:: आदेश निशाणी 1 वर ::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन. कांबळे ,मा.अध्यक्ष, प्रभारी)
(पारीत दिनांक :07 एप्रिल, 2012)
1. अर्जदार/तक्रारकर्त्याने सदर दरखास्त ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-27 अंतर्गत गैरअर्जदाराचे विरुध्द ग्राहक तक्रार क्रमांक-105/2008 निकाल पारीत दिनांक-31.05.2010 मधील आदेशाचे अनुपान न केल्यामुळे, कारवाई होण्या करीता दाखल केलेली आहे.
दरखास्त क्रं-18/2010
2. सदर दरखास्त, अर्जदाराचे कारवाई करीता प्रलंबित असून, अर्जदार सतत न्यायमंचा समक्ष गैरहजर. अर्जदाराने कुठलीही कारवाई दरखास्त पुढे चालविण्या बाबत, गैरअर्जदार यांचे विरुध्द केलेली नाही.
3. दरखास्त प्रकरणातील अभिलेखाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार यांनी, मूळ तक्रार क्रमांक-105/2008 निकाल पारीत दिनांक-31.05.2010 मधील आदेशाचे पालन करुन, मंचात रुपये-1,37,841/-अंडर प्रोटेस्ट म्हणून जमा केलेले आहे. गैरअर्जदाराने मंचाचे मूळ तक्रारीतील आदेशाचे विरुध्द ,अपिल , मा.राज्य आयोगा समोर दाखल केले असल्यामुळे सदरची रक्कम मूळ तक्रारदारास देऊ नये, अशा आशयाचा अर्ज मंचा समक्ष दिनांक 24.06.2011 रोजी केला, गैरअर्जदाराचे सदर अर्जावर अर्जदाराचे म्हणणे, अर्जदार गैरहजर असल्यामुळे नोंदविता आले नाही. मंचाने सदरची रक्कम पी.एल.ए. अकाऊंटला जमा करण्याचे आदेशित केले, त्याप्रमाणे सदर रक्कम जमा करण्यात आली. परंतु त्यानंतर अर्जदार सतत न्यायमंचा समक्ष गैरहजर आहे.
4. यावरुन अर्जदाराला प्रस्तुत दरखास्त, गैरअर्जदाराचे विरुध्द चालवावयाची नाही, असे दिसून येत असल्याने आणि अर्जदार मंचा समक्ष सतत गैरहजर असल्यामुळे दरखास्त Dismissed in Default म्हणून काढून टाकून, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
(1) अर्जदाराची दरखास्त खारीज .
वर्धा
दि.07/04/2012