Maharashtra

Nanded

CC/09/91

Md.Waheedullakhan S/o.Md.Saitulakhan - Complainant(s)

Versus

Ganpatrao Wagmare - Opp.Party(s)

ADV.A.N.Chanuhan

13 Jan 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/91
1. Md.Waheedullakhan S/o.Md.Saitulakhan Killa road NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Ganpatrao Wagmare nandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 13 Jan 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्र.379/2008 ते 384/2008 व 89/2009 ते 92/2009.
                           प्रकरण दाखल तारीख   - 02/12/2008
                           प्रकरण निकाल तारीख - 13/01/2010
 
समक्ष -   मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील            - अध्‍यक्ष.
         मा.श्री.सतीश सामते               - सदस्‍य.
 
1. वेदकंडयाळ पुन्‍नेम अन्‍नम (स्‍व.)           प्रकरण क्र.2008/379.  
वारस सुहास श्रीकृष्‍णराव पाटील                                        
    वय वर्षे 39 , धंदा नौकरी रा. नांदेड.
2.   सखाराम दत्‍ताञय देशमूख             प्रकरण क्र.2008/380. वय वर्षे निरंक, रा.ञिमूर्ती नगर, परभणी.
3. श्रीमती सायरा बेगम भ्र. अब्‍दुल लतीफ       प्रकरण क्र.2008/381.      
    तर्फे अब्‍दुल लतीफ पि.फकीर अहेमद
    वय वर्षे 62, धंदा निरंक 
    रा.रहेमत नगर, देगलूर नाका, नांदेड. .  
4. श्रीमती निर्मला भ्र. सॅमसन सायलस          प्रकरण क्र.2008/382.                       
    वय वर्षे 59,धंदा घरकाम,                     अर्जदार
    रा.भारत नगर, पावडेवाडी नाका, नांदेड.
5.   श्रीमती मिरा भ्र.बबन वैराळ,               प्रकरण क्र.2008/383.      
    वय, सज्ञान, धंदा घरकाम,
     रा.शासकीय रुग्‍नालय, निवासी क्‍वॉटर्स,नांदेड.
6.   गुलाबराव पांडूरंगराव बोदडे               प्रकरण क्र.2008/384.   
     वय,निरंक रा. पाटबंधारे नगर, नांदेड.
7.   सौ.गुरविंदर कौर भ्र.जसवंतसिंग भाटीया,     प्रकरण क्र.2009/89.          
     वय, 54 वर्षे, धंदा घरकाम,
     रा. गेट नंबर 1, गुरुद्वारा, नांदेड.
8.   सयद यासीन अली हाश्‍मी पि.सयद अफजल,प्रकरण क्र.2009/90.       वय, 64 वर्षे, धंदा निरंक,
     रा.घर नंबर 5-1-131, किल्‍ला रोड,गवळी गल्‍ली,
     आयना महल टेकडी, नांदेड.
9.   म.वहीदुल्‍लाखान पि. म.सजुल्‍लाखान,          प्रकरण क्र.2009/91. 
     वय, 59 वर्षे, धंदा निरंक,
     रा. ईनामदार गल्‍ली, किल्‍ला रोड, नांदेड.
10. अनिस अहमद फारुकी पि. गुलाम मुस्‍तफा,
    वय, 53वर्षे, धंदा नौकरी,                 प्रकरण क्र.2009/92.  
     रा. किल्‍ला रोड, नांदेड.
 
     विरुध्‍द.
 
