Maharashtra

Chandrapur

CC/19/150

Anil Ramnarayan Panday - Complainant(s)

Versus

Gayatri Tyres & Battery - Opp.Party(s)

Adv. Sandesh G. Haste

27 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/150
( Date of Filing : 14 Nov 2019 )
 
1. Anil Ramnarayan Panday
R/o Sontoshimata Ward Ballarpur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Gayatri Tyres & Battery
Near Dr.Mehra Hospital Civil Lines Nagpur Road Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Apr 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                    (पारीत दिनांक २७/०४/२०२२ )

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे  कलम ३५ सह कलम ३८ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हा बल्‍लारपूर येथील रहिवासी असून विरुध्‍द पक्ष हे मॉ. गायञी टायर्स अॅन्‍ड बॅटरीज या नावाने गाडीचे टायर्स खरेदी विक्री करण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारकर्त्‍याकडे चारचाकी बोलेरो वाहन क्रमांक एम.एच. ३४/बी.बी. १२२९ याकरिता दोन चाकाची आवश्‍यकता होती त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे ब्रीज स्‍टोन व अल्‍ट्रामाईल हे चाक चांगले असल्‍यामुळे त्‍या  चाकाची मागणी केली परंतु सदर चाक विरुध्‍द पक्षाकडे नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी विटोर गॅलक्‍सी टायर्स चांगले आहे असे सांगून सदर टायरची एका वर्षाची वॉरंटी किंवा ६०,०००/- किलोमीटर यापैकी जे अगोदर येईल ते असे सांगितले तसेच वरील टायरला एका वर्षाच्‍या आत काही झाल्‍यास बदलवून देण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष यांची राहील. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍या  बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून दिनांक २६/६/२०१९ रोजी विटोर गॅलक्‍सी टायर २१५/७५/१५ हे दोन टायर नगदी खरेदी केले व त्‍याचे रुपये ९,२००/- विरुध्‍द पक्ष यांना  दिले. टायर खरेदी करतांना तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना वॉरंटी कार्डची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्ष यांनी कार्ड देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यानंतर दिनांक ३/७/२०१९ रोजी तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा दोन टायर नगदी खरेदी केले त्‍याचे सुध्‍दा वॉरंटी कार्ड विरुध्‍द पक्ष यांनी दिले नाही. परंतु त्‍यानंतर दोन्‍ही उपरोक्‍त तारखेला खरेदी केलेले टायर दोन महिण्‍यात खराब झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ९/९/२०१९ रोजी विरुध्‍द पक्ष यांच्‍या दुकानात जावून तक्रार केली. विरुध्‍द पक्ष यांच्‍या व्‍यक्‍तीने सांगितले की, दिनांक २६/६/२०१९ रोजी खरेदी केलेले टायर ९० टक्‍के खराब झालेले आहे तर दिनांक ३/७/२०१९ रोजी खरेदी केलेले टायर ७० टक्‍के खराब झालेले आहे. सबब तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांनी दिलेल्‍या हमी प्रमाणे टायर बदलवून मागितले असता फक्‍त दोन टायर बदलवून देतो असे सांगितले. बाकीचे दोन बदलवून देत नाही काय करायचे ते करुन घ्‍या असे म्‍हटले. तक्रारकर्त्‍याचे पुढे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्ता सदर वाहन वैयक्तिक कामाकरिता वापरतो. टायर घेतल्‍यापासून वाहन १००००/- ते १२०००/- किमी चालले आहे. विरुध्‍द पक्ष यांनी दिलेल्‍या  टायरच्‍या हमीप्रमाणे टायर बदलवून देणे आवश्‍यक होते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठवून टायर बदलवून देण्‍यास सांगितले परंतु नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांनी उत्‍तर दिले नाही. सबब तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार विरुध्‍द पक्ष यांनी अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन सेवेत ञुटी केल्‍यामुळे दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याची मागणी अशी आहे की, दिनांक २६/६/२०१९ व दिनांक ३/७/२०१९ रोजी विरुध्‍द पक्षाकडून विकत घेतलेले टायर्स अनुचित व्‍यापार पध्‍दतीव्‍दारे विक्री केले आहे तसेच उपरोक्‍त टायर्स बदलवून नवीन टायर्स तक्रारकर्त्‍याला द्यावे किंवा त्‍यांची किंमत रुपये १८,५००/- व त्‍यावर १८ टक्‍के व्‍याजासह परत करावे असा आदेश व्‍हावा तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक शारीरिक ञासापोटी रुपये ५०,०००/- तक्रारकर्त्‍याला द्यावे.
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित राहून प्राथमिक आक्षेप घेतला की, या प्रकरणातील विरुध्‍द पक्ष मॉ. गायञी टायर्स ऍन्‍ड बॅटरीज चा मालक भागीदार हा नाही तसेच श्री संजय पालपत्‍तुवार यांचा तथाकथीत मॉ. गायञी टायर्स अॅन्‍ड बॅटरीजशी कोणताही संबंध नाही. सबब हा ग्राहक वाद योग्‍य व्‍यक्‍तीला पार्टी न केल्‍यामुळे प्राथमिकदृष्‍ट्या खारीज होण्‍यास पाञ आहे. तसेच प्रकरणातील तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी कोणतेही टायर्स विकलेले नसल्‍यामुळे येथे ग्राहक विक्रेता संबंध येत नसल्‍यामुळे या न्‍यायालयाला हा वाद चालविण्‍याचे अधिकार नाही. सबब तक्रार खारीज करण्‍यात यावी. विरुध्‍द पक्ष यांनी पुढे त्‍याच्‍या लेखी कथनात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हे मॉ. गायञी टायर्स अॅन्‍ड बॅटरीज या नावाने गाडीचे टायर्स खरेदी विक्री करण्‍याचा व्‍यवसाय करीत आहे परंतु श्री संजय पालपत्‍तुवार हा या व्‍यवसायाचा मालक नाही. वास्‍तविक तक्रारकर्त्‍याने व्‍यक्‍तीगत दुश्‍मनीकरिता या प्रकरणामध्‍ये श्री संजय पालपत्‍तुवार या व्‍यक्‍तीला तो मॉ. गायञी टायर्स अॅन्‍ड बॅटरीज चा मालक नसतांना गुंतविले आहे. वास्‍तविक तक्रारकर्ता हा बेकायदेशीरपणे टॅक्‍सी परवाना नसतांना टॅक्‍सीचा व्‍यवसाय करतात. श्री संजय पालपत्‍तुवार यांचा टॅक्‍सीचा व्‍यवसाय असून बरेचदा विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे जात असतात तसेच टॅक्‍सी वाहन लोकांना उपलब्‍ध करुन देण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष त्‍याचा जागेचा वापर करतात. सबब श्री संजय पालपत्‍तुवार सोबत तक्रारकर्त्‍याने दुरध्‍वनीवर किंवा व्‍हॉट्स अॅप वर कोणतीही देवाणघेवाण केली नाही.तक्रारकर्त्‍याने पाठविलेल्‍या नोटीसवर श्री संजय पालपत्‍तुवार यांचे नाव नमूद असल्‍यामुळे सदर नोटीस त्‍यांना दिला ते टॅक्‍सीचा व्‍यवसाय अधिकृत जी.एस.टी. परवाना आहे. याशिवाय ते बुकींगकरिता मॉ. गायञी टायर्स अॅन्‍ड बॅटरीज या दुकानाचा नियमीत वापर करतात कारण ही जागा मुख्‍य रस्‍त्‍यावर आहे. विद्यमान न्‍यायालयाकडून प्राप्‍त नोटीसचे पंजीबध्‍द डाकेने आलेल्‍या लिफाफ्यावर श्री संजय पालपत्‍तुवार यांचे नाव असल्‍यामुळे हा लिफाफा पोस्‍टमॅनने त्‍यांना दिला. परंतु या दाव्‍यातील विषयाशी श्री संजय पालपत्‍तुवार चा कोणताही संबंध नाही. श्री संजय पालपत्‍तुवार स्‍पष्‍ट करतात की, तक्रारकर्त्‍याने तथाकथीत टायर्स मध्‍ये निर्मिती दोष होता व त्‍या टायर्स चे वॉरंटी-गॅरंटी होती हे दर्शविणारे कोणतेही कागदपञे दाखल केलेले नाही किंवा कलम १३ ची पुर्तता केली नाही. सबब श्री संजय पालपत्‍तुवार यांचे विरुध्‍द तथाकथीत व्‍यवसायाचे मालक म्‍हणून ही तक्रार दाखल करण्‍याचे तक्रारकर्त्‍यास कोणतेही कायदेशीर कारण घडत नसल्‍यामुळे तसेच चुकीच्‍या व्‍यक्‍तीविरुध्‍द तक्रार दाखल करुन न्‍यायालयाचा दुरुपयोग केला असल्‍यामुळे कलम २६ अन्‍वये रुपये १०,०००/- दंड तक्रारकर्त्‍यावर ठोठवून दंडाची रक्‍कम श्री संजय पालपत्‍तुवार यांना नुकसान भरपाई म्‍हणून द्यावी.
  5. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर, दस्‍तावेज व लेखी उत्‍तर व दाखल केलेले दस्‍तावेज यातील मजकुराला त्‍यांचे शपथपञ समजण्‍यात यावे अशी पुरसीस दाखल तसेच परस्‍पर विरोधी कथनाचा सखोल विचार करुन न्‍यायनिर्णयासाठी आयोगाने खालिल कारणमीमांसा व निष्‍कर्षे विचारार्थ घेण्‍यात आले. 

