईल क्रं. 9422114062 वरुन वापरलेल्‍या सेवेकरिता त्‍याला रुपये 3125/- च्‍या देयकाचा भरणा करावयाचा आहे. जर ग्राहकाने आपल्‍या निश्चित केलेल्‍या क्रेडिट सीमा पेक्षा जास्‍त कॉलचा वापर केला असल्‍यास त्‍याकरिता  येणारे बिल भरण्‍याची जबाबदारी सर्वस्‍वी ग्राहकाची असते. विरुध्‍द पक्षाने नमूद केले की, अटी व शर्ती मधील परिच्‍छेद क्रं. 12.6 मध्‍ये नमूद केले आहे की, ग्राहकाने निवडलेल्‍या विविध सेवा / प्‍लान अनुसार त्‍यांच्‍यावर वेगवेगळे किंमती/ शुल्‍क निरनिराळया प्रकारे आकारले जातात. तसेच शर्ती व अटी क्रं. परिच्‍छेद 6.1 प्रमाणे भारत संचार निगम लिमिटेडला अधिकार असतो की, ते ग्राहकांना सूचित करुन अथवा सूचना न देता मोबाईलवरील सेवा अंशतः किंवा पूर्णतः खंडित करु शकतात. किंवा ते ग्राहकांना त्‍याच्‍या क्रेडिट सीमेवर पोहचल्‍यानंतर त्‍वरित त्‍यांची सेवा खंडित करु शकतात.  
  3.      तक्रारकर्ता विदेशात दिनांक 01.12.2016 ते 13.12.2016 असतांना त्‍याने  इंन्‍टरनॅशनल रोमिंग व आय.एस.डी. सेवेचा पूर्णपणे वापर केलेला आहे हे दाखल दस्‍तावेजावरील पान क्रं. 28 वरुन दिसून येते व तसेच अंतर्राष्‍ट्रीय वापरात असलेले युसेजचे दर हे सामान्‍य दरापेक्षा अतिश्‍य जास्‍त प्रमाणात असते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला विदेशा दरम्‍यान वापरण्‍यात आलेल्‍या सेवेचे देयक भरणे हे अनिर्वाय आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

परंतु विरुध्‍द पक्षाने हा विचार केला की, तक्रारकर्ता हा प्रतिष्ठित चिकित्‍सक आहे व विरुध्‍द पक्षाकडून मागील 10 वर्षापासून अखंडितपणे सेवा घेत आहेत. तक्रारकर्त्‍याने विदेशात जाण्‍यापूर्वी विरुध्‍द पक्ष 3 कडे इंटनॅशनल रोमिंग व आय.एस.डी. सेवा सोयीकरिता रुपये 5000/- Security deposit म्‍हणून जमा केले होती. सदरची रक्‍कम ही बिल देयकाची अधिकतम सीमा नाही, ही केवळ Security deposit रक्‍कम आहे व बिलाची रक्‍कम त्‍यापेक्षा जास्‍त येऊ शकते ही बाब विरुध्‍द पक्षाने शर्ती व अटी मधील परिच्‍छेद क्रं. 6.1 व 12.6 मध्‍ये नमूद असल्‍याचे उत्‍तरात नमूद आहे. ज्‍यावेळी तक्रारकर्ता विदेशात गेला होता, तिथे त्‍यांना कोणत्‍याही प्रकारची अडचण येऊ नये या विचाराने ग्राहकाचे मोबाईलवरील सेवा खंडित करणे विरुध्‍द पक्षाला योग्‍य वाटली नाही व विरुध्‍द पक्षाला विश्‍वास होता की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून घेतलेल्‍या सेवेचा भरणा करतील हा विचार करुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास मोबाईलवर सूचना देऊन तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवरील सेवा खंडित केली नाही, ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे म्‍हणता येणार नाही. आंतरराष्‍ट्रीय रोमिंग दरम्‍यान सेवा घेतानां तक्रारकर्त्‍याने स्‍वतः त्‍याला कोण-कोणत्‍या प्रकारच्‍या सेवा घ्‍यायच्‍या आहेत आणि डाटा सेवा घ्‍यावयाची नसल्‍यास ती निष्‍क्रीय करणे आवश्‍यक असते आणि त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने स्‍वतः जागरुक राहणे आवश्‍यक आहे, तक्रारकर्त्‍याने तसे न केल्‍यामुळे तक्रारकर्ता हा बिलाबाबत वाद उपस्थितीत करु शकत नाही, म्‍हणून विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सेवा देण्‍यात कसूर केल्‍याचे दिसून येत नाही.

 

            सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                       अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.
  2. उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.        

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.