मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 149/2011 तक्रार दाखल दिनांक – 21/07/2011 निकालपत्र दिनांक – 23/09/2011 श्री. रघुनाथ गणपती दुधडे, श्री दुर्गा कॉम्प्लेक्स, बी-303, सेक्टर 3, प्लॉट नंबर 4, घणसोली, नवी मुंबई 400 701. ........ तक्रारदार विरुध्द
जी मनी फायनान्स, श्री महालक्ष्मी इंजिनिअरींग इस्टेट, 11 फर्स्ट क्रॉस रोड, माहिम (पश्चिम), मुंबई 400 016. ......... सामनेवाले समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – तक्रारदार स्वतः हजर विरुध्दपक्ष गैरहजर (एकतर्फा) निकालपत्र – एकतर्फा द्वारा - मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी नमूद केले आहे की, त्यांना गैरअर्जदार यांनी दूरध्वनीद्वारे कर्ज घेण्याचे आमिष दाखविले व रुपये 70,500/- कर्ज दिले. सदर कर्ज हे एकूण 36 मासिक हप्त्यात व्याजासह फेडायचे होते. सदर कर्जाच्या परतफेडीचा मासिक हप्ता रुपये 3,122/- चा होता. सदर कर्जाच्या 3 टक्केप्रमाणे रुपये 3,122/- चा हप्ता कापून दिनांक 30/03/2007 रोजी रुपये 67,687/- चा चेक तक्रारदाराच्या घरी पाठविला. दिनांक 8/05/2007 रोजी त्याच्या खात्यातून कर्जाचा पहिला मासिक हप्ता गेला. तक्रारदार यांनी नमूद केले आहे की, त्यांचे सातारा बँकेत बचत खाते होते व गैरअर्जदार हे परस्पर चेकद्वारे घेत होते. तरी सुध्दा गैरअर्जदार यांचेमार्फत बळजबरीने कर्जाची रक्कम थकीत नसतांनाही वसूल करीत आहेत. तसेच त्याच्या घरी येऊन गोंधळ घालून धमकी देत आहेत. तक्रारदार यांनी नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांचे कार्यालय हे बंद झाले होते. तक्रारदार यांनी नमूद केले आहे की, त्यांनी संपूर्ण रक्कम भरलेली आहे त्यामुळे प्रस्तुत तक्रारीत कर्ज खाते बंद करण्याबाबत विनंती केलेली आहे. 2) प्रस्तुत प्रकरणात मंचामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार हे मंचाची नोटीस मिळूनही हजर झाले नाहीत. तसेच सदर नोटीस मिळाल्याबाबतची पोचपावती अभीलेखात उपलब्ध आहे. सदर नोटीस गैरअर्जदार यांना दिनांक 1 ऑगस्ट 2011 रोजी मिळाल्याबाबत पावतीवर शेरा मारलेला आहे. गैरअर्जदार हे मंचात हजर न झाल्यामुळे मंचाने गैरअर्जदार यांचेविरुध्द दिनांक 08.09.2011 रोजी तक्रार एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित केला होता. सदर प्रकरणात तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज, सत्यप्रतिज्ञा पत्रावर पुरावा दाखल केलेला आहे. 3) प्रस्तुत प्रकरण मंचासमक्ष दिनांक 23/09/2011 रोजी मौखिक युक्तीवादाकरीता आले असता तक्रारदार स्वतः हजर. त्यांचा मौखिक युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज म्हणजेच तक्रार, प्रतिज्ञापत्रावरील पुराव्याचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षावर येत आहे.
- निष्कर्ष - तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, मार्च 2007 मध्ये गैरअर्जदारामार्फत दूरध्वनीद्वारे कर्ज देण्याबाबत प्रस्ताव केला होता. त्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला रुपये 70,500/- एवढे कर्ज दिले होते, व त्याऐवजी तक्रारदाराकडून 36 कोरे चेक घेण्यात आले होते. सदर कर्जाचा परत फेडीचा हप्ता प्रती महा रुपये 3,122/- ठरविण्यात आला होता. तक्रारदाराने नमूद केले आहे की, त्यांनी एकूण 25 हप्ते भरलेले आहेत. त्या 25 हप्त्यांची एकूण रक्कम रुपये 78,050/- एवढी भरलेली आहे. तक्रारदाराने नमूद केलेले आहे की, त्यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम स्वीकारलेली आहे तरी त्यांना गैरअर्जदार यांचेमार्फत बळजबरीने व्याज व कर्जाची रक्कम मागत आहेत.
मंचाने प्रस्तुत तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रार सत्य प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेली आहे. तसेच तक्रारीसोबत तक्रारदाराचे सातारा बँकेतील बचत खाते उतारा दाखल केलेला आहे. त्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी बचत खात्यात दर वेळेस कर्ज परतफेडीचे एकूण 25 मासिक हप्ते भरलेले आहेत. तसेच तक्रारदार यांनी दिनांक 27/12/2010 रोजी नोंदणीकृत डाकेद्वारे पत्र पाठविले आहे, त्याची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी मंचाची नाटीस मिळूनही व संधी देऊनही गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले नाही त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, दस्तऐवज व प्रतिज्ञापत्राचा विचार केला असता मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत. - अंतिम आदेश - 1) तक्रारदार यांची तक्रार क्रमांक 149/2011 अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदाराच्या खात्यातील कोणतीच रक्कम मागू नये व खाते बंद करावे. 3) गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारदाराला शारिरीक मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रुपये 5,000/- (रुपये हजार पाचशे फक्त) द्यावेत. 4) गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला तक्रारीच्या न्यायिक खर्चापोटी नुकसानभरपाई रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत. 4) गैरअर्जदार यांनी सदर आदेशाची पूर्तता आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी. 5) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. ( सदर आदेश तक्रारदाराच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकल्यानंतर लगेच मंचाच्या बैठकीत देण्यात आला.) दिनांक – 23/09/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./-
| [ SMT.BHAVNA PISAL] MEMBER[HONABLE MR. MR. NALIN MAJITHIA] PRESIDENT | |