1.   डॉ. गणपतराव वाघमारे,गणेश नगर, प्रकरण क्र.2008/379.        चेअरमन, राघवेंद्र नगर सहकारी                   ते 2008/384
     गृहनिर्माण संस्‍था लि.सांगवी ता. नांदेड.                व
2.   सौ.भाग्‍यलक्ष्‍मी दिनकरराव कोटलवार       प्रकरण क्र.2009/89 ते                  
     द्वारा डॉ. डी.एन.कोटलवार,सोमेश कॉलनी             2009/92
     प्रमूख एकता ट्रेडींग कंपनी व सर्वेसर्वा राघवेंद्र
     नगर गृहनिर्माण संस्‍था, सांगवी ता.जि.नांदेड
3.   शेख हूसेन शेख अहेमद बावजीर,
     द्वारा भाग्‍यलक्ष्‍मी कोटलवार सोमेश कॉलनी
     कला मंदिरच्‍या पाठीमागे, नांदेड
     (भागीदार एकता ट्रेडीग कंपनी)                     गैरअर्जदार
4.   सुभाष हौसाजीराव मंगनाळे
     वय सज्ञान, धंदा वकीली
 रा. नाईकनगर, नांदेड,
     (भागीदार एकता ट्रेडीग कंपनी)
5.   अजय गणपतराव वाघमारे
     वय, सज्ञान धंदा प्‍लॉटींग
     रा. गणेश नगर,नांदेड,
     (भागीदार एकता ट्रेडींग कंपनी)
6.   शाखा व्‍यवस्‍थापक,
     आय.एन.जी.वैश्‍य बँक,शाखा नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील                    - अड.ए.एन.चव्‍हाण
गैरअर्जदार क्र.1  तर्फे वकील             - अड.बी.व्‍ही.भूरे.
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील          - अड.एस.आर. धनकोट.
गैरअर्जदार क्र.4 व 5 तर्फे वकील          - अड.आर.एन.कूलकर्णी
गैरअर्जदार क्र.6 तर्फे वकील              - अड.पी.एस.भक्‍कड.
                           निकालपञ
             (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्‍य )
 
          सर्व अर्जदार हे वेगवेगळे जरी असले तरी सर्व गैरअर्जदार हे एकच आहेत व त्‍यांचे विरुध्‍द सर्व अर्जदार यांची तक्रार व मागणी सारखीच आहे. त्‍यामूळे वरील सर्व प्रकरणात आम्‍ही एकञित निकाल देत आहोत.
                   यातील तक्रारकर्ते हे गैरअर्जदार क्र.1 या सहकारी गृह निर्माण संस्‍थेचे सभासद आहेत. त्‍यांनी सदर संस्‍थेकडून भूखंड विकत घेतले आणि त्‍या बाबत त्‍यांना भूखंड मंजूर करण्‍यात आल्‍या बाबतची पञ संस्‍थेने दिले. पूढे त्‍याचे असेही म्‍हणणे आहे की, सदर संस्‍थेने प्रत्‍यक्ष त्‍यांना भूखंड ताब्‍यात दिले नाही. त्‍यांनी वेळोवेळी मागणी करुनही त्‍याचा उपयोग झाला नाही. पूढे तक्रारकत्‍याचे असे निवेदन आहे की, त्‍यांनी विकत घेतलेला भूखंड असलेली जागा ही विशेष भूसंपादन अधिका-याने विमान प्राधीकरणात संपादीत केली आणि सदर संपादीत भूखंडाची नूकसानीची, विशेष भूसंपादन अधिका-याने निर्धारित केलेली रक्‍कम ही गैरअर्जदार क्र.2 ते 5 यांनी एकता ट्रेडींग कंपनीचे भागीदार या नात्‍याने वीशेष भूसंपादन अधिका-याकडून स्विकारली. आणि विशेष भूसंपादन अधिका-यांना त्‍या संबंधी असे संमतीपञ दिले की, ज्‍या ज्‍या भूखंडधारकांचे भूखंड आहेत त्‍यांना त्‍यांची रक्‍कम ते देण्‍यास जबाबदार राहतील. या त्‍यांच्‍या आश्‍वासनामूळे भूसंपादन अधिका-याने ती रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 ते 5 यांना एकता ट्रेडींग कंपनीचे भागीदार म्‍हणून दिली. प्रत्‍यक्षात माञ सदर रक्‍कम भूखंडधारकांना वितरीत करण्‍याचे कबूल करुनही ती तक्रारकर्ता अर्जदार यांना देण्‍यात आली नाही. त्‍या संबंधी त्‍यांनी विविध प्रकारे मागण्‍या केल्‍या, मा. जिल्‍हाधिका-या कडे तक्रार केली, परंतु निष्‍पन्‍न झाले नाही आणि म्‍हणून ही तक्रार केली. अर्जदाराचे असेही निवेदन आहे की, गैरअर्जदार क्र.2 ते 5 आणि गैरअर्जदार क्र.1 चे पदाधिकारी ही एकमेकांशी संबंधीत आहेत आणि त्‍यांनी मिळून संगनमताने हा गैरव्‍यवहार केलेला आहे व रक्‍कमेचा अपहार केलेला आहे. सदरच्‍या भूखंडाची रक्‍कम त्‍यांना व्‍याजासह तसेच नूकसान भरपाईसह मिळावी किंवा पर्यायी प्‍लॉट मिळावा. त्‍यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासाबददल भरपाई मिळावी अशा मागण्‍या केल्‍या आहेत.
          गैरअर्जदारांना नोटीसा देण्‍यात आल्‍या, त्‍यांनी हजर होऊन आपले लेखी जवाब दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी आपला लेखी जवाब दाखल करुन, सदरचे प्रकरण चालविण्‍याचा अधिकार ग्राहक मंचास
नाही, हा विवाद सहकारी संस्‍था व तिचे सभासद यांच्‍यातील आहे म्‍हणून सहकारी न्‍यायालयाला या बाबत अधिकारक्षेञ आहे. यास्‍तव तक्रार खारीज व्‍हावी. त्‍यांनी असे मान्‍य केले की, ते एकता ट्रेडींग कंपनीचे भागीदार आहेत. त्‍यांनी 20.07.1983 रोजी सर्व्‍हे क्र. 26 मौजे महाळजा येथील 5 एकर जमीन विकत घेतली होती. पूढे ती जमीन विमानतळ विस्‍तारीकरणासाठी संपादीत करण्‍यात आली. नूकसानीची रक्‍कम एकता ट्रेडींग कंपनीच्‍या नांवे देण्‍यात आली. ज्‍यांना प्‍लॉट विक्री करण्‍यात आले आहे, त्‍यांनी त्‍यांच्‍या मालकीची नोंद भूमिअभिलेखात करण्‍यात आलेली नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या नूकसानीची रक्‍कम एकता ट्रेडींग कंपनीच्‍या नांवे देण्‍यात आली. ज्‍याची जमिन संपादीत करण्‍यात आली त्‍या भूखंडधारकाची नूकसानीची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी एकता ट्रेडींग कंपनीची आहे. तक्रारदार यांनी त्‍यांच्‍याकडून कोणताही प्‍लॉट खरेदी केलेला नाही म्‍हणून तक्रारदारांना ते जबाबदार नाहीत. व त्‍यांचे विरुध्‍द मागणी करता येणे शक्‍य नाही. एकता ट्रेडींग कंपनी व राघवेंद्र नगर को आपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी या वेगवेगळया संस्‍था आहेत. त्‍यांचे एकमेकांशी काही संबंध नाही. तक्रार मूदतीत नाही. सबब ती खारीज व्‍हावी असा उजर घेतला.
          गैरअर्जदार क्र.4 व 5 यांनी आपला लेखी जवाब दाखल करुन त्‍याद्वारे वरील प्रकारचे सर्व आक्षेप घेऊन असे नमूद केले की, ते तक्रारदारांना कोणतीही सेवा देण्‍यास जबाबदार नाहीत. तक्रारदार केवळ गैरअर्जदार क्र.1 चे सभासद आहेत असे दिसते. त्‍यांनी तक्रारदाराकडून कोणताही मोबदला घेतलेला नाही. तक्रार ही पूर्ण गैरकायदेशिर व चूकीच्‍या पध्‍दतीने दाखल करण्‍यात आलेली आहे. यास्‍तव तक्रार खारीज करावी.
          गैरअर्जदार क्र.1 यांनी हजर होऊन आपला लेखी जवाब दाखल केला आणि सदरचे प्रकरण हे महाराष्‍ट्र सहकारी न्‍यायालयाच्‍या अधिकारक्षेञातील आहे. मंचास अधिकारक्षेञ नाही. अर्जदार हे ग्राहक नाही ते सभासद आहेत. गैरअर्जदार क्र.1 ही नोंदणीकृत संस्‍था आहे. त्‍यांनी महाळजा येथील सर्व्‍हे नंबर 26/1 येथील 6 एकर दोन गूंठा जमिन विकत घेतली. त्‍यांचा फेरफार झालेला आहे. सदरील जमीनीचा ले आऊट तयार करण्‍यात आला, पण दरम्‍यान संस्‍थेने विकत घेतलेली जमीन संपादीत केलेली आहे असे कळाले, त्‍यांना कूठल्‍याही प्रकारची नोटीस देण्‍यात आली नव्‍हती आणि संस्‍थेच्‍या नांवे कूठल्‍याही प्रकारचा निवाडा अदयाप पावेतो देण्‍यात आलेला नाही. कोणतीही रक्‍कम त्‍यांनी उचलेली नाही. एकता ट्रेडींग कंपनीकडून संस्‍थेने प्‍लॉट विकत घेतलेली नाहीत. त्‍यामुळे त्‍यांनी संगनमत
 
केल्‍याचे आरोप चूकीचा आहे. राघवेंद्र नगर सोसायटीला पैसे मिळाल्‍यानंतर ते पैसे भूंखडधारकास देण्‍यास संस्‍था तयार आहे. त्‍यांनी ताराबाई कोळी यांना कधीही पञ दिले नाही, त्‍यांच्‍या सहीचा दूरुपयोग केल्‍याचे दिसून येते. इतर सर्व विपरीत विधाने खारीज करुन तक्रार खारीज करावी असा उजर घेतला.
          गैरअर्जदार क्र.6 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचे विरुध्‍द प्रकरण दाखल करावयास कोणतेही कारण नाही, कारण त्‍यांचेकडून सेवेत कमतरता झालीच नाही. परिच्‍छेद नंबर1,2,3,4,5 अमान्‍य. परिच्‍छेद नंबर 6 मधील मजकूरा प्रमाणे अर्जदाराने बचत खात्‍याचा नंबर दिलेला नाही त्‍यामूळे गैरअर्जदार काही म्‍हणणे मांडू शकत नाहीत. परिच्‍छेद नंबर 7 ते 12 अमान्‍य.
          तक्रारदाराने स्‍वतःचे शपथपञ, वकिलामार्फत गैरअर्जदाराना दिलेली नोटीस, संस्‍थेचे शेअर्स प्रमाणपञ,संस्‍थेचे प्‍लॉट अलाऊट प्रमाणपञ, अर्जदार  याचे शपथपञ, दि.10.11.2008 रोजी मा. भूसंपादन अधिकारी जिल्‍हाधिकारी कार्यालय यांना दिलेले पञ,इत्‍यादी कागदपञे दाखल केली आहेत.
          गैरअर्जदारातर्फे लॅन्‍ड अक्‍वीजीशन अवार्ड, 7/12 चा उतारा, रिझूलूशन दिनांक 19.12.2000, तसेच 7/12 गट क्र.26/1 गांव म्‍हाळजा यांची सत्‍य प्रत, गैरअर्जदारातर्फे शेख हूसेन शेख अहमद, अजय गणपतराव वाघमारे यांची शपथपञ दाखल केली आहेत.
           या प्रकरणात काही महत्‍वाचे मूददे विचारात घेण्‍याजोगी आहे ते खालील प्रमाणे,
                   मूददे
1.        संस्‍थेच्‍या सभासदाना ग्राहक म्‍हणून ग्राहक मंचात
          दाद मागता येते काय व त्‍यामुळे मंचास अधीकारक्षेञ
          आहे काय ?
2.                      तक्रार मूदतीत आहे काय ?
3.                      गैरअर्जदार क्र.2 ते 5 व गैरअर्जदार क्र.1 यांच्‍यामध्‍ये संगनमत
3.          असल्‍याचे दिसून येते काय ?
उत्‍तर मूददा क्र. 1 -
         सहकारी संस्‍थेचे सभासद हे संस्‍थेचे सभासद असले तरी त्‍यांना ग्राहक म्‍हणून संस्‍थेच्‍या विरुध्‍द दाद मागता येते. या संबंधीची स्थिती ही वरिष्‍ठ न्‍यायालयांनी वेळोवेळी विविध निकालातून स्‍पष्‍ट केलेली आहे.
‘’कराळ ट्रेडींग कंपनी विरुध्‍द कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी शेतकरी विणकरी सहकारी संस्‍था’’ 2006 III CPJ 390 या ठिकणी प्रकाशीत झालेल्‍या मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या निकालात या संबंधीचा स्‍पष्‍ट निर्णय घेण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे या संदर्भात घेतलेल्‍या आक्षेपात फारसे तथ्‍य नाही. शिवाय सर्व अर्जदारांनी प्‍लॉट खरेदी साठी रक्‍कम दिली आहे.
उत्‍तर मूददा क्र. 2 -
              गैरअर्जदारांनी घेतलेला दूसरा महत्‍वाचा आक्षेप, ही तक्रार मूदतीत नाही अशा स्‍वरुपाचा आहे. यातील अर्जदाराच्‍या प्‍लॉटच्‍या संबंधीत मोबदल्‍याची रक्‍कम इतर 40 प्‍लॉट धारकांच्‍या रक्‍कमेसह भूसंपादन अधिका-याकडून गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी स्विकारलेली आहे, ती रक्‍कम 9 लाखांवर आहे. ही बाब या संबंधी दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवज ज्‍यांचे नांव ‘’समंतीपञ’’ असे आहे. हा दस्‍ताऐवज 3 जानेवारी 1999 चा आहे. त्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी स्‍पष्‍ट केलेले आहे की, त्‍यांना संपूर्ण मोबदल्‍यांची रक्‍कम धनादेश स्‍वरुपात देण्‍यात यावी त्‍यांनी भूखंडाची विक्री केलेली होती. ज्‍या ज्‍या भूखंडाची विक्री केली त्‍यांना मोबदल्‍याची रक्‍कम देण्‍यास ते तयार आहेत. त्‍या संबंधी संबंधीत प्‍लॉट धारकाचा वाद नाही. सदरच्‍या दस्‍ताऐवज नोटरीकडून साक्षांकीत करुन घेण्‍यात आलेला आहे. सन 1999 न्रतर वेळोवेळी अर्जदार हे त्‍यांची रक्‍कम मिळावी म्‍हणून प्रयत्‍न करीत आहेत हे दिसून येते माञ त्‍यांना मोबदल्‍याची रक्‍कम प्रत्‍यक्षात देण्‍यात आलेली नाही. त्‍यांनी जिल्‍हाधिका-याकडे तक्रार केलेली आहे. परंतु तरीही रक्‍कम मिळालेली नाही. या गैरअर्जदारांनी तसा प्रयत्‍न केला नाही. अर्जदारांनी मागणी करुन व ही तक्रार दाखल करुनही रक्‍कम दिली नाही, उलट खोटे उजर घेत आहेत. गैरअर्जदार क्र.2 व 5 यांनी आपल्‍या जवाबातच नमूद केलेले आहे की, ज्‍या प्‍लॉटधारकाची जमीन स्विकारली आहे त्‍या प्‍लॉटधारकांची एकता ट्रेडींग कंपनी ही मिळालेल्‍या मावेजाची रक्‍कम देण्‍यास बंधनकारक आहेत. ज्‍याअर्थी गैरअर्जदार एकता ट्रेडींग कंपनीचे भागीदार हे मान्‍य करतात की, त्‍यांना संबंधीत प्‍लॉटधारकाची रक्‍कम उचलली आहे व ती  ते  देण्‍यास जबाबदार आहेत तेव्‍हा अशा परिस्थितीत आमच्‍या मते ते
स्‍वत कबूल करीत असल्‍यामुळे मूदतीचा प्रश्‍न निर्माण होत नाही. गैरअर्जदार क्र.1  यांनी सूध्‍दा कबूल केले आहे की, त्‍यांना रक्‍कम मिळाल्‍यास ते रक्‍कम देण्‍यास अर्जदारास तयार आहेत असे नमूद केलेले आहे. मावेजा रक्‍कम गैरअर्जदार यांनी घेतली पण अद्याप अर्जदार यांना दिली नाही व आजही देण्‍यास इन्‍कार करत नाहीत--- कॉज ऑफ अक्‍शन आजही चालू आहे. त्‍यामुळे सदर प्रकरणात मूदतीचा मूददयाचा प्रश्‍न निर्माण होत नाही.
उत्‍तर मूददा क्र. 3 -
          या प्रकरणात एक महत्‍वाची बाब अशी की, सन 1999 मध्‍ये अर्जदाराच्‍या प्‍लॉट संबंधीची रक्‍कम एकता ट्रेडींग कंपनीने उचलेली. भूसंपादन अधिका-यासमोर सदरच्‍या रक्‍कमे संबंधी भूखंड देण्‍या बाबतचे लिखीत सांक्षाकीत अभीलेख दिले आणि आजपर्यत त्‍या रक्‍कमा संबंधीताना दिल्‍या नाहीत. जेव्‍हा की अर्जदार त्‍यांची मागणी करीत होते. नोटीस दिली. मंचात तक्रार दाखल केली तरीही ते रक्‍कम देत नाहीत. यासर्व बाबीवरुन एक स्‍पष्‍ट होते की, यातील अर्जदाराच्‍या रक्‍कमा हडप करण्‍याचा संबंधीताचा हेतू होता. ही अतीशय गंभीर बाब आहे कारण अर्जदार हे सर्वसामान्‍य वर्गातील लोक आहेत. या संदर्भात मा. राष्‍ट्रीय आयोगाने उमाशंकर भट विरुध्‍द पंजाब व सिंध बँक यांच्‍यातील दिलेला निकाल, जो  III 2008 CPJ 31 (NC), याठिकाणी प्रकाशीत झालेला आहे. यातील परिच्‍छेद क्र.31 मध्‍ये हे स्‍पष्‍ट केलेले आहे की,
