::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/01/2018 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणात, अर्जदार/तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी, दिनांक 23/01/2018 रोजी, पुरसिस रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
मी नियोजोद्दीन पिता रियाजोद्दीन सदर प्रकरणात तक्रारदार आहे. सदर प्रकरणातील विरुध्द पक्षांनी माझेसोबत कोर्टाबाहेर आपसात केले आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण आता मला पुढे चालवायचे नाही. सदरचे प्रकरण आपसात झाल्याची नोंद घेण्यात यावी व प्रकरणात त्यानुसार आदेश पारित करण्यात यावा.
अशास्थितीत, सदर तक्रार प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri