Atul Giri, filed a consumer case on 21 Nov 2013 against Ganesh Kamal Developers, Director - Suryakant Shete, in the Pune Consumer Court. The case no is CC/12/571 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
| ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
यावरुन गणेश कमल डेव्हलपर्स यांनी तक्रारदारांना अदा केलेला रक्कम रु. 73,750/- चा धनादेश (क्र. 152155) वटलेला नसल्याने तक्रारदारांना त्यातील रक्कम मिळालेली नाही, हे स्पष्ट होते. याबाबतची माहिती तक्रारदारांनी जाबदेणारांना दिल्याचे प्रस्तुत प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दि. 22/10/2011 च्या तक्रारदारांनी पाठविलेल्या पत्रावरुन व दि. 1/8/2012 च्या विधीज्ञामार्फत देण्यात आलेल्या नोटीसीवरुन दिसून येते आणि तरीदेखील जाबदेणारांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल न घेवून, त्यांना रक्कम परत करण्याची टाळाटाळ केल्याचेही प्रस्तुत प्रकरणी स्पष्ट होते. जाबदेणारांना संधी असूनही प्रस्तुत प्रकरणी हजर होवून तक्रारदारांच्या तक्रारीचे त्यांनी खंडन केलेले नाही. यावरुन तक्रारदारांना उर्वरीत बयाणा रक्कम न देवून, त्यांच्या या बाबतच्या तक्रारीची दखल न घेवून त्यांना दुषीत सेवा दिल्याचे प्रस्तुत प्रकरणी शाबीत होते. 5] तक्रारदारांनी, जाबदेणारांना रक्कम रु. 1,25,000/- दिल्याचे दाखल पावत्यांवरुन शाबीत झालेले आहे. त्यापैकी रक्कम रु. 50,000/- परत मिळाल्याचे तक्रारदारांनी स्वत: मान्य केलेले आहे. त्यामुळे बयाणा रक्कम रु. 1,25,000/- मधून रक्कम रु. 50,000/- वजा जाता उर्वरीत रक्कम रु. 75,000/- जाबदेणार, तक्रारदारांना देणे लागतात, हे प्रस्तुत प्रकरणी शाबीत होते. आणि म्हणून तक्रारदारांना रक्कम रु. 75,000/- मंजूर करण्यात येतात. या रकमेवर दि. 4/5/2012 पासून म्हणजेच रक्कम रु. 73,750/- चा धनादेश प्रथम ज्या दिवशी न वटता परत आला, त्या दिवसापासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याज मंजूर करण्यात येते. प्रस्तुत प्रकरणी मंजूर रकमेवर व्याज देण्यात आल्याने मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई देणेत आलेली नाही. जाबदेणारांनी तक्रारदारांना दिलेल्या दुषित सेवेमुळे तक्रारदारांना तक्रार अर्जास सामोरे जावे लागले, त्यकरीता म्हणून रक्कम रु. 3,000/- मंजूर करण्यात येत आहेत. सबब मंचाचा आदेश की, ** आदेश ** 1. यातील जाबदेणारांनी तक्रारदारांना रक्कम रु. 75,000/- (रु. पंच्याहत्तर हजार फक्त) दि. 4/5/2012 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजदराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत अदा करावी. 2. यातील जाबदेणारांनी तक्रारदारांना तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 3,000/- (रु. तीन हजार फक्त) आदेशाची प्रत मिळाल्या पासून सहा आठवड्यांच्या आंत अदा करावी. 3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी. 4. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील. स्थळ : पुणे दिनांक : 21/नोव्हे./2013 |
[HON'ABLE MR. V. P. UTPAT] |
PRESIDENT |
[HON'ABLE MS. Geeta S.Ghatge] |
MEMBER |
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.