Maharashtra

Kolhapur

CC/11/498

Vikas Raghunath Ingawale - Complainant(s)

Versus

General Manager,ICICI Lombard General Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

R.V.Shaha

18 Feb 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Shri Pant Balekundri Market, 1st floor, Shahupuri, 6th Lane,
Gavat Mandai, Kolhapur – 416 001. (Maharashtra State)
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/11/498
 
1. Vikas Raghunath Ingawale
1883 E ward,Shop no.2,Gopal Complex,Rajarampuri 9th lane,Kolhapur.
...........Complainant(s)
Versus
1. General Manager,ICICI Lombard General Insurance Co.Ltd
ICICI Bank Towers,Bandra-Kurla Complex,Mumbai-400051
2. Manager,ICICI Lombard General Insurance Co.Ltd
First Floor,A no.1082,Omkar Plaza,Rajaram road,Kolhapur.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh PRESIDENT
 HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:R.V.Shaha, Advocate for the Complainant 1
 P.B.Gurav/Pravin Patil , Advocate for the Opp. Party 1
 P.B.Gurav/Pravin Patil , Advocate for the Opp. Party 1
ORDER

निकालपत्र :- (दि.18/02/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या) 

(01)       तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 2 हे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. सुनावणीचे वेळेस उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला.
 
           सदरची तक्रार ही सामनेवाला इन्‍शुरन्‍स कंपनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे.                 
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार यांनी त्‍यांचे उपजिविकेसाठी महिंद्रा Pick-Up Vans ही गाडी रजि. नंबर MH-09-BC-7774 घेतली होती. सदरची गाडी सामनेवाला विमा कंपनीकडे इन्‍शुअर्ड केलेली होती. सदरचा गाडीचा इन्‍शुरन्‍स हा दि.21/01/11 ते 20/01/12 पर्यंत होता. सदर पॉलीसीचा नंबर 3003/62999071/00/B00  असा असून गाडीची इन्‍शुअर्ड डिक्‍लेअर्ड व्‍हॅल्‍यू रु.2,90,401/- आहे. सदर गाडीला दि.26/01/2011 रोजी अपघात झाला. सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी ताबडतोब कोल्‍हापूर येथील सामनेवालांचे ऑफिसला कळविले होते. त्‍याप्रमाणे सामनेवाला यांचे सांगणेप्रमाणे क्‍लेम नं.MOTO 1897306 हा नोंदविला होता. सामनेवालांचे सांगणेप्रमाणे तक्रारदार यांनी कोल्‍हापूर येथील त्‍यांचे अधिकृत सर्व्‍हीस स्‍टेशन मे. ट्रेंडी व्‍हील्‍स प्रा.लि. कोल्‍हापूर यांचेकडे गाडी दुरुसतीसाठी दिलेली होती. सदर गाडीचे सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे करुन नेट इस्‍टीमेट रु.1,29,820.53 इतकी दुरुस्‍तीची रक्‍कम काढली आहे. त्‍याप्रमाणे सदर गाडीची दुरुस्‍ती सदर अधिकृत डिलर यांनी केलेली असून रक्‍कम रु.1,26,777/- इतके बील केलेले आहे. तक्रारदार यांनी सदर बीलाची रक्‍कम दि.20/04/2011 रोजी सदर डिलर यांना दिलेली आहे. व त्‍याप्रमाणे त्‍यांनी तक्रारदारास पावतीही दिलेली आहे. सदर बील रक्‍कम भरतेवेळी सामनेवाला ऑफिसकडून तक्रारदारास क्‍लेम मंजूर होऊन बिलाची रक्‍कम अदा करणेत येईल अशी हमी दिलेली होती. त्‍याबाबत सामनेवाला यांचे ऑफिसमध्‍ये तक्रारदार यांनी वेळोवेळी चौकशी केली असता सामनेवाला यांनी उडवाउडवीची उत्‍तरे देऊन क्‍लेम मंजूरीबाबत सांगणे टाळलेले आहे. सामनेवाला यांनी दि.27/05/2011 रोजीचे पत्राने तक्रारदारास क्‍लेम नामंजूर केलेचे व सदरचा क्‍लेम Misrepresentation of Facts या कारणास्‍तव नामंजूर केलेचे कळविले. क्‍लेम कोणत्‍या कारणास्‍तव नामंजूर केलेचे कारण नमुद केलेले नाही.त्‍यामुळे तक्रारदार यांनी त्‍यांचे वकील श्री राजेश व्‍ही. शहा यांचेमार्फत दि.19/07/2011 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठवली व सदर बिलाची रक्‍कम व्‍याजासह मागणी केली. सदर नोटीस सामनेवाला क्र.1 यांना दि.26/07/11 व सामनेवाला क्र.2 यांना दि.20/07/11रोजी मिळालेबाबत पेाष्‍टाची पोहोच पावती आलेली आहे.सदर नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदारास त्‍यांचे क्‍लेम बाबत काही कळविलेले नाही किंवा क्‍लेमची रक्‍कमही दिलेली नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार मे.मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन क्‍लेम रक्‍कम रु.1,26,766/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह, मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी नुकसान भरपाई म्‍हणून रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ MH-09-BC-7774  या गाडीचे रजिस्‍ट्रेशन सर्टीफिकेट, पॉलीसी सर्टीफिकेट, प्री इन्‍व्‍हॉईस व नेट इस्‍टीमेट अमाऊंट, ट्रेंडी व्‍हील्‍स प्रा;लि. यांचे टॅक्‍स इन्‍व्‍हाईस, त्‍यांनी तक्रारदारास दिलेली रिसीट, सामनेवाला यांचे क्‍ल्‍ेम नामंजूर केलेचे पत्र, सामनेवाला यांना तक्रारदाराने पाठविलेली नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना मिळालेची पोष्‍टाची पोहोच पावती इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.  
 
(04)       सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार मान्‍य केले कथनाखेरीज परिच्‍छेदनिहाय तक्रार नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराचे महिंद्रा पिक-अप व्‍हॅन नं.MH-09-BC-7774या गाडीचे नुकसान झालेबाबतचे मुल्‍यांकनाचे कोणतेही कागदपत्रे दाखल नाहीत. तसेच अपघाताबाबतचे एफआयआर, पंचनामा, रेकॉर्डवर नाहीत. त्‍यामुळे सदर तक्रारीस Locus Standi  नाही. प्रस्‍तुत क्‍लेम वेळेत दाखल केला होता याबाबत तक्रारदारास काटेकोर पुरावा दयावयास हवा. दि.27/05/11 चे पत्राने Misrepresentation of Facts या कारणास्‍तव नाकारलेचे स्‍पष्‍ट होते. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचे तक्रारीबाबत इन्‍शुरन्‍स ओम्‍डसमन कार्यालयाकडे दाद मागणेबाबत सुचवले होते. सामनेवाला क्र.2 यांनी योग्‍य कारणास्‍तव क्‍लेम नाकारलेला आहे. सामनेवालांची जबाबदारी ही सर्व्‍हेअर यांनी निश्चित केलेली रक्‍कम ही रु.75,524.55 इतकी मर्यादित राहील. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवाला यांनी आपले म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ महेंद्र पाटील या सर्व्‍हेअर यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे तसेच उभय पक्षांचे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. प्रस्‍तुतची तक्रार चालणेस पात्र आहे काय?                 --- होय. 
2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ?          --- होय. 
3. काय आदेश ?                                                      --- शेवटी दिलेप्रमाणे.
 
मुद्दा क्र.1:- सामनेवाला यांनी तक्रारदारास लोकस स्‍टॅन्‍डी नसलेबाबतचा आक्षेप घेतलेला आहे. सामनेवाला यांनी सदरचा आक्षेप तक्रारदाराने कथन केलेप्रमाणे अपघाताबाबतचे एफआयआर, पंचनामा नसलेने सदर आक्षेपाचा आधार घेऊन तक्रार चालणेस पात्र नसलेबाबतच्‍या आक्षेपाचा विचार करता तक्रारदाराचे नमुद वाहनाची पॉलीसी सामनेवाला यांनी मान्‍य केलेली आहे. सदर वाहनाचा अपघात दि.28/01/11रोजी दुपारी 12.45 वाजता झालेला आहे. सामनेवाला यांनी नियुक्‍त केलेले सर्व्‍हेअर महेंद्र पाटील यांनी नमुद वाहनाचा दि.30/01/11 रोजी दुपारी 12.30 वाजता सर्व्‍हे केलेला आहे. सर्व्‍हेअरचे रिपोर्टनुसार निढोरी घाटाजवळ अपघात झालेला आहे. यावरुन तक्रारदार हा सामनेवाला यांचा वाहन विमाधारक असल्‍याने तो ग्राहक आहे व त्‍यास तक्रार दाखल करणेची लोकस स्‍टॅन्‍डी येत असलेने सामनेवाला यांचा सदर आक्षेप हे मंच फेटाळत आहे. सबब प्रस्‍तुतची तक्रार मंचात चालणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  
 
मुद्दा क्र.2 व 3 :- दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमा पॉलीसीच्‍या सत्‍यप्रतीवरुन तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे वाहन क्र.MH-09-BC-7774, M & M make, Pick up Van Mahindra Utility Model fully built Closed Type of body 2000 CC GVW -2523 Manufacture year 2009, carrying capacity 5, Engine No.15400 Chesis IDV Rs.2,90,401/- वाहनाचे एकूण निर्धारित मुल्‍य रु.2,90,401/- या तपशीलाची नोंद आहे. या वाहनाचा विमा उतरविलेला आहे. दि.21/01/11रोजी पॉलीसी दिलेली आहे.पॉलीसीचा कालावधी हा दि.21/01/11 रोजी दुपारी 13.16 वाजलेपासून ते 20/01/2012 चे मध्‍यरात्रीपर्यंतचा आहे. नमुद वाहनाची आयडीव्‍ही व्‍हॅल्‍यू रु.2,90,401/- आहे. प्रस्‍तुत वाहनाच्‍या हप्‍तेपोटी रु.10,936/- भरलेले दिसून येतात. यामध्‍ये बेसीक ओन डॅमेज रु.4,160/-व बेसीक थर्डपार्टी लायबलेटी रु.5,580/-,पी.ए.कव्‍हर फॉर ओनर ड्रायव्‍हर रु.100/-,क्लिनर/कंडक्‍टर/कुली रु.50/-लिगल लायबलेटी टू पेड ड्रायव्‍हर रु.25/- अशा एकूण रु.9,915/- रक्‍कमेचा तसेच सर्व्‍हीस टॅक्‍स इतर करासहीत रु.1,021/- प्रस्‍तुत विमा हप्‍ता रक्‍कमेत समावेश आहे.
 
           नमुद वाहनाचा दि.26/01/11 रोजी अपघात झालेला आहे. सदर अपघाताबाबत सामनेवाला यांनी एफआयआर, पंचनामा इत्‍यादी नसलेने अपघात झाला हे सिध्‍द करणेची जबाबदारी तक्रारदाराची असलेचे प्रतिपादन केलेले आहे. याचा विचार करता सामनेवाला यांचे सर्व्‍हेअर यांनी नुकसानीचे पाहणीवरुन अपघात झालेची बाब नमुद केलेली आहे. सबब अपघात झालेचे सिध्‍द होणेसाठी एफआयआर किंवा पंचनामा पाहिजेच असे नाही. तसेच सर्व्‍हेअर यांनी अपघात झालाच नाही असे कुठेही नमुद केलेले नाही. सबब सामनेवालांचा सदरचा आक्षेप हे मंच फेटाळणेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           सामनेवाला यांचे सर्व्‍हेअर यांनी त्‍यांचे सर्व्‍हे अहवालावर पान नं.3 वर खालील मजकूराची नोंद केलेली आहे.
 
Assessment of loss is subject to submission and verification of final bills and/or cash memos. We inspected the damages which were conforming to the nature of accident described in the claim form. At the time of policy issuing breaking inspection was conducted and found that vehicle is different than the actual vehicle(we found that vehicle load body angles are different, front bumper white tape position found different, Vehicle Reg number plate fonts are different, load body stickering and number plate distance is different, Goods carrier lettering on roof top is not on break in photo, leaf spring broken on chassis number photo, rear parking sticker was different) Hence the liability of insured is left to insurance co. This is for your kind information. This report has been issued without prejudice, Subject to the terms and conditions of the policy.  
   
           सदर मजकुराचे आधारे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम दि.27/05/11 रोजीचे पत्राने तक्रारदारास क्‍लेम नामंजूर केलेचे व सदरचा क्‍लेम Misrepresentation of Factsया कारणास्‍तव नामंजूर केलेचे तक्रारदारास कळविले आहे.वस्‍तुत:विमा पॉलीसीच्‍या सत्‍यप्रतीवरुन नमुद पॉलीसीमध्‍ये वाहनाचा नंबर, मेक इत्‍यादी नमुद आहे. सर्व्‍हे रिपोर्टमधील पान क्र.1 वरील क्‍लॉज 4 मधील सर्व्‍हेअर यांनी नमुद केलेला वाहनाचा नंबरही तोच आहे. तसेच इंजिन नंबरही तोच आहे. यावरुन विमा उतरविलेल्‍या वाहनाचा अपघात होऊन त्‍याची नुकसानी झालेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तरीही सर्व्‍हेअर यांनीही क्‍लेम फॉर्ममध्‍ये नमुद वाहन अपघाताचे वर्णनावरुन तपासणी केलेली आहे. तसेच पॉलीसी इश्‍यु करतानाचे वर्णन व सदर वर्णनात वर नमुद केलेप्रमाणे फरक आहे. यामध्‍ये रजिस्‍टर नंबर प्‍लेट,रुफ, तसेच अन्‍य बाबीबाबत बदल असलेबाबतचा आक्षेप नोंदवलेला आहे. वस्‍तुत: वाहन नंबर, इंजिन नंबर, चेसीस नंबर यावरुन वाहन तेच आहे की नाही याची खात्री केली जाते. प्रस्‍तुत प्रकरणी सर्व्‍हेअर यांनी नोंदणी केलेनुसार विमा उतरविलेले वाहन व अपघात झालेले वाहन एकच असलेचे निदर्शनास येते.  वर नमुद नंबर प्‍लेट व अन्‍य अनुषंगीक वाहनामध्‍ये असलेले बदल केले असतील तर ते वाहन विमा उतरविलेले वाहन नाही असे म्‍हणता येणार नाही. तसेच आश्‍चर्याची बाब अशी आहे की, दाखल विमा पॉलीसीवर वाहनाचा चेसीस नंबर हा 25722 आहे.  तर सर्व्‍हेअर यांनी नमुद केलेल्‍या अहवालामध्‍येही तोच नंबर नमुद आहे. तरीही प्रस्‍तुतचे वाहन हे विमा उतरविलेले वाहन नाही अथवा अपघातग्रस्‍त वाहन नाही या म्‍हणणेस कोणताही संयुक्तिक आधार नाही. याउलट दाखल प्री इन्‍व्‍हाईस, रजिस्‍ट्रेशन सर्टीफिकेट, विमा पॉलीसी मधील वर नमुद वाहनाचा इंजिन नंबर, चेसीस नंबर, रजिस्‍ट्रेशन नंबर एकसारखा आहे तसेच अपघातग्रस्‍त वाहनाचा नंबरही तोच आहे. यावरुन विमा उतरविलेल्‍या वाहनाचा अपघात होऊन त्‍याची नुकसानी झालेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.   
 
           विमा कालावधीत नमुद वाहनाचा अपघात होऊन नुकसान झालेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे नांवे पॉलीसी दिली असलेने या कृतीच्‍या मागे त्‍यांना जाता येणार नाही. सबब सर्व्‍हे रिपोर्टनुसार वाहनाची नुकसानीची रक्‍कम तक्रारदारास अदा न करुन सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.त्‍यामुळे महेंद्र बी.पाटील या सर्व्‍हेअर यांनी नुकसानीची निश्चित केलेली रक्‍कम रु.92,425/- क्‍लेम नाकारले तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारुन सेवात्रुटी केल्‍यामुळे तक्रारदार झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)  सामनेवाला यांनी तक्रारदारास महेंद्र बी. पाटील यांचे सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे रक्‍कम रु. 92,425/-(रु.ब्‍यान्‍नव हजार चारशे पंचवीस फक्‍त) दि.27/05/2011 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजासह दयावी.
 
3) सामनेवाला यांनी तकारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु एक हजार फक्‍त) अदा करावेत. 
 
 
 
[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.