 

 

कारणमीमांसा

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍द पक्ष यांचेकडून विकत घेतलेल्‍या विटोर गॅलक्‍सी या कंपनीचे टायर्स दोन महिण्‍यात पूर्ण खराब झाल्‍याने सदर टायर्स विरुध्‍द पक्ष यांनी बदलवून किंवा त्‍याचे पूर्ण पैसे परत करण्‍याची मागणी तक्रारीत केलेली आहे. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी मॉ. गायञी टायर्स अॅन्‍ड बॅटरीज चे ते मालक नसल्‍यामुळे सदर तक्रार त्‍याचे विरुध्‍द आयोगासमोर चालू शकत नाही असे नमूद केलेले आहे परंतु या मुद्दयावर सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने त्‍याचे स्‍पष्‍टीकरण शपथपञासह नमूद केले नाही. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांना विकलेल्‍या टायर्स कसे खराब झाले किंवा किती टक्‍के खराब झाले या बद्दल कोणताही खुलासा तक्रारीतकेला नाही तसेच टायर्समध्‍ये जर उत्‍पादकीय दोष असल्‍यास सदर टायर्सच्‍या उत्‍पादक कंपनीला सदर तक्रारीत पक्षकार केले नाही तसेच प्रकरणात विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याचे उत्‍तर दाखल केल्‍यावर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे खोडून काढायला शपथपञ दाखल करणे आवश्‍यक होते किंवा प्रकरणात तज्‍ज्ञ अहवाल दाखल करुन टायर्सचे किती प्रमाणात हानी झाली आहे याबद्दल तज्‍ज्ञ अहवाल शपथपञावर दाखल करणे अपेक्षित होते. तक्रारकर्त्‍याने प्रकरणात फक्‍त टायर्सचे पुराव्‍या दाखल बील दाखल केलेले आहे यावरुन टायर्स खराब झाले याबद्दल निष्‍कर्ष काढता येत नाही. मुळातच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या तक्रारीतील सर्व आक्षेप सबळ पुराव्‍यानीशी सिध्‍द करण्‍याची जबाबदारी तक्रारकर्त्‍याची आहे परंतु प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्ता त्‍याची तक्रार पुराव्‍यासह सिध्‍द करु शकले नाही. त्‍यामुळे तक्रार फेटाळणे उचित ठरेल या निष्‍कर्षाप्रत आयोग आले आहे. त्‍यानुसार खालिल आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. १५०/२०१९ खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.