                   “ In such circumstances, a helpless man was not required to rush to the Court for which he has to spend both time and money. In the peculiar facts and circumstances of this case, and also in the interest of justice, this is a fit case for condoning the delay in filing this complaint.   We, therefore, condone the delay, if there is any. ”
     वरील निकालाच्‍या आधारे वरील प्रकरणातून जर काही विलंब झाला असेल तर तो पोस्‍ट फॅक्‍टो क्षमापीत  करण्‍यात येत आहे.
उत्‍तर मूददा क्र. 4 -
          सदर प्रकरणात तक्रारदाराची एक महत्‍वाची तक्रार अशी आहे की, यातील गैरअर्जदार क्र. 2 ते 5 आणि गैरअर्जदार क्र.1  ही संस्‍था व त्‍यांचे पदाधिकारी यांच्‍यामध्‍ये आपसात संगनमत आहे व ते सर्व आपसात
जूळलेले आहेत आणि त्‍यांनी संगनमताने हा प्रकार केलेला आहे.
       यातील गैरअर्जदार क्र.1 या संस्‍थेचे अर्जदार सभासद आहेत. गैरअर्जदार क्र.1 व त्‍यांचे अध्‍यक्ष व पदाधिका-यात  या बाबीची जाणीव आहे की, त्‍यांच्‍या संस्‍थेच्‍या सभासदाचे प्‍लॉट हे अर्जीत करण्‍यात आले जे भूखंड सभासदाना देय होते ते त्‍यांनी प्‍लॉट अलाऊटमेंट प्रमाणपञाद्वारे मंजूर केलेले होते, (त्‍या बाबी गैरअर्जदार क्रमांक 1 ने नाकारल्‍या नाहीत.) त्‍यांचा मोबदला सभासदना मिळाला नाही तो एकता ट्रेडींग कंपनीने उचलेला आहे. तेव्‍हा गैरअर्जदार क्र.1 या संस्‍थेच्‍या पदाधिका-याचे आद्य कर्तव्‍य आहे की, त्‍यांनी आपल्‍या सभासदाना अर्जीत भूखंड मोबदल्‍याची रक्‍कम त्‍यांना मिळून दयावी, त्‍यांनी तसे काहीही केलेले नाही ही त्‍यांची भूमिका अत्‍यंत सशंयास्‍पद तसेच ञूटी पूर्ण सेवा देणारी आहे. गैरअर्जदार क्र.1 या संस्‍थेचे अध्‍यक्ष हे गणपत वाघमारे आहेत तर अजय गणपत वाघमारे हे एकता ट्रेडींग कंपनीचे भागीदार आहेत. मंचासमोर दाखल दस्‍ताऐवजातील एक दस्‍ताऐवजावरुन त्‍यांचे  स्‍वरुप ‘’ठराव’’ असे आहे व जे ठराव एकता ट्रेडींग कंपनीने आपल्‍या भागीदाराच्‍या उपस्थितीत केलेले आहेत व डॉ. कोटलवार यांच्‍या घरी करण्‍यात आलेले आहेत, यामध्‍ये उर्वरित प्‍लॉटधारकाना रक्‍कमेचे वाटप करण्‍याची जबाबदारी सौ. भाग्‍यलक्ष्‍मी कोटलवार व शेख हूसेन यांना देण्‍यात आलेले आहे, या ठरावात एकता ट्रेडींग कंपनीची भागीदार म्‍हणून अजय गणपत वाघमारे, सूभाष हौसाजीराव मंगनाळे, शेख हूसेन,  सौ. कोटलवार यानी सहया केलेल्‍या आहे व साक्षीदार म्‍हणून डॉ.गणपतराव वाघमारे, हौसाजीराव मंगनाळे, श्री. दिनकर कोटलवार , शेख अहमद   यांनी सहया केलेल्‍या आहेत. म्‍हणून ही सर्व मंडळी एकमेकांशी संबंधीत दिसतात असे असताना गैरअर्जदार क्र.1 ने काहीही कारवाई न करणे व गैरअर्जदार क्र.2 ते 5 यांनी त्‍यांना कोणताही अधिकार नसताना भूखंडाची रक्‍कम उचलली व त्‍याचेही वाटप संबंधीताने न करणे असा प्रकार दिसून येतो. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या या म्‍हणण्‍यात तथ्‍य दिसून येते. यातील गैरअर्जदारांनी राघवेंद्र नगर सहकारी संस्‍थेचे सभासद म्‍हणून त्‍यांचा कोणताही संबंध नाही व संस्‍थेचे पदाधिकारी कोण आहेत असा कोणताही पूरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.
गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांचा असाही आक्षेप आहे की, अर्जदारांनी वेगवेगळी तक्रार दाखल न करता एकञित तक्रार दाखल केलेली आहे व ती तक्रार कायदेशीर नाही. मा. राजस्‍थान ग्राहक वाद निवारण आयोगाने, राजस्‍थान रोड स्‍टेट कार्पोरेशन विरुध्‍द सूनिल कूमार यांच्‍यातील निकाल, जो III 2005 CPJ 568  याठिकाणी प्रकाशीत झालेला आहे. त्‍यात स्‍पष्‍टपणे निदेर्शीत केले आहे की, अशा प्रकारची संयूक्‍त तक्रार कोणतीही परवानगी न घेता दाखल केल्‍या जाऊ शकते. त्‍यामुळे त्‍या आक्षेपात तथ्‍य नाही.
     वरील सर्व बाबींवरुन हा सर्व गंभीर स्‍वरुपाचा मामला आहे व अर्जदारांचे न्‍याय हक्‍क मारल्‍या गेले आहेत हे उघड होते. अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 मार्फत गैरअर्जदार क्र. 2 ते 5 यांचे लाभार्थी ग्राहक ठरतात. 
     गैरअर्जदार क्र.6 ही बँक असून गैरअर्जदार क्र.2 ते 5 यांचे त्‍यांचेकडे खाते आहे, त्‍यांनी खात्‍यावर चेक भरणे, रक्‍कम काढणे ईत्‍यादी व्‍यवहार नियमानुसार केले, बँकेनी अर्जदार यांचेशी व्‍यवहार केला नाही ही जबाबदारी बँकेची नाही म्‍हणून ते जबाबदार नाही.
वरील सर्व गोष्‍टीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                           आदेश
1.   तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.   गैरअर्जदार क्र.1 ते 5 यांनी संयुक्‍तरित्‍या व वैयक्‍तीकरित्‍या,भुसंपादन
अधिका-यांनी निर्धारि‍त केलेल्‍या अवार्ड प्रमाणे येणारी सर्व लांभासह मोबदल्‍याची रक्‍कम जी अर्जदाराच्‍या हिश्‍यात येईल तेवढी रक्‍कम ती उचलल्‍याची दि.03.01.1999 पासून रक्‍कम अदा होईपर्यत द.सा.द.शे. 18% व्‍याजासह आदेश प्राप्‍त झाल्‍यापासून अर्जदारांना एक महिन्‍याच्‍या आंत परत करावी.
3.   अर्जदारांना झालेल्‍या मानसिक ञासाबददल प्रत्‍येकी रु.5000/-   गैरअर्जदारांनी संयूक्‍तीक व वैयक्‍तीकरित्‍या दयावेत.
4.   या निकालाची एक प्रत वीशेष भूसंपादन अधिकारी पाझर तलाव व ल.सि.का.क्र.1 नांदेड यांना पाठविण्‍यात यावी, त्‍यांनी या प्रकरणी संबंधीत पोलिस स्‍टेशनकडे दोषी व्‍यक्‍तीच्‍या विरुध्‍द योग्‍य ती चौकशी करुन  कार्यवाही होण्‍यासाठी, फिर्याद दाखल करावी असे निर्देशीत करण्‍यात येते. यातून उदभवणा-या संभाव्‍य फौजदारी प्रकरणी या निकालात व्‍यक्‍त करण्‍यात आलेली मते विचारात घेण्‍यात येऊ नये.
5.   गैरअर्जदार क्र.6 यांचे विरुध्‍द आदेश नाही.
6.   दावा खर्च ज्‍यांचे त्‍यांनी आपआपला सोसावा.
7.   पक्षकारांना निकाल कळवावा.
8.   आदेशाचे पालन एक महिन्‍यात करावे.
9.   एकत्रीत निकालाची मुळ प्रत प्रकरण क्र.379/2008 मध्‍ये ठेवण्‍यात  
येते.
 
 
श्री.बी.टी.नरवाडे,पाटील                                                                    श्री. सतीश सामते              
    अध्‍यक्ष                                                                                              सदस्‍य
 
जयंत पारवेकर,
लघुलेखक,