नि.19 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 53/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.24/09/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.14/12/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या नाझीम सत्तार पडवेकर रा.एक्स-50, रिलायन्स सोलार एनर्जी, एम.आय.डी.सी.झाडगांव, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. जनरल मॅनेजर, भारत संचार निगम लि., संचार भवन, खारेघाट रोड, ता.जि.रत्नागिरी. 2. मॅनेजर (आय.टी) मे.व्हिफ्रो कंपनी, पुणे व्हिफ्रो बीपीओ, प्लॉट नं.2, एम.आय.डी.सी. पुणे, इन्फोटेक पार्क, हिंजवाडी, पुणे – 411 057. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.आर.आर.नाचणकर सामनेवाले क्र.1 तर्फे विधिज्ञ श्री.आर.एस.रेडीज सामनेवाले क्र.2 तर्फे : एकतर्फा -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.अध्यक्ष, श्री.अनिल गोडसे 1. तक्रारदार यांनी सदरची तक्रार त्यांच्या दूरध्वनी संचाबाबत व त्या अनुषंगाने आलेल्या बिलाबाबत दाखल केली आहे. 2. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज दाखल करुन घेतल्यानंतर सामनेवाला यांना याकामी म्हणणे देण्यासाठी नोटीस काढण्यात आली. सामनेवाला क्र.2 हे नोटीस मिळूनही याकामी हजर राहिले नाहीत म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर करण्यात आला. सामनेवाला क्र.1 यांनी याकामी हजर होवून नि.14 वर प्राथमिक मुद्दा काढण्यासाठी अर्ज सादर केला. त्याबाबत तक्रारदार यांनी नि.17 वर म्हणणे सादर केल्यानंतर, “ प्रस्तुतची तक्रार चालविण्यास या मे.मंचाला न्यायाधिकार आहे का ?”असा प्राथमिक मुद्दा काढण्यात आला व त्याबाबत तक्रारदार व सामनेवाला यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. 3. सामनेवाला यांनी आपल्या युक्तिवादामध्ये टेलिफोन अथवा मोबाईल बिल अथवा त्यासाठी वापरण्यात येणारे संच याबाबत कोणताही वाद उपस्थित झाल्यास तो वाद सोडविण्याचा अधिकार या न्यायमंचास नाही असा निर्वाळा सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज चालविण्यास या मंचास न्यायाधिकार नाहीत असे आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले व सोबत सन्मा.सर्वोच्च न्यायालयाचा General Manager, Telecom V/s. M.Krishnan & Anr. 2009 CTJ 1062 Supreme Court (CP) हा निवाडा दाखल केला. सदर निवाडयामध्ये सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने पुढीलप्रमाणे निष्कर्ष नोंदविला आहे. “In our opinion when there is a special remedy provided in Section 7-B of the Indian Telegraph Act regarding disputes in respect of telephone bills, then the remedy under the Consumer Protection Act is by implication barred.” 4. तक्रारदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये तसेच म्हणण्यामध्ये सदरचा वाद हा मोबाईल संच व त्याबाबतच्या सुविधेबाबत असून सदरचा निर्णय या तक्रार अर्जास लागू होणार नाही असे नमूद केले. सदर निवाडयाचे अवलोकन केले असता सदर निवाडयामध्ये तसेच Telegraph Act मध्ये Section 7-B पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. Arbitration of Disputes – Except as otherwise expressly provided in this Act, if any dispute concerning any telegraph line, appliance or apparatus arises between the telegraph authority and the person or whose benefit the line, appliance or apparatus is, or has been provided, the dispute shall be determined by arbitration and shall, for the purpose of such determination, be referred to an Arbitrator appointed by the Central Government either specifically for the determination of that dispute or generally for the determination of disputes under this section. तसेच The Indian Telegraph Act 1855 मधील कलम 3(1) मध्ये Telegraph ची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. “Telegraph means any appliance, instrument, material or apparatus used or capable of use for transmission or reception of signs, signals, writing , images and sounds or intelligence of any nature by wire, visual or other electro-magnetic emissions, Radio waves or Hertzian wares galvanic, electric or magnetic means. ” सदर व्याख्येचे अवलोकन केले असता मोबाईल संच हा टेलिग्राफ ऍक्टमधील टेलिग्राफच्या व्याख्येनुसार Telegraph appliance or apparatus या सदरात येईल व त्याबाबतचा वाद सोडविण्याची तरतूद कलम 7-B नुसार Arbitrator ला आहे असे दिसून येते. 5. सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदार यांच्या मोबाईल संच व त्या अनुषंगाने आलेले बिल याबाबतचा वाद चालविण्यास या मंचास न्यायाधिकार नाही असे दिसून येते. सबब सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश प्रस्तुतचा तक्रार अर्ज चालविण्यास या मंचास न्यायाधिकार नसल्याने प्रस्तुतचा तक्रार अर्ज निकाली करण्यात येत आहे. रत्नागिरी दिनांक : 14/12/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |