जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 28/2015 तक्रार नोंदणी दि. :-12/8/2015
तक्रार निकाली दि. :- 30/08/2016
निकाल कालावधी :-1 वर्ष 18 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्री.शंकर हरीपद डे,
वय अंदाजे 56 वर्षे, धंदा-नोकरी,
राह.कालीमाता मंदीराजवळ, नागेपल्ली,
तहसिल अहेरी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) महाव्यवस्थापक,
चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी मर्या.,
2 रा माळा, डेअर हाऊस, 2 एनएससी बोस रोड,
चेन्नई-600 001.
(2) शाखा व्यवस्थापक,
चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लि,
प्रयाग इन्क्लेव्ह प्लॉट नंबर 17-1 ला माळा,
शंकर नगर, सन्मान लॉन जवळ, नागपूर,
तहसिल व जिल्हा नागपूर.
(3) श्री. शेख जाकीर शेख रमजान, एजन्ट,
चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लि,
ताज मोटर्स, अहेरी रोड, आलापल्ली,
तहसिल अहेरी, जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.सिध्दार्थ मांगे
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे :- एकतर्फा
गैरअर्जदार क्र.3 तर्फे :- अधि.श्री.के.आर.रासपेल्ली
गणपूर्ती :- (1) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, अध्यक्ष (प्र.)
(2) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.झवेरी, अध्यक्ष (प्रभारी))
(पारीत दिनांक : 30 ऑगष्ट 2016)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने, खाजगी वापराकरीता टाटा इंडिगो ecs Lx ही कार खरेदी केली असून, सदर गाडीचा क्रमांक MH-33-a-2968 असा आहे व श्री.साजीद खान रहीम खान पठाण यांना ड्रायव्हर म्हणून ठेवले आहे. अर्जदाराने कार खरेदी करतेवेळी गैरअर्जदार कंपनीचा, गैरअर्जदार क्र.3 कडून दिनांक 19.3.2015 ते 18.3.2016 या कालावधीकरीता विमा घेतला असून, सदर विम्याचा क्रमांक 3362/00899933/000/01 असा आहे. दिनांक 6.4.2015 रोजी अर्जदाराचा ड्रायव्हर उपरोक्त कारने आलापल्ली वरुन एटापल्ली येथे जात असतांना मौजा गड्डीगुडम जवळ विरुध्द बाजूने येणा-या वाहनाने, अर्जदाराच्या वाहनास ठोस मारली व अर्जदाराची कारण रोडच्या बाजूला असलेल्या झाडावर जावुन आदळली. सदर अपघातामध्ये अर्जदाराचे कारचा चुराडा होऊन नुकसान झाले. सदर बाब अर्जदाराने फोनव्दारे गेरअर्जदार क्र.1 व 2 यांना कळविली. गैरअर्जदारांनी अपघातग्रस्त कार खामला मोटर्स, नागपूर येथे इन्स्पेक्शनकरीता जमा करण्यास सांगितल्यावरुन, अर्जदाराने सदर कार जमा केली. खामला मोटर्स, नागपूर यांनी कारचे इन्स्पेक्शन करुन जॉब कार्ड व इस्टीमेट अर्जदारास दिले व तीन आठवडयाचे स्टॅन्डींग चार्जेस रुपये 26,600/- अर्जदाराकडून वसूल केले. त्याचप्रमाणे, अपघातग्रस्त कार नागपूर नेणे व परत आणणे करीताचा वाहतुक खर्च रुपये 20,000/- अर्जदाराला करावा लागला. अर्जदाराने सदर कारचा अपघात विमा रक्कम रुपये 4,75,000/- मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.1 कडे प्रस्ताव सादर केला. खामला मोटर्स, नागपूर यांनी इन्स्पेक्शन करुन जॉब कार्ड व इस्टीमेट रुपये 5,93,100/- चे दिलेले आहे जे विमा रकमेपेक्षा जास्त आहे. परंतु, अर्जदाराने विम्याची रक्कम रु.4,75,000/- क्लेम केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी दिनांक 13.6.2015 चे पत्रान्वये, अर्जदाराने सदर वाहन बाकर नावाचे व्यक्तीस विकल्याचे कारण दाखवून विमा क्लेम नाकारला. अर्जदाराने सदर कार कोणालाही विकली नसून आजही ती अर्जदाराचे नावावर आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कारच्या विम्याची रक्कम न दिल्यामुळे, अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने कार अपघात विमा रक्कम रुपये 4,75,000/-, स्टॅन्डींग चार्जेस रुपये 26,600/-, कार वाहतुक खर्च रुपये 20,000/- तसेच, विम्याचे रकमेवर 24 टक्के व्याज व मानसिक ञासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 10 झेरॉक्स व मुळ दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी नोटीस प्राप्त होऊनही मंचासमोर हजर झाले नाही व लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे, त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.14 प्रमाणे लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.14 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदार क्र.3 ने पुढे त्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र.3 हे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीचे एजन्ट असून, त्याने अर्जदाराचे विमा प्रिमियमची रक्कम भरलेली आहे. त्यामुळे, अर्जदार अपघात विमा मिळण्यास पात्र असून, विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांची आहे.
4. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.3 ने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 चा ग्राहक आहे काय ? : नाही
3) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
4) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
5) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने दाखल केलेले नि.क्र.4 वरील दस्ऐवज क्र.1 नुसार विमा पॉलिसी काढली आहे व सदर विमा पॉलिसीचे प्रिमियम सुध्दा भरलेले आहे, म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे, हे सिध्द होते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराची तक्रार दाखल झाल्यानंतर गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.3 ने हजर होऊन आपले उत्तर दाखल केले व नमुद केले की, तो फक्त गैरअर्जदार क्र.1 व 2 चा एजन्ट आहे व विमा रक्कम देण्याची त्याची जबाबदारी नाही. तसेच, गैरअर्जदार क्र.3 च्या विरुध्द कुठलीही सेवा त्रृटी दिल्याबाबत किंवा अनुचित व्यापार पध्दती अवलंबिल्याबाबत तक्रारीत उल्लेख नसल्यामुळे व गैरअर्जदार क्र.3 विरुध्द कोणतीही मागणी केली नसल्यामुळे, गैरअर्जदार क्र.3 ने कुठलीही त्रृटीपुर्ण सेवा किंवा अनुचित व्यापार पध्दती अवलंबिली नाही, हे सिध्द होते.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना वारंवार संधी देवूनसुध्दा मंचासमोर हजर न झाल्यामुळे, त्यांचेविरुध्द नि.क्र.1 वर प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश दिनांक 7.11.2015 ला पारीत करण्यात आले.
गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नोटीस मिळून सुध्दा व वारंवार संधी देवूनसुध्दा उत्तर दाखल केले नसल्यामुळे तसेच नि.क्र.20 नुसार पुरशिस व नि.क्र.21 नुसार पुरशिस व पुरशिसवर शपथपत्र दाखल करुन पुरशिस नुसार गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने मा.राज्य आयोगाकडे नि.क्र.1 वरील एकतर्फी आदेशाविरुध्द अपील केल्याचे कथन केले आहे. परंतु, दिनांक 21.12.2015 ते 25.8.2016 पर्यंत मा.राज्य आयोगाचे कुठलेही स्थगिती आदेश दाखल केले नाही किंवा त्याबाबत कुठलेही लेखी, तोंडी वक्तव्य मंचासमोर हजर होऊन केले नाही. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 व 2 हे सदर तक्रारीतील नि.क्र.1 च्या एकतर्फी आदेशावर स्थगिती आहे किंवा कसे ? हे सिध्द करु न शकल्यामुळे या मंचाव्दारे सदर तक्रार अंतिम आदेशाकरीता ठेवण्यात आली. वरील कारण मिमांसावरुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी, अर्जदारास न्युनतापुर्ण सेवा देण्याचे प्रयत्न चालविले आहे, हे सिध्द होते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन व गैरअर्जदार क्र.1 व 2 ने हजर न होऊन हे सिध्द केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 ने अर्जदारास न्युनतापुर्ण सेवा दिली आहे व अनुचित व्यापार पध्दती अवलंबलेली आहे.
अर्जदाराचे दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते की, अर्जदार हा विमा दावा प्राप्त करण्यास पात्र आहे व म्हणून वरील सर्व मुद्दयांच्या विवेचनावरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
4,75,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 30.8.2016.
( रोझा फु.खोब्रागडे ) (सादिक मो.झवेरी)
सदस्य अध्यक्ष (प्र.)