निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार संस्थेच्या सचिवांनी व सामनेवाला क्र.2 ते 11 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदार पतसंस्थेने सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | दि.31.12.07 पर्यन्त व्याजासह होणारी रक्कम | 1. | 456 | 25000/- | 09.07.2001 | 09.07.2002 | 49308/- | 2. | 476 | 25000/- | 29.09.2001 | 29.09.2002 | 48465/- | 3. | 478 | 25000/- | 29.09.2001 | 29.09.2002 | 48465/- | 4. | 479 | 25000/- | 22.10.2001 | 22.10.2002 | 48229/- | 5. | 480 | 20000/- | 22.11.2001 | 22.10.2002 | 38583/- | 6. | 487 | 25000/- | 15.10.2001 | 15.11.2002 | 47983/- | 7. | 496 | 25000/- | 24.10.2001 | 24.12.2002 | 47583/- | 8. | 220 | 20000/- | 17.05.2002 | 17.05.2003 | 34631/- | 9. | 225 | 25000/- | 18.07.2002 | 18.07.2003 | 42746/- | 10. | 226 | 25000/- | 18.07.2002 | 18.07.2003 | 42746/- |
(3) वरील ठेव पावत्यांची मुदत संपल्यानंतर तक्रारदार संस्थेने सामनेवाला संस्थेकडे पाठपुरावा केला असता सामनेवाला यांनी तक्रारदार संस्थेच्या पदाधिका-यांना सर्वच ठेव पावत्यांची रक्कम एकदम देव असे म्हणून दिशाभूल करत वेळ घालविण्याच्या प्रयत्न केला. तदनंतर, सामनेवाला पतसंस्थेने दि.15.12.2004 रोजीपर्यन्त ठेवींची रक्कम देत असलेबाबत लेखी कळविले, परंतु सामनेवाला संस्थेने काहीही रक्कम दिली नाही. तदनंतर पुन्हा दि.17.10.2005 रोजीपर्यन्त ठेव रक्कम देत असलेबाबतचे पत्र दिले, परंतु त्यानंतरही ठेवीची रक्कम दिली नाही. त्यामुळे तक्रारदार संस्थेने दि.05.07.2005 व दि.12.07.2005 रोजी पत्रव्यवहार केला. तसेच, दि.14.01.2008 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठवून ठेव रक्कमा अदा करणेबाबत कळविले. सदर नोटीसीस सामनेवाला यांनी उत्तर दिलेले नाहीत, तसेच ठेव रक्कमाही अदा केलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, ठेवी मिळणेबाबत केलेला पत्रव्यवहार व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) सामनेवाला क्र.2 ते 11 यांनी त्यांच्या एकत्रित म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.12 हे सहकार खात्याच्या पॅनेलवरील लेखा परिक्षक असून विजय देसाई (चेअरमन) त्यांचे व संचालक मंडळातील काही संचालक यांचेशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या सर्वांनी हेतुपूर्वक व जाणीवपूर्वक आर्थिक व्यवहार केलेला आहे. सामनेवाला संस्थेचे संबंधीत पदाधिकारी व चेअरमन, विजय देसाई व सेक्रेटरी-खुटाळे यांच्याशी संगनमत करुन तक्रारदार संस्थेची ठेव सामनेवाला संस्थेत ठेवली असे दाखवून विजय देसाई यांनी स्वत: व नातेवाईकांच्या नांवावर सदर रक्कम कर्ज म्हणून उचल केल्याचे दाखविले आहे. तसेच, सामनेवाला संस्थेचे मॅनेजर खुटाळे व पदाधिकारी यांनी संगनमताने सदरची रक्कम वापरलेचे दिसून येते. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांची कोणतीही जबाबदार येत नाही. तसेच, तक्रारदार संस्थेने ठेवी ठेवल्या त्यावेळी प्रस्तुत सामनेवाला संचालक म्हणून कार्यरत नव्हते. तक्रारदार संस्थेने ठेवीच्या मागणीसंबंधी कोणतीही सुचना दिलेली नाही. तक्रारदार संस्थेचे तत्कालिन चेअरमन, संचालक, सामनेवाला संस्थेचे चेअरमन देसाई व मॅनेजर खुटाळे यांचे संगनमताने तथाकथित रक्कम नियोजनबध्दरित्या अपहार करणेचे हेतूने व दिशाभूल करणेसाठी रक्कम दि.15.12.2004 व दि. 17.12.2005 पर्यन्त देत असलेची चेअरमन देसाई व मॅनेजर खुटाळे यांच्या सहीची पत्रे तयार करण्यात आली आहेत. सन 2000 पूर्वी चेअरमन देसाई व मॅनेजर खुटाळे यांनी सर्व व्यवहार केले असल्यामुळे सर्व व्यवहारांची जबाबदारी त्यांची असलेबाबत रुपये 100/- च्या स्टॅम्पवर लिहून दिले आहे. तक्रारदारांची तक्रार मुदतीत नाही. तसेच, तक्रारदार व सामनेवाला संस्था सहकारी संस्था असल्यामुळे याबाबतचा वाद सहकार कायदा कलम 91 प्रमाणे सहकार न्यायालयात चालणे आवश्यक आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. (6) सामनेवाला क्र.1 व 12 यांनी त्यांच्या एकत्रित म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार संस्थेला भेट देवून कर्जदारांकडून पेसे वसूल झालेनंतर वेळोवेळीच्या व्याजदराप्रमाणे हिशेब होवून हप्त्याहप्त्याने रक्कम देतो असे तोंडी सांगितले. सामनेवाला हे तक्रारदार संस्थेचे पैसे देण्यास तयार आहेत. परंतु, इतर सामनेवाला हे जाणूनबुजून सहकार्य करीत नाहीत. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
(7) सामनेवाला क्र.13 यांची दि.29.03.2008 रोजीच्या आदेशान्वये अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र दप्तरी चार्ज न मिळालेने संस्थेकडे ठेवीबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही असे म्हणणे दाखल केले आहे.
(8) उपरोक्त तक्रारीतील ठेवींच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदरच्या ठेव रक्कमा व्याजासह देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदार पतसंस्थेने केली आहे. सामनेवाला क्र.2 ते 11 यांनी तक्रारदार व सामनेवाला संस्था सहकारी संस्था असल्यामुळे याबाबतचा वाद सहकार कायदा कलम 91 प्रमाणे सहकार न्यायालयात चालणे आवश्यक आहे असे कथन केले आहे. तक्रारदार पतसंस्था ही विधिमान्य व्यक्ती (Juristic Person) आहे व तक्रारदार पतसंस्थेने सामनेवाला पतसंस्थेकडे ठेव ठेवली आहे. सदर मुद्दयाचा विचार करता तक्रारदार पतसंस्था ही सामनेवाला पतसंस्थेची ग्राहक होते व प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होतो. सबब, सदरचा वाद या मंचासमोर चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारीचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.1 म्हणून श्री.विजयकुमार गणपतराव देसाई, चेअरमन यांचे नमूद केलेले नांव खोडून त्या ठिकाणी केवळ चेअरमन, श्री गणेश ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आंबवणे असे सामनेवाला क्र.1 म्हणून नमूद केलेचे दिसून येते. युक्तिवादाचे वेळेस तक्रारदार संस्थेचे उपस्थित सचिव व सामनेवाला क्र.2 ते 11 यांचे वकिलांना विचारणा केली असता सदरची खाडाखोड कोणी केली याबाबत त्यांना माहित नसलेचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच, सदर खाडाखोडीस तक्रारदार संस्थेच्या प्रतिनिधींनी अगर त्यांच्या वकिलांनी यापूर्वी हरकत घेतलेली नाही. तसेच, सामनेवाला क्र.2 ते 11 यांच्या म्हणण्याचे अवलोकन केले असता सदर म्हणण्यात सामनेवाला क्र.2 ते 11 यांनी सर्व जबाबदारी चेअरमन, विजयकुमार देसाई व मॅनेजर खुटाळे यांचेवर ढकलल्याची दिसून येते. इत्यादी बाबींवरुन श्री.विजयकुमार गणपतराव देसाई, चेअरमन यांना सामनेवाला म्हणून प्रस्तुत प्रकरणी समाविष्ट करणेची तक्रारदार संस्थेची इच्छा नसलेचे दिसून येते. त्यामुळे सामनेवाला संस्थेच्या संचालकांची तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा करणेबाबतची जबाबदारी निश्चित करीत असताना सामनेवाला संस्थेच्या चेअरमनना जबाबदार न धरता सामनेवाला क्र.2 ते 11 यांना तक्रारदार संस्थेच्या ठेव रक्कमा अदा करणेकरिता वैयक्तिक धरणे न्यायोचित होणार नाही. सबब, इक्विटीचा विचार करुन सामनेवाला क्र.1 ते 11 या पदाधिका-यांना/संचालकांना तक्रारदार संस्थेच्या ठेव रक्कमा अदा करणेकरिता वैयक्तिकरित्या जबाबदार न धरता केवळ संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, सामनेवाला क्र.12 व 13 हे अनुक्रमे संस्थेचे कर्मचारी व शासकिय अधिकारी असल्याने त्यांचीही तक्रारदार संस्थेच्या ठेव रक्कमा अदा करणेकरिता संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(12) तक्रारदार संस्थेने ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला संस्थेने यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार संस्था ही मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
(2) सामनेवाला क्र.1 ते 11 यांनी संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.12 व 13 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे.
अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 456 | 25000/- | 2. | 476 | 25000/- | 3. | 478 | 25000/- | 4. | 479 | 25000/- | 5. | 480 | 20000/- | 6. | 487 | 25000/- | 7. | 496 | 25000/- | 8. | 220 | 20000/- | 9. | 225 | 25000/- | 10. | 226 | 25000/- |
(3) सामनेवाला क्र.1 ते 11 यांनी संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.12 व 13 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदार संस्थेस